फॉलोअर

२० एप्रिल २०१९

मेरा चाँद मुझे आया है नजर

मेरा चाँद मुझे आया है नजर

बदली का वो चाँद
आज कुछ ज्यादाही हसीन है़ !

मेरा चांद उस पार है !
और मै इस पार हूँ !

मैंने कहा चाँदको देखो मेरी चाँदको !
वो भी बेककार था देखने मेरी चाँदको!


चाँदकी नजरे गयी मेरी चाँदपे !
और मेरी नजरे उस चाँदपर !
हम दोनोकी नजरे एक साथ उस चाँदपर !

दुर होते हुएभी मैने देखा मेरी चाँदको,
एहसास किया मेरे चाँदने भी उस पार से !

एक दुसरोंके आँखोमे देखा हमने सजना,
कितना अच्छा फिलिंग है ये सजना !

०१ एप्रिल २०१९

गाढव , मुर्ख, शहाणे मतदार आणि एप्रिल फुल

*अंतरंग*


karawadikarad.blogspot.com


*गाढव आणि दोन मुर्ख,*

*एप्रिल फुल आणि शहाणे मतदार*


नक्की आठवत नाही पण सातवी किंवा आठवीच्या इंग्लिशच्या पुस्तकात एक धडा होता. ऐकावे जनाचे करावे,करावे मनाचे !


एक मुलगा आणि वडील गाढव विकण्यासाठी शहरात निघाले होते. दोघेही गाढवासोबत चालू लागले. जरा पुढे गेल्यानंतर

एका गावाजवळ काही ग्रामस्थ भेटले आणि ते म्हणाले,एवढ्या उन्हात तुम्ही गाढवाला घेऊन निघाला आहे. एकाने गाढवावर बसायचं की नाही झाले. मग बापाने मुलाला गाढवावर बसायला सांगितले आणि ते चालू लागले.


पुढच्या कोपऱ्यावर ग्रामस्थ बसले होते .त्यांनी या दोघांना अडवले. गाढवावर बसलेल्या मुलांना लोक म्हणू लागले , तू एवढा मोठा तरणाबांड,स्वतः गाढवावर बसला आहेस आणि तुझ्या वयोवृद्ध बापाला चालायला लावले आहेस. तुला काय समजते कि नाही? मुलांना हे म्हणणे पटले तो खाली उतरला आणि त्याने वडिलांना गाढवावर बसले आणि ते दोघे पुढे जाऊ लागले. 


पुढच्या कोपऱ्यावर त्यांना काही ग्रामस्थ भेटले. त्यांनी वडलांना टोमणा मारला, छोट्या मुलांना चालायला लावले आहे आणि स्वतः घोडा झालेला बाप गाढवावर बसला आहे. या बापाला छोट्या मुलाची काही काळजी नाही !


बापाला या बोलण्यामुळे वाईट वाटले. आता काय करायचे? मुलगा गाढवावर बसला तरी लोकांना आवडत नाही, बाप गाढवावर बसला तरी  लोकांना आवडत नाही ! लोकांना काहीच पटत नाही ,आता काय करायचे ?


मग दोघांनी शेवटी विचार केला. आपण दोघेही गाढवावर बसू. दोघेही गाढवावर बसले आणि चालू लागले.


पुढे गेल्यावर चौकात काही लोक बसले होते. त्यांनी या बापलेकांना गाढवावर बसलेले पाहिले आणि लोक बोलू लागले, एका गाढवावर दोघे दोघे बसले आहेत. बिचारे गाढव गरीब आहे.पण या गाढवावर बसणारे हे दोन गाढव मूर्ख आहेत का ? त्यांना बिचार्‍या मुक्या प्राण्याची दया का येत नाही? 


असे म्हटल्यानंतर दोघे बापलेक गाढवावरून खाली उतरले आणि  विचार करू लागले, आता काय करायचे ? 


काहीही केलं तरी लोक नाव ठेवतात. मग त्यांनी निश्चय केला, आपण दोघांनी मिळून गाढवाला डोक्यावर घेऊया. दोघांनी गाढवाचे पाय बांधले आणि गाढवाला डोक्यावर घेतले आणि चालू लागले.


नदीवरून पुलावरून जात असताना गाढवाला ओरडायची इच्छा आली आणि त्याने पाय झाडले. गाढव नदीत पडले.


गाढव विकायला निघालेल्या बापलेकाची अशी फजिती झाली, हातात काहीच उरले नाही.


*ही गोष्ट सांगायची,आठवायचे कारण आज व्हाट्सअप वर सोबतचा फोटो पाहायला मिळाला. या फोटोत दोघेजण टू व्हीलर वरून गाढवाला घेऊन जात आहेत.*


एका गाढवाला डोक्यावर घेऊन फिरणारे ते मुर्ख बापलेक आणि या फोटोत गाढवाला गाडीवरून घेऊन जाणार आहे हे दोघे शहाणे !


आज एक एप्रिल ! कुठलीतरी पाश्चात्त्य पद्धत स्वीकारून फुल बनवायचा हा दिवस आहे.असो.


आजच्या दिवशी एकमेकाला मूर्ख बनवण्यात अनेकांना आनंद वाटतो. 


आयुष्यात अनेक चुका कळत-नकळत होत जातात. *आपण मूर्ख बनतो आणि त्या मूर्खपणातून आपण काहीतरी धडा घेतो आणि पुन्हा मूर्खपणा करत नाही.* ही झाली सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती. मात्र कोणीतरी बोलते म्हणून एप्रिल फुल बनवण्यात काहीच अर्थ नाही.


ऐकावे जनाचे करावे मनाचे,असे उगीच म्हटले नाही. *दुसऱ्याला फुल बनवण्यात नाही तर तर कधीतरी मूर्ख बनून झालेल्या चुका दुरुस्त करण्यात खरा पुरुषार्थ आहे.* 


सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. एका पक्षाने पंधरा लाख देतो म्हणून सांगितलं होतं तर एक पक्ष 72 हजार रुपये देणार आहे. या वरून सध्या समाज माध्यमावर अनेक जोक्स सुरू आहेत. राजकीय पक्ष एप्रिल फूल बनवत असल्याच्या टीका सुरू आहेत. मात्र *देशभरातील मतदारांनी मुर्ख न बनता आपल्याला योग्य वाटेल अशा , सकारात्मक आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या व्यक्तीलाच डोळे उघडे ठेवून मतदान केले पाहिजे,* हा एक संदेश द्यावासा वाटतो.


*जय लोकशाही*


      धन्यवाद.

*सतीश वसंतराव मोरे.*


karawadikarad.blogspot.com

   


१ एप्रिल २०१९

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...