फॉलोअर

०२ फेब्रुवारी २०२४

माझा पहिला परदेश प्रवास बाकू 1


#माझीपहिलीपरदेशवारी @ बाकू ~भाग 1

चला बाकूला...!

परदेश सहल म्हणा , परदेश गमन म्हणा किंवा परदेश वारी ! हे स्वप्न सर्वांचच असतं,माझंही होत. पण ते कधी पूर्ण होणार याची गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होतो. परदेशात जायचं म्हणून पासपोर्ट काढला खरा मात्र पासपोर्टची मुदत संपली, पाच वर्षे होऊन गेली तरी कुठेही जाता आलं नाही. जुलै महिन्यात पुन्हा पासपोर्ट नुतनीकरण केला आणि आता ठरवलं जायचं, यावेळी नक्की जायचं. परंतु पासपोर्ट रिन्यू करून पुन्हा सहा महिने गेले तरी योग येत नव्हता. ऑफिसचं काम, घरच्या अडचणी, कन्येची दहावी या सर्व जबाबदारी मध्ये परदेशात जायचं राहूनच जातं होतं.

डिसेंबर महिन्यात फेसबुकवर ट्रॅव्हल्स कंपनीची  जाहिरात वाचली. त्यापैकी एका कंपनीला संपर्क साधला. तत्पूर्वी कराड मधील जे ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्या सर्वांना फोन केले, त्यांनी काही कल्पना दिल्या, सुचवल्या. मात्र मी फेसबुक वर आलेल्या दिल्ली येथील डुक कंपनीकडून परदेश दौऱ्याचे नियोजन केले. एरवी कुठेही जाताना मला बोलवा असे सांगणारे अनेक जण असतात मात्र आपल्या वेळेला कोणी तयार होत नाही, हा माझा अनुभव आहे. मग माझ्यासोबत लहानपणापासून असलेला माझा करवडी येथील शेजारी, लहानपणीचा सवंगडी अनिल चव्हाण याला मी ती आयडिया सांगितल्यानंतर तो लगेच तयार झाला.आम्ही पैसे भरले देश निवडला,अजरबैंंजान ! जशी दुबई ही संयुक्त अमिरातची राजधानी आहे मात्र संयुक्त अमीरातला फार जास्त पण ओळखत नाही. दुबई म्हटले की लोकांना सर्व आठवत तसंच अझरबैझान हा देश हा कमी लोकप्रिय आहे मात्र त्याची राजधानी बाकू ही अतिशय प्रसिद्ध आहे. बुकिंग केलं. एक महिना या सहलीची उत्सुकता लागली होती.तयारी सुरू होती. माहिती संकलन सुरू होतं. अखेर बाकूला जाण्याचा दिवस उजाडला. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथून सायंकाळी आठ वाजता बाकूसाठी फ्लाईट रवाना झालं. 27 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजता आम्ही बाकूमध्ये पाय ठेवला. 

कुठल्याही परदेशी भुमीवर माझं हे पहिले पाऊल होतं. परदेश किती मोठा असो,लहान असो, तो देश प्रगत असो वा गरीब असो, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथली संस्कृती जाणायला, तिथले लोक पहायला, त्यांचा अभ्यास करायला मला पहिल्यापासूनच आवडतं. अझरबैझान देशाविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं आहे. 1991 साली रशिया पासून वेगळा झालेला आणि गेल्या तीस वर्षांत प्रगतीपथावर जाऊन स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलेला हा देश आहे.आता बाकूमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. पुढील पाच दिवसात तिथं राहणार आहोत.

भारतात कुठेही गेलो तर पत्रकारितेचा मी पिंड कधी विसरत नाही. ज्या ठिकाणी नवीन काही दिसेल ते मी माझ्या नजरेतून पाहतो आणि त्याविषयी लिहितो. दिल्ली, आग्रा, गोवा इथून मी लेखन केलेलच आहे. आता परदेशात गेल्यावर लिहिणं कसं रोखता येईल ? अझरबैझान मध्ये खुप ठिकाणी भेट देणार आहे . याबाबत पुढील चार पाच दिवस लिहिणारच आहे. Be connected. 

#azerbaizan
#baku
Baku, Azerbaijan 

 *सतीश मोरे सतिताभ* 
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...