फॉलोअर

०६ सप्टेंबर २०१८

दो रास्ते

आयुष्यात अशा काही वाटा असतात,ज्या वाटेकडे जावं लागतं, टाळावं लागतं किंवा जाण्याची आपल्यावर वेळ येते. आपण जेव्हा वाटा निवडतो तेव्हा ती वाट योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत लगेच काही जण टीका करू लागतात, चर्चा करू लागतात,तुमच्या पायात आडवे येण्याचा प्रयत्न करतात.  मला पहायला मिळालेल्या , भावलेल्या दोन.वाटाबाबत मी आज बोलणार आहे



गेली 20 वर्षे कराड शहरात रहायला आल्यापासून माझे सोमवार पेठेतील घर ते ऑफिस  या मार्गावरून ऑफिसला येताना कामावर जाताना, कुठेही जाताना किंवा परत घरी येताना सकाळच्या वेळी येताना अथवा दुपारी सायंकाळी ऑफिसवरून परत जाताना मी हमखास दोन रस्त्यावरूनच , या वाटेवरूनच घरी परततो, याची कारणेही आहेत. ती  ती कारणे सांगण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. काहीना हे आवडेल किंवा आवडणार नाही. माझा जाण्याचा येण्याचा दिवसभरातील एक मार्ग निश्चित आहे हा मार्ग थोडासा वेगळा आणि आपणास न पटेल असा पद्धतीचा आहे.

आज हा प्रसंग पाठवण्याची किंवा लिहिण्याची आठवण मला आली कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्र संत तरुण सागर महाराज यांचे निधन झाले. 2003 मध्ये तरूण सागर महाराज यांचे इस्लामपूर येथे तीन दिवस कडवे प्रवचन येथील जैन बांधवांनी आयोजित केले होते. तरूण सागर महाराज यांचे टीव्हीवरील आणि वृत्तपत्रातील रकान्यांमध्ये व प्रसिद्ध झालेले कडवे विचार ऐकून मी त्यांच्या विचारांकडे थोडाफार आकृष्ट झालो होतो आणि याच भावनेतून मी सहकुटुंब इस्लामपूर येथे तरूण सागर महाराज यांचे प्रवचन यासाठी तीन दिवस गेलो होतो. तरूण सागर महाराज यांचा एक प्रभावी व कडवा असा विचार मला खूप आवडला.

तरूण सागर महाराज म्हणतात, मनुष्य  अतिशय हुशार प्राणी आहे. त्याने विचारपूर्वक मंदिरे गावाच्या मध्यभागी बांधली आहेत आणि त्याहून अधिक विचारपूर्वक स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधलेल्या आहेत. गावाच्या मध्यभागी बांधलेल्या मंदिरात तो जाता-येता वेळ मिळेल तेव्हा देव दर्शन घेतो, देवाजवळ भीक मागतो, इच्छा व्यक्त करतो. फक्त संकट आले की देवाचा धावा करतो .हातात संपत्ती आणि प्रसिद्धि आली की तो मौजमजेत गुंग राहतो आणि केवळ दुःख आले की त्याला देवाची आठवण होते. संत कबीर म्हणतात दुखमे स्मरण सब करे ,सुख मे करे ना कोई, जो सुख मे स्मरण करे, दुख कायेको होए . मात्र मनुष्य हे सर्व विसरून जाऊन फक्त दुःखाच्या वेळेतच ईश्वराचे स्मरण करतो. मंदिरात जातो आयुष्यभर मौजमजा करतो पण त्याला आपण कधीतरी मरणार आहोत याचे भान राहत नाही. मृत्युच्या भीतीने किंवा मी मरणारच नाही, मी अमर आहे ,मला काही होतय, मी सर्वांच्या पेक्षा मोठा आहे या अविर्भावात राहतो. मृत्यूकडे दुर्लक्ष करतो. तरूण सागर महाराज पुढे म्हणतात खरे तर मंदिरे गावाच्या बाहेर निवांत ठिकाणी डोंगरावर असली पाहिजेत आणि स्मशानभूमी गावाच्या मध्यभागात असली पाहिजे. असे असेल तर महिन्यातून एकदा दोनदा त्याला गावाच्या मध्यभागी कुणाचेतरी प्रेत जळताना पहावयास मिळेल, कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे, याची त्याला जाणीव होईल आणि कधीतरी मला या ठिकाणी जायचे आहे, मला मृत्यू येणार आहे याचे भान त्याला राहिल,असे तरूण सागर महाराज म्हणतात .

तरुण सागर महाराजांचा हा विचार जेव्हा मी इस्लामपूर मधील कार्यक्रमात ऐकला तेव्हा मलासुद्धा या विचाराने प्रभावित करून सोडले. बालपण संपते, तरुणपण येतं ,परत प्रौढत्व येतो म्हातारपण येत आणि माणसाचा शेवट होतो.  कधीतरी माझा मृत्यू होणार आहे या जाणीवेतूनच मनुष्य चांगल्या विचारांचा किमान विचार तरी करतो आणि या भावनेतूनच मलासुद्धा कराड मधील मंगळवार पेठेत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा आखरी रास्ता आवडू लागला. रोज घरातून बाहेर पडताना या स्मशानभूमीच्या उताराकडे माझी पावले वळू लागली. ऑफिसला जाण्याची वेळ दहा असल्यामुळे याच दरम्यान या स्मशानभूमीचा आखरी रास्ता वर मला रक्षाविसर्जन विधी अथवा दशक्रिया विधीसाठी येणारे लोक पाहायला मिळू लागले. कधीतरी एकादी अंत्ययात्राही पहायला मिळाली. या लोकांच्याकडे पाहिल्यानंतर मृत्यूचं सत्य मला उलगडलं . जो मृत्यू होऊन निघाला आहे त्यालाही माहिती होतं की त्याचा मृत्यू येणार आहे. मृत्यूच्या या रस्त्यावर जाण्यापूर्वी आपण काहीतरी वेगळं करावं असा विचार येत राहतो. मला एखादी अंत्ययात्रा पाहायला मिळाली की समोरून येणाऱ्या अंत्ययात्रेत मी सहभागी होत नाही. मात्र तिरडीवर बांधलेल्या त्या निर्जीव देहाकडे पाहून माझे हात आपोआप जोडले जातात आणि मनातून प्रार्थना बाहेर पडते. हे ईश्वरा, या व्यक्तीने आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी खूप खस्ता खाल्ल्या असतील .त्याच्या जाण्याने समाजाचे कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाच्या दुःखात तर आम्ही सहभागी आहोत. या कुटुंबाला ही व्यक्ती पुन्हा कधी भेटणार नाही. व्यक्ती संपला की त्याची कारकीर्द संपते. या व्यक्तीच्या वारसदाराने त्याचे कर्तृत्व पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रार्थना माझ्या तोंडातून आपोआप बाहेर पडते.  गेल्या आठ ते दहा वर्षात स्मशानभूमीचा हा आखरी रास्ता मला खूप भावतो. अनेकजण म्हणतात समोरून अंत्ययात्रा आलेले चांगले नसतं, अशुभ असतं. माझा अनुभव वेगळा आहे, आनंददायी आहे.  एवढ्या वर्षात या रस्त्यावरून जाताना मला अनेक अंत्ययात्रा पहायला मिळाल्या, रक्षाविसर्जन विधीसाठी जाणारे अनेक लोक पहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात एक दुःख पहायला मिळाले आणि या दुःखातूनच मृत्यू अटळ आहे. जिंदगी तो बेवफा हे, एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा है, अपने साथ लेकर जायेगी, हे माझ्या आवडत्या हिरो अमिताभ बच्चन यांचे मुकंदर का सिकंदर मधील गाणे माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणूनच हा रस्ता कधी सोडलेला नाही, टाळलेला नाही.

फार वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळात एक कादंबरी वाचलेली होती . मला लेखकाचे नाव आठवत नाही मात्र त्या लेखकाने हिंदुस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका समाज व्यवस्थेबाबत एक टिप्पणी केली होती. ही टिप्पणी होती कुंटणखाना ,वेश्याव्यवसाय आणि अलीकडच्या काळातील शब्द घ्यायचा तर कॉलगर्ल रेडलाईट येरीया बाबत. ही एक व्यवस्था अनेक वर्षापासून समाजात कार्यरत आहे. सर्वच प्श प्रमुख शहरात असा एक भाग आहे ज्याला वेश्यावस्ती, कुंटणखाना अशा नावाने ओळखले जाते. या भागाकडे कोणीही चांगल्या नजरेने पाहत नाही एक घाणेरडा भाग म्हणून लोक तिकडे पाहतात. त्या गावातील स्थानिक स्वराज संस्थाही या लोकांना चांगल्या नागरी सुविधा कधी पुरवत नाहीत. ही समाजव्यवस्था कुणी सुरू केली आहे ,कधी सुरू केली आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे? स्त्रीला  देवी मानणाऱ्या भारतात स्त्रीचा असा व्यवसाय कोणी सुरू केला? याच्या खोलात गेलो तर याची उत्तरे सापडतीलही. मात्र या समाज व्यवस्थेमुळे समाजाचे आरोग्य सुस्थितीत राहिले आहे असे त्या लेखकाने त्याच्या एका लेखात मांडले होते. हे पटवून देताना त्या लेखकाने पुढे असे म्हटले होते, जर ही व्यवस्था नसती तर समाजात रावणरुपी, कंसरुपी,  गिधाडरुपी काही लोक आहेत त्यांनी भर दिवसा स्त्रियांना ओरबाडून खाल्ले असते. ही व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारचे वासनांध  आपली वासना शमवण्यासाठी त्या विभागात जातात. पैसे देऊन आपली भूक भागवतात. हेच लोक बाहेर येऊन उच्चभ्रू समाजात मी नाही त्यातला या भावनेत वावरतात.  मात्र या लोकांनी आपली भूक जर अशा वेश्यावस्तीत जाऊन भागवली नसते तर हे तर हे लोक समाजात,  घरात घुसले असते. रस्त्यावर स्त्रियांना त्यांनी ओरबाडून खाल्ले असते, म्हणून ही व्यवस्था योग्य आहे असे त्या लेखकाने मांडले होते. हा विचार मी माझ्या मनात कायम राहिला होता. याबाबत माझ्या सद्गुरु महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनाही मी प्रश्न चालला होता. त्यांनीही याला दुजोरा दिला होता.  रामायण, महाभारत आर्वाचीन काळापासून समाजात राक्षसरुपी लोक आहेत आणि त्यांची भूक भागवण्यासाठी त्याच लोकांनी अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली आहे, असे मला एका प्राध्यापकांनी सांगितले होते. हा विचार मनातून जात नव्हता परंतु अशा प्रकारच्या महिलांना समाजात वाईट नजरेने पाहिले जाते मला पटत नव्हते. ज्या स्त्रिया पुरुषांच्या वासनेसाठी स्वतःला बळी देतात, स्वतःच्या देहाचे लचके तोडण्याचे अधिकार त्या पुरुषाला देतात , त्यांना वाईट का म्हणायचे ? पोटासाठी हा व्यवसाय करणाऱ्या अशा स्त्रिया समाजाचे सुद्धा सरंक्षन करत आहेतच ना ! मग त्यांना वाईट का बोलायचे ,असे मला सतत वाटत होते . 2001 मध्ये जेव्हा मी पुढारी वृत्तपत्रात वार्ताहर घेऊन हजर झालो. माझ्या कार्यालयाच्या पाठीमागे एसटी स्टँड परिसरातच  ही वस्ती आहे. स्टँड परिसरात गिर्‍हाईकाच्या शोधात उभे असलेल्या या स्त्रिया पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना सतत निर्माण होत होती. या स्त्रियांसाठी आपण काही करू शकत नसलो तरी किमान समाजाच्या आरोग्यासाठी स्वतःच्या शरीराचा बळी देणार्‍या या स्त्रियांप्रती कृतज्ञतेचा भाव सतत माझ्या मनात येत राहिला. समोरून अशा प्रकारची महिला आली तर मी अंतकरणापासून तिचे आभार मानत होतो . माऊली , तुझ्यामुळे समाजातील माझ्या बहिणींची आईची अब्रू वाचते आहे, मी तुझा खूप ऋणी आहे अशा प्रकारचे भाव सतत माझ्या मनात येत राहिले .

2008 झाली आम्ही पुढारी कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवले त्यानंतर याच काळात मी सोमवार पेठ रहायला गेलो. मात्र घरी जाताना किंवा कार्यालयात येताना एकदातरी मी या परिसरातून जातो. या वस्तीकडे पाहून कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात सतत येत राहतो. या स्त्रियांनी फक्त पैसे कमावण्यासाठी हा मार्ग स्वीकारलेला नाही, त्यांनासुद्धा आई-वडील बहिण-भाऊ आहेत. शरीराचा व्यवसाय करून या माऊली कर्नाटकात त्यांच्या आई-वडिलांना पैसे पाठवतात, आई वडिलांची सेवा करतात, याची मला माहिती मिळाली.

लाखो रुपये पगार असणाऱ्या काही मंडळींचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत ,ते त्यांना सांभाळत नाहीत. अशी एकीकडे परिस्थिती असताना स्वतःच्या शरीराचा व्यवसाय करून आई-वडिलांचा सांभाळ करणाऱ्या या माऊली कितीतरी पटीने त्या उच्चभ्रू लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, याची मला जाणीव झाली..

आखरी रास्ता हा येणारच असतो, मिळणारच असतो, आपल्याला मृत्यू च्या वाटेला जावे लागणारच आहे, इच्छा असली तरी नसली तरीही ! दुसरीकडे शरीराचा व्यवसाय करणारा हा रस्ता या महिलांनी मनापासून कधी स्वीकारला नसेल, त्यांच्या पण काहीतरी अडचणी असतील.

दो रास्ते  प्रती माझा कृतज्ञतेचा भाव आयुष्यभर राहील.

सतिताभ@
karawadikarad.blogspot.com

०३ सप्टेंबर २०१८

Selfie with Ex CM Ashok Chavan

सेल्फी विथ खासदार अशोक चव्हाण

आज सकाळी हॉटेल पंकज मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकारांसाठी चहापाण्याला निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार परिषदेत यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना मी एक प्रश्न विचारला, संघर्ष यात्रा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप सरकार अपयशी कसे ठरले आहे याच्यावर झोड उठवत आहे. मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात?  जुन्या काही निष्ठावंत लोकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार आहात का? तुमचे जवळचे मित्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये मानाचे स्थान देणार का ?

माझ्या या प्रश्नावर खासदार अशोक चव्हाण यांनी कोण मित्र असा खोचक सवाल मुद्दामहून केला. यावेळी माझ्या पत्रकार मित्रानी विलास काका असे नाव घेताच  काका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत , त्यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच निर्णय घेतील असे सांगितले.

उंडाळकरांबाबत खासदार चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नाचा रोख त्यांनी चांगलाच ओळखला आणि शेवटी तुमच्या मनात आहे  ते मला माहिती आहे असे म्हणत हसतमुखाने पत्रकार बैठक संपवली

त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी मला जवळ बोलावून घेतले. तुमचा पेपर कोणता , नाव काय नाव काय हे विचारून चौकशी केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मला बाजूला घेतले, काय चालले आहे विचारून चौकशी केली. हर्षवर्धन पाटील यांना मी अशोक चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विचारले.  पाटील यांनी अशोक चव्हाण यांना कराडचे हे पत्रकार आहेत त्यांना तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे सांगितल्यानंतर हो माझी त्यांचे आत्ताच ओळख झाली आहे .मोरे पुढारीचे पत्रकार आहेत असे सांगून सेल्फीसाठी पोज दिली. खासदार अशोक चव्हाण यांची एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवण्याचे खुबी मला आज चांगलीच आवडली.

दरम्यान पुन्हा बाहेर आमचे काही मित्रांनी पुन्हा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी अनौपचारिकपणे बोलताना उंडाळकर काकांचा विषय काढला. यावेळी हा विषय कसा मिटवायचा , काय मार्ग आहे का,पर्यायी मतदारसंघ आहे का असा प्रतिप्रश्न खा. चव्हाण यांनी पत्रकारांना केला. मतदारसंघ नाही, मात्र विधानपरिषदेचा पर्याय आहे असे पत्रकारांनी सांगितले. काही असो उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटांमध्ये समेट ठेवावा अशी खासदार अशोक चव्हाण यांची इच्छा आहे हे तरी यानिमित्ताने दिसून आले.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...