फॉलोअर

३१ डिसेंबर २०२०

साध्यं साध्य करूया

 माझेअंतरंग@करवडीकराड.ब्लाॅगस्पाॅट.काॅम





*चला साध्यं साध्य करूया*


मंदिरात जाण्यासाठी फार मोठी लाईन असते. या लाईनमधून जाताना आपल्याला खूप त्रास होतो, काही वेळ थांबावे लागते, उभे राहावे लागते. मात्र हे सर्व कष्ट घेतल्यानंतर त्या ईश्वराचे दर्शन होते आणि आपणास खुप समाधान लाभते. ईश्वराचे दर्शन होईपर्यंत लागणारा कालावधी कष्टाचा असतो मात्र एकदा दर्शन झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्या पुढचा कालावधी प्रेरणादायी आणि सुखदायक असतो तसेच आपल्या आयुष्याचे पण असते.


एखादे काम पूर्ण होईपर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचण्यापर्यंत खुप अडचणी येतात. तोपर्यंत थांबावं लागतं, संयम ठेवावा लागतो, कष्ट करावं लागतं, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं,12 ते 18 तास कष्ट करावे लागतात, अविरत कामं करावे लागतं,अनेकांना तोंड द्यावं लागतं, कधी कोणाच्या पाया पडावं लागतं तर कधी कुणाच्या विनवण्या कराव्या लागतात. मात्र हे सगळं केल्यानंतर आपल्याला यश मिळतं, आपले टारगेट पूर्ण होतं. साध्यं साध्य झाल्यानंतर आपण सिद्ध होतो.आपल्याला यशाची गोडी चाखता येते.आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यापुढील प्रवास सुखद असतो. चला तर मग आजपासून यशाचा आनंद घेण्यासाठी अजून प्रयत्न करूया.



*सतीश वसंतराव मोरे*

Karawadikarad.blogspot.com


३१.१२.२०२०

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...