फॉलोअर

१६ एप्रिल २०१७

वाढदिवस भारतीय रेल्वेचा

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑ आज १६ एप्रिल*
*आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस*.
➖➖➖➖➖➖➖➖➖
आज १६ एप्रिल १८५३ रोजी या दिवशी बोरीबंदर ते ठाणे देशातली पहिली रेल्वे धावली. भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास ४५ मिनीटांत पहिल्या रेल्वेने पार पाडला होता. या रेल्वेला १४ डब्बे होते. या रेल्वेत जवळपास ४०० लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली. त्यानंतर भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला.
🔲🔲🔲
दरम्यान, १९२४ मध्ये इस्ट इंडीया कमिटीचे चेअरमन विल्यम एक्वठर्थ यांनी रेल्वेअर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळे केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत रेल्वेचे अर्थसंकल्प हे वेगळेच सादर करण्यात येत होते. भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास ५० वर्षानंतर अर्थात १९०९ मध्ये रेल्वेत शौचालये तयार करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान ओखिल चंद्र सेन या प्रवाशाने आपल्या वाईट अनुभवाविषयी साहिबगंज विभागीय कार्यालयास पत्राव्दारे माहिती दिली होती. त्यानंतर या पत्राची दखल घैत ब्रिटीश सरकारने रेल्वेत शौचालयांची सुविधा सुरू केली. सेन यांनी लिहीलेले पत्र आजही भारतीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. तसेच जगात एकाच मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात ११५००० किमीचे रेल्वे रुळ आहेत. दररोज जवळपास १२,६१७ रेल्वे धावतात. तसेच २३ लाख प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात. भारतीय रेल्वे रूळाची एकूण लांबी ही ६४ हजार किमी एवढी आहे. तसेच यार्ड, साइडिंग्स यासर्वांना जोडून रेल्वेरुळाची लांबी ही १ लाख १० हजार किमीपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजही जगातील सर्वात जुन्या वाफेवरची रेल्वे ही आजही भारतात धावते. या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. फेअरी क्वििन नावाची ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते राजस्थान दरम्यान धावते तसेच या रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. 
🔲🔲🔲
जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्वतभूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.
२०१४ मध्ये प्रति तास १६० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेचे यशस्वी चाचणी घेण्यात आले होती. याच्या काही महिन्यानंतर लगेच सेमी हाय स्पीड ट्रेन गतिमान एक्सनप्रेसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास ९० मिनीटात पार करण्यात या रेल्वेला यश आले होते. या ट्रेनमुळे जवळपास प्रवाशांचे ३० मिनीटे वाचली. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्साप्रेस ही सध्या सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १५० किमी प्रति तास असून ही रेल्वे फैजाबादवरून आग्राला पोहचते. तर दुसरीकडे मेतुपलयम ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १० किमी प्रति तास आहे. भारतीय रेल्वेमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये जगातील सर्वात मोठे रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. याच सिस्टीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भारतात ओडीशातील एका रेल्वे स्टेशनला सर्वांत छोटे नाव अर्थात इब असे नाव आहे. तर दुसरीकडे सर्वात मोठे रेल्वे स्टेशनचे नाव म्हणून व्यंकटनरसिंहराजुवारीपटा या स्टेशनला ओळखले जाते. या स्टेशनच्या नावात तब्बल २९ अक्षरे आहेत. हावडा - अमृतसर ही रेल्वे आपल्या निश्चीेत ठिकाणा पर्यंत पोहचताना जवळपास १११ ठिकाणी थांबते. तसेच आणखी एक बाब म्हणजे गोरखपुरमध्ये जगातील सर्वात लांब अर्थात १३६६.३३ मिटरचे प्लॅटफॉर्म आहे. सध्या देशात त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ही कुठेही न थांबता सर्वांत लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ही रेल्वे वडोदरा-कोटा दरम्यानचा ५२८ किमीचा प्रवास जवळपास ६.५ तासात पुर्ण करते. तसेच भारतीय रेल्वेतून लाखो लोकांना रोजगार मिळतो अशा क्रमवारीत ही जगातील ९ व्या क्रमांकावर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

१० एप्रिल २०१७

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कसे दिले जातात

*🛣National🛣Highway🛣*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔺🙇🏻 मनातील प्रश्न.....*

*☑राष्ट्रीय महामार्गांना.......*
*क्रमांक कसे दिले जातात....?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना १९८८ साली करण्यात आली. देशातील राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम हे प्राधिकरण करतं. भारतात आजवर ५,४७२,१४४ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये ९७,९११ किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.
🔲🔲🔲
गुगल मॅप्स वापरताना आपल्याला अनेकदा AH, NH and SH यांसारखी सांकेतिक चिन्हे दिसतात. त्यापैकी National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग होय आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.
🔲🔲🔲
उत्तर-दक्षिण (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ४००० किमी! पूर्व पश्चिम (पोरबंदर ते सिलचर) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ३३०० किमी!
🔲🔲🔲
सुवर्ण चौकौन मार्ग (The Golden Quadrilateral -GQ) जो दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर आहे ५८४६ किमी!
🔲🔲🔲

*🔺राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?*

सर्व उत्तर-दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.उदा, NH 8: दिल्ली ते मुंबई.
आणि सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो. उदा, NH 13: तवांग ते आसाम *सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.*
🔲🔲🔲
जसजसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पूर्व भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

_उदा. समजा NH 4 हा पूर्व भारतामध्ये आहे , तर NH 34 हा पश्चिम भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते सम संख्या असल्यामुळे उत्तर-दक्षिण जाणारे असणार._
🔲🔲🔲
त्याचप्रकारे जसजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

_उदा. समजा NH 7 हा उत्तर भारतामध्ये आहे , तर NH 83 हा दक्षिण भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते विषम संख्या असल्यामुळे पूर्व-पश्चिम जाणारे असणार._
🔲🔲🔲

*🔺तीन आकडी क्रमांक असणारे महामार्ग मुख्य महामार्गाचे उपमार्ग असतात.*

_उदा. १४४, २४४, ३४४ हे महामार्ग NH 44 चे उपमार्ग आहेत. या उपमार्गांना देण्यात आलेल्या क्रमांकामध्ये जर पहिला क्रमांक हा विषम असेल तर समजावं की तो रस्ता पूर्व-पश्चिम दिशेला स्थित आहे. जर पहिला क्रमांक हा सम संख्या असेल तर समजावं की रस्ता उत्तर-दक्षिण दिशेला स्थित आहे._

_A,B,C,D हे तीन आकडी क्रमांक असणाऱ्या उप महामार्गांच्या नावाशी जोडले जातात. ज्यावरून उपमहामार्गांच्या भागांचे संकेत मिळतात. उदा. 966-A, 527-B_
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🛣National🛣Highway🛣*

०१ एप्रिल २०१७

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया स्थापना दिवस 1 एप्रिल

🏦💰🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑आज १ एप्रिल*
*भारतीय रिझर्व बँकेची स्थापना दिवस.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
१ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना एक खासगी संस्था म्हणून करण्यात आली होती. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत मा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रोब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतल्या गेलेल्या आहेत, बाबासाहेबांनी सादर काम मार्गदर्शक सूचनांनुसार संकल्पना असताना, केंद्रीय विधानसभा सादर मार्गदर्शक तत्त्वे या मार्गदर्शक तत्त्वे पार आधारित संकल्पना होते. १९४९ पर्यंत या केंद्रीय बँकेचे राष्ट्री यकरण झालेले नव्हते.
🔲🔲🔲
आर्थिक देशात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष समजले जाते. मात्र, रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे आर्थिक वर्ष १ जुलै व ३० जून असे मानले जाते. रिझर्व बॅंक ऑफ इंडियातर्फे देशाच्या चलनी नोटांची छपाई केली जाते. नाणे बनवण्याचे काम भारत सरकारद्वारा केले जाते. के.जे.उडेशी बनल्या पहिली महिला डेप्युटी गव्हर्नर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनण्याचा मान के.जे.उडेशी यांना मिळाला आहे. २००३ मध्ये उडेशी यांची नियुक्ती झाली होती. पाच व दहा हजारच्या नोटा देखील छापल्या. रिझर्व बॅंकेने ५००० व १०००० रुपये मुल्य असलेल्या नोटांची छपाई १९३८ मध्ये केली होती. यानंतर १९५४ व १९७८ मध्येही या नोटांची छपाई करण्यात आली होती. रिझर्व बॅंक भारताशिवाय पाकिस्तांन व म्यानमारमध्ये सेंट्रल बॅंकेच्या रुपात आपली भूमिका पार पाडत आहे.
🔲🔲🔲
आरबीआयने जुलै १९४८ पर्यंत पाकिस्तायन व एप्रिल १९४७ पर्यंत म्यानमारमध्ये (वर्मा) सेंट्रल बॅंकेच्या रुपात काम केले. सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. त्यानंतर सरय जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१ जुलै १९३७ ते दि. १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले. आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.
🔲🔲🔲
दि. १९३५ पासून २००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. २०१३ पासून या पदावर रघुराम राजन गव्हर्नर म्हणून होते. २०१६ पासून उर्जीत पटेल यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे. भारतात केंद्रीय बॅंक अर्थात रिझर्व बॅंक ऑफ इंडियाची (आरबीआय) स्थाळपना 'हिल्टंन यंग कमिशन'च्या आधारावर झाली होती.रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये व्दितीय श्रेणीचे कर्मचारी नाहीत. प्रथम श्रेणीत, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीत एकूण १७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात मॉनिटरी म्युझियम (मुद्रा संग्रहालय) आहे. रिझर्व बँकेचा लोगो ईस्टय इंडिया कंपनीच्या डबल शिक्क्याने प्रेरित आहे. त्यात थोडा बदल करण्यावत आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦💰🏦

GMAIL Birthday Today

📡📲📩📡📲📩📡📲📩
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑१ एप्रिल आज जीमेलचा वाढदिवस*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा "गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा "एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी सुरवातीच्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते. हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. खरोखरच जीमेल सेवा सुरू झाली आणि हा हा म्हणता जगभरातील लोकांना जी-मेलने आकृष्ट केले. व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग वगैरे गोष्टी आधीही होत्या. परंतु, त्यांची ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करून घ्यावी लागत. "जी-मेल‘मध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा हात जोडून उभ्या राहिल्या. कॅलेंडर, ऑनलाइन ड्राइव्ह, फोटो होस्टिंग, व्हिडिओसाठी यू-ट्यूब, ब्लॉग, बातम्या आणि "गुगल‘च्या सर्व सेवा वापरण्याची सोय झाली. जीमेल ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या.
🔲🔲🔲
उदाहरणार्थ, अगदी पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच त्या काळी जास्त नव्हते. निळ्या-करडय़ा रंगाचे हॉटमेल पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही खिडकी, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. अशी संपूर्ण रचना तयार करण्यामागे गुगल कंपनीतील अभियंता पॉल बुशैत याची धडपड होती. नवी सेवा मोफत द्यायची किंवा नाही, यासारख्या मुद्‌द्‌यांवर आधी कंपनीत वादही झाले होते. पण, या सगळ्यातून तावून-सुलाखून तयार झालेली "जी-मेल‘ सेवा पाहतापाहता इतकी लोकप्रिय झाली, की सध्या ती वापरणाऱ्यांची संख्या १२५ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत!
🔲🔲🔲
जीमेलच्या वापरकर्त्यांपैकी निम्मे आशियातच आहेत. जी-मेल मुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर संगणकाच्या पडद्यावर उमटविलेली अक्षरे निमिषार्धात सातासमुद्रापार पोचण्याची सोय उपलब्ध झाली. या "डाकिया‘चे स्वरूपच आमूलाग्र पालटून गेले. मग "पांढऱ्यावर काळे‘ करण्याची आवश्ययकता उरली नाही.
जीमेलचे अभिनंदन
🔲🔲🔲

*🔺जी-मेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी-मेलची अनोळखी फीचर्स.*

इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या 'जीमेल'चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर 'जीमेल' वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही 'जीमेल'ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.

*▪'स्पॅम' चा वापर*

आपल्या जीमेल अॅड्रेसमध्ये जो डॉट दिला जातो, त्याचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नसतो. तुमचा जीमेल आयडी जर tyler.durden@gmail.com असा असेल तर tylerdurden@gmail.com किंवा t.ylerdurden@gmail.com किंवा t.y.l.e.r.d.u.r.d.e.n@gmail.com या नावाने येणारे मेल्ससुद्धा तुमच्या इनबॉक्समध्येच येतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. अशा प्रकारचे जीमेल अॅड्रेस आपण वन टाइम ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी किंवा इतर तात्पुरत्या इंटरनेट सेवांसाठी वापरता येतात. तात्पुरते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जर पुन्हा त्या साइटवरून मेल येऊ द्यायचे नसतील तर आपल्या जीमेल आयडीची अक्षरे बदलून इमेल फिल्टर तयार करता येते आणि या आयडीवर येणारे सर्व मेल डीलीट करता येतात.

*▪इमेल फिल्टर तयार करणे*

इमेल फिल्टर तयार करण्यासाठी जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर गो टू सेटिंग्ज-फिल्टर टॅब-क्रीएट अ न्यू फिल्टर या क्रमाने जावे लागते. फिल्टर तयार झाल्यानंतर त्यात स्कीप इनबॉक्स, अप्लाय द लेबल, डीलीट आणि इतरही अनेक पर्याय असतात. फिल्टर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमच्याकडे येणारे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या पर्यायांनी तपासल्यानंतरच इनबॉक्समध्ये येतील.

*▪इमेल सबस्क्रिप्शनचे वर्गीकरण*

वेगवेगळ्या इमेल सबस्क्रिप्शनचे इमेल फिल्टर तयार करण्यासाठी + या चिन्हाचा उपयोग करावा. The Onion या वेबसाइटवरुन इमेल सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर tyler.durden+theonion@gmail.com हा इमेल अॅड्रेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे theonion वरून सर्व इमेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि आवश्यकता नसल्यास फिल्टर बसवून ते परस्पर डीलीट करता येतील.

*▪जीमेल कॉन्टॅक्ट्स*

आपल्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स  ऑटोमॅटीकली आपल्या गुगल अकाऊंटशी जोडले जातात. यासाठी तुम्ही ज्या इमेल अॅड्रेसने स्मार्टफोनवर साइन इन केलेले असते त्यातील कॉन्टॅक्ट्स अपडेट केलेल असायला हवेत.

*▪गुगलशी कॉन्टॅक्ट्स जोडणे*

अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवरून सेटींग्ज-अॅड अकाऊंट-गुगल या क्रमाने सर्व टप्पे पूर्ण केले की गुगल अकाऊंटशी कॉन्टॅक्ट्स जोडता येतात. अशा पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये जे फोन नंबर्स असतील ते सर्व गुगल अकाऊंटशी जोडले जातात आणि नंबर डीलीट होण्याचा धोका कमी होतो. गुगल आयडीवर नंबर सेव्ह झाला की तो तुमच्या जीमेल अॅड्रेस बुकमध्ये समाविष्ट होतो आणि तुम्ही त्या इमेल अॅड्रेस ज्या डीव्हाइसवरून उपयोग कराल त्यात तो दिसू शकतो. अॅण्ड्रॉइडशिवाय आयओएस, विन्डोज फोन आणि ब्लॅकबेरीवरूनसुद्धा कॉन्टॅक्ट्स गुगल अकाऊंटशी जोडता येतात.

*▪गुगल १८....*

गुगलच्या मुख्य पानावरील डाव्या कोपऱ्यातील जीमेल-कॉन्टॅक्ट्स-मोअर-फाइंड अॅण्ड मर्ज कॉन्टॅक्ट्स या क्रमाने पुढे गेले की आपल्या अॅड्रेस बुकमधील कॉन्टॅक्ट्सच्या डबल एन्ट्रीज दिसून येतात. यातील आवश्यक त्या कॉन्टॅक्ट्सला क्लीक करा आणि मर्ज करा.

*▪कॉन्टॅक्ट्स परत मिळवणे*

आपल्या फोनमधून अॅड्रेस डीलीट केला की जीमेलवरूनही तो डीलीट होतो. पण तीस दिवसांच्या आत प्रयत्न केल्यास तो कॉन्टॅक्ट रिकव्हर होऊ शकतो. यासाठी जीमेलच्या कॉन्टॅक्ट्सवर गेल्यानंतर मोअर-रीस्टोअर हे ऑप्शन्स निवडावे लागतात.

*▪लॅब्ज....*

जीमेलची उपयुक्तता अधिकाधिक वाढवण्यासाठी 'लॅब्ज'मध्ये आणखीही पर्याय उपलब्ध आहेत. डावीकडे असलेले चॅट ऑप्शन उजवीकडे नेणे, अनेक इनबॉक्स तयार करणे, आलेला इमेल क्लीक न करता पाहता येणे असे वेगवेगळे प्रयोग 'लॅब्ज'च्या माध्यमातून करता येतात.

*▪कॅलेंडर....*

तुमच्या गुगल अकाऊंटवर स्वतःचे कॅलेंडर/प्लानर तयार करता येते. हे कॅलेंडर इमेलद्वारे इतरांना पाठवता येऊ शकते. त्यामुळे तुमचे त्यामुळे तुमच्या वेळापत्रकानुसार इतरांना त्यांची कामे प्लान करता येतात. लॅब्ज ऑप्शनमधून कॅलेंडर सेट अप करता येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📡📲📩📡📲📩📡📲📩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...