फॉलोअर

१५ मार्च २०१९

35000

सतिताभ ट्विटस्.. https://twitter.com/Satitabh/status/1106217907782995968?s=08

*आज माझ्या करवडी कराड या ब्लॉगवर 35000 रीडरशिप पूर्ण झाली*.

आज अखेर 35 हजार लोकांनी हा माझा ब्लॉग वाचला आहे.

आपणा सर्वांचे खूप खूप आभार ! काहीतरी वेगळे लिहून आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून मी भेटतच राहणार आहे. लोभ असावा.
धन्यवाद पुन्हा एकदा माऊलीनों !

karawadikarad.blogspot.com

१२ मार्च २०१९

देवराष्ट्रे...वंदन चव्हाण साहेबाची जन्मभूमी!

यशवंतराव चव्हाण साहेब एक आदर्श नेतृत्व ! ज्यांची उंची  आजपर्यंत कोणीही मराठी नेता गाठू शकला नाही.

आज जे काही राजकारणी आहेत, त्या राजकारण्यांमध्ये चव्हाण साहेबांचा एक ही गुण नाही, हे मी जबाबदारीने बोलतोय. मला चव्हाण साहेब का आवडतात खूप कारणे आहेत. दिल्लीमध्ये मंत्रिपदावर असताना यशवंतराव चव्हाण यांनी अनुभवलेला एक प्रसंग ,एक पत्र मी कराडच्या वेणूताई चव्हाण पत्रामध्ये पाहिले आहे, वाचला आहे.

प्रसंग असा आहे,  यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये मोठ्या मंत्री पदावर कार्य करत होते. त्याच वेळी त्यांची पत्नी सौ वेणुताई कराडमध्ये शुक्रवार पेठेत एकट्या रहात होत्या. सौ वेणूताई चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांना म्हणजे आपल्या पतीला एक पत्र लिहिले, घरात पैशाची खूप चणचण आहे . थोडे पैसे पाठवून देऊ शकाल का?

यावर केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पत्नीला उलटे एक पत्र लिहिले, बटाणे यांच्या घरी जा, त्यांच्याकडून थोडे पैसे उसने घ्या. मी आल्यानंतर त्यांचे पैसे परत देईन.

एक मंत्री आपल्या बायकोला काय सांगतोय ,तू अमक्याच्या कडून पैसे उसने घे .खरं सांगा आजच्या काळातील मंत्र्याने असे केले असते का? त्याने सरळ कलेक्टर, तहसीलदार,  प्रांताला फोन केला असता आणि सांगितले असते माझ्या घरी रेशनिंग भरा माझ्या बायकोला एक पेटी पोहच करा.

यशवंतराव चव्हाण हे मंत्री असूनही ही त्यांनी आपल्या पदाचा मंत्री पदाचा कधी गैरवापर केला नाही. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या चव्हाण साहेबांच्या बँक खात्यात शेवटच्या काळात केवळ काही हजार रुपये होते.

जे बोलेल तेच करणार म्हणजे करतो तेच बोलणार असा नेता महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्याचे नाव यशवंतराव चव्हाण !

आज त्यांच्या नावाने मी त्यांचा .... आहे. मी त्यांचा वारसदार आहे ,असे म्हणणाऱ्या राजकारण्यांनी चव्हाण साहेबांचा एक तरी गुण घेतला आहे का?
जाऊदे हा जरा राजकीय विषय!

चव्हाण साहेबांचे वारसदार, चव्हाण साहेबांचे टिंब टिंब टिंब, चव्हाण साहेबांचा अमका, असे म्हणून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी चव्हाण साहेबांचा एक तरी गुण घेतला आहे का? आणि घेतला तर ते राजकारणात मोठ्या पदावर पोहोचतील.

आज हे सांगायचा प्रसंग येण्याचे कारण यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मगावी म्हणजेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या त्यांच्या गावी आज त्यांच्या घरी जाण्याचा पहिल्यांदा योग आला. या अगोदर सोनसळ, चिंचणीला जाताना-येताना देवराष्ट्रे या गावात मी अनेकदा गेलो आहे .मात्र चव्हाण साहेबांच्या घरी भेट कधीही दिली नव्हती.

माझे मित्र विजय वाटेगावकर, आनंदा लादे, जाँन्टी थोरात यांच्या सोबतीने मी चव्हाण साहेबांच्या घरी गेलो. सहा खणी प्रशस्त असे हे घर पाहून खूप आनंद झाला. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात ही वास्तू आहे. शासनाने चव्हाण साहेबांचे घर संरंक्षित वास्तू म्हणून जतन केले आहे. जशी आहे त्या स्वरूपात, जसे होते तसे हे घर देवराष्ट्रे मध्ये आहे. या घरांमध्ये गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी किती सामान्य घरांमध्ये जन्म घेतला होता हे पहायला मिळाले.

सामान्य घरात सामान्य कुटुंबात, दारिद्र्यात खचलेल्या घरात यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा व्यक्ती जन्म घेतो, मात्र गरिबीचे भांडवल न करता कराडला येतो, शिकतो. पुढे पुणे मुंबई पुणे नाशिक येथे शिकायला जातो. मोठ्या पदावर जातो, एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, भारताचा उपपंतप्रधान होतो ! ही अफाट अशी कामगिरी चव्हाण साहेब करू शकले कारण त्यांच्यामध्ये असणारी जिद्द आणि बुद्धिमत्ता, काहीतरी नवे शिकण्याची उत्सुकता !

चव्हाण साहेब सतत नवीन नवीन शिकत गेले. एका ठिकाणी कोणत्याही गोष्टी मध्ये ते अडकून राहिले नाहीत. महाराष्ट्रातल्या राजकारणात अडकून न राहता आलेली संधी स्वीकारून त्यांनी देशाच्या राजकारणात उडी घेतली. भारताचे तडफदार संरक्षणमंत्री म्हणून भारत चीन युद्धात त्यांनी दमदार भूमिका घेतली. या सर्व आठवणी आणि त्या बाबतचे सर्व फोटोग्राफ्स मला देवराष्ट्रे येथील त्यांच्या घरी पहावयास मिळाले.

यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई यांच्या ताब्यात देवराष्ट्रे येथील चव्हाण साहेबांच्या जुने घर ही वास्तू आहे. या ठिकाणी त्यांनी छोटेसे ग्रंथालय उभारले आहे. घरांमध्ये प्रत्येक खोलीत चव्हाण साहेबांच्या फोटोचे प्रदर्शन गँलरी आहे. चव्हाण साहेबांनी यशवंतराव  होण्याअगोदर गावात जे चटके सोसले ते छोटेसे गाव असलेल्या देवराष्ट्रे जाऊन मला माझ्या सहकाऱ्यांना खूप आनंद झाला.

इतके दिवस आपण या गावात का आलो नाही याची खंत वाटली. मात्र आज 12 मार्च चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी त्यांच्या घरी जाण्याचा फार मोठा योग विजयी वाटेगावकर यांच्यामुळे आला, याबाबत मी त्यांना फार धन्यवाद देतो !

चव्हाण साहेबांच्या घरी भेट दिल्यानंतर आम्ही या खोऱ्यातील दुसऱ्या एका गावात पोचलो, ते म्हणजे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सोनसळ गावात .या गावाच्या शेजारी चौरंगीनाथ नावाचे एक पर्यटन स्थळ डॉ. कदम यांनी विकसित केले आहे.
चौरंगीनाथ डोंगरावरून एका बाजूला कृष्णाकाठ आणि दुसऱ्या बाजूला सोनहिरा खोरे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कृष्णाकाठावर असलेली समृद्धी आणि आणि कृष्णा साखर कारखान्याचे धुराडे पाहून कोणे एके काळी पतंगराव कदम साहेबांनी सोनहिरा खोऱ्यातही साखर कारखाना सुरू करण्याचे, हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहिले असेल.

ते स्वप्न पतंगराव कदम साहेबांनी सत्यात उतरवले .हा सर्व  हिरवागार भाग पाहून खूप खूप आनंद झाला !

लेखन मर्यादा

सतीश वसंतराव मोरे.

12/03/2019

०८ मार्च २०१९

महिला दिन

मला अभिमान आहे,
तुच स्रीशक्ती आहेस !

मला अभिमान आहे,
तुच सहनशक्ती आहेस !

मला अभिमान आहे,
तुच आमचा स्वाभिमान आहेस !

मला अभिमान आहे,
तु आहेस म्हणून आम्ही आहोत !

आई,माई ,ताई ,
लेकी,सहचारिणी,
साथी,सोबती ... !

तुला
जागतिक महिला
दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा !

*सतीश वसंतराव मोरे

🙋🏻💁🏻🙅🏻🌐🙅🏻💁🏻🙋🏻
➖➖➖➖➖➖➖
*☑ आज ८ मार्च.....*
*जागतिक महिला दिन....*

*🔺जाणून घेऊया महिला दिनाचा महत्वपूर्ण इतिहास...*
➖➖➖➖➖➖➖
🌀

*_८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातही या महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरा करण्यात येतात महिलांचे सत्कार, विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांना पुरस्कारही दिले जातात. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला._*
🔲🔲🔲
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.

🌀
🔲🔲🔲

_*🔺 पण आपण जो महिला दिन साजरा करतो त्यामागचे नेकमे कारण काय हे जाणून घेऊया ह्याच महिला दिनाच्या निमित्ताने या मागील इतिहास...!!!*_

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण होते आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.
🔲🔲🔲
१८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितां विषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना कृष्णवर्णीय ,मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.
🔲🔲🔲
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. या परिषदेत क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.
🔲🔲🔲
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.
🔲🔲
_*🔺१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.*_
🔲🔲🔲
या ठरावानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. त्यानंतर पुढे जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा​ होऊ लागला.

🌀
➖➖➖➖➖➖➖
🙋🏻💁🏻🙅🏻🌐🙅🏻💁🏻🙋🏻

०४ मार्च २०१९

महाशिवरात्री स्त्री शक्तीची सुफळ कहाणी

आज महाशिवरात्री सदाशिव गडावर जाण्याचा योग आला. सदाशिवगडाचे आणि माझे नाते काय आहे हे यापूर्वी मी अनेकदा लिहिले आहे.

आज सदाशिवगडावर महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कराड शहर सहित परिसरातील अनेक शिवभक्त सकाळी पासूनच गडावर येत होते. आठच्या सुमारास मी सहकुटुंब गडावर पोहोचलो. गडावर गेल्या काही वर्षात खूप बदल झाले आहेत. डॉक्टर योगेश कुंभारमार यांच्या पुढाकाराने  मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडावर अनेक सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पाईप लाईनने वरती पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गडावर आता हिरवी झाडे दिसू लागले आहेत. थकलेल्या, दमलेल्या,कंटाळलेल्या, दुनियादारीमुळे विटलेल्या लोकांना एक वेगळा आनंद मिळावा म्हणून काही क्षण निवांत बसण्याचे बसण्याचे ठिकाण आता सदाशिवगड बनू लागले आहे.

पूर्वी फक्त सोमवारी गडावर शिवभक्तांची ये-जा असायची. आता रोज गडावर किमान शंभर लोक ये जा करत असतात. काही जण पहाटे लवकर गडावर जातात, साडेसात वाजेपर्यंत घरी पोहोचलेले असतात. यि सदाशिवगडावर दोन वर्षानंतर जाण्याचा मला योग आला.

महादेवाचे दर्शन घेतले , बाहेर आल्यानंतर मावळा प्रतिष्ठानने शिवभक्तांसाठी खिचडी ,केळी आणि दुधाची सोय केली होती. अतिशय आदराने आणि प्रेमाने हे शिवसेवेकरी आलेल्या शिवभक्तांना सेवा देत होते, काय हव आहे आणि काय नक याची अदबीने चौकशी करत होते. काही शिवभक्तांनी गडावर टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या हे सेवेकरी गोळा करत होते. गड स्वच्छ कसा राहील आणि येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होईल यासाठी सगळे स्वतःच्या घरातील काम असल्याप्रमाणे हे काम करत होते.

दोन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीदिनी असाच एक शिवभक्त सेवेकरी मला भेटला होता. तो येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना सांगत होता, भक्तांनो महादेवाच्या पिंडीवर दूध उतू नका हे दूध बाहेर आणून आमच्याकडे द्या ते दूध गरम करून कुणाच्यातरी मुखात जाऊ द्या, अशी विनवणी तो सर्वांना करत होता. खरा शिवभक्त मला दोन वर्षांपूर्वी तिथे भेटला होता. आजही मनोभावे सेवा करणारे मावळा प्रतिष्ठानचे अनेक सेवेकरी पाहिल्यानंतर निष्काम भक्ती काय असते हे मला अनुभवायला आले.

खिचडी दूध आणि केळी याचा आस्वाद घेतल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गडावरील पठारावर देवयानीने इकडे तिकडे उड्या मारल्या आणि आम्ही गड उतरायला सुरुवात करतात तिथे असलेल्या भगव्या झेंड्या जवळ आलो. त्यानजीक आम्हाला एक वेगळेच चित्र दिसले. दोन, तीन, पाच वयाची तीन छोटी मुले आणि अंदाजे 20/22 वय असणारी एख साधारण महिला वेफर्स शेंगदाणे लाडू विकत बसली होती. छोट्या पोत्यावर बसून या माउलीने दुकान थाटले होते. या छोट्या दुकानाला सहकार्य करण्यासाठी तिची तीन छोटी मुले मांडी घालून  दुकानदाराच्या  ऐटीत बसली होती. येणा जाणाऱ्यांना हे घ्या पाच रुपया शेंगदाणे घ्या अशी हाक मारत होती.

ती छोटीशी तीन फुलपाखरे पाहून आमचे लक्ष तिकडे गेले. डोक्यावर इतके सारे साहित्य आणि  तीन पाखरांना घेऊन ही माऊली तिथे कशी बरी आली असेल ! सकाळी किती वाजता उठली असेल. एवढे साहित्य आणि तीन चिमण्या पाखरांनी घेऊन ही माऊली कशी बरी गडावर चढली असेल, असा विचार आल्यानंतर डोळ्यात दोन आसू उभे राहिले. खर तर आज सर्वांसाठी महाशिवरात्री होती . मात्र या माऊलीसाठी ती एक व्यवसाय करण्याची चांगली संधी होती. शेंगदाणे, वेफर्स आणि राजगिऱ्याचे लाडू विकून त्या माऊलीला किती बरे पैसे मिळाले असतील?  200 ,300, 400 ! या दोन तीनशे रुपयावर या माऊलीचा संसार कसा बरे चालत असेल?  हा विचार करूनच मन हेलावले.  माऊलीची चौकशी केली त्यांच्याकडून थोडे साहित्य विकत घेतले आणि त्या छोट्याना दुकानदार म्हणत हसून नमस्कार केला. व्यापार कसा करावा याचे बाळकडू त्यांना एवढ्या छोट्या वयात आईकडून मिळाले असेल नसेल ही झाली एक बाजू ! मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या पोरांना आई सोबत एवढा उंच गड चढून यावे लागले,दिवसभर उन्हात बसावे लागले, हा विचार आल्यानंतर आपली पोर किती सुखी आहेत हे जाणवलं ! या ईवल्याश्या मुलांना आमच्या आमचं खूप अप्रूप वाटलं. मग आम्ही त्यांच्या सोबत बसून मस्त फोटो काढला.फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं ते पाहून 'फोटो ऑफ द महाशिवरात्रि डे' हाच तो अशी जाणीव झाली.

शंभो शंकरा या ईवल्याच्या बालकांना एवढी मोठी ताकत तू कुठून दिलीस ,आई सोबत गडावर येऊन व्यवसाय करण्यास चार पैसे मिळण्यासाठी उन्हातानात बसण्याची सहनशक्ती त्यांना कशी मिळाली ! खरंच परमेश्वर किती मोठा आहे याची जाणीव झाली.  शंभोशंकराच्या लीला आपणास ज्ञात आहेत. मात्र महाशिवरात्री दिवशी आज पाहिलेली ही *'स्त्री सहनशक्तीची कहाणी'* प्रत्यक्ष पाहून आई ! असा टाहो फोडावासं वाटलं.

*सतीश वसंतराव मोरे*
*सतिताभ*

०३ मार्च २०१९

फुल फुललं

आज मला एक फुल भेटलं
माझी विचारपुस करू लागलं !
कुणीतरी दुखावलं
म्हणून नाराज का होतोस
असं पुसू लागलं !

माझी कैफियत ऐकून
ते हसून बोलू लागलं !
पाणी घालतो एक
काळजी घेतो एक
विकत घेतो दुसराच
सुवास घेतो तिसराच !
तरीही मी माझा
स्वभाव नाही सोडत !
आनंद देता देता
जमीनीत नष्ट होतो
तिथंही पुन्हा फुलतो !
कळीचं पुन्हा फुल बनतो
आनंद देतच राहतो
असं बरंच सांगू लागलं !

स्व:तचा स्वभावगुण
सोडू नकोस
आनंद देत रहा !
विश्वास वाढवत रहा !
काम करत रहा!
तत्व सोडू नको
देत रहा , हसत रहा !

खरं पचायला
आणि रुचायला
वेळ रागतो
संयम ठेव !
तु जर वाईट
केलं नाहीस तर
तुझं कोणीच
वाकडं करू
शकत नाही !

घेतला वसा
सोडू नकोस
तुला जे हवं आहे
ते इतरांना देत रहा !
असं मला
सांगू लागलं!

फुलाचा सल्ला
ऐकून मी फुललो !

तोडलं तरी आनंद
देत रहा
सदाबहार फुलाच्या
गुणाच्या प्रेमातच पडलो !

*सतिताभ*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...