मुख्यमंत्र्यांची इच्छा.. राज्यपालांचा आग्रह...
साकारले पहिले स्वतंत्र महिला पोलिस स्टेशन राणीपुल
पवनकुमार चामलिंग यांनी सिक्किमच्या मुख्यमंत्रीपद पाचव्यांदा शपथविधी घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याचे अभिवचन दिले होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, मंत्री मंडळ, आमदार, गंगटोकचे नगरसेवक यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. राज्याच्या प्रगतीबरोबरच कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने एकमत घेतले.
याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांचा पायलट प्रोजक्ट म्हणून स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनच्या निर्मितीचा पाया रचला. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्यानंतर सिक्किम राज्यात पहिल्या स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याची निर्मिती झाली.
![]() |
| महिला पोलीस ठाणे उद्घाटन प्रसंगी फोटो |
तिमितारक (दक्षिण), फुडोंग (उत्तर), कलूक (पश्चिम) आणि राणीपूल (पूर्व) अशा चार ठिकाणी स्वतंत्र महिला पोलिस ठाणे नियोजन करण्यात आले आहे. मार्च 2016 रोजी पूर्व सिक्किम जिल्ह्यातील राणीपूल येथे स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले. तायक्वांदोमध्ये इंडोनेशिया, रशिया, भूतान या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविलेल्या सावित्री प्रधान या डॅशिंग महिला अधिकाऱ्याची पोलिस इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली.
महिलांचे स्वतंत्र पोलिस स्टेशन हा सिक्किमकरांसाठी वेगळा अनुभव होता. मात्र सर्व प्रकारचे चांगले बदल तात्काळ स्विकारण्याची तयारी असलेल्या लोकांनी राणीपूल पोलिस स्टेशनला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. वास्तविक हे पोलिस स्टेशन जुने आहे. या ठिकाणी अनेक वरिष्ठ अनुभवी पुरूष पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काम केले होते. त्यांनी महिला पोलिस ठाणे झाल्यानंतर आनंदाने बदल स्विकारला. सावित्री प्रधान यांच्या नेतृत्वाखाली 3 सिनियर ऑफिसर्स, 2 सब इन्स्पेक्टर, 24 कॉन्स्टेबल आणि 10 ऍडिशनल रिझर्व्हड् पोलिस बटालियन असा महिला पोलिस स्टाफ गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागला आहे. या पोलिस ठाण्यात आता सर्व महिलाच आहेत.
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सावित्री प्रधान यांना विशेष पदक देवून राज्य शासनाने गौरविले होते. मनिपूर येथे स्पर्धेला जाण्यापूर्वी राज्यपालांनी प्रधान यांना 50 हजार रुपयांची खास मदत देऊ केली होती. सावित्री प्रधान या तायक्वांदो स्पेशालिस्ट, डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत याबाबत मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी कौतुक केले आहे. महिला पोलिस ठाण्याच्या अधिकारी दणकट पाहिजेत. यासाठी ती स्पोर्टस् वूमनच हवी. या निकषाखालीच प्रधान यांची पोलिस ठाण्याच्या प्रमुख म्हणून निवड झाली.
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या भेटीदरम्यान त्यांनी सावित्री प्रधान यांच्याबाबत माझ्याजवळ भरभरुन कौतुक केले होते. राज्यपालांच्या सुचनेनूसार मी या पोलिस ठाण्याला भेट दिली. तेव्हा सिनियर इन्स्पेक्टर अंकिता यांनी आमचे स्वागत केले. प्रधान मॅडम गंगटोक-बागडोग्रा दरम्यान रस्त्यावर अपघात झाल्यामुळे तिकडे गेल्याचे अंकिता यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण पोलिस स्टेशन फिरून दाखवून अंकिता यांनी महिला पोलिस ठाण्याचे अनुभव सांगितले.
अंकिता म्हणाल्या, "आम्ही महिला असलो तरीही सर्व बाजूंनी सक्षम आहोत. यापूर्वी आम्ही पुरूष अधिकाऱ्यांसोबत काम केले आहे. कामाचा अनुभव आहे. त्या दरम्यान पीडित महिला ठाण्यात आली तर पुरूष पोलिसांमुळे बोलायला कचरत होते, असा अनुभव होता. आता मात्र आमच्या ठाण्यात आम्ही सर्व महिला आहोत. त्यामुळे पीडित महिला कचरत नाहीत. आम्ही सकाळी 8.30 ते सायं. 6.30 आणि सायंकाळी 6.30 ते सकाळी 8.30 अशा दोन शिफ्टमध्ये काम करतो. कसलीच अडचण येत नाही. सिक्किममध्ये क्राईम रेट खूप कमी आहे.
नो पाॅलिटीकल प्रेशर
वर्षभरात एखाद्या ठाण्यात 50 ते 60 गुन्हे दाखल होतात. राणीपूलमध्ये 2015 मध्ये 62 गुन्हे दाखल झाले होते. सिनियर अधिकारी सावित्री प्रधान या पूर्णवेळ पोलिस ठाण्यात असतात. आम्हा महिला पोलिसांना कसलीही अडचण आली तर धावून येतात. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे. आम्हाला काम करताना कोणताच दबाव येत नाही. पोलिस स्वतंत्रपणे काम करतात. राजकीय दबाव नसल्यामुळेच सिक्किममध्ये पोलिसांचा दबदबा आहे आणि त्यामुळेच आम्ही गुन्ह्यांवर नियंत्रण ठेऊ शकतो.' , असे सिनियर अधिकारी अंकिता यांनी सांगितले.
डॅशिंग सावित्री मॅडम ठाणे प्रमुख
नो पाॅलिटीकल प्रेशर
वर्षभरात एखाद्या ठाण्यात 50 ते 60 गुन्हे दाखल होतात. राणीपूलमध्ये 2015 मध्ये 62 गुन्हे दाखल झाले होते. सिनियर अधिकारी सावित्री प्रधान या पूर्णवेळ पोलिस ठाण्यात असतात. आम्हा महिला पोलिसांना कसलीही अडचण आली तर धावून येतात. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे. आम्हाला काम करताना कोणताच दबाव येत नाही. पोलिस स्वतंत्रपणे काम करतात. राजकीय दबाव नसल्यामुळेच सिक्किममध्ये पोलिसांचा दबदबा आहे आणि त्यामुळेच आम्ही गुन्ह्यांवर नियंत्रण ठेऊ शकतो.' , असे सिनियर अधिकारी अंकिता यांनी सांगितले.
डॅशिंग सावित्री मॅडम ठाणे प्रमुख
ठाण्याच्या निरीक्षक सावित्री प्रधान यांचे दरम्यान आगमन झाले. साडेपाच फूट उंचीच्या या डॅशिंग महिला अधिकाऱ्याचा रुबाब व आत्मविश्वास डोळ्यातच दिसत होता. राज्यपालांच्या सूचनेनुसार आम्ही इथे आलो आहे, असे सांगितल्यानंतर प्रधान यांनी "वो बहोत अच्छे आदमी हैं, उन्होंने हम महिलाओें को बहोत सन्मान दिया हैं,' असे त्यांनी उत्साहाने सांगितले. लहानपणापासूनच मला पोलिस क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा होती. वडिल लहानपणीच वारले. आईला भिती वाटायची. मात्र तरीही मी पोलिस सेवेत दाखल झाले. "मैं सेल्फ डिफेन्स पे विश्वास करती हुँ. गांव-गांव मे लडकियों को इकठ्ठा कर के कॅम्प लेती हुँ और वहां सेल्फ डिफेन्स कि ट्रेनिंग देती हुँ.' असेही सावित्री प्रधान यांनी सांगितले.
पोलीस को पब्लिक का साथ चाहिए
पोलीस को पब्लिक का साथ चाहिए
मी अनेकदा धाडसाने घुसून धडक कारवाई केली आहे. परवा एका तरुणाकडे झोपेच्या प्रमाणापेक्षा अधिक गोळ्या होत्या. त्या बाळगणे इथे गुन्हा आहे. त्याला पकडण्यासाठी मी गेल्यानंतर शरीराने दणकट असलेल्या त्या मुलाला अशा ठिकाणी पकडले की, तो अजिबात हलू शकला नाही. माझ्यासोबत पोलिस फोर्स कमी होता. मात्र तिथे बघ्घ्यांची खूप गर्दी होती. यापैकी कोणीही पोलिसांच्या मदतीला आला नाही. याचे वाईट वाटले. मात्र तरीही आम्ही त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. "पब्लिकने पुलिस को साथ देना चाहिए. तभी पुलिस और अच्छा काम कर सकेगी'अशी आशा व्यक्त करीत काही झालं तरी आम्ही महिला कोठेच कमी नाही असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
गुन्ह्यांचे अत्यल्प प्रमाण
कायद्याची कडक अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सिक्किममध्ये पोलिस चांगले काम करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी महिला आहे म्हणून कधीच त्रास दिला किंवा कार्यालयीन छळवणूक केली असे घडले नाही. पोलिसांच्या चांगल्या कामगिरीमुळेच या वर्षी गेल्या पाच महिन्यांत राणीपूल पोलिस ठाण्यांतर्गत दखल घेण्याइतके कलम 302, 307, 376, 498 आणि प्रोक्सो असेे फक्त 6 गुन्हे घडले आहेत, असे सावित्री प्रधान यांनी सांगितले.
(क्रमश:)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा