फॉलोअर

२८ फेब्रुवारी २०१८

पैसा स्विस बँकेत का ?

🏦⚫💰🏦⚫💰🏦
➖➖➖➖➖➖➖
*🔴◾“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो..?🤔*
➖➖➖➖➖➖➖
स्विस बँकेचं प्रकरण आपण सर्वजण जाणतोच. तुम्ही हे देखील ऐकून असाल की काळा पैसा जमवणाऱ्या सगळ्यांचीच खाती ही स्विस बँकांमध्येच आहेत. मोदीजी देखील भाषणात म्हणतात की स्वीस बॅंकांमधला काळा पैसा परत आणू. केवळ भारतातीलचं नाही तर जगातल्या असंख्य धनदांडग्यांची संपत्ती याच बॅंकांमध्ये बंदिस्त आहे. मग अश्या वेळी मनात काही प्रश्न सहज उभे राहतात. जसे की, स्विस बँक एवढी खास का आहे की जगातील सगळा काळा पैसा याचं बँकेत येतो. बरं या बँकेला देखील माहित असेलच की हा काळा पैसा म्हणजे अनधिकृत आहे तर मग ही बँक पैसा स्वीकारतेच का? अश्या काळा पैसा ठेवणाऱ्या अजून काही बँक्स आहेत का?
🔲🔲🔲

🔺आपल्यापैकी बहुतेकांना हे वाटत असेल की स्विस बँक ही एकच कोणतीतरी बँक आहे, पण तसं नाहीये. स्विस बँक ही कोणती एक बँक नाही. स्वित्झर्लंड देशामध्ये जेवढ्या बँका आहेत त्यांना स्विस बँक म्हटलं जातं. त्यापैकी युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड ही युरोपमधील सगळ्यात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे.
🔲🔲🔲
🔺स्वित्झर्लंड हा देश ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखला जातो, कारण येथे कितीही पैसा ठेवा, साठवा तुम्हाला त्यावर अगदी मामुली कर भरावा लागतो किंवा कर भरावाच लागत नाही असं म्हटलं तरी चालेल. तसेच तुमचे बँकिंग सिक्रेट्सदेखील अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. फक्त स्वित्झर्लंडच नाही तर जगात अशी अनेक ठिकाण आहेत जी ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखली जातात. त्यापैकी लुक्झमबर्ग, हॉंगकॉंग, कॅमन आयलँड, सिंगापूर, यु.एस.ए., लेबनन, जर्मनी, जर्सी, जपान या ठिकाणांचा टॉप टेनमध्ये समावेश होतो. या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या बँकांचे निरनिराळे कायदे आहेत,
🔲🔲🔲
*स्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे मुख्य कारण आहे या देशातील बँक पॉलीसी! नागरिकांना असणारा ‘गोपनीयता बाळगण्याचा अधिकार’ (right to privacy) हा मुलभूत अधिकारांपैकी एक आहे आणि प्रत्येक देशाने हा अधिकार आपल्या नागरिकाला दिला पाहिजे. म्हणूनच आम्ही आमच्या देशातील नागरिकांची आणि ग्राहकांची माहिती त्यांच्या संमती शिवाय उघड करत नाही, कारण तसे करणे त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. म्हणूनच जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करेल त्याला कडक शासन करण्याची तरतूद आहे.*
🔲🔲🔲

*🔺परंतु काळा पैसा साठवण्यासाठी हे सगळेच कायदे अनुकूल आहेत. त्यांचे कायदे काळा पैसा जमवणाऱ्यांसाठी किती पूरक आहेत पहा.....*

▪१९३४ मध्ये या देशाने एक बँकिंग कायदा संमत केला, ज्यानुसार जर स्विस बँकेने त्यांच्याकडे असणाऱ्या खातेदारांची नावे आणि माहिती उघड केली तर तो कायदेशीर अपराध मानला जाईल. त्याबदल्यात त्या बँकेवर कठोर कारवाई करण्यात येईल. (धन्य आहे अश्या कायद्याची!)
याच कायद्यामुळे स्विस बँकेतील खातेदारांची दिवाळी सुरु आहे. फक्त याच नाही तर अश्या इतर अनेक बँकिंग कायद्यांमुळे स्विस बँक गोपनीयतेच्या चक्रव्युहात अडकली आहे. म्हणजे जरी स्विस बँकेला कोणाची नावे उघड करायची असतील तरी ती करू शकणार नाही, कारण त्याची भारी किंमत त्यांना चुकवावी लागेल. (परदेशातले कायदे तुम्हाला माहित आहेतच! स्वित्झर्लंड देश अश्या कडक कायद्यांसाठी आणि शिक्षांसाठी फारच प्रसिध्द आहे.)

▪स्वित्झर्लंड सरकारच्या मते (परंतु गुन्हेगारी याला अपवाद आहे.) एखाद्या गुन्हेगारा विरोधात न्यायालयामध्ये खटला सुरु असेल तर स्वित्झर्लंडचे न्यायालय त्या व्यक्तीची सर्व माहिती आणि गुपिते उघड करण्याचे आदेश देऊ शकते.
स्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे अजून एक कारण म्हणजे स्विस बँक तुम्हाला हे विचारात नाही की तुम्ही हा पैसा कुठून आणला? त्यांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमावता. तुम्हाला फक्त तुमचा पैसा त्यांच्याकडे द्यायचा असतो आणि त्या पैश्याचे संरक्षण करण्यासाठी एक ठराविक रक्कम बँकेला द्यावी लागते.

▪अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्विस बँक आपल्या खातेदारांना एक युनिक नंबर देते, म्हणजे यात खातेदाराला स्वत:चे नाव देण्याची गरज भासत नाही. खातेदाराला त्या नंबरच्या सहाय्याने संपूर्ण व्यवहार हाताळता येऊ शकतात. तसेच कोणीही व्यक्ती या नंबरचा वापर करून खाते हाताळू शकतो. त्याला ते खाते त्याचेच आहे हे सिद्ध करण्याची गरज भासत नाही. तो नंबरच सर्व गोष्टींसाठी पुरेसा आहे. त्यामुळेच खाते नेमक्या कोणा व्यक्तीचे आहे हे शोधून काढणे जवळपास अशक्य आहे. एवढेच नाही तर ठराविक नंबरचे खाते कोणत्या व्यक्तीचे आहे हे तर खुद्द स्विस बँकेला देखील ठावूक नसते.
🔲🔲🔲
जसे आपल्या इथे बँकेमध्ये खातेसुरु करण्यासाठी काही अटी आणि निकष ठेवलेले असतात तसे स्विस बँकांचे देखील काही अटी आणि निकष आहेत. खातेदाराचे वय किमान १८ असावे आणि त्याने खात्यामध्ये किमान ३.२१ ते ६.२४ करोड रुपयांचा बॅलेन्स राखण्याची गरज आहे. एवढा बॅलेन्स जर खात्यात ठेवला तरच व्याज मिळते. ते ही अतिशय कमी टक्क्यांनी !
🔲🔲🔲
स्विस बँकेमध्ये खाते हे स्वत: तेथे प्रत्यक्ष जाऊन सुरू करावे लागते किंवा स्विस बँकेच्या प्रतिनिधी मार्फत सुरू लागते. इंटरनेटच्या माध्यमातून स्विस बँकेमध्ये खाते उघडता येत नाही. कारण ते ट्रॅक केले जाऊ शकते. अगोदर सांगितलेल्या बँकिंग कायद्याच्या आधारावर ही अट घालण्यात आली आहे.
🔲🔲🔲
तसेच स्विस बँकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खातेदाराला पैसे भरताना किंवा काढताना स्वत: बँकेत जायची गरज पडत नाही. त्याच्या वतीने दुसरा एखादा व्यक्ती पैसे जाऊन भरू शकतो किंवा काढून आणू शकतो. यामुळे ज्या व्यक्तीचे खाते आहे त्या व्यक्तीला कोणी ट्रॅक करू शकत नाही.

तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्विस बँकांना काळ्या पैश्याचं माहेरघर का म्हणतात ते..!
➖➖➖➖➖➖➖
🏦⚫💰🏦⚫💰🏦

२५ फेब्रुवारी २०१८

TRP

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧👩‍👩‍👧‍👦📺👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧👩‍👩‍👧‍👦
➖➖➖➖➖➖➖
*☑ TRP रेटिंग म्हणजे नेमकं काय रे भाऊ...??? 🤔*
➖➖➖➖➖➖➖
बऱ्याचदा आपल्या कानावर पडतं, अमुक शो फार पाहिला जातो, त्याचा टीआरपी जास्त आहे. तमुक शो जास्त फेमस नाही, कारण त्याचा टीआरपी कमी आहे. पण मंडळी कधी विचार केलाय का काय आहे हा टीआरपी? आणि कश्या प्रकारे आपण पाहतो त्या कार्यक्रमांना रेटिंग दिलं जातं, चला जाणून घेऊया.
🔲🔲🔲
२-४ वर्षांपूर्वी भारतामध्ये टीआरपी (Television Rating Point) साठी डेटा मिळवण्याचं काम हे TAM Media Research या कंपनीकडे होतं, पण नंतर Broadcast Audience Research Council (BARC) यांनी हे काम स्वत:च्या अखत्यारीत करून घेतलं आणि आता BARC कडून कार्यक्रमांना दिल्या जाणाऱ्या रेटिंग या अधिकृत मानल्या जातात.
🔲🔲🔲
*टीआरपी म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी होय!*
🔲🔲🔲
या रेटिंग साठी डेटा मिळवण्याचं काम केलं जातं रेटिंग मशीनच्या माध्यमातून! या मशीन्सना People’s Meter म्हटले जाते. या मशीन्स कंपनीशी जोडल्या गेलेल्या ठराविक प्रेक्षकांच्या घरी बसवल्या जातात.
या मशीन नजर ठेवतात की प्रेक्षक कोणत्या वेळेला, कोणता कार्यक्रम, किती वेळ पाहतो. या मशीन्स संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या घरी त्यांच्या समंतीनेच बसवल्या जातात. ३० दिवसांनंतर त्या प्रेक्षकाने कोणत्या चॅनेल आणि कार्यक्रम किती वेळ पाहिला याची अंदाजे आकडेवारी उपलब्ध होते.
🔲🔲🔲

*▪टीआरपी मिळवण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत म्हणजे – frequency monitoring*

या पद्धतीमध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात. या मशीन्स प्रत्येक चॅनेलच्या फ्रिक्वेन्सी समजून घेतात आणि नंतर त्या ठराविक चॅनेलच्या नावामध्ये रेकॉर्ड केलेला डेटा डिकोड करतात. पण या पद्धतीमध्ये एक त्रुटी आहे. त्रुटी अशी की बऱ्याचदा केबल ऑपरेटर्स टीव्हीला सिग्नल पाठवण्यापूर्वी विविध चॅनेल्सच्या फ्रिक्वेन्सी वारंवार बदलतात. त्यामुळे ठराविक फ्रिक्वेन्सी वरून ठराविक चॅनेलचाच डेटा मशीन रेकॉर्ड करत असले याची खात्री देता येत नाही.
🔲🔲🔲

*▪दुसरी पद्धती म्हणजे – picture matching technique*

या पद्धतीमध्ये देखील प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात, पण त्या काहीश्या वेगळ्या पद्धतीने काम करतात. या मशीन्स ठराविक टीव्हीवर पाहिल्या जाणाऱ्या चित्रीकरणाचा संक्षिप्त भाग वारंवार रेकॉर्ड करत असतात. तसेच ठराविक चॅनेलचा डेटा देखील संक्षिप्त चित्र रुपात साठवला जातो. हा गोळा केलेला डेटा नंतर मेन डेटा बँक मधील डेटाशी जुळवून पाहिला जातो आणि त्यानुसार चॅनेलचे नाव समोर येते आणि कोणता चॅनेल किती वेळ पाहिला त्याची आकडेवारी केली जाते.
🔲🔲🔲
अश्याप्रकारे महिन्याभरच डेटा गोळा केल्यानंतर कोणता चॅनेल आणि कोणता कार्यक्रम किती वेळा पाहिला जातो आणि त्याची पॉप्यूलॅरिटी काय हे मिळालेल्या रिझल्टनुसार सादर केले जाते. त्यानुसार आपल्या चॅनेल आणि एखाद्या ठराविक कार्यक्रमामध्ये सुधारणा कशी आणावी त्याची वेळ बदलली जावी का, या सर्व गोष्टी ठरवल्या जातात.
➖➖➖➖➖➖➖
👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧👩‍👩‍👧‍👦📺👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧👩‍👩‍👧‍👦

TV वर पडणारे आकडे

२४ फेब्रुवारी २०१८

Headphones Left and Right

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

*LEFT👂🏼🎧👂🏼RIGHT*
➖➖➖➖➖➖➖
*☑ दोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं?*
➖➖➖➖➖➖➖
इयरफोनच्या डाव्या बाजूला L आणि उजव्या बाजूला R लिहिलेलं असतं. जर तुम्ही चायना इयरफोन वापरत असाल तर कदाचित तुम्हाला ही गोष्ट आढळणार नाही, कारण प्रत्येक चायना इयरफोनवर असे लिहिलेले नसते, पण एखादा ओरिजिनल इयरफोन पाहिलात तर तुम्हाला Left/Right लिहिलेलं नक्की आढळेल. आज जाणून घेऊया या मागचं लॉजिक!
🔲🔲🔲
मुख्य गोष्ट म्हणजे हे L आणि R असं दर्शवतं की तुम्हाला एयरफोनची कोणती बाजू कोणत्या कानात घालायची आहे. म्हणजे ज्या भागावर L लिहिलेलं असतं तो भाग तुम्ही डाव्या कानात घालणं अपेक्षित असतं आणि ज्या भागावर R लिहिलेलं असतं तो भाग उजव्या कानात घालणं अपेक्षित असतं.
🔲🔲🔲
पण आपण कुठे एवढं लक्ष देतो. जो भाग ज्या हातात येईल तो भाग सरळ त्या त्या कानात घालून मोकळे होतो. आता तुम्ही म्हणालं की दोन्ही बाजूंनी उत्तम तर आवाज येतो आणि उलट सुटल घातलं तर त्रास देखील काही होत नाही, मग Left/Right ची चिन्ह देण्याचा काय फायदा?
🔲🔲🔲
खरतरं प्रश्न एकदम साधा आहे, पण त्यामागचं उत्तर मात्र गहन आहे! Sound Engineering पासून Recording पर्यंत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर ठेवून ही चिन्ह देण्यात येतात.

▪Stereo Recording च्या वेळेस एखादा ध्वनी डाव्या बाजूने येत असेल तर तर तुमच्या इयरफोनच्या Left बाजूकडून तो ध्वनी मोठ्या आवाजात ऐकू येईल आणि जर तुम्ही हा ध्वनी Right बाजूकडून ऐकायला गेलात तर तुम्हाला कमी आवाजात ऐकू येईल. हे झालं एक कारण..!

*_▪इयरफोनवर Left/Right लिहिण्यामागे अजून एक कारण असं आहे की, यामुळे दोन आवाजांना वेगवेगळ करून ऐकणं सोप्प होतं. त्या दोन आवाजांमधला फरक जाणून घेणं देखील सोप होतं. अशी अनेक गाणी असतात ज्यामध्ये Loud Musical Instruments उदा. ढोल किंवा Soft Musical instrument उदा. बासरी, यांसारखी दोन टोकांची वाद्ये एकत्र वाजवली जातात. अश्यावेळेस एका वाद्याच्या आवाजामागे दुसरा आवाज लपू नये म्हणून दोन्ही आवाजांना एकत्र वेगवेगळ्या चॅनेलमध्ये (Left किंवा Right) ऐकलं जातं._*

▪तसेच चित्रपटाच्या अचूक Sound Recording साठी Left आणि Right चॅनेल असणं गरजेच आहे. तुम्ही कधीतरी एखादा चित्रपट लॅपटॉपवर किंवा फोनवर आपल्या एयरफोनच्या माध्यमातून ऐकला असेल. तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की स्क्रीनच्या डाव्या बाजूकडून येणारा एखाद्या गाडीचा आवाज पहिल्यांदा इयरफोनच्या डाव्या बाजूकडूनच ऐकू येतो आणि त्यानंतर हळूहळू इयरफोनच्या उजव्या बाजूकडून ऐकायला येतो. हे यासाठी केलं जातं जेणेकरून चित्रपट पाहणाऱ्याला त्या प्रसंगात तो तेथे असल्याचा फील यावा! अश्यावेळेस जर तुम्ही इयरफोनची डावी बाजू उजव्या कानात आणि उजवी बाजू डाव्या कानात घातली असेल तर तुम्ही तो अनुभव घेऊ शकणार नाही.
➖➖➖➖➖➖➖
*LEFT👂🏼🎧👂🏼RIGHT*

०७ फेब्रुवारी २०१८

चेक बुक वरील नंबर

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

🏦✍🏼🏦✍🏼🏦✍🏼🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ चेकच्या खाली लिहिलेल्या अंकांचा अर्थ माहिती आहे का...??.*
➖➖➖➖➖➖➖
_चेक मध्ये 23 क्रमांकात लिहिलेले असतात ह्या संख्या. चला याचा अर्थ जाणून घेऊयात…_
🔲🔲🔲
आजही, एटीएम आणि इंटरनेट बँकिंगच्या काळातसुद्धा लोकांनी चेकचा वापर सुरू ठेवला आहे. आजही चेक हे मोठ्या व्यवहारासाठी वापरले जातात. चेकचा वापर करताना आपण रकमा, चिन्ह, नाव आणि नंबर तपासून पाहतो आणि संपूर्ण सावधगिरीने भरलेल्या माहितीची विशेष काळजी घेतो. परंतु तुम्ही तुमच्या चेकशी संबंधित इतर काही गोष्टी देखील ओळखून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का…? जसे कि, चेकच्या खाली दिलेली संख्या काय आहे…? चेकचे मूल्य तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित असेल. अशा प्रकारे चेकमध्ये देण्यात आलेली कोणतीही माहिती हि अनावश्यक नसते. चेकवर लिहिलेल्या प्रत्येक विधानाचे विशेष अर्थ आहेत. खाली दिलेले 23 अंक देखील अतिशय खास आहेत.
🔲🔲🔲

*_🔺चेकखाली लिहिलेली 23 अंकीय संख्या 4 भागांमध्ये विभाजित आहे. प्रत्येक भाग किंवा अंगाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे._*

◼चेकच्या खाली लिहिल्या गेलेल्या या नंबरवरून सुरुवातीचे 6 अंक चेकचा नंबर दर्शवतात. जे रेकॉर्डसाठी सर्वप्रथम तपासले जातात.

◼यानंतरचे, पुढील 9 अंकी एम.आय.सी.आर. कोड म्हणजेच ‘चुंबकीय इंक कॅक्टर रेकग्निशन’ दर्शवतात. प्रत्यक्षात हे 9 आकडे दर्शवतात की, कोणता चेक कोणत्या बँकेद्वारे व्यवहारात आणला गेला आहे. ‘चेक रीडींग मशीन’ ह्या कोडचे वाचन करते.

_*◼एम.आय.सी.आर कोड तीन भागांमध्ये विभागले जातात.*_

_▪पहिला भाग म्हणजे सिटी कोड. म्हणजेच, रांगेतील पहिले तीन अंक प्रत्यक्षात आपल्या शहराचा झिप कोड दर्शवतात आणि याने चेक कोणत्या शहरातील आहे याची माहिती मिळते._
_▪दुसरा भाग बँक कोड आहे. प्रत्येक बँकेचा स्वतःचा असामान्य कोड असतो. जसे कि, आय.सी.आय.सी.आय. बँकेचा कोड २२९ आणि एस.बी.आय. बँकेचा हा ००२ कोड आहे._
_▪एम.आय.सी.आर. कोडचा तिसरा भाग म्हणजे शाखा कोड. हा शाखा कोड बँकेच्या प्रत्येक शाखेचा वेग वेगळा असतो. हा कोड बॅंकेला जोडलेल्या प्रत्येक व्यवहारामध्ये वापरला जातो._

◼एम.आय.सी.आर. कोडनंतर, पुढील 6 अंक बँक खाते क्रमांक असतात. आपण हे जाणून घ्या कि, या संख्या फक्त नवीन चेकबुकमध्येच आढळून येतात. पूर्वीच्या जुन्या चेकबुकमध्ये हा क्रमांक नव्हता.

◼शेवटचे दोन अंक ‘ट्रान्झॅक्शन आयडी’ असतात. ज्यात २९, ३० आणि ३१ हे अंक क्रॉस चेकला, तर ०९, १० आणि ११ हे अंक स्थानिक चेकला दर्शवतात. ‘क्रॉस चेक’ हा एक असा चेक आहे, जो संपूर्ण देशातील संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये स्वीकार्य असेल. सोबतच बाहेरच्या शाखांमध्येहि हा चेक वापरताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
➖➖➖➖➖➖➖
🏦✍🏼🏦✍🏼🏦✍🏼🏦

०४ फेब्रुवारी २०१८

CIBIL काय आहे सिबिल स्कोर

_*🔺🙇🏻‍♂ मनातील प्रश्न...*_

🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ सीबील/CIBIL आर्थात (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited) किंवा सिबिल (CIBIL)*

*☑ सिबिल (CIBIL) काय आहे आणि त्याचा कर्जाशी काय संबंध आहे?.....*
➖➖➖➖➖➖➖
एखाद्या बँकेकडून जेव्हा आपण कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा कर्ज द्यायचे की नाही हा निर्णय घेण्यासाठी बँकेला आपल्याबद्दल काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात.

▪१) तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे?

▪२) तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का आणि असेल तर किती आहे?

▪३) यापूर्वी तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केली होती का?

बँकेला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे आहे. तुम्ही बँकेला तुमच्या उत्पनाचे कागद दिले (सॅलरी स्लिप, इनकम टॅक्स रिटर्न) की बँक खात्रीने तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज देता येईल ते ठरवू शकते.
🔲🔲🔲
पण तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का हे किंवा यापृवी घेतलेल्या कर्जाची तुम्ही वेळेत परतफेड केली होती का हे जाणून घेण्यासाठी बँकेला जो कर्ज घेतोय त्याने दिलेल्या माहितीवर विसंबून रहावे लागू शकते. बँकेला यात जोखीम आहे कारण कर्ज मागणाऱ्याने दिलेली माहिती नेहमीच खरी असेल याची हमी नाही.
🔲🔲🔲
जसे उत्पन्न दर्शविण्यासाठी स्वतंत्र कागदपत्रे असतात तसेच जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती देण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था असती तर बँकांसाठी चांगले झाले असते. ह्या विचारातूनच २००५ साली एक कायदा पारित करण्यात आला. त्या कायद्याने कर्जाची माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांना, ज्यांना क्रेडिट ब्युरो (Credit Bureau) असेही म्हणतात, सक्षम केले गेले आणि त्यांना अधिकार देण्यात आले कि त्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून माहिती गोळा करू शकतात. अशीच कर्जाची माहिती गोळा करणारी एक कंपनी (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) किंवा सिबिल (CIBIL).
🔲🔲🔲
सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते. नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फॉर्मशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात.
🔲🔲🔲
ह्या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात. सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँका कर्ज द्यायला तयार होतात आणि सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर बँक एकतर कर्ज नाकारू शकतात किंवा कर्ज दिलेच तर नेहमीपेक्षा जास्त व्याज दर आकारू शकतात.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अर्जदाराने अर्ज भरून बँकेला दिल्यावर बँक प्रथम अर्जदाराचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासते. जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्या अर्जावर विचार करायच्या आधीच त्यास त्यास नकार देऊ शकते. जर सिबिल स्कोर जास्त असेल तर बँक अर्जावर लक्ष देतील आणि अन्य तपशील विचारात घेऊन अर्जदार कर्ज देण्यायोग्य आहे का नाही हे ठरवतील. बँकेसाठी सिबिल स्कोर ही अर्जदाराची पहिली ओळख असल्या सारखे असते, जितका जास्त स्कोर, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त .
🔲🔲🔲
क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच सिबिल ही काही एकच कर्जाची माहिती गोळा करणारी कंपनी नव्हे. तिच्या सारख्याच आणखी ३ कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत जसेकी एक्विफॅक्स (Equifax), एक्स्पेरियन (Experian) आणि हायमार्क (Highmark). त्यांचेही सिबिल सारखेच स्वतःचे क्रेडिट स्कोर आहेत.
🔲🔲🔲

*◾क्रेडिट रिपोर्ट मध्ये काय असते?*

कर्ज घेतल्यावर तुमच्या कर्ज खात्यात जे काही घडले असेल त्यापैकी बहुतांश माहिती ही क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेली असते.

जसेकी –

तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि तुम्ही घेतलेल्या गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज या व अशा इतर कर्जाबरोबर क्रेडिट कार्डा ची माहिती दिलेली असते.पूर्वी घेतलेल्या प्रत्येक कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती यामध्ये दिलेली असते.एखादे कर्ज तुम्ही फेडले नसेल तर तेही नमूद केले असते.बँकांशी कधी कर्जफेडीबाबत भांडण / तंटा झाला असेल आणि त्यामुळे कर्जखाते बंद केले असेल तर त्या कर्जसमोर ‘सेटल्ड’ (Settled) असे लिहिलेले असते.तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल पण कर्ज घेतले नसेल तर त्याचीही नोंद यात केली जाते.सध्या चालू असलेल्या कर्जाच्या बाबतीत किती कर्ज फेडणे अद्याप शिल्लक आहे तेदेखील यात सांगितलेले असते.मागील ३६ महिन्याचा परतफेडीचा इतिहास प्रत्येक कर्जाच्या बाबतीत सांगितला जातो.तुमच्या क्रेडिट कार्डाची माहिती जसेकी प्रत्येक क्रेडिट कार्डांची क्रेडिट मर्यादा आणि कॅश मर्यादा नमूद केलेली असते.कर्जाचे व क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळच्यावेळी भरले जातात का ही बाबही ३६ महिन्यांच्या परतफेडीच्या इतिहासाकडे बघून कळते.
🔲🔲🔲
आणि ह्या सर्व मापदंडांचा उपयोग करून बनवलेला सिबिल स्कोर क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेला असतो.
🔲🔲🔲

*◾चांगला सिबिल स्कोर म्हणजे किती?*

सिबिल स्कोर कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त ९०० एवढा असू शकतो. सिबिल स्कोर ९०० च्या जेवढा जवळ असेल तेवढा चांगला आणि बँका तेवढे तुमच्या कर्ज परतफेडण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील. सामान्यतः ७५० पेक्षा जास्तचा सिबिल स्कोर हा चांगला समजाला जातो.
🔲🔲🔲
*_सिबिलच्या संकेतस्थळावर (www.cibil.com) वर पैसे भरून तुम्ही स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोर बघू शकतो._*
🔲🔲🔲
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर चांगला आहे म्हणून कर्ज मिळेलच ह्याची कुठलीही हमी नाही. शेवटी कर्ज देण्याचा निर्णय हा पूर्णपणे बँकेवर अवलंबून असतो.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर हा जसे व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टला थोडक्यात आकड्याच्या स्वरूपात दर्शवतो तसेच सिबिल जेव्हा एखाद्या कंपनीच्या क्रेडिट रिपोर्ट ला आकड्याच्या स्वरूपात दर्शवते तेव्हा त्याला सिबिल रँक (CIBIL Rank) असे म्हणतात. सिबिल रँक १ ते १० मध्ये असतो, जेथे १ हा सर्वोत्तम रँक असतो. सिबिल रँक फक्त अशाच कंपन्यांना प्रदान केला जातो ज्यांच्यावरील कर्ज  हे १० लाख रुपयांपासून १० कोटी रुपयांपर्यंत असते.
➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...