फॉलोअर

२५ नोव्हेंबर २०२१

बाळासाहेबांनी करून दाखवलं !


बाळासाहेबांनी करुन दाखवलं...

फक्त कराड उत्तरचे पालकमंत्री, कराड तालुक्यात बाळासाहेब पाटलांचा दबदबाच नाही, बाळासाहेब अपघाताने मंत्री झाले आहेत, त्यांना साखर कारखान्या शिवाय काही कळत नाही, या आणि अशा अनेक टीकाटिप्पणी आणि टोमण्यांना सामोरे गेलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय मी पण काय कमी नाही, पन्नास वर्षे कराड तालुक्याचे राजकारण आणि सलग 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या पी.डी.पाटील यांचा पुत्र आहे, असे जणू काही दाखवून दिले आहे. बाळासाहेब पाटील कराड सोसायटी गटातूनच का उभे राहिले आणि ते का जिंकले याची अनेक कारणे आहेत. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण त्यांना कराड तालुक्याचा प्रमुख नेता व्हायचं होतं आणि त्यांनी ते या निकालातून सिद्ध करुन दाखवलं आहे !

--------------



सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वर्षी फार महत्त्व आले. या अगोदर गेल्या अनेक निवडणुका दरम्यान पालकमंत्री एक तर अजित पवार राहिले होते किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा आणखी कोणी. या सर्व नेत्यांनी त्या काळात विलासराव उंडाळकर यांना हाताशी धरून जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवल्या होत्या, जिंकल्या होत्या. मात्र, ही पहिली निवडणूक होती ज्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर नव्हते. सलग नऊ टर्म जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून जाण्याचा विक्रम विलासराव पाटील यांच्या नावावर आहे. हा विक्रम फक्त उपस्थिती पुरता नाही तर या कालावधीत त्यांनी सातारा जिल्हा बँक टॉपला नेऊन ठेवली. जानेवारी 2021 मध्ये काकांचे निधन झाले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी ठाकरे सरकार आल्यानंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले, पुढे पालकमंत्री झाले. या अगोदरच्या दोन निवडणुकांमध्ये जिल्हा बँकेत जाण्यासाठी बाळासाहेब पाटलांना संघर्ष करावा लागला होता. एकदा पक्षाच्या खातिर पराभव समोर दिसत असून सुद्धा उदयनराजेंच्या विरोधात लढावे लागले होते. तर गेल्या निवडणुकीत गप्प बसवून नंतर स्वीकृत संचालक म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली होती. हे करताना त्यांना पद्धतशीर पद्धतीने राष्ट्रवादीने बाजूला ठेवले होते. मात्र यावेळी बाळासाहेब पाटील स्वतः पालकमंत्री असल्यामुळे निर्णय  प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार गेल्या पाच वर्षात चांगला झाला. तिघेही सुरुवातीपासून एकत्र आहेत आणि होते. बाळासाहेब पाटील पालकमंत्री झाले म्हणून त्यांना जिल्हा  बँकेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत फारसे महत्त्व येणार नाही असं पद्धतशीर पूर्वक नियोजन करून डाव आखला गेला. विलासराव पाटील -उंडाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध चांगले होते. खरतरं मनात आणलं असतं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार शरद पवार यांच्याशी ‘मनापासून’ दुबार चर्चा करून ना. निंबाळकर हे उदयसिंह पाटील यांचे मन वळवू शकले असते किंवा बाळासाहेब पाटील यांना पर्यायी जागा देऊ शकले असते.
 सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कराडचे सुरुवातीपासूनच असणारे मोठे स्थान कमी करण्यासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षात फार मोठा प्रयत्न झाला. मात्र, नियतीने 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने कराडला मुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून सत्ताकेंद्रे कराडलाच राहिली. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रराजे निवडून आले, मात्र शरद पवार यांचे जवळचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. मकरंद पाटील हे निवडून आले मात्र त्यांचा अनुभव बाळासाहेब पाटील यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाले आणि पुन्हा एकदा सत्ता केंद्र कराडला आले. मात्र असे असूनही राष्ट्रवादीच्या या जिल्हा टीमने कधीही बाळासाहेब पाटील यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाही. ना. बाळासाहेब पाटील यांची छाप पडू लागली तर आपली इमेज कमी होईल यासाठी भरपूर प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील हे सोसायटी मतदार संघातूनच कशी निवडणूक लढतील, त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील कसे उभे राहतील याचं नियोजन राष्ट्रवादी मधील दिग्गजांनी केलं. कराडचा वाद मिटवण्या ऐवजी पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंपरा आणि वारसा या जिद्दीला पेटलेल्या उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदा अर्ज भरला आणि बाळासाहेब पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब पाटील यांनीही या दबावाला न झुकता याच गटातून उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.
गेली नऊ टर्म कराड तालुका सोसायटी मधून प्रतिनिधित्व करणार्‍या विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या चिरंजीवांच्या विरोधात निवडणूक लढवताना बाळासाहेब पाटील यांनी सुरुवातीपासूनच केलेला अभ्यास आणि त्यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासहित एकनिष्ठ कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची होती. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असल्यामुळे त्यांनी निवडणुकी अगोदरच तीन महिने सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. कोणता मतदार कोणाचा आहे? कुठे विकू, झुकू शकतो? कुठे स्ट्राँग होऊ शकतो? या मतदाराचा वीक पॉईंट कोणता? हा कुणाचे नेतृत्व मानतो इथपासून तो कुणाचा पाहुणा आहे ? त्याचा कोणी नातेवाईक कुठल्या ठिकाणी नोकरीला आहे? त्याच्यावर कोणत्या पद्धतीने दबाव टाकता येईल किंवा मदत करता येईल? याचा ‘कराड उत्तर पॅटर्न’ नुसार अभ्यास बाळासाहेब पाटील गटाने केला होता. बाळासाहेब पाटील यांचे समर्थक हे त्यांच्या सोबतच राहणार होतेच. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे मतदार उघडपणे उदयसिंह पाटील यांना मदत करणार नव्हते. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्यातील मनोमिलन किती मनापासून झालेले आहे याचा अभ्यास बाळासाहेब पाटील यांना होता. कराड तालुक्यातील गावागावात गेल्या दोन वर्षात नेटवर्क अधिक मजबूत करून उत्तर मतदार संघाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांनी दक्षिणेत आपला एक माणूस गावागावात तयार केला होता.


बाळासाहेब पालकमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत ते निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे ‘स्ट्राँग पॉइंट’ असणार, असा प्रचार कराड तालुक्यात सुरुवातीपासूनच झाला. छत्रपती उदयनराजें विरोधात जिल्हा बँकेत पक्षाने त्यांच्यावर लादलेल्या उमेदवारीमुळे झालेला पराभव वगळता बाळासाहेब कधीही पराभुत झालेले नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांनी कराड दक्षिणच्या राजकारणात फारसा रस घेतला नव्हता. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचा फारसा सहभाग नसतो. कुणालाही न दुखावण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सहसा त्यांचा नवीन राजकीय विरोधक तयार होत नाही. त्यांचे परंपरागत काही विरोधक आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यावेळी दक्षिण मधील सर्व घटकांचा अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे गेले.
ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांच्या घराचे एक फारमोठे शल्य आहे. एवढे मोठं राजकीय आणि विकासात्मक काम करूनही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर असून सुद्धा विलासराव पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना कराड तालुक्याचे नेते होते आले नव्हते. किंबहुना ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांनी कराड शहर आणि  उत्तर या पलीकडे जाऊन जास्त पाहिले नव्हते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीपुरते लक्ष घातले. पुढे त्यांचा तिथे गट निर्माण झाला. मात्र या तालुक्यातील राजकारणात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही.  उंडाळकर आणि पी.डी.पाटील गटाचे अनेक वर्षे अनेक निवडणुकीमध्ये सख्य राहिले. मात्र ते मनापासून नव्हते. परिस्थितीनुसार निर्णय घेऊन ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने त्या -त्या वेळी पंचायत समिती, बाजार समिती या सत्ता ताब्यात घेतल्या होत्या. काकांनी दक्षिणेतील आपले पाय मजबूत करताना मोहिते- भोसले यांच्यामध्ये भांडणे लावत सतत मोठा विरोधक तयार होऊ दिला नव्हता. त्यामुळे ते सलग विधानसभेत जाऊ शकले. राज्यात असणारा दरारा कायम ठेवत बँकेच्या माध्यमातून काका नेहमी जिल्ह्याचे नेते म्हणून कार्यरत राहिले. सह्याद्री कारखाना आणि माझे शहर एवढाच विचार तसेच सोयीचे आणि तडजोडीचे राजकारण करत असल्यामुळे पी.डी. साहेब यांना कधीही जिल्ह्याच्या राजकारणात जावसं वाटलं नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्याच्या राजकारणात आपली पावले भक्कम करण्यास सुरुवात केली. कृष्णा कारखानाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील तटस्थ राहत अप्रत्यक्षरित्या त्यांनी अतुल भोसले यांना पाठिंबा दिला. अतुल भोसले यांचा तीन वेळा झालेला पराभव कुणामुळे झाला हे सर्व जिल्ह्याला माहित आहे. पहिला पराभव थेट बाळासाहेब पाटलांनी केला. दुसर्‍या दोन पराभवाला बाळासाहेब पाटील थेट जबाबदार नसतील पण कराड दक्षिणमधील बाळासाहेब पाटील यांचा गट अतुल भोसले यांच्या सोबत राहिला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. या जरी जर-तरच्या गोष्टी असल्या तरी कराड दक्षिण राजकारणात जिकडे बाळासाहेब पाटील तिकडे विजय
नक्की होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे.
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्यासोबतही बाळासाहेब पाटील यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षात बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील जरी एकत्र दिसले असले तरीही या गटातील दुरावा वेळोवेळी दिसला आहे. कराड नगरपालिकेच्या गत निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुभाषराव पाटील यांच्या विरोधात केलेला प्रचार आणि लोकशाही आघाडीचा झालेला मानहानीकारक पराभव बाळासाहेब पाटील गट अजूनही विसरलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण गट आणि उदयसिंह पाटील यांचा गट एकत्र आलेला असला तरी कार्यकर्त्यांमधील कुजबुज काय आहे याची माहिती घेत बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावरच ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले.
जिल्हा बँकेची निवडणूक सोपी नसते. सोसायटी मतदारसंघातून निवडून जायचं असेल तर तेवढी ताकद आपल्याकडे आहे का? गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला किती मते मिळाली होती? याचा अंदाज घेतानाच उदयसिंह पाटील यांच्या विरोधातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत असा प्रचार सुरुवातीपासूनच करण्यात आला. मात्र काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहित कोणीही नेता  उदयसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कराड तालुक्यात कुठेही फिरताना दिसला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी जी काही मते मते होती ती मते सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्यात बाळासाहेब पाटील यांचे बंधू यशस्वी झाले. उदयसिंह पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे मदत मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. हे जरी खरे असले तरी काँग्रेस प्रेमी अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती बाळासाहेब पाटील यांच्यावर खालच्या शब्दात जोरदार टीका झाली. फक्त या ग्रुपवरच हे दोन गट एकत्र असल्याचे दिसले. प्रत्यक्षात उंडाळकर गट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेही एकत्र काम करताना कोणालाही दिसला नाही. याची कारणेही
वेगळी आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांना कराड तालुक्याच्या राजकारणात तसा फारसा इंटरेस्ट नाही. त्यांना दक्षिण सोडून दुसरीकडे जायचे नाही. दक्षिणमध्ये ‘सध्या तरी’ ते सेफ आहेत. दक्षिणमध्ये निवडून यायचे असेल तर बाळासाहेब पाटील गटाची मदत लागणार आहे किंबहुना बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या मदतीमुळेच ते 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. त्यामुळे उघड प्रचार करून मने दुखावण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मला काही कळत नाही असे बोलून ते या निवडणुकीपासून लांब राहिले. त्यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाटील गटाने चांगलेच लॉबिंग केल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी काही मते जर पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले असते तर कदाचित उदयसिंह पाटील यांना मिळू शकली असती. मात्र उदयसिंह पाटील यांनी तशी मदतच मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते खासगित बोलून दाखवत आहेत. मात्र, हे सगळं घडूच नये यासाठी बाळासाहेब पाटील यांच्या सहीत यांच्या बंधूनी खेळलेल्या खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून लक्षात येते. खरेतर उदयसिंह पाटील सोसायटी मतदारसंघातून उभे राहिले नसते तर बाळासाहेब पाटील दक्षिणेतल्या गावा-गावात पोहोचू शकले नसते. ही झाली एक बाजू.  मात्र उदयसिंह पाटील हे एकाकी लढले.त्यांना मिळालेली मते पहिली तर त्यांची मते त्यांच्या सोबत आहेतच हे स्पष्ट होते. पराभवानंतर ते स्वतः यावर आत्मचिंतन करतीलच!
बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्या गटाची जुळवून घेतले, ही या निवडणुकीला सुरुवातीला मिळालेली एक वेगळी कलाटणी होती. अतुल भोसले यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती किंवा नगरपालिका फारसे महत्त्वाचे नाही. त्यांना काही करुन फक्त विधानसभेत जायचं आहे आणि विधानसभेत जाण्याचा मार्ग ‘मंगळवार पेठे’तून जातो याची त्यांना चांगली जाणीव आहे. उदयसिंह पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे येणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. या दोन्ही उमेदवारां विरोधात उभे राहताना बाळासाहेब पाटील यांना आत्ता मदत केली तर भविष्यात फायदा होऊ शकतो, या दूरदृष्टीतून अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला. बाळासाहेब पाटील यांना मिळालेली मते पाहिली तर अतुल भोसले यांची मदत त्यांना किती फायद्याची ठरली आहे हे स्पष्ट होते.
या निकालामुळे बाळासाहेब पाटील यांचा कराड तालुक्यातील दरारा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जिल्हा बँकेत येण्यासाठी वेगळे पर्याय देऊ केले होते, मात्र थेट सोसायटीतूनच लढायचे आहे असा आग्रह बाळासाहेबांनी करण्याचे कारण त्यांना  जिंकून  कराड तालुक्यावर आपला होल्ड आहे हे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवायचे होते. बाळासाहेब पाटील ठासून या निवडणुकीत जिंकले. या निकालामुळे भविष्यात अनेक राजकीय स्थितंतरे  होणार आहेत. काँग्रेसचं काय होणार, काँग्रेस काय करणार ? कराड तालुक्यात भविष्यात निवडणुका कशा होणार?  हे पाहण्यासाठी येणार्‍या काळाची वाट पहावी लागेल.

२० नोव्हेंबर २०२१

२४ तास तुझ्यात


२४ तास तुझ्यात!

दुलारी,

दिस सुरू होतो,
तुझ्या स्मरणाने..

सकाळ होती प्रसन्न,
सुप्रभात सतीराजानं..

वेध लागतात मध्यान्ही,
तुझ्या गोड दर्शनाचे..

सांज करते आतुर,
संवाद तुझसी साधण्याशी..

होता रात मग,
मन होतं व्याकुळ..
तुझ्या आठवणीत !
तुझ्या आठवणीत !

दुलारीचासती 
२०.११.२०२१


24 hours in you !

Dulari,

The day begins,
In your memory !

The morning is pleasant,
With Good morning Sati !

In the noon dreams,
For your sweet glimpse !

Evening makes crazy,
To communicate with you !

Then  night comes,
Mind becomes restless, 
In your memory
In your memory !


Dulari'Sati
20:11:2021

१६ नोव्हेंबर २०२१

तेरी हसी कि किमत क्या है बता दे तु


तेरी हसी़ंकी 
किमत क्या है ये बता दे तु ! 

कहो तो सारे 
रिश्ते नाते तोड के आऊ !

कहो तो खुदको 
हवाले तेरे कर डालु ! 

कहो तो खुलकर 
नाता इझहा़र कर दुं!

तेरी हसींकीं 
किमत क्या है ये बता दे तु🙏

१४ नोव्हेंबर २०२१

निरागस बालपणीच्या आठवणी




#निरागस बालपणीच्या आठवणी !

बालपण ही निसर्गाने दिलेली अतिशय सुंदर अशी देणगी आहे. कसलीही कामं नसतात, कसलीच चिंता नसते. फक्त हसणं,रडणं,खेळणं, नाचणे, जेवणं,आई-वडिलांच्या कुशीत जाऊन झोपणं,मजा करणं! येवढंच काम असतं.

बालपणात एका गोष्टीचे वेध लागलेले असतात ते म्हणजे मी मोठा कधी होणार ! पण आता (वयाने) मोठ्या झालेल्या लोकांना असं वाटतंय की बालपण परत यायला हवं !

या बालपणात आपण अनेक आनंद लुटले आहेत, खूप मजा केल्या आहेत. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी बाल दिन साजरा केला जातो. या दिनी आपण आपल्या लहानपणीच्या काही आठवणीमध्ये का बरं रमून जायचं नाही! 

खोडकर निरागस बालपण!
अल्लड अवखळ बालपण !
सुंदर सहज बालपण!

मला माझ्या बालपणीची एक गोष्ट चांगली आठवते. १९८२-८३ सालची गोष्ट असेल. तेव्हा एक दुजे के लिए चित्रपट पाहायला मी माझा थोरला बंधू हनुमंत अण्णा त्याच्या सोबत कराडला गेलो होतो. सोबत दुसरे एक आमच्या गावचे सतीश पाटील सोबत होते. कराडच्या राजमहल थेटरला आम्ही हा चित्रपट पाहिला. पाचवी सहावीत असेन मी. या वयात हा चित्रपट मला किती कळला, मला हा इतका रोमँटिक चित्रपट लव स्टोरी चित्रपट पहायला आमचा भावाने का नेले असेल कुणास ठाऊक? तरीही हा चित्रपट पाहून आल्यानंतर माझ्या बालमनाने जो प्रश्न विचारलेला होते त्याचे मला आज सुद्धा हसू येते.

कराडला चित्रपट पाहायला जायचं म्हणजे त्यावेळी सायकल हा एकमेव पर्याय होता. भावाच्या सायकलवर नळीवर टॉवेल बांधून त्यावर बसून डबल सीट कराडला जाणे यासारखा आनंद कुठलाच नव्हता. चित्रपट पाहून आल्यानंतर ओगलेवाडी जवळ रेल्वे स्टेशनचा मोठा ब्रीज लागतो. या ब्रिज वर सायकल स्वार खाली उतरतात कारण चढ लागतो. आम्ही बंधू डबलसीट होतो, आम्हीही उतरलो.

चालता चालता मी माझ्या बंधूंना आणि सतीश पाटील काकांना एक प्रश्न विचारला. आपण एक दुजे के लिये चित्रपट पाहून आलो खरं मात्र या चित्रपटातील हिरो हिरोईन शेवटी पाण्यात उडी मारतात, पाण्यात गायब होतात. मग पाण्यात उडी मारलेले ते दोघे कुठे गेले ? माझा हा निरागस प्रश्न ऐकून माझा बंधू त्यावेळेला हसला होता. आज मात्र हा प्रसंग आठवला की मला सुद्धा हसू येते.

आज बालदिनी हा प्रसंग शेअर करताना मला खूप आनंद वाटतोय. माझा पाचवीतला एक फोटो मी आपल्यासोबत शेअर करतोय. ब्लॅक व्हाईट फोटो आहे तो! मी दोन किंवा तीन वर्षाचा असतानाच आहे. तेव्हा माझे केस फार मोठे होते, जावळ चांगले होते. माझी  ताई माझी वेणी घालायलची. वेणी घातलेला फोटो आहे तो . दुसरा फोटो आहे सहावीतला. आमच्या थोरल्या बंधूच्या लग्नातला. तिसरा फोटो आहे येता दहावीतला. बोर्डाचे परीक्षेच्या साठी रिसीटवर लावण्यासाठी काढलेला. उजव्या बाजूचे हे तीन फोटो माझ्या बालपणीचे आहेत तर डाव्या बाजूचा फोटो अलीकडचा आहे. ‌

आपणा सर्वांना बालपणीच्या खूप खूप शुभेच्छा!

*सतीश वसंतराव मोरे*
  १४.११.२०२१
    बालदिन



# Innocent childhood memories  !

Childhood is a beautiful gift from nature. No work, no worries. Just laughing, crying, playing, dancing, eating, sleeping in the arms of parents, having fun! That's all there is to it.

One of the things I have noticed in my childhood is when I will grow up! But now (older) people think that childhood should come back!

In this childhood you have had a lot of fun, a lot of fun. Today, Children's Day is celebrated on the birth anniversary of Pandit Jawaharlal Nehru. Why don't you just go back and reminisce about your childhood? 

Khodkar innocent childhood! 
Allad fiery childhood! 
Beautiful instinctive childhood!

I remember one thing from my childhood. It will be the year 1982-83. Then my elder brother Hanumant Anna and I went to Karad with him to watch a movie. Another one was with Satish Patil from our village. We saw this movie at the Rajmahal Theater in Karad. I will be fifth and sixth. How much did I know about this movie at this age, who knows why my brother took me to see this romantic movie Love Story? Still, I can still laugh at the question my child asked me after watching this movie.

Bicycles were the only option for Karad to go to the movies. There was no such thing as having a towel tied to a tube on a brother's bicycle and sitting on it to get a double seat. After watching the movie, there is a big bridge at the railway station near Oglewadi. Cyclists get down on this bridge because of the ups and downs. We were brothers double seat, we got off too.

While walking, I asked a question to my brothers and uncle Satish Patil. We have seen the movie for a while, but the hero and heroine of this movie finally jumps into the water and disappears into the water. So where did the two jump into the water? My brother was smiling when he heard my innocent question. Today, however, I remember this incident and I can smile too.

I am very happy to share this episode of Children's Day today. I am sharing with you a photo of my fifth. It's a black and white photo! When I was two or three years old. At that time my hair was very long, the hair was good. My mother used to wear my braid. This is a braided photo. The second photo is of the sixth. At our older brother's wedding. The third photo is of the coming tenth. Drawn on the receipt for board examination. The three photos on the right are of my childhood and the photos on the left are recent. 3

Happy childhood to all of you!


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...