फॉलोअर

१९ नोव्हेंबर २०१६

पहिलं पहिलं



काचा वेचताना वाटेवरल्या
फूलं मिळत गेली...
भेटलीस वळणावर तू
आणि मने जुळत गेली !

तुझ्याबद्दल काय लिहावं
तेच कळत नाही...
मनाला किती समजावलं
तरी ते समजायला तयार नाही...!

कुठंही, कधीही, केव्हाही
दिन रात आणि स्वप्नी
तुझं नाव ऐकलं की मी सैरभैर होतो
तुझी भिरभिरती नजर शोधत राहतो !

मला उमगण्यासाठी
पुन्हा  प्रेमात पड ...
वा पहिल्या प्रेमाची उजळणी कर
शब्द जवळ येतील, मन गुंतत जाईल !


०५ नोव्हेंबर २०१६

भाजप-उंडाळकर (सदृश्य) आघाडी, धडपडणारी "सेना'; एमआयएमचा डाव

भाजप-उंडाळकर (सदृश्य) आघाडी, धडपडणारी "सेना'; एमआयएमचा डाव

सत्तेत असलेली लोकशाही आघाडी आणि त्यांच्यातूनच बाहेर पडलेल्या गटासोबत तयार झालेली "यशवंत जनशक्ती विकास आघाडी' आणि भाजपाच्या कारभारी नेत्यांची पडद्यामागील "सेटलमेंट' आणि विस्कटलेल्या आघाड्या याबाबत कराडकर चांगलेच जाणून आहेत. सर्व प्रभागांत उमेदवार न देता माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील कराड शहर नागरी विकास आघाडीला बरोबर घेऊन भाजपानेही सदृश्य आघाडी केली आहे. शहराबाहेरील विलासराव पाटील-उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले या दोन नेत्यांच्या आघाडीला आजपर्यंतचा इतिहास पाहता कराडकर काय करणार ?. अस्तित्व शोधणाऱ्या शिवसेनेला वरिष्ठांचे कसलेच सहकार्य नाही तरीही ती धडपडत आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमने निवडलेला उमेदवार वेगळा डाव आहे.




कराड शहरातील परंपरागत विरोधक आणि समविचारी लोक यांनी तयार केलेल्या आघाड्यांबाबत कराडकरांना चांगलीच माहिती आहे. कराडकरांनी नेहमीच शहरातील नेत्यांनाच पाठींबा दिला आहे. 2006 साली डॉ. अतुल भोसले यांनी पुरस्कृत केलेले मात्र प्रचारात कोठेही त्यांचे नाव जाहीर न केलेले तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. हा अपवाद वगळता शहराबाहेरील कोणत्याही नेत्यांना लोकांनी स्वीकारले नाही. 2006 ते 2016 दरम्यानच्या 10 वर्षात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले असले तरी कराडकरांच्या या विचारात अजून कसलाही फरक पडलेला नाही. याची जाणीव असल्यामुळेच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी शहरातील त्यांच्या विचारांच्या लोकांना पुढे करून कराड शहर नागरी विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने  महिन्यापूर्वी कराड पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद शहरातून  मिळाला नाही.


नगरपालिका निवडणुकीतील आचारसंहिता सुरू झाल्यानंतर शहरातील सत्ताधारी, सत्ताधाऱ्यामधील विरोधक,  मुळ विरोधक, भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या आघाड्यांनी जोरदार मुसंडी मारत लॉबिंग सुरू केले. मात्र शहर नागरी विकास आघाडीला कोणीही दाद दिली नाही. कराड दक्षिणेत माजी आ. विलासराव उंडाळकर आणि डॉ. सुरेश भोसले  मैत्रीपर्व  आहे. हे दोन्ही गट एकत्र येऊन कराडात उमेदवार देतील अशा शक्यता व्य्कत होत्या. डॉ. सुरेश भोसले यांचे चिरंजीव डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टी वतीने विलासराव उंडाळकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर झालेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत भोसले-उंडाळकर गट एकत्र आला होता. 

दरम्यान डॉ. अतुल भोसले यांना भाजपाने गेल्या दोन वर्षांत मानाचे स्थान देत  चांगली ताकद दिली आहे. भविष्यात भाजपाकडून ङ्किळणाऱ्या आमदारकीचा  विचार करत डॉ. भोसले यांनी पक्षाच्या अजेंड्याप्रमाणेच कराड पालिकेत उतरण्याचा निर्णय घेतला. वास्तविक डॉ. भोसले यांना मानणारे शहरातील अनेक लोक भाजपा पक्ष चिन्हापेक्षा आघाडी करून निवडणूक लढवावी, या विचारांचे होते व आहेत. सध्या डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीचे 8 सदस्य पालिकेत आहेत. या सदस्यांपैकी  महादेव पवार वगळता कोणीही भोसले यांचे नाव घेत नव्हते. डॉ. भोसले यांची कृष्णा विकास आघाडी आणि कराड शहर नागरी विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवितील, असा अंदाज अनेकांनी वर्तविला होता. त्यादृष्टीने उंडाळकर गटाने शहरात प्रवेश करण्याची स्वप्ने पाहिली होती. मात्र भाजपाच्या दबावा  मुळे डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाबरोबरच राहणे पसंत केले. कोअर कमिटीत विक्रम पावसकर, ना. शेखर चरेगांवकर, स्वप्निल भिंगारदेवे यांच्या बरोबरीने अतुल भोसले कार्यरत राहिले. भाजपाने सुरूवातीपासूनच पक्ष चिन्हाचा आग्रह करताना नंतर  आमच्च्याबरोबर येणाऱ्या सर्व आघाड्यांना स्थान दिले जाईल, असे जाहीर केले होते. ताकद असलेल्या सात प्रभागांमध्ये भाजपा लढणार आणि उर्वरित सात प्रभागांत नागरी विकास आघाडीला जागा सोडण्याचा अलिखित करार करून भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर केला. भाजपा आणि कराड शहर नागरी विकास आघाडीचा समझोता आणि त्यांनी दिलेले (मिळालेले)  उमेदवार पाहता येथेही "सेटलमेंट ए्क्सप्रेस' जोरात धावली आहे, असेच म्हणावे लागेल.


प्रभाग क्र. 1, 2, 4, 5, 6, 13 आणि 14  मधून भाजपाचे उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रभाग क्र. 7, 8, 9, 11, 12, 13 ङ्कध्ये कराड शहर नागरी विकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. 7, 8, 9 आणि 10 या प्रभागांत व्यापारी वर्ग, जैन, मारवाडी यांची  लक्षनीय आहेत. ही  मते भाजपाला  मिळू शकली असती. पण भाजपा जिल्हाध्यक्षांपासून प्रदेश चिटणीसपर्यंत तसेच भाजपा शहराध्यक्षांपासून सचिवांपर्यंत सर्वांचे विरोधी जनशक्ती आणि लोकशाही आघाडीच्या नेत्यांशी लागेबांधे आहेत. या प्रभागात उमेदवारी देऊन ताकद आजमावण्याऐवजी भाजपाने या जागा आघाडीला देऊन टाकल्या आणि एकप्रकारे जनशक्ती आणि लोकशाही आघाडीला  मदतच केली आहे. प्रभाग क्र. 12  मध्ये डॉ. अतुल भोसले यांचे निष्ठावंत नगरसेवक  महादेव पवार यांच्या पत्नीने कराड शहर नागरी विकास आघाडीची उमेदवारी घेतली आहे. या प्रभागात मुस्लिम  मतदारसंख्येचा विचार करून पवार यांनी भाजपाच्या चिन्हावर लढण्याऐवजी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बाजार समिती, खरेदी-विक्री संघ परिसरात असलेल्या या प्रभागात विलासराव पाटील-उंडाळकर यांना मानणारा वर्ग दखलनीय आहे. याचा विचार करून भाजपाने ही जागा सोडल्याची चर्चा आहे.


माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कराड शहरात थेट प्रवेश करण्यासाठी आसूसलेले आहेत. कराड शहराचा समावेश दक्षिणेत झाल्यानंतर 2009 च्या पहिल्या निवडणुकीत कराडकरांनी काकांना चांगली साथ दिली होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर उंडाळकर काकांचे शहरातील  महत्व हळूहळू कमी होत गेले. 2014 च्या निवडणुकीत उंडाळकरांना कराड शहरात म्हणावीशी  मते  मिळू शकली नाहीत. शहरात त्यांना मानणारा ज्येष्ठ नागरिकांशिवाय दुसरा वर्ग नव्हता. युवक वर्ग भाजपा, शिवसेनेकडे तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या विकासनिधी मुळे इतर सर्व वर्ग कॉंग्रेसकडे किंबहुना बाबांकडे आकर्षिला गेला. शहरातून ताकद न  मिळाल्याने उंडाळकर तिसऱ्या क्रमांकावर  फेकले गेले. या पराभवानंतर उंडाळकरांनी कराडात गटबांधणी केली. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरात प्रवेश करण्यासाठी मोर्चेबांधणी केली. मात्र  मराठा समाजाचा एकही वजनदार कार्यकर्ता त्यांच्या हाताला लागू शकला नाही. त्यामुळे उंडाळकर गट कराडात बॅकफुटवर गेला. नेहमीचेच निष्ठावंत विजय  मुठेकर, मझहर कागदी तसेच माजी नगराध्यक्ष अशोक भोसले यांना पुढे करून त्यांना आघाडी स्थापन करावी लागली. 35 वर्षे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले विलासकाका भाजपासोबत खुल्यापणाने आघाडी करू शकत नव्हते आणि नाहीत. उंडाळकरांनी कॉंग्रेस पक्षत्याग केला असला तरी पक्ष धोरणे अजूनही सोडलेली नाहीत. भविष्यात आ. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष आपलाच विचार करेल असा विश्वास उंडाळकरांना आजही आहे. त्यामुळे  नागरी विकास आघाडीचा भाजपासोबत अलिखित युतीमध्ये  उंडाळकर गटाने कुठेही खुला पुढाकार घेतलेला नाही. मात्र तरीही भाजपा- उंडाळकर सदृश्य युती लपून राहिलेली नाही.

भाजपा आणि नागरी विकास आघाडीच्या सेटलमेंट   युतीनुसार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाला  फायदा होईल, असे गणित मांडले गेले आहे. भाजपाने दिलेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या डॉ. अतुल भोसले यांनी सुचविलेल्या आहेत. या उमेदवाराच्या निवडणुकीची यंत्रणा, प्रचार आणि विजयाची जबाबदारी डॉ. अतुल भोसले यांच्या सहित ना. शेखर चरेगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने नगराध्यक्ष  भाजपचा झाला तर  शहराला मोठा निधी आणता येईल. या अपेक्षेने तसेच येणाऱ्या निवडणुकीत ङ्खायदा व्हावा या दृष्टीने अतुल भोसले यांनी पावले टाकली आहेत. याचा किती ङ्खायदा होईल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी उंडाळकर-भोसले गट आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची ध्येय-धोरणे आणि खेळ्या कराडकर चांगलेच जाणून आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत कराडकरांचा कल आणि स्वभावाचा विचार करता डॉ. अतुल भोसले आणि विलासराव उंडाळकर या शहरा बाहेरील नेतृत्वांच्या आघाडीला कराडकर कुठे नेऊन ठेवणार हे 28 नोव्हेंबरला कळणार आहे.

शिवसेना हा भाजपाचा मित्र  पक्ष आहे. राज्य पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची घोषणा या दोन्ही पक्षांनी शेवटच्या टप्प्यात केली. मात्र तोपर्यंत बरेच होत्याचे नव्हते झाले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाने ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यात आक्रमक यंत्रणा राबविली तशी शिवसेनेचा पालकमंत्री   असूनही त्यांना राबविता आली नाही. कराडात तर शिवसेना आहे की नाही? असा प्रश्न पडला होता. एकेकाळी शहरात शिवसेनेच्या विचारांचे 7 ते 8 नगरसेवक होते. शहरात शिवसेनेच्या 29 शाखा होत्या.  मात्र गेल्या 20 वर्षांत पक्षाची शहरात वाताहत झाली आहे. कराड उत्तरेत शिवसेना सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून येते. मात्र त्या मानाने शहरात हा पक्ष निवेदनाच्या पुढे जात नाही. निष्ठावंत शिवसैनिकांना ताकदही दिली जात नाही आणि ङ्कुंबईत बसलेले नेते पाठींबाही देत नाहीत. तरीही शशिराज करपे यांच्या पत्नी  सौ. स्वाती करपे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. पक्षाचे 8 उमेदवार 4 प्रभागात आहेत.  धनुष्यबाणाचे चिन्ह कराडात पुन्हा घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवसेना धडपडत आहे. पण शिवसेना पक्षप्रङ्कुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आयात केलेल्या उमेदवाराला जेवढी ताकद दिली तशी ताकद दिली तरच शिवसेनेचे अस्तित्व जाणवणार आहे.


माजी नगराध्यक्ष अल्ताफ गणी शिकलगार यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेच कराडची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. एमआयएम पक्षाची ध्येयधोरणे आणि समाजातील स्थान तसेच पक्ष आणि शिकलगार यांची निगेटिव्ह प्रतिमा यांमुळे गेल्या वर्षभरात शिकलगार यांना म्हणावासा प्रतिसाद मिळाला  नाही. तरीही एमआयएमने माजी नगरसेवक आनंदराव लादे यांच्या पत्नी रुपाली लादे यांना नगराध्यक्ष पदासाठी दिलेली उमेदवारी  धकादायक आणि इतर आघाड्यांना विचार करायला लावणारी आहे. मुस्लिम  बहुल पाच प्रभागांत 10 जागांवर एमआयएमचे उमेदवार रिंगणात आहेत. पैकी 4 जागांवर एकटे अल्ताङ्ख शिकलगार उभे आहेत. कराडात ङ्कुस्लिङ्क समाजाचे  मतदान 14/15 हजारांच्या घरात आहे. स्थानिक राजकारणाचा विचार करता या समाजाचे सर्वच राजकीय पक्ष आणि आघाड्यांशी संबंध आहेत. जनशक्ती, लोकशाही, कराड शहर नागरी विकास आघाडी तसेच भाजपानेही मुस्लिम  लोकांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग पातळीवर मुस्लिम  समाजाच्या  मतांची प्रत्येक ठिकाणी विभागणी होणार आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमने टाकलेला डाव आणि गणिते धक्कादायक असण्याची श्नयता आहे.
बहुजन क्रांती दलानेही नगराध्यक्ष पदासहीत 5 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. पहिल्यांदाच बहुजन क्रांती दल पालिकेच्या निवडणुकीत उतरली असल्याने  त्यांचा अंदाज कोणालाच नाही.

कराड पालिकेच्या रिंगणात असलेल्या सर्व आघाड्‌या आणि पक्षांचे उमेदवार   आणि उमेदवार निवडीवेळी विचारात घेतलेली गणिते, परस्पर सहकार्य करण्याचे धोरण आणि सेटलमेंट याबाबत सर्वसामान्य कराडकरांना जेवढा अभ्यास आहे, तेवढा  कोणत्याच आघाडीप्रमुखांनाही नाही. पहिल्यांदाच नगराध्यक्ष आणि प्रभाग निहाय निवडणुकीत तिहेरी, चौरंगी, पंचरंगी लढतीची श्नयता निर्माण झाली आहे. 11 नोव्हेंबर पर्यंत आणखी काही आघाड्या किंवा पक्ष एकत्र येण्याच्या श्नयता आहेत. अनेकजण माघारही घेणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

                             
  (उत्तरार्ध)
- सतीश मोरे

०४ नोव्हेंबर २०१६

विस्कळीत आघाड्यांतील सेटलमेंट

विस्कळीत  आघाड्यांतील "सेटलमेंट'

27 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कराड शहरात ओढून-ताणून एकत्र आलेल्या, वैयक्तिक द्वेषापोटी वेगळ्या झालेल्या नेत्यांच्या आणि विरोधाला विरोध म्हणून तयार झालेल्या आघाड्यांमध्येच सामना रंगणार आहे. 5 वर्षे गुण्यागोविंदाने सुख - दु:खाच्या वाटणीत एकत्र राहिले, तेच आता लोकशाही नव्हती एकाधिकारशाही होती असे म्हणत जनशक्तीचा नारा देत विरोधात उभे ठाकले आहेत. केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोळाबेरीज नेत्यांनी भविष्यातील सत्तेचा लाभ डोळ्यासमोर ठेवून एकत्र येण्याचा देखावा केला आहे. शिवसेनेनेही आम्ही "संपलोय पण संपलेलो नाही' असा केविलवाणा प्रयत्न करत कसेबसे उमेदवार जमवले आहेत. एम आय एम , बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, कराड शहर नागरी विकास या पार्ट टाईम आघाड्या नाही म्हणायला उभ्या आहेत ! माजी मुख्यमंत्र्याचा वैयक्तिक करिश्मा वगळता कॉंग्रेस शून्य आहे.



नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी लोकशाही आघाडीने नगराध्यक्ष पदासहीत अन्य 22 जागांवर उमेदवार दिले आहेत. आ. बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणारी लोकशाही आघाडी शहरातील सर्वात मोठी आघाडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील यांना मानणारा आणि निवडणुकीतही त्याच्या पाठीशी राहणारा 35 टक्के मतदार आहे. हा मतदार संपूर्ण शहरात विभागलेला आहे.

2001, 2006, 2011 मध्ये  झालेल्या सर्वच निवडणुकीत लोकशाही आघाडीने कोणाची तरी साथ घेत सत्ता काबिज केली आहे. 2001 साली थेट जनतेतून शारदा जाधव नगराध्यक्षा झाल्या.  मात्र लोकशाही आघाडी आणि नगरविकास आघाडीक  एकत्र येऊन 16 जागांवर विजयि झाले होते. 2006 मध्ये लोकशाही आघाडी स्वतंत्र लढली आणि 12 जागांवर विजयी  झाली. डॉ. अतुल भोसले यांच्या 3 आणि एका अपक्षांचा पाठींबा घेऊन ही आघाडी अडीच वर्षे सत्तेत राहिली. 2011 मध्ये जजनशक्ती आघाडीमध्ये  फुट पडून राजेंद्रसिंह यादव यांचा गट लोकशाहीला मिळाला आणि 21 जागा जिंकून ही आघाडी पुन्हा सत्तेत आली. या तिन्ही निवडणुकींचा विचार करता सत्तेत येण्यासाठी आवश्यक 15 ते 20 टक्के मतांचा आधार लोकशाही आघाडीला इतरांकडून घ्यावाच लागला आहे.

5 वर्षांचा सुखाचा संसार सोडून लोकशाही आघाडीतून राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील ययांचा गट आज पुन्हा जनश्नतीला जाऊन मिळाला आहे. 2011 साली 18 जागांवर उमेदवार उभे करून लोकशाहीचे 16 उमेदवार विजयी झाले होते. तर याच आघाडीच्या बॅनरखाली राजेंद्रसिंह यादव यांना मानणारे 5 सदस्य विजयी झाले होते. आज लोकशाही आघाडीने 22 जागांवर उमेदवार देताना तडजोडी स्विकारल्या आहेत. धक्कादायक निकालापेक्षा सन्मानाने थांबण्याचा निर्णय घेताना सुभाषराव पाटील यांनी किंगमेकरची भूमिका स्विकारली आहे.

ताकद असूनही किंवा वर्षानुवर्षे त्याच्या गटाशी एकनिष्ठ अनेक कुटुंबे असतानाही प्रभाग क्र. 6 आणि 10 मध्ये  त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत. प्रभाग क्र. 8, 9 आणि 11 प्रभागात  एक-एकच उमेदवार दिला आहे. यादव आणि पाटील यांनी 5 वर्षे हेवा वाटेल असा संसार केला आहे. मनाने एकत्र असलेले हे दोन्ही गट पाच वर्षांत सर्वच चांगल्या - वाईट गोष्टीत समान भागीदार होते. तत्याच्यावर लक्ष ठेवायला किंबहुना सुख-दु:खाच्या भागीदारीत जयवंत पाटील हे  सोबत होते. सुभाषराव पाटील, राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील या तिघा नेत्यांनी भांडणे न करता कारभार केला. आज प्रभाग 10 मध्ये राजेंद्रसिंह यादव तर प्रभाग 8 मधून जयवंत पाटील उभे आहेत. या दोन प्रभागांत लोकशाही आघाडीला सक्षम उमेदवार देता आला असता पण का दिला नाही ? याची कारणे कराडकरांना चांगलीच ठाऊक आहेत.

जयवंत पाटील आणि राजेंद्रसिंह यादव लोकशाही आघाडीला कदापिही सोडून जाणार नाहीत, अशी खात्री सुभाषराव पाटील यांना होती. त्यामुळेच बेरजेचे राजकारण करत सुभाषकाकांनी दोघांशीही चांगले संबंध ठेवले. शेवटच्या टप्प्यात जयवंत पाटील आणि सुभाषकाका यांचे संबंध फारच ताणले. मात्र यादव आणि सुभाषकाका यांचे सलोख्याचे संबंध राहिले. भविष्ङ्माकत राजेंद्रसिंह यादव यांच्या  ताकदीचा फफायदा घेता यावा. नगराध्यक्ष एका गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाचे अशी परिस्थिती निर्माण झाली तर यादव-पाटील युती पुन्हा करणे सोपे व्हावे या दृष्टीने राजेंद्रसिंह यादव यांच्या  विरोधात लोकशाहीने उमेदवारी न ददिल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्र. 6 मधून उभ्या असलेल्या शारदा जाधव यांचा पाठींबा, जुने संबंध आणि ताकद विचारात घेऊन लोकशाहीने येथे  थांबणेच पसंत केले आहे. राजेंद्रसिंह यादव आणि अरुण जाधव  यांच्या  गटानेही प्रभाग क्र.4  आणि 1 मध्ये  लोकशाही आघाडीच्या उमेदवाराविरोधात त्यामानाने सक्षम उमेदवार दिलेले नाहीत. यादव -जाधव आणि सुभाषकाका यांच्या  पडद्यामागील  तडजोडीची कराडात चर्चा सध्या आहे. प्रभाग 4 मधून आप्पा माने यांच्या  उमेदवारीसाठी जयवंत पाटील यांचा  आग्रह होता. पण अशोकराव पाटील यांचे नाव पुढे आले.आप्पा माने यांना उमेदवारी न दिल्यास जबाबदारी घेणार नाही, असा पवित्रा जयवंत पाटील यांनी घेतला होता. अशोक पाटील यांच्या उमेदवारीमुळे जयवंत पाटील मोकळे झाले आहेत. ते आता चार मध्ये फार लक्ष घालणार नाहीत. प्रभाग क्र. 8 मधून लोकशाही आघाडीला सागर बर्गे यांच्या रुपाने मनसेचा उमेदवार आयात करावा लागला. जयवंत पाटील यांच्या विरोधात  सक्षम उमेदवार न मिळाल्याने लोकशाहीला हा निर्णय घ्यावा लागला, अशी चर्चा शहरात आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये जनशक्ती आघाडीच्या स्मिता हुलवान यांच्या  विरोधात लोकशाहीने उमेदवार दिलेला नाही. प्रभाग क्र. 5 प्रमाणेच 11 मध्येही लोकशाहीला उमेदवार आयात करता आला असता. मात्र  स्मिता हुलवान यांच्या मुळे गेल्या 5 वर्षांत झालेला त्रास पाहता त्यांना पराभूत करण्यासाठीच सुभाषराव पाटील यांनी आताचे विरोधक (15 दिवसांपूर्वीचे लोकशाहीचे घटक) आणि जनशक्तीकधील घटकांशी जुळवून घेत हुलवान यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली नाही. यादव आणि पाटील यांचा 5 वर्षांच्या संसारातील कडू-गोड आठवणींचा उमेदवार देताना विचार केला गेला आहे, असे कराडकर उघडपणे बोलत आहेत.

"धरलं तर चावतंय.. सोडलं तर पळतंय..' अशी अवस्था माजी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण  गटाची झालेली आहे. वास्तविक कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा, त्याच्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग  आहे. पण हा वर्ग म्हणजे कॉंग्रेस पक्ष नव्हे . कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असणारे आठ- दहा जे लोक आहेत, ते फक्त  पृथ्वीराज चव्हाण यांचा फायदा घेण्यासाठीच आहेत, हे कटू सत्य आहे. राज्यभर कार्यकर्ताचा उपयोग ( वापर ) करून घेणारे हजारो लोकप्रतिनिधी आहेत.  पण लोकप्रतिनिधी (पृथ्वीराज चव्हाण) यांचा वापर करून घेणारे अनेक जण कराडात आहेत. या लोकांनी बाबा मुख्यमंत्री असताना त्याचा फायदा घेतला. पण कॉंग्रेस पक्ष वाढीचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळेच इच्छा असूनही पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेस चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे  घ्यावा लागला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या  नेतृत्वाखाली जनशक्तीतच्या झेंड्यावर  अरुण जाधव, राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील एकत्र आले आहेत. या तिघांनाही बाबांच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला कधीच अडचण वाटत नाही. मात्र कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आलो तर बाबांचे सोडून इतरांचेच ऐकावे लागेल. पालिकेचा कारभार नको त्यांच्या  हातात जाईल. याची पूर्ण जाणीव असल्यानेच कॉंग्रेसच्या चिन्हावर लढण्यास या तिघांनीही नकार दिला. दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्व निवडणुका हाताच्या चिन्हावरच लढाव्यातत, असा आग्रह आणि दबाव कॉंग्रेस श्रेष्ठींकडून वाढत होता. पृथ्वीराज चव्हाणांनी तो निर्णय घेण्याचे निश्चितही केले. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक राहिले (छाननीवेळी त्यांची नावे कळली ). पृथ्वीराज बाबा चालतात मात्र चिन्ह नको, असा विचार असणाऱ्या जाधव-यादव-पाटील यांच्या आघाडीने पुन्हा एकदा दुसरीकडे बोलणी सुरू केली आणि मनात नसतानाही पृथ्वीराज चव्हाण यांना जनशक्ती आघाडीसोबत फरपटत जावे लागले. वास्तविक मुख्यमंत्री असताना त्यांनी भरपूर  निधी दिला.  मात्र  कॉंग्रेस पक्ष वाढविण्यासाठी  कधीच लक्ष दिले नाही. ही जबाबदारी त्यांनी बगलबच्च्यांवर सोपविली. मात्र या बगलबच्च्यानी स्वत:चा फायदा करून घेतला. विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस पक्षावर असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण ययांनी दिलेल्या भरभरुन निधीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कराडकरांनी हाताला मतदान केले. मात्र तो हात पालिकेच्या निवडणुकीत आणण्याची संधी पृथ्वीराज चव्हाण यांना बगलबच्च्यानी केलेल्या चुकांकुळे गमवावी लागली.
कराडात डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगांवकर आणि विक्रम पावसकर यांच्या रुपाने दिलेल्या सत्ताकेंद्रांच्या माध्यमातून फिडबॅक घेण्यासाठी पहिल्यापासूनच  भारतीय जनता पक्षाने पक्षचिन्हाचा आग्रह धरला. पक्षाचे चिन्ह डॉ. अतुल भोसले यांच्या  उमेदवारीने विधानसभेवेळी दक्षिणेत पोहोचले होते. मात्र शहरात कमी पडले होते. तरीही शहरातून मिळालेली 10 हजारांच्या घरातील मते भाजपसाठी जमेची बाजू होती. मनात नसुनही मन न जुळणारे भाजपचे नेते कराडात एकत्र आले. नगराध्यक्ष पदासहित 15 जागांवर त्यांनी उमेदवार कसेबसे उभे केले आहेत. मात्र या पक्षांलाही जनशक्ती आणि लोकशाही आघाडीप्रमाणेच अंतर्गत तडजोडी केल्याचे उमेदवारांवरून लक्षात येते.  ब्राम्हण बहुल्य प्रभाग क्र. 4  व 5 मध्ये  ब्राम्हण समाजाचा  उमेदवार न देता प्रभाग क्र. 1 मध्ये या समाजाचे दोन-दोन उमेदवार देऊन भाजपाने काय साध्य केले ? हे न कळण्याइतपत कराडकर नकीच खुळे नाहीत.

भारतीय जनता पार्टी कराडचे नाव पावसकर जनता पार्टी द्यावे लागेल.  लोणंदमध्ये भाजपचा झेंडा लावणाऱ्या जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना जिल्ह्यात भाजप सक्षम करण्याची द्वारे खुली असताना ते कराडात का अडकले आहेत? हा प्रश्न पडतो. भाजपाच्या जुन्या निष्ठावंताना टाळून जवळच्या लोकांना जवळ करताना भाजपानेही कॉंग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे काय ? असे संघप्रेमी बोलून दाखवत आहेत. एकाच घरातील 4 जणांना तिकिट देऊन भाजपने आमच्याकडे सक्षम माणसे नाहीत हेच जणू मान्य केले आहे. नाही म्हणायला 13 आणि 14 प्रभागात सोशल इंजिनिअरिंगचा भाजपने प्रयत्न केला आहे. नगराध्यक्ष पदासाठीही चांगला उमेदवार दिला आहे. वास्तविक नगराध्यक्ष पद जिंकणे हाच भाजपचा अजेंडा आहे.

एकंदरीतच कराड शहरात बिघडलेल्या आघाड्यांतील विस्कटलेल्या नेत्यांचे एकत्रिकरण यातून सत्ता मिळविणे हाच अजेंडा सध्या तरी दिसतोय . जनशक्ती आणि लोकशाही आघाडीला एकमेकांविरोधात बोलायला सध्या तरी कोणताच मुद्दा दिसत नाही. रेंगाळलेली कामे, रखडलेला विकास या गोष्टीला या दोन्ही आघाडीतील तीन नेतेच जबाबदार आहेत. लोकशाही आघाडीसमवेत सुखाने संसार केलेले राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील आज एकत्र येऊन जाधवांच्या जनश्नती आघाडीच्या झेंड्याखाली बाबांना येऊन मिळाले आहेत. त्यामुळे जनश्नती आघाडी सत्ताधारी लोकशाही आघाडीचीच झेरॉक्स कॉपी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजपाच्या आघाडीत असणारे कारभारी पाच वर्षे अनेक महत्वाच्या आणि लाभाच्या प्रसंगी सत्ताधाऱ्या सोबतच होते, हे कराडकरांना चांगलेच ठाऊक आहे. "एकाला बाजूला काढायचा आणि दुसऱ्याला उभा करायचा तर दुसराही पहिल्यासारखाच निघाला, असे म्हणायची वेळ सध्या आली आहे.   
                         
(पूर्वार्ध)

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...