फॉलोअर

२७ जून २०१८

पाऊस कसा पडतो

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

💦🌧⛈💦🌧⛈💦
➖➖➖➖➖➖➖
*☑ नेमका कसा पडतो पाऊस..? ढगांचे प्रकार कोणते...? पावसाचे ढग कोणते...? पावसाचे प्रकार किती...?*
➖➖➖➖➖➖➖

भूप्रुष्ठावरील मोठ्या प्रमाणावरील पाणीसाठ्याची (जसे समूद्राचे पाणी) सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि ती वरती आकाशाकडे जाते . या सततपणे तयार होणाऱ्या वाफेचे ढग बनतात.वाढत्या उंचीप्रमाणे वातावरणातल्या दाबाच्या जास्त- कमी फरकाने हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे हे ढग घेऊन वाहू लागते. विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते . मात्र या बाष्पाचे पून्हा द्रवीकरण होण्यासाठी हवेत पुरेशा संख्येने आर्द्रतेस शोषणारे केंद्रके उपस्थित असावे लागतात तरंच बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होते.
🔲🔲🔲

_*◾ढगांचे ढोबळमानाने चार प्रकार आहेत.*_

*◼१) राशीमेघ वा क्युम्युलस (ढिगाप्रमाणे दिसणारे) ढग.-* ह्या ढगांमधे पाणी बाष्प व द्रव रूपात असून पाण्याचे प्रमाण कमी असते. ह्या ढगांची भूपृष्ठापासूनची उंची जास्त नसते. हे सहसा चमकदार पांढर्‍या रंगाचे असतात (‘कापूस पिंजून ठेवलाय जसा’ वाला ढग).
*◼२) वर्षामेघ वा निंबस (पावसाळी) ढग.-* हे ढगही ढिगाप्रमाणे दिसतात आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण खूप अधिक असल्याने काळे दिसतात व जास्त उंचावर नसतात. हे ढग पाऊस देतात._
*◼३) तंतूमेघ वा सिरस (पिंजलेल्या दोर्‍याप्रमाणे वा पिंजारलेल्या केसांप्रमाणे दिसणारे) ढग.-* हे राशीमेघ वा वर्षामेघांपेक्षा अधिक उंचीवर असतात.
*◼४) स्तरीमेघ वा स्ट्रॅटस ढग.-* हे पांढरे असून विरळ चादरीप्रमाणे दिसतात. ह्यातील पाणी हे हिमकणांच्या रूपात असते. हे वातावरणामध्ये बर्‍याच उंचीवर असतात.
🔲🔲🔲
ह्या चार प्रकारातील काही प्रकार मिळून तयार होणारे ढग उपप्रकारात मोडतात. तंतूस्तरमेघ वा सिरोस्ट्रॅटस हा उपप्रकार तंतू व स्तरी प्रकारचे ढग मिळून तयार झालेला असतो.
🔲🔲🔲

*◾ढगांची जाडी :* हवेच्या दाबानूसार ढग सतत फिरत असतात. त्यात जलबिंदू असले तरी ते पाऊसरूपाने जमिनीवर पडतीलच याचा नेम नसतो. साधारणपणे ढगांची जाडी जसजशी वाढत जाते तसतशी त्यांची पर्जन्यक्षमताही वाढते. ३,६५० मी. पेक्षा अधिक जाडी असलेल्या ढगांतून हमखास पाऊस पडतो. ढगात सूक्ष्म जलकणांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सहजच उपलब्ध असतात त्यापैकी सर्वांत प्रभावी म्हणजे जलबाष्पयुक्त हवेची ऊर्ध्वगती, पाऊस किती पडेल हे यावर बहुतांश अवलंबून असते. अशा प्रकारे दव, धुके, मंद तुषार , अतिवृष्टी , गारा ,हिमवर्षाव असे निसर्ग आविष्कार पहायला मिळतात.
🔲🔲🔲
जेव्हा जलकणांचा व्यास २० ते ४०μ असतो तेव्हा त्यांचा वातावरणातून खाली येण्याचा वेग ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो आणि ते पर्जन्यरूपाने खाली पडूच शकत नाहीत. मंद तुषारांत जलबिंदूचा व्यास ०.२ मिमी. ते ०.५ मिमी. असतो. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असतात. जेव्हा जलबिंदू व्यास २ ते ६ मिमी आणि त्याचा खाली येण्याचा वेग ७० सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो तेव्हा पाऊस पडतो. या जलबिंदूचे पाऊस म्हणून रूपांतर होवून जमिनीवर येतानाच्या प्रवासात हवेची उर्ध्व वा आडवी गती याप्रमाणे थेंबांचे आकार कमी-जास्त होतात, त्यांचा पतनवेगही वाढतो वा कमी होतो आणि त्यानुसार थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात वा अधःप्रवाह रूपाने दुसऱ्या दिशेने वाहून जातात. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा म्हणजे वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा उंच वाढतात. बर्फकणांवर अतिशीत जलबिंदूचे आक्रमण होवून बर्फकणांचे आकारमान वाढून ते बर्फवर्षाव म्हणून खाली पडू लागतात. हि झाली पाऊस पडण्याची प्रक्रिया.... ,
🔲🔲🔲

*◾यानूसार पावसाचे प्रमुख तीन प्रकार केलेले आहेत.*

*🌀१. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :* विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवा थंड होते. हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते त्यामुळे या हवेचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होऊन पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते; तसेच क्षितिज समांतर रेषेत ती फारशी होत नाही अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

*🌀 २ . प्रतिरोध पर्जन्य -* समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे अडवले जावून. पर्वताला अनुसरून वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशा पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात, त्या उतारावर पाऊस जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. अशा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.

*🌀३. आवर्त पर्जन्य -* एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो, अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पडतो. तसेच उष्ण पट्ट्यामध्येदेखील काही प्रमाणात "आवर्त पर्जन्य' पडतो तो वादळी स्वरूपाचा असतो.
🔲🔲🔲
_जगात सर्वांत जास्त भागात वरील तीन प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आरोह प्रकारच्या पावसात तशी निश्चितता असते परंतु त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारांत काही वेळेस अतिवृष्टी, पूर, तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते._

_
➖➖➖➖➖➖➖
💦🌧⛈💦🌧⛈💦

२६ जून २०१८

वकिलांचा ड्रेस काळा का

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..✍🏼*_

🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻
➖➖➖➖➖➖➖
*☑ वकील काळा कोट आणि पांढरा बँड, तर डॉक्टर पांढरा कोट का घालतात? जाणून घ्या यामागचं लॉजिक...*
➖➖➖➖➖➖➖

या जगातल्या प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी निमित्त किंवा कारण दडलेलं असतं भाऊ. काही कारणच नसतं तर त्या गोष्टीचं अस्तित्वच उरलं नसतं... असो, फिलॉसॉफी बाजूला ठेवूयात. आज आपण आपल्या ज्ञानात आणखी थोडी भर टाकूया. चला, जाणून घेऊया वकीलांचा युनिफॉर्म हा नेहमी काळा आणि डॉक्टरांचा पांढराच का असतो? काय आहे यामागचं कारण?
🔲🔲🔲
तुम्हाला माहितीच असेल की रंग हे नेहमीच आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. त्यामुळं वकील आणि डॉक्टरांच्या या विशिष्ट वेशभूषेमागेही एकप्रकारचं मनोविज्ञान दडलेलं आहे.  इथं वकिलांच्या काळ्या कोटाचा संबंध ब्रिटिश राजवटीशी येतो. म्हणजेच इतर अनेक पध्दतींप्रमाणं ही पध्दतही आपण ब्रिटिशांकडून घेतलीय.
🔲🔲🔲

*◾ड्रेस कोड मागील इतिहास..*

वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने १३२७ साली केली. त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवले. पुढे १३ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्याने ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आला. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असे.
🔲🔲🔲
१६०० साली या ड्रेसकोडमध्ये काहीसा बदल झाला आणि १६३७ साली प्रीवी काऊन्सीलने सांगितलं की, समाजानुसार न्यायलयाने कपडे परिधान केले पाहिजेत. तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरु झाली. तेव्हा असं मानण्यात यायचं की, गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं दर्शवतात.
🔲🔲🔲
१६९४ साली राणी मेरीच्या मृत्युनंतर राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूच्या शोकाचे प्रतिक म्हणून काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला आदेश कधीही मागे घेण्यात आला नाही आणि वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट (गाऊन) हा ड्रेसकोड झाला. न्यायाधीश आणि वकिलांनी देखील या पेहरावावर आक्षेप घेतला नाही आणि काळ्या रागांचा पेहराव मान्य केला.
🔲🔲🔲

*भारतात १९६१ च्या ऍडव्होकेट अॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड आणि पांढरा बँड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहेत.*
🔲🔲🔲
*_🔺It was believed that gowns and wigs gave a degree of anonymity to judges and lawyers. In India , the Advocate's Act 1961 makes it mandatory for advocates appearing in the supreme court., high courts, subordinate courts, tribunals or authorities to wear a dress that is sober and dignified._*
🔲🔲🔲
यामागची भावना अशी आहे की, या पेहरावामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते आणि त्यांच्या मनात न्यायाने लढण्याचा एक विश्वास निर्माण होतो. तसेच हा पेहराव त्यांना शांत आणि सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो. तसंच त्यामुळं त्यांच्यात एकप्रकारची गंभीरता आणि रहस्यमय प्रवृत्तीची छाप दिसावी. काळा रंग त्यांचा उच्चभ्रू दर्जा दर्शवायचा. हाच काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्‍या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत. या पेहरावामुळे वकिलांना आणी न्यायाधीशांना समाजामध्ये ओळख मिळते.
🔲🔲🔲
काळ्या रंगाचा पेहराव परिधान करण्यामागे अजून एक दावा असा केला जातो की, काळा रंग हा एकमात्र असा रंग आहे ज्यावर इतर रंग चित्रित केले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल जो बदलता येणार नाही आणि वकिलांसाठी या काळ्या रंगाचा अर्थ असा आहे की स्वत:ची मते आणि विचार न्यायदेवतेसमोर मांडताना त्यांनी विवेकी आचरण करावे.
🔲🔲🔲

*◾गळ्याला पांढरा बँड का?*
१६४० सालापासून आपल्या शर्टाची कॉलर लपवण्यासाठी वकिलांनी लिननच्या पांढऱ्या कपड्याचा वापर करण्यास सुरुवात केली. १८६० साली या कपड्याचे स्वरूप बदलून दोन आयताकारी भागांसारखा झाला. (म्हणजे जे आताचे बँड आहेत तसा) पांढऱ्या रंग हा शांतीचे प्रतिक असून न्यायाधीश आणि वकिलांनी सत्याच्या बाजूने लढून समाजामध्ये शांती प्रस्थापित करावी अशी भावना पांढऱ्या रंगामागे असल्याचे सांगितले जाते.
🔲🔲🔲

*◾डॉक्टरांचा पांढरा ड्रेस कोड...*

डॉक्टरांनी पांढरा कोट घालण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या दरम्यान झाली होती. खरेतर हा रंग स्वच्छतेचे प्रतिक असते आणि याचबरोबर हा रंग व्यक्तीची इमानदारी पावित्र्य आणि निष्ठेचेही प्रतिक आहे. यामुळेच दुनियेच्या सगळ्या पैलूंमध्ये पांढरा रंग श्रेष्ठ आणि पवित्र असा मानला जातो. पांढरा रंग हा शांतता स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्‍या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश फार्मासिस्ट, लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.
🔺संकलन सचिन मणियार..✍🏼
➖➖➖➖➖➖➖
🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻

२३ जून २०१८

FIR काय असते

*_🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न.._*

👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂
➖➖➖➖➖➖➖
*◾FIR म्हणजे नेमकं काय..???*

*◾FIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं? जाणून घेऊ FIR बद्दल...!!!*
➖➖➖➖➖➖➖
आपल्या भारतीय लोकांची मानासिकता पण गमतीशीर आहे. बाकी देशात पोलिसांना पाहिल की लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटते. पण आपण भारतीय लोक मात्र पोलीस बघितले की घाबरून रस्ता बदलून निघून जातात. मग भलेही आपण कुठलाही गुन्हा का केला नसेना! आपल्याला पोलिसांचा फोबिया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला पोलीस ह्या शब्दाचीच इतकी भीती वाटते की आपल्यावर अन्याय झाला असला तरी किंवा समोरच्यावर अन्याय होताना दिसत असला तरी, समोरच्याला मदतीची नितांत गरज आहे हे कळत असताना देखील, केवळ पोलिसांच्या भानगडीत कोण पडेल ह्या भीतीने आपण गप्प बसतो. पण पोलिसांची मदत घेत नाही. आपल्याकडे मोठी माणसं सांगतात, शहाण्याने पोलिसांच्या, कोर्ट कचेरीच्या फंदात पडू नये. म्हणूनच गरजेला पोलिसांची मदत घेणं तर लांबच राहिलं, आपण पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंदवणे ह्या भानगडीत पडतच नाही.
🔲🔲🔲
खरं तर ह्या भीतीमागे अज्ञानाचा फार मोठा हात आहे. आपल्याला कोणत्या परिस्थितीत काय करायचं असतं हे देखील माहिती नसतं. पोलीस स्थानकात तक्रार करायची असेल तर ती कशी करायची, FIR काय असते इतके बेसिक ज्ञान सुद्धा कधी कधी सामान्य माणसाला नसते. म्हणूनच आपण जाणून घेऊया FIR बद्दल..!
🔲🔲🔲

_🔺FIR stands for *First Information Report.* It is a written document prepared by Police when they receive an information about a cognizable or Non-cognizable offence. खरं तर FIR आपल्या सुविधेसाठी आहे पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे कारण FIR ची सुविधा ही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे._
🔲🔲🔲

*🌀 FIR म्हणजे काय आणि कोण ती दाखल करू शकतो? सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया FIR म्हणजे काय ?*

_FIR पोलीस दाखल करून घेतात. FIR हा एक महत्वाचा दस्तऐवज असतो ज्यात गुन्ह्याची पहिली आधिकारीक माहिती असते. भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्यांचे २ प्रकारात वर्गीकरण केले आहे._

_*🔺पहिला म्हणजे Cognizable Offence -* ह्या आरोपीला पोलिस वॉरंट शिवाय अटक करू शकतात . शिवाय ह्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय केस बद्दल तपास सुरू करू शकतात._

_*🔺दुसरा प्रकार आहे Non Cognizable Offence-* ह्यात वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकत नाहीत आणि कोर्टाच्या आदेशाशिवाय केसचा तपास सुरू करू शकत नाहीत. म्हणूनच गुन्हा घडल्यावर FIR दाखल करणे अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय पोलीस कुठल्याही केस चा तपास करू शकत नाहीत._
🔲🔲🔲

*🔺FIR कोण दाखल करु शकतो..??*
FIR नोंदवण्यासाठी तुमच्या संदर्भातच गुन्हा घडायला हवा असे आवश्यक नाही. तुम्ही जर गुन्ह्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असाल तरीही तुम्ही गुन्ह्यासंदर्भात FIR नोंदवू शकता. ह्याशिवाय जर इतर व्यक्तीच्या संदर्भातही घडलेल्या गुन्ह्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही FIR दाखल करू शकता.
🔲🔲🔲

*🔺FIR दाखल करताना काय माहिती द्यावी लागते?*
FIR नोंदवताना FIR दाखल करणाऱ्याचे नाव, गुन्हा घडल्याची तारीख, दिवस आणि घटनास्थळाची माहिती पोलिसांना द्यावी लागते. ह्याशिवाय गुन्ह्याची FIR दाखल करताना त्या व्यक्तीने गुन्हा घडल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्याच्या विरुद्ध FIR दाखल करायची आहे त्या व्यक्तीचे नाव आणि इतर सर्व माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी लागते .
🔲🔲🔲
ह्याशिवाय FIR बद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे फायद्याचे आहे.
Criminal Procedure code 1973 च्या सेक्शन 154 अन्वये FIR मध्ये नोंदवलेली माहिती प्रमाणित केली जाते. तसेच FIR ची एक प्रत FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीस दिली जाते. FIR ची प्रत मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. तसेच FIR दाखल करण्यास कोणताही चार्ज लागत नाही. जर तुमची FIR , Cognizable Offence च्या वर्गात येत असेल तर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस तक्रार नोंदवू शकतात .

*🔺पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यास काय करावे?*

जर कुठल्याही पोलीस स्टेशनला पोलीस तुमची FIR दाखल करून घेण्यास नकार देत असतील तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. त्यांचा आदेश पोलीस नाकारू शकत नाहीत. तसेच तुम्ही तुमची तक्रार पोस्ट द्वारे सुद्धा पाठवू शकता. ह्या संदर्भात पोलिसांविरुद्ध तक्रार करायची असल्यास तुम्ही राज्याच्या Human Rights Commission च्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकता .

*🌀 काही महत्त्वाचे :*
ही सुविधा प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी दिली आहे. परंतू ह्याचा गैरवापर करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच कधीही खोटी किंवा चुकीची FIR दाखल करू नका. ह्याने तुम्हालाच शिक्षा होऊ शकते.
पुराव्यांशी कधीही छेडछाड करू नका. पोलिसांना कधीही खोटी, चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊ नका. किंवा FIR मध्ये खोटी, चुकीची माहिती लिहू नका. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला स्वतःला FIR दाखल करणे सोपे जाईल किंवा प्रसंगी कुणालाही FIR दाखल करून द्यायला मदत करता येईल.
➖➖➖➖➖➖➖
👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂

२२ जून २०१८

Youtube पैसे कसे कमवायचे

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

💰📲📹💰📹📲💰
➖➖➖➖➖➖➖
_*☑ खरंच ... युट्युबवर आपले व्हिडीओ टाकून पैसे कमावता येतात...???*_

_*◾कसे कमवायचे पैसे...??? काय करावे लागेल...??? इत्यादी बद्दल....*_
➖➖➖➖➖➖➖

आपण सर्वजण युट्युब वापरतो . प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये ऍटोमॅटीक युट्युबचे ऐप असते.त्यामुळे आपण सर्वजन युट्युब मध्ये व्हिडिओ बघतो, आवडला तर पुढे शेअर करतो. बऱ्याच जणांना हे माहित देखील आहे कि युट्युब ही गुगलचीच कंपनी आहे . मग युट्युब मधून पैसे कसे कमवले जाऊ शकतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ही पोस्ट तयार केलीये .
🔲🔲🔲
आपण युट्युबवर जे विडिओ बघतो त्यावेळी साधारण ३ प्रकारच्या जाहिराती आपल्याला दिसत असतात . एक म्हणजे जी आपण स्किप करू शकतो , दुसरी म्हणजे जी आपण स्किप करू शकत नाही आणि तिसरी जेव्हा आपण व्हिडिओ बघतो त्यावेळी व्हिडिओ टाइमलाईन ला जिथे पिवळा डॉट असतो त्यावेळी येते (व्हिडिओ च्या समोर दिसते ) ती आपण क्रॉस वॉर क्लिक करून क्लोज करतो आणि व्हिडिओ बघत राहतो किंवा क्लिक करून त्या जाहिरातीच्या वेबसाईटवर जातो.
🔲🔲🔲
_आता यात आपण पैसे कसे कमवू शकता ? सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओ . तुमच्या व्हिडिओ ला जितके जास्त वेळ आणि जास्त संख्येमध्ये लोक पाहणार , त्यावर तुमचे इनकम अवलंबून असते . त्यासाठी तुमचा व्हिडीओ हा एकदम छान हवाय. जो पाहायला , लाईक करायला आणि शेअर करायला लोकांना आवडायला हवा. मग यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे, तुमचे ज्या क्षेत्रातील ज्ञान चांगले आहे त्यावर तुम्ही हा विडिओ बनवू शकता . कोणता असावा असे नाही बंधन नाही किंवा भाषेचे देखील कोणते बंधन नाही. चित्रपटाच्या रिव्यू पासून , तर चांगल्या रेसिपी बनवण्यापर्यंत किंवा मोबाईल ची माहिती पासून तर मित्र कसे जोडावेत इथपर्यंत काहीही चालेल. पण व्हिडिओ कायम कायम बनवून अपलोड केले तर इनकम साठी चांगले असते त्यामुळे शक्यतो आपले ज्ञान ज्यात आहे तसेच टॉपिक निवडावेत . मात्र अश्शील भाषा आणि अश्शील फोटो असे काही असेल तर गुगल आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते . म्हणजे आपले अकाउंट बंद करू शकते . एक सोपे गणित डोक्यात ठेवा , असा व्हिडिओ जो आपण आपल्या फॅमिली सोबत म्हणजे आई, बहीण ,वडील यांच्यासोबत पाहू शकेल असा व्हिडिओ असावा._
🔲🔲🔲
मग आता सुरुवात कशी करायची , सर्वात आधी आपला एक जीमेल अकाउंट बनवायचं ,आधीच असेल तरीही उत्तम. . मग त्या अकाउंट मधून युट्युब ला लॉगिन करायचं ..एकदा लॉगिन झाले कि मग तिथे स्वतःचा चॅनेल सुरु करायचा .आणि चॅनेल म्हणजे विशेष काही नाही. जस आपण आपले नवीन ई-मेल अकाउंट ओपन करून करतो तसाच प्रकार असतो फक्त ज्यामध्ये आपण आपले विडिओ अपलोड करू शकतो किंवा किती जणांनी हे व्हिडिओ पाहिले हे देखील आपल्याला कळू शकते .
🔲🔲🔲
पूर्वी युट्युब ला एकदा व्हिडिओ लोड केला कि लगेच जाहिराती आणि इन्कम सुरु होत होते. मात्र आता ,आपण चॅनेल सुरु केल्यापासून ते २० फेब्रुवारी पर्यंत कमीत कमी ४००० तासांचा वॉच टाइम आणि १००० पेक्षा जास्त स्बस्ट्राइबर आपल्या चॅनेल साठी मिळवणे गरजेचे आहे . अर्थात हे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही त्यामुळे चांगले व्हिडिओ असतील तर हे टार्गेट पूर्ण केले जाऊ शकते . एकदा हे टार्गेट पूर्ण झाले कि मग आपल्याला आपले व्हिडिओ मॉनेटाईज करता येतात . पण त्यासाठी गुगल ला अप्लाय करावे लागते . जे एकदम सोपे आहे . ९९ टक्के गुगल रिजेकट करत नाही. एकदा गुगल ने अप्रूव्हल दिले कि मग तुमच्या व्हिडिओ वर देखील जाहिराती सुरु होतात आणि त्याचे इन्कम तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला ( ऍडसेन्स हे गुगल चा जाहिरातीचे पब्लिशर लोकांचे प्लॅटफॉर्म आहे ) दिसायला लागते .
🔲🔲🔲
_तुमच्या अकाउंट ला १० डॉलर झाल्यानंतर तुम्ही जो पत्ता दिला असेल त्यावर गुगलचा एक कोड पोस्टाने येतो तो आला कि तुम्हाला तो तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला लॉगिन करून पेस्ट करावा लागतो , हे केले कि गुगल ला खात्री पटते कि तुमचा पत्ता बरोबर आहे . आधी ते ह्या पत्त्यावर चेक पाठवत मात्र आता बँकेत तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात . हे पैसे सिंगापूर मधून येत असल्याने तुमच्या बँकेकडे स्विफ्ट कोड असणे गरजेचे आहे. असा आपल्या बँकांना आयएफएससी कोड असतो तसा परदेशातून पैसे घेण्यासाठी स्विफ्ट कोड गरजेचं आहे . हा सगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे असतो. आपल्या अकाउंट ला १०० डॉलर झाले कि मग गुगल आपल्याला पैसे पाठवते . म्हणजे समजा १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झाले तर ते पैसे १०-१५ मे ला आपल्या अकाउंट मध्ये भारतीय रुपयात कन्व्हर्ट होऊन जमा होतात, मात्र जर १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झालेच नाही , समजा ४० डॉलर झाले तर ते १०-१५ मे ला बँकेत न येता तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला क्रेडिट दाखवतात व पुढे जेव्हा १०० डॉलर होतील ,त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्या बँकेत अकॉउंट ला पाठवले जातात ._
🔲🔲🔲
गुगल आलेल्या जाहिराती मधून काही पैसे स्वतःकडे ठेवते. यात ते ५५ टक्के ज्याचा व्हिडिओ आहे त्यांना देतात व ४५ टक्के स्वतःला घेतात . कारण युट्युब सारखा मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवला आहे म्हणून. आपल्या व्हिडिओ ला जागा, आणि त्यांचा प्लॅटफॉर्म ते पआपल्याला वापरायला देतात म्हणून . मात्र आपल्याला जे आपल्या अकाउंट ला दिसतात ते सगळे येतात. मात्र यात बँक काही रक्कम फी म्हणून घेते , ती साधारण अंदाजे ८००० रुपयाला २००-३०० रुपये अशी असते.
🔲🔲🔲
आज युट्युब मधून करोडो लोक पैसे कमवत आहेत. हा मार्ग सोपा आहे , मात्र कॅमेरा समोर बसायला थोडं शिकावं लागेल.एकदा चॅनेल पॉप्युलर झाला कि लाखो व्हूज एकदा दिवसात सुद्धा येऊ शकतात .आजही असे अनेक चॅनेल आहेत . मोठे मोठे टी.व्ही चॅनेल असोत वा लहान लहान संगीतकार किंवा शिक्षक , सर्वजण आपले ज्ञान प्रबोधनपर व्हिडिओ युट्युब वर टाकतात आणि जसे जसे व्युज येतात तसे पैसे कमवायला सुरु करतात . किचन पासून तर गिटार शिकवणे किंवा मोबाईल रिव्यू पासून ते चक्क गोष्टी सांगण्यापर्यंत काहीही टाका .. लिमिट नाही . फक्त कोणाची बदनामी होईल असे काही करू नका, कारण ह्या कारणाने जर तुमचे अकाउंट गुगल ने बंद केले तर परत गुगल कधीही तुम्हाला ह्या प्रोग्रॅम ला तुम्हाला जॉईन करून घेत नाही. प्रोग्रॅम खूप सोपा आहे तरीही एका टर्म्स वाचून ह्या आणि व्हा सुरु भरभरून भरभरून भरभरून भरभरून भरभरून पैसे कमवायला

_
➖➖➖➖➖➖➖
💰📲📹💰📹📲💰

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...