फॉलोअर

१४ डिसेंबर २०१७

प्रीतिसंगमावरून .. पुन्हा एकदा आम्ही तिघेच

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील-उंडाळकर या दोन दिग्गजांनी सलग 62 वर्षे केले. 2014 साली  विलासराव पाटील - उंडाळकर यांची सलग या मतदारसंघातून निवडून येण्याची परंपरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंडित केली. तिघा दिग्गज नेतृत्चांचा कराड दक्षिण मतदारसंघ आणि एकाच नेत्याला सलग कौल देण्याची मतदारांची मानसिकता यामुळे हा मतदारसंघ निवडणूक विश्‍लेषणासाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. सलग 19 तास एकाच विषयावर विधीमंडळात चर्चा करणारे स्व. यशवंतराव मोहिते, 50 वर्षे जनमाणसांवर गारुड करणारे विलासराव पाटील-उंडाळकर आणि पारदर्शक कारभारामुळे राज्यभर लोकप्रिय झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण आज दक्ष आहे. 
2014 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर निवडणुका लढविण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतल्यानंतर विलासराव उंडाळकर यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. उंडाळकरांनी बंडखोरी करत अपक्ष तर डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे असणारे वलय,  सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधी या जोरावर सुमारे 16 हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण निवडून आले. मात्र, अतुल भोसले आणि विलासराव उंडाळकर यांना मिळालेली मते फार मोठी होती. ग्रामीण भागाबरोबरच कराड शहर व मलकापूरने दिलेल्या विक्रमी मतांमुळे पृथ्वीराज बाबा विजयी होऊ शकले. 


2014 साली पृथ्वीराज चव्हाण, विलासराव उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्या पाठिशी असणारे मतदार संघातील दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेते तसेच कराड शहरातील कमी-जास्त प्रमाणात असणारी ताकद यामध्ये गेल्या तीन वर्षांत नोंदणीय असा बदल झाला आहे. दक्षिणमधून पुन्हा एकदा हे तिघेच उभे राहतील अशीच शक्यता आहे.  किंबहुना या मुद्याचाच विचार करून दक्षिणमधील  गणिते मांडणे योग्य ठरेल. 

विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदारसंघातील वैयक्तिक वलय आजही कायम आहे. त्यांनी शहरासहित दक्षिणमधील बहुतांश गावात दिलेल्या विकासनिधीचा वापर होऊन पूर्ण झालेली कामे आता दिसू लागली आहेत. चव्हाण यांच्याकडे थेट पोहोचण्यासाठी येणार्‍या अडचणी त्यांच्यापर्यंत काही निकटवर्तियांनी पोहचवल्यामुळे गेल्या वर्षभरात बाबांनी कार्यपद्धतीत बदल केला आहे. गावागावांतील कार्यकर्त्यांना वन टू वन भेटण्याबरोबरच काही कार्यकर्त्यांना अधूनमधून फोन  होऊ लागले आहेत.  नेहमीच त्यांच्यासोबत असणार्‍या काही मंडळींना बाजूला ठेऊन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणासुदीच्या काळात त्यांनी केलेले संपर्कदौरे त्यांच्या पथ्यावर पडले. या सर्व गोष्टींचा फायदा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींत त्यांना मिळाला. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व मिळवले. 

विलासराव पाटील उंडाळकर यांनी पराभवातून धडा घेत लगेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रत्येक दिवशी किमान एक गाव संपर्क अभियान सुरुच ठेवले. आमदारकी नसताना सुरूवातीला ‘दुर की सोच’ म्हणून फक्त गरज ओळखून त्यांच्या विरोधात लढलेल्या डॉ. अतुल भोसले गटाला जवळ केले. तालुक्यातील इतर सर्व दिग्गज विरोधात असताना बाजार समिती पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील गटाकडून हिसकावून घेतली. त्या बदल्यात भोसले गटाला सहकार्य करून कृष्णा कारखान्यावरही सत्तांतर घडवून आणले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांइतकेच यश मिळवत आ. बाळासाहेब पाटील यांच्याशी सलगी करून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यानंतर राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साधत कार्यकर्त्यांना चार्ज करत नुकताच भव्य असा कार्यक्रम घेतला. दिग्गज काँगे्रस नेत्यांबरोबरच वैचारिक व्यासपीठावरून ‘मी थकलेलो नाही, अजूनही रेसमध्ये आहे’, असा इशारा विरोधकांना दिला. 

डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेतील निसटत्या पराभवानंतर घरातील भांडणे मिटवून घेत मदनराव मोहिते यांच्यासह जुळवून घेतले. कृष्णा कारखाना आणि बाजार समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाची केलेली युती तोडून टाकत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले, गटही मजबूत झाला.  तत्पूर्वी कराड नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून त्यांच्या विचाराच्या रोहिणी शिंदे निवडून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत अतुलबाबांनी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून चार गावांमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनांसाठी कोट्यावधींचा निधी आणला. केवळ तिकिट मिळाले म्हणून भाजपातून उभे राहिलेले अतुल भोसले भाजपाची कार्यप्रणाली स्विकारतील काय? अशी शंका भाजपासहीत इतर सर्व पक्षातील लोकांना होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास संपादन करत त्यांना तीन वेळा कराडला आणून मी भाजपमय झालो आहे, असा संदेश देत त्यांनी दक्षिणमध्ये भाजपाचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न केला. या निष्ठेचे फळ म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान कमिटीचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. कृष्णा साखर कारखाना तसेच जयवंत शुगर्समध्ये शेतकर्‍यांशी संपर्क ठेवण्याबरोबरच विक्रमी ऊस दर यामुळे डॉ. भोसले यांनी दक्षिणमध्ये मीच सक्षम आहे, असा दावा केला आहे. 

2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी संभाव्य दिग्गज तीन उमेदवारांची ही झाली जमेची बाजू. मात्र दुसर्‍या बाजूने विचार केला तर  या तिघांनीही स्वत:ला ठराविक प्रतिमेत आणि ठराविक भागापुरते मर्यादित ठेवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कराड शहर व परिसराशी असतो. विलासराव उंडाळकर काले, ओंड, उंडाळे, कोळे भागातच अधिक सक्रिय असतात. अतुल भोसले यांना कृष्णाकाठ आणि कधीतरी कराड शहर या व्यतिरिक्त दुसरीकडे संपर्क ठेवायला जमत नाही. निवडणुकीपूर्वी काही महिने हे तिन्ही नेते मतदारसंघात खूप सक्रिय असतात. स्वत:चे बालेकिल्ले किंवा  दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांचे नेटवर्क याबाबत तिघांनाही मर्यादा आहेत. उंडाळकरांना शहरात तितक्या दमाचा कार्यकर्ता न मिळाल्यामुळे ते अजूनही चाचपडत आहेत. कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि काँग्रेस पक्ष सक्षम करण्यात आ. पृथ्वीराज चव्हाण  फार मागे आहेत. डॉ. अतुल भोसले यांना  कृष्णा काठावरील नेहमीच्याच जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय नवीन दमदार कार्यकर्ते मिळालेले नाहीत. हे तिन्ही संभाव्य उमेदवार आजच्या घडीला संपूर्ण दक्षिण मतदारसंघात सक्षमपणे यंत्रणा राबवत नाहीत, असे म्हणावे लागेल. निवडणूक काळापर्यंत बर्‍याच गोष्टी घडणार आहेत. पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे सद्य स्थितीत वेगवेगळ्या माध्यमातून हे तिघेही संभाव्य उमेदवार ‘आम्ही आहोतच’ या दिशेने कामाला लागलेले दिसत आहेत. राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, असा कराड दक्षिणचा आजवरचा लहरी राजकीय इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, कराडचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव हे ही निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. याशिवाय मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आणि मदनराव मोहिते हे अतुल भोसले यांच्यासाठी हुकूमाचा एक्का ठरू शकतात की नाही याचे उत्तर 2019 लाच मिळणार आहे. 

- सतीश मोरे

 

वाचा : प्रितिसंगमावरुन : दखलनीय काका काँग्रेस







© 2017 पुढारी न्यूज

१२ डिसेंबर २०१७

दखलनीय अदखल काका congress



दखलनीय काका कॉंग्रेस  

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पुर्ण होत असताना याच काळात 1942 साली ब्रिटीशांविरोधात पुकारलेल्या छोडो भारत आदोंलनाला 75 वर्षे होणे, हा फार मोठा योगायोग आहे. या दोन्ही घटनांचा योग साधत विलासराव पाटील आणि संयोजन समितीने आयोजित  केलेल्या भव्य मेळाव्यामुळे कराड दक्षिणेत काका कॉंग्रेस गटाला पुन्हा उभारी घेण्याची फार मोठी संधी निर्माण झाली आहे. 

2003 मध्ये कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सभेनंतर अशा प्रकारचा भव्य मेळावा कराडात घेऊन उंडाळकर काकांनी मी कॉंग्रेसमध्येच असून 89 व्या वर्षीही मी रेसमध्ये  आहे, असा निरोप पक्षश्रेष्ठी आणि विरोधकांना दिला आहे.  सलग 35 वर्षे कराड दक्षिण  मतदारसंघात निवडून येणे आणि पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय राहत सत्तेत टिकून राहण्याचा फार मोठा राजकीय पराक्रम उंडाळकर काकांच्या नावावर आहे. काकांची संपूर्ण राजकीय कारकीर्द चढती राहिली आहे. रयतेला म्हणजेच सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्य झाले, पुढे लोकसभेला उभे राहिले, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले,  पुढे आमदार झाले,  जिल्हा बंँकेचे संचालक, उपाध्यक्ष झाले, पुन्हा आमदार झाले, पुढे मंत्री झाले परंतु काही झाले तरी त्यांनी सर्वसामान्य माणसाची नाळ कधीच सोडली नाही, ते कायम रयतेतच राहिले. प्रत्येक वेळी तिकिट मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. तरी त्यांचे जनमाणसातील स्थान पक्षाला माहित असल्याने पक्ष त्यांना डावलू शकला नाही.   


2014 साली मात्र परिस्थिती वेगळी होती. राज्याची सूत्रे उंडाळकर यांचे परंपरागत राजकीय शत्रू ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढवल्या जाणार होत्या. त्यामुळे आठव्या वेळी उंडाळकराना कॉंग्रेस पक्षाचे  तिकिट मिळाले नाही. दोन प्रमुख पक्षांची ऑफर काकांना होती, प्रलोभनेसुद्धा दाखवली गेली. मात्र ती धुडकावून लावत कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्विकारता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तिरंगी लढतीत उंडाळकरांनी समोरच्या सर्व बाजूंनी सक्षम उमेदवारांना जोरदार लढत दिली. त्यांचा पराभव  झाला. तरीही समोरच्या व्यक्तीच्या विजयापेक्षा उंडाळकरांच्या पराभवाचीच अधिक चर्चा झाली.  2014 साली राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले. कॉंग्रेस पक्षाचा राज्यात लाजिरवाणा पराभव झाला, पक्षाला नेतृत्वच राहिले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कराड दक्षिणमधील विजयाचा आनंद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना फार काळ घेता आला नाही. मात्र जनतेतून निवडून मिळालेली आमदारकी, पूर्ण होऊन  दिसायला लागलेली विकासकामे तसेच माजी मुख्यमंत्री म्हणून असणारे वलय यामुळे हा गट सतत चर्चेत राहिला. 


 दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचे अतुल भोसले यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत कामे आणली. नंतरच्या काळात त्यांना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद सुद्धा मिळाले. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि सत्ताधारी  अतुल भोसले यांच्या तुलनेत 35 वर्षे सलग आमदारकी असलेले विलासराव उंडाळकर बाजूला फेकले गेल्याचे  वातावरण विधानसभा निवडणुकीनंतर काही महिने होते.  सत्ता नाही, आता काका गट संपला अशी चर्चा विरोधक करू लागले होते. खरं तर पराभवानंतर दुसऱ्याच आठवड्यात उंडाळकरांनी वाडी टू वाडी, गाव टू गाव, घर टू घर अभियान पुन्हा सुरू करत झालेल्या चुकांची दुरूस्ती करून पुढची तयारी सुरू केली होती.   त्याचाच परिपाक म्हणजे  कराड बाजार समिती, कृष्णा साखर कारखाना आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उंडाळकर गटाने सत्तांतर घडवत मिळविलेले यश होते. काका गटाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. या सर्व राजकीय घडामोडीची दखल कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा घेऊन काकांच्यावर अन्याय झाला, अशी भावना व्यक्त केली होती.  

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर फुल्ल चार्ज झालेल्या उंडाळकर गटाने 2019 डोळ्यासमोर ठेवून विलासराव पाटील यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.  कसलेही सत्कार,  वाढदिवस,  महोत्सव न करणाऱ्या काकांनी सुरूवातीला याला नकार दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तयारी दर्शवत याला 1942 च्या "चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाची जोड द्यायची अट घातली. जून - जुलैमध्ये तयारी सुरू झाली आणि 10 डिसेंबरला कार्यक्रम पार पडला.  हा कार्यक्रम म्हणजे काकांच्या गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या इतर सर्व कार्यक्रमाचा अर्क होता. 50 वर्षाचा अनुभव पणाला लावून काकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. 


कोणतीही मोठ्ठी सत्ता नसताना, आर्थिक बाजू सक्षम नसताना 15 ते 17 हजार लोक या कार्यक्रमाला कसे जमले? हे न उमगणारे कोडं आहे. आजकाल सभेला माणसं गोळा करताना सत्ता असलेल्या लोकांना आटापिटा करावा लागतो, कारखाने तसेच आमदारकी असलेल्या नेत्यांना माणसे आणण्यासाठी कामगारांना हाताशी धरावे लागते अशी परिस्थिती आहे.  दुसरीकडे यापैकी काहीच नसताना उंडाळकर काकांच्या कार्यक्रमाला  माणसे जमतात. हाच तर काकांच्या राजकारणाचा, बुद्धिमत्तेचा आणि लोकसंग्रहाच्या अभ्यासाचा विषय आहे. मी थकलेलो नाही, 89 वर्षाचा तरूण आहे, असे सांगत काकांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय विरोधकांना तर आव्हान दिलेच आहे, पण त्याचवेळी कार्यकर्त्यांनी खचून जाऊन नये, नव्या जोमाने कामाला लागावे असा संदेशही देण्यात काका कोठेही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्या याच जिगरबाज वृत्तीमुळे 2019 ची निवडणूक तुमच्यासाठी सोपी नाही, असा संदेश विरोधकांना देण्यात काका  यशस्वी ठरले आहेत. 

सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेले आवेशपूर्ण भाषण कार्यकर्त्यांसाठी केवळ प्रेरणादायीच नव्हते, तर ही कराड दक्षिणच्या किंबहुना सातारा जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदीच होती. त्यामुळे आता कराड दक्षिणसह जिल्ह्यात राजकीय गोळाबेरीज करताना काकांना डावलून चालणार नाही, असा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॉंग्रेसला, विरोधकांना मिळाला आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका काय असेल? हे आत्ताच कोणी सांगू शकत नसले, तरी आपण मैदानात असणारच आहोत, आपले आव्हान परतवणे सोपे नसून आपण विजयीही होणार आहोत, असाच सूचक संदेश देण्यात काका यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच काकांच्या या सत्कार कार्यक्रमाची नोंद प्रत्येक पक्ष, राजकीय विरोधकांना घ्यावीच लागणार आहे, हे निश्चित. 


2003 साली सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत कराडच्या शिवाजी स्टेडियमवर सुमारे 1 लाख लोक जमवून विलासकाकांनी कराड दक्षिणमधील आपली ताकद दाखविली होती. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री म्हणून सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी यासभेनंतर उंडाळकरांची राजकीय उंची दिल्लीदरबारी वाढली होती. सुशिलकुमार शिंदे सध्या सोनिया गांधी किंबहूना राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनाच या कार्यक्रमाला बोलावून उंडाळकरांनी पुन्हा एकदा दिल्लीकरांना आपले लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. देशभर मोदी विरोधी लाट निर्माण होत असताना याचा फायदा घेण्यात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासहीत कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते कमी पडत असताना मी कॉंग्रेसचाच आहे हे स्पष्ट करून छोडो भारत आंदोलनाप्रमाणे "छोडो नरेंद्र- देवेंद्र सरकार' असा संदेश पोहोचविण्यात उंडाळकर यशस्वी ठरले आहेत आणि हेच या कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल. 

(उद्याच्या अंकात "काय होऊ शकते दक्षिणेत !)

०७ डिसेंबर २०१७

सखी शेजारणी



मी पद्य तु गद्य !
मी सूर तू संगीत !
मी कथा तु कादंबरी !
तु आणि मी जीवन गाणे !


कधी कधी मला वाटतं,
तु आणि मी दोघेच असावं !
आपल्या जगात दुसरं कोणी नसावं !


तु जवळ असावीस,
नजरेत माझ्या विसावीस !
नयनांची भुक तु शमवावीस !


जीला भेटायला, पहायला,
जिच्याशी बोलायला,ऐकायला,
जिची आठवण करायला,
मनातलं सारं काही सांगायला,
मी मला आवर घालू शकत नाही,
अशी तु सखी शेजारणी !


०३ डिसेंबर २०१७

संवाद नात्याचा




ती
तु माझ्यात असण्याचा फार फरक पडतो, 
तुझ्या असणंच मला माझं असणं देवून जातं !

तो
दूर असूनही मज तु जवळ भासतेस,
माझ्या असण्यावर तुच राज्य करतेस !

ती
चिमणी आणि चिमणा भेटीस आतुरलेले,
शब्दात काय वर्णु मन बेधुंद झाहले !

तो
वाट पाहतोय चिमणा चिमणीची रातदिनी,
लावून डोळे वाटेकडे चिमणीही आसुसलेली !

ती
तुझ्या भावना मला कळतात,
भावनेतच मी भावून जाते, भाऊक होते !
 
तो
मला सखी हवी होती म्हणून
तुला सखा हवा होता म्हणून
अव्यक्त व्यक्त  करायला हवं होतं कोणीतरी म्हणून !

ती
आपल्या दोघांच्या नात्याला काय नाव देवू
नात्या मधील भावना पाहू की नाव शोधू ?

तो
नाव महत्वाचे नाय तर भाव अन् साव खरा आहे
राधाकृष्णाच्या नात्यातील गहराई जगाला ठावूक आहे !

०२ डिसेंबर २०१७

Amitabh 10

Film review: Coolie by Times of India
▪▪▪▪▪▪▪▪
Starring Amitabh Bachchan, Rati Agnihotri, Rishi Kapoor
♦♦♦♦♦♦♦♦
In his latest movie Coolie, though, Manmohan Desai seems to have got his recipe wrong and forgotten the meat for the masala.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Coolie 
Produced and directed byManmohan Desai and Prayad Raj
Starring:Amitabh Bachchan, Rati Agnihotri, Rishi Kapoor, Shoma Anand, Suresh Oberoi and Kader Khan
With a string of box-office blockbusters behind him - including Amar Akbar Anthony, Dharamveer, Naseeb and Suhaag -  director Manmohan Desai can rightly claim to have a special understanding of audience tastes.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
There is, however, he modestly insists, no sure-fire formula for a hit: "It is 75 per cent luck and 25 per cent my trade secret." And elaborating this secret, he says: "Just as food requires salt and spices in the right proportion to make it tasty, I try to put the right amount of everything in my film." In his latest movie Coolie, though, the master entertainer seems to have got his recipe wrong and forgotten the meat for the masala.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
Even before its release. Coolie had become part of film folklore as the movie in which Amitabh Bachchan was seriously injured before making a spectacular recovery (India Today August 31, 1982). To get maximum mileage, the dramatic punch scene shot has been frozen twice and a subtitle announces that this is the historic moment when disaster struck temporarily, on July 25,1982.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
Amitabh Bachchan with Rati Agnihotri: A still from the film
After Bachchan miraculously recovered, Desai felt that art had to imitate life and though originally the plot called for Bachchan to die at the end, the script was changed to make him survive even after being riddled with bullets.
Excitement Aplenty: Desai says: "To hoodwink a public into watching spellbound for three hours is no mean art and something these so-called art movies can never achieve." Coolie offers plenty of stock-in-trade "thrills and delights".

Among them: a village flood scene following the bursting of a dam, a Haj pilgrimage ship and prayers in Mecca, a romance scene in which the hero and heroine push Rs 16,000 worth of oranges down the Western Ghats, a razzle-dazzle political meeting with a cast of thousands, a trained falcon costing Rs 1.5 lakh in hire charges, plus an endless sequence of fight scenes, chase scenes and songs .and dances.

With all that at his disposal, Desai obviously felt no need for a plot and improvises with his favourite theme of characters gelting lost and found for which he says he drew his inspiration from the Mahabharat.

Since nothing succeeds like excess; the heroes, heroines, villains, mothers, fathers and children all at various points get misplaced and rediscover each other over a decade later - with so many of them peppered through the plot, even the script- writer gets casual about the reunions and the scenario at times resembles a lost property office.

Desai describes his films as hero-oriented and action packed. Of the two heroes, Iqbal (Bachchan) and Sunny (Rishi Kapoor), Bachchan is his favourite - his lucky star whom he has cast in every film since Amur Akbar Anthony. Bachchan, after his recovery, continued the interrupted film shooting by gamely enacting many more punching bouts.
◼◼◼◼◼◼◼◼
The action includes him jumping in slow motion from a roof, and at one stage, like Tarzan with Jane, he props Julie (Rati Agnihotri) on his shoulder and carries her off.

Wide Variety: Desai admits that his heroines Julie and Deepa (Shoma Anand) are meant to be just props but their fresh-faced looks do show up Bachchan's age a bit. Still, whether he is spouting bombastic speeches on the upliftment of the coolies or performing such slapstick comedy as sitting on an egg and hatching a chicken, he tries to look unembarrassed and puts his soul into it. Salma (Waheeda Rehman), his long-separated mother, tries equally hard to take her part seriously.

The script stresses egalitarianism by making the illiterate coolie marry a spoiled rich girl. And to bridge the gulf in their prospects, the coolie has to join politics. As villain Zafer Khan (Kader Khan) notes: "When all other businesses fail, try the elections."

Amitabh 9

#बंदा रुपया...

आज म्हणजे अकरा ऑक्टोबरला हा माणूस पंचाहत्तर पूर्ण करून शहात्तरीत शिरला. बेचाळीस साली 'चले जाव' आंदोलन झालं हा जसा इतिहास आहे तसाच हा माणूस त्याच साली जन्माला आला हा ही इतिहास आहे, इतिहास असा सांगड घालून शाळांतून शिकवला तर पोरं अभ्यास करतील बघा. आमचे एक शिक्षक कवितेला गाण्याची चाल लावायचे, विनासायास कविता पाठ होऊन जायची. आपण एकेरी हाक कुणाला मारतो, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला आणि आपल्या आवडत्या माणसाला. मुलगा आईला, आजीला अरे तुरे करतो, तसाच आहे तो. लता, किशोर, आशा, सुनिल, सचिन सगळेच एकेरी प्रेमातले. विंडीजच्या टीमबद्दल कुठल्याही क्रिकेट कळणा-या रसिकाला असतं तसंच कुठल्याही वयातल्या सिनेरसिकाला त्याच्याबद्दल विशेष ममत्व आहे. क्रिकेटमध्ये ऑलराउंडरचं कौतुक असतं ते त्याच्या नशिबात आहे, त्याने काय केलं नाही पडद्यावर? गाणं गायलं, ऍक्शन केली, रडवलं, उत्तम विनोद करून हसवलं, अन्यायाविरुद्ध लढा दिला. आपल्याला जे जे आवडतं ते सगळं त्याने केलं. काळाच्या ओघात करमणुकीचे संदर्भ बदलत जातात, काही गोष्टी कालबाह्य होतात, काही हास्यास्पद होतात. आपल्याला हे आवडत होतं एकेकाळी? असा प्रश्नं आपणच आपल्याला विचारून मनाशीच हसतो. याला हा प्रकार लागू नाही. त्याच्या आजूबाजूचा प्रकार कदाचित कंटाळवाणा असू शकेल पण तो नाही.

त्याचे सिनेमे बघत गेले की कळतं, काय काय बारकावे टिपलेत त्याने ते. मुद्राभिनय, हातांचा वापर, पॉझेस, उभं राहणं, कशाकशावर बोलणार. तो अनुभवण्याचा विषय आहे. तो स्कॉचसारखा आहे, चवीने बघाल तर अजून आवडत जाईल. त्याचे सिनेमे अनंतवेळा बघण्याचं ते एक कारण आहे मला. मजा येते बघताना. दरवेळेला काहीतरी नवीन सापडत जातं आणि वाटतं, 'अरे, हे या आधी लक्षातच नाहीत आलं'. 'डॉन'मधलं पळणं, जिना चढणं, 'शक्ती'मधे दिलीपकुमारकडे बघताना आणि राखीकडे बघताना त्याचे डोळे बघाल, किती सांगतो तो त्यातून. चित्रपट शब्दबंबाळ नसावा, ते नाटक नव्हे. आवाजासाठी प्रसिद्ध असलेला हा माणूस चेह-याने किती बोलका आहे ते एकदा समजलं की मजा येते. उन्मळून पडणे, उध्वस्त होणे, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेह-याच्या हलणा-या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बघण्यापेक्षा के.भाग्यराजनी लिहिलेला तमिळ 'कमल हसन अभिनित - Oru Kaidhiyin Diary' चा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा 'त्या'च्या चित्रपटात शशी, ऋषी कपूर जसे दबलेले असतात तसा आहे. अर्थात ही किमया 'त्या'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळ्या देहबोली आहेत. त्याने या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना त्याला तोड नाही (तो ज्या भोळेपणानी रडतो, दलीप ताहिलला विश्वासानी सांगतो, ते बघाच). पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाता-या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज.

'शोले' मधले बडबडे वीरू आणि बसंती आणि जोडीला अबोल जय आणि राधा. काय सुरेख लिहिलीयेत ती पात्रं. त्यातला त्याचा मुद्राभिनय बघा, ते म्हशीवरून उतरणं असो, माऊथऑर्गन वाजवताना वरच्या मजल्यावर बघणं असो किंवा शेवटाला ये कहानी भी अधूरी रह गयी म्हणणं असो, चेहरा बोलतो बॉस. 'रोटी कपडा' मधे त्याला चंद्रा बारोटने घ्यायला लावलं होतं मनोजकुमारला. ज्याचा क्यामेरामन होता 'चौदहवीका चांद'वाला नरिमन इराणी. तिथली दोस्ती त्यांची, तो, झीनत, इराणी आणि बारोट. बुडालेल्या नरिमन इराणीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी 'डॉन' केला होता. इराणी अपघातात गेला रिलीज व्हायच्या आधीच पण त्याला मरणोपरांत कर्जमुक्तं केलं. मला नेमकं आठवत नाही पण गीतकार(?) समीर की त्याचे वडील अंजानच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं अमिताभच्या हस्ते. बोलता बोलता तो म्हणाला, 'मी आलोच असतो प्रकाशनाला, माझं करिअर घडवण्यात अंजानसाहेबांच्या 'खईके पान बनारसवाला'चा मोठा वाटा आहे.' अशी कृतज्ञता आता दुर्मिळ आहे. पाय जमिनीला घट्ट चिकटलेले असले की माणसं आभाळा एवढी मोठी होतात हेच खरं. किती लिहिणार त्याच्या सिनेमांवर. जागा पुरायची नाही. 'त्रिशूल', 'दिवार', 'अमर अकबर', 'मुकद्दर का सिकंदर', 'काला पत्थर', 'अग्नीपथ' किंवा अलीकडचा 'पिंक', 'पा', 'सरकार' काय दुर्लक्ष करायच्या लायकीचे आहेत का? एकाच माणसाचे महिन्यात सलग शुक्रवारी सिनेमे रिलीज होतायेत आणि ते सगळे हिट होतायेत, संमोहनच ते. सिंगल स्क्रीनला महिनोन महिने एकावेळी दोनपेक्षा जास्ती एकट्याचे सिनेमे हाऊसफुल्ल ठेवणे हे खायचं काम नाही. अनेक टुकार पटकथा त्याच्या नावामुळे हिट होऊन गेल्या.

तो काही फार मोठा नृत्यं येत असलेला माणूस नाही. आपल्या भगवानदादांची आधुनिक स्टाईल असाच तो नाचतो खरंतर पण तो जे करतो ते आवडतं असा सगळा प्रकार आहे. अरुणा इराणीने किस्सा सांगितला होता. 'देखा ना हाय रे' गाणं काही केल्या जमत नव्हतं त्याला. प्रचंड फ्रस्ट्रेशन आलेलं त्याला, आपल्यामुळे शूटिंग खोळंबलंय याची बोच जास्ती होती त्याला. मेहमूद आणि बाकी सगळ्यांनी त्याला धीर देण्यासाठी सतत हास्यंविनोद चालू ठेवले आणि सरतेशेवटी एकदा ते झालं. पहिले काही चित्रपट सोडले तर नंतर तो क्वचित हास्यास्पद दिसलाय पडद्यावर. तो जे करत होता ते त्याला सूट होत होतं, लोकांना आवडत होतं म्हणूनही तसं वाटलं असावं पण नाचताना तो धर्मेंद्र, राजकुमारसारखा हास्यास्पद दिसला नाही, उंच आहे म्हणून कुठल्याही अभिनेत्रीबरोबर ऑकवर्ड वाटला नाही, नवीन काळात तंत्रज्ञान आणि कलाकारांसमोर आऊटडेटेड वाटला नाही, गाडी जसा अलगद रूळ बदलते तसा त्याने अलगद ट्रॅक बदलला. तो उत्तम श्रोता आहे. शम्मीकपूरच्या तोंडी त्याने 'नीला आसमाँ सो गया'ची चाल 'जमीर'च्या सेटवर ऐकली होती ती 'सिलसिला'साठी वापरायला त्याने यश चोप्राला सांगितलं. त्याच्याच वडिलांनी लिहिलेलं 'रंग बरसे' आणि 'अग्नीपथ'ची कविता पडद्यावर म्हणायचं भाग्यं त्याला लाभलं. सतत पदरी अपयश पडलेल्या माणसाला यश मिळालं की तो जमिनीवर रहात असावा. सलग सात सिनेमे धाराशायी पडल्यावर एक 'जंजीर' त्याला मुक्तं करून गेला अपयशातून. यश माणसाला देखणं करतं, एरवी घोडयासारखा चेहरा, बिनकामाची उंची, रेडिओवर नाकारला गेलेला आवाज असे दुर्गुण असलेला हा माणूस काय विलक्षण देखणा दिसतो.

कशी गंमत असते ना, हिरा पारख्याच्या हातात पडला पाहिजे. एका ठिकाणी त्याचं डबिंग चालू होतं. बाहेर राजकपूरने त्याचा आवाज ऐकला, त्याला माहित नव्हतं कुणाचं डबिंग आहे ते. त्याने न बघता सांगितलं, 'ये आदमी एक दिन राज करेगा'. यश मिळाल्यावर कौतुक होणं आणि कुणीहि नसताना त्यात गुण आहेत हे कळण्यासाठी पारख हवी. राजेशखन्नाने सांगितलं होतं, 'आनंद' त्याच्या बरोबर करणं ही माझी चूक होती. तो न बोलता काम करत राहिला, कुणी काय म्हटलं याकडे फार लक्ष त्याने दिलं नाही. एक ऐकीव किस्सा आहे. रॉबर्ट रेडफोर्डला त्याने अपॉइंटमेंट मागितली होती. अडीच मिनिटांची होती. हा इथला सुपरस्टार होता पण त्याने कमीपणा मानला नाही, तो वेळेत गेला, भेटला आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जास्ती गप्पा मारून आला. वेळेत जाणारा माणूस आहे तो शूटिंगला सुद्धा. कर्तृत्वाचा दबदबा म्हणजे काय ते त्याच्याकडे पाहून कळतं. नाटकी किंवा ओढून ताणून आणलेला विनम्रपणा कळतो, लक्षात येतो, मुखवटे असतात ते. हा माणूस नखशिखांत शिस्त आहे. आदर्श म्हणजे काय असतं शेवटी, त्याच्यासारखं आपण असावं असं वाटणं म्हणजे आदर्श. एकूण काय तर तो दोनचार लेखात संपण्याचा विषय नव्हे.

लिहायला घेतलं की त्याच्याबद्दल काय लिहिणार असा प्रश्नं मला नेहमी पडत आलाय. न कळत्या वयात त्यालाच पहिल्यांदा पाहिल्यामुळे असेल पण त्याचा अमिट ठसा एकदा उमटला तो उमटलाच. त्याच्या अभिनयाबद्दल किती बोलणार, आता कंटाळा येईल इतकं बोलून झालंय. रसिक, प्रेक्षक आणि समीक्षक ह्या भिन्न गोष्टी आहेत. कुठलंही पूर्वग्रह मनात न ठेवता बघतो तो प्रेक्षक अशी आपली कॅटेगरी आहे. समीक्षक जे बघतो ते बघू दे बापडा, उगाच पृथ्थकरण करून मजा घालवायची नसते हे कळलं की झालं. दोन चार घटका आपल्या विवंचना विसरायला लावून त्या मायावी दुनियेत तो आपल्याला रमवून टाकतो हे त्याचे मोठे ऋण आहेत आपल्यावर. त्याची जादूच वेगळी आहे. पण तो नुसता उंचीनीच मोठा नाहीये. गुणांनी पण मोठा आहे. जिवंत दंतकथा. सुसंस्कृत, नम्र. एक प्रामाणिक माणूस, सगळी कर्तव्यं पार पाडणारा, कुणाचाही रूपया न बुडवणारा, संकटांना सामोरा जाणारा आणि हरलेली बाजी जिंकणारा. नम्रता आणि कृतज्ञता हे त्याचे सर्वात मोठे गुण आहेत. म्हणून एक अभिनेता यापेक्षा या सगळ्या गुणांसाठी तो मला जास्ती आवडता आणि आदरणीय आहे. लोक सगळ्या बाजूने बोलतात पण सगळ्या बाजूंवर बोलत नाहीत. 'हत्ती आणि सहा आंधळे' या बोधकथेसारखा तो प्रत्येकाला वेगळा दिसू शकेल. त्यामुळे मला ज्यासाठी आवडला तसाच दुस-यांना आवडेल असं नाही.

माणूस एकदा प्रेमात पडला की  दोष दिसत नाहीत किंवा दिसले तरी खुपत नाहीत. एकदा आपण भक्तं झालो की मग आपल्याला वाईट दिसत नाही. पण मी काही भक्तं नाही मी एक त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा माणूस आहे. पण टीका करायला फार बुद्धी लागत नाही,त्यात वेळ घालवण्यापेक्षा पुलं म्हणाले तसं समोरच्यातलं चांगलं काय दिसतं ते बघावं, सांगावं. चुका सांगायला जगात तज्ञांची कमी नाहीये. व्यक्तिपूजा हा आपला राष्ट्रगुण आहे. तरीपण त्याचा 'मृत्यूदाता' पहाताना मी काळझोप लागल्यासारखा झोपलो होतो, 'मर्द', 'गंगा जमना सरस्वती', 'आज का अर्जुन' बघताना तुफान हसलो होतो, 'इन्सानियत' बघताना लाजून काळवंडलो होतो. 'जादूगर', 'अजूबा', 'तुफान' मी अजून पूर्ण बघू शकलेलो नाही. 'द लास्ट लिअर' मी पाहिलेला नाही. तसे त्याचे बरेच नविन चित्रपट मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे माझं काही अडलेलंही नाही. त्याचे 'डॉन', 'मुकद्दर का...'. 'अमर अकबर...', 'चुपके चुपके', 'मिली', 'अभिमान', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'फरार', 'दिवार', 'सत्ते पे सत्ता', 'अग्नीपथ', 'आखरी रास्ता' 'सौदागर', 'मजबूर', 'जंजीर' आणि एक छोटासा हिट 'शोले' पुरेसे आहेत. 'सुहाग', 'कस्मे वादे', 'कालिया', 'शहेनशाह', 'देशप्रेमी', 'हम', 'खुदा गवाह', 'दोस्ताना', 'परवरीश', 'हेरा फेरी' चॅनल बदलताना दिसले तर क्षणिक घुटमळायला बरे आहेत. (लिस्ट थांबवण्यात येत आहे, किती लिहिणार ना).

त्याची माणुसकी अफाट आहे जी मला कायम मोह घालत आली आहे. कुठेही वाच्यता न करता चांगलं काहीतरी करत रहाणं अवघड असतं. 'इन्सानियत' टिटो टोनीचा ('राम बलराम', 'दो अंजाने' त्याचेच) होता. ८९ ला सुरु झालेला सिनेमा नूतन, विनोद मेहरा गेल्यामुळे तसाही रखडलाच होता. तो, सनी, चंकी, सोनम, रविना, जयाप्रदा अशी एकदाच एकत्रं आलेली स्टारकास्ट होती. तेंव्हा त्याचा वाईटकाळ होता. तरीपण ९४ ला फिल्म रिलीज झाली. आपटणार हे कन्फर्म होतं. पण त्याचा सिनेमा एक आठवडा भारतभर चालला तरी कॉस्ट वसूल होते म्हणून त्याने फिल्म पूर्ण केली. त्याच्या करिअरला फटका बसलेलाच होता, हा रिलीज करून अजून खपली निघणार होती पण तरीही त्यानी मान्यता दिली. निर्माता आयुष्यातून उठला नाही त्यामुळे. त्याच्या केवळ या कृत्यापोटी कृतज्ञता म्हणून मी 'विजय'ला जाऊन हा सिनेमा बघितला होता. प्रत्येकवेळेला पैशाचा मोबदला मिळतो असं नाही आणि एरवी कितीही पैसे टाकले तरी ऋणाची परतफेड करता येईलंच असं नाही. ठपका नको म्हणून त्याचा आणि मुमताजचा 'बंधे हाथ' मला बघायचाय. काळाचा महिमा असतो, 'परवाना' आला तेंव्हा नविन निश्चलनी अल्फाबेटीकली नामावली द्यायला विरोध केला होता कारण 'त्या'चं नाव पहिलं आलं असतं. 'मंगला'ला रिरन मधे पाहिला मी तेंव्हा नविन निश्चल कोप-यात निश्चल होता आणि व्हिलन 'तो' पोस्टर व्यापून. नावात काय नसतं, झेडवरून चालू झालं अस्त तरी काही फरक नसता पडला. कर्तृत्व असलं की तो म्हणालाय तसंच, 'हम जहाँ खडे होते है, लाईन वहांसे शुरु होती है'.

आई बाप सुसंस्कृत असले म्हणजे मुलं असतीलंच असं नाही. सुनील दत्तनी 'यादें' मधे दिलेला पहिला रोल तो आजपर्यंत विसरलेला नाहीये. 'रेश्मा और शेरा' मधे ऐनवेळी रोल अदलाबदली झाले आणि तो मुका झाला आणि विनोद खन्ना बोलका पण सुनील दत्तच्या शब्दावर तो काही बोलला नाही. संजय दत्तच्या पाठीशी परतफेड म्हणून तो कायम उभा असतो. 'नाम' (सलीमचा एकट्याचा 'दिवार') रिलीज झाल्यावर त्याने त्याला सोन्याची साखळी आणि पत्रं दिलं होतं. 'सात हिंदुस्थानी'मध्ये संधी देणा-या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या आजारपणात त्यानी त्यांची काळजी घेतली होती. पंकज पराशरच्या पहिल्या मोठ्या चित्रपटासाठी ('जलवा') त्यानी दोस्तीत स्पेशल अपिअरन्स केला होता. रजनीकांतची हिंदीत एंट्री सुखकारक व्हावी म्हणून 'अंधा कानून' केला. एबीसीएल काढली आणि त्यात तो बुडला. बुडणारच होता, माणूस भिडस्तं असला की वेगळं काय होईल. नाहीतर मग पळून गेला असता की तो. पडद्यावरचा नायक नावाला नव्हता तो. त्याच्यासारखाच धीराचा आणि सरतेशेवटी विजय मिळवणारा होता. पेशन्स लागतात, नैराश्यं आलं की धीर खचतो, सल्लागार वाढतात, कुणीही अक्कल शिकवायला लागतं. काही न बोलता काम करत राहणं सोपं नसतं. 

दुर्धर 'मायस्थेनिया ग्रेव्हीस', पुनीत इस्सारबरोबरची फायटिंग, टी.बी.सगळ्यातून तरला, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परत आला. संपूर्ण देश एखाद्यासाठी प्रार्थना करतो याला पुण्याई लागते. कुणी नवस बोललं, कुणी देवाला उलटं चालत गेलं. नोंद नसलेल्या अनंत प्रार्थना पाठीशी उभ्या राहिल्या, कशामुळे? त्याने जे काही दिलं इतक्या वर्षात त्याची ती मूक परतफेड होती. रेखा, परवीन, माधवी अनेक नावं जोडून झाली, तो एक शब्दंही कधी बोलला नाही. 'बावर्ची'च्या सेटवर तो जयाला घ्यायला जायचा तेंव्हा खन्ना त्याच्याशी बोलणं लांब, ओळख सुद्धा द्यायचा नाही पण तो एक शब्दंही कधी बोलला नाही, उलट त्याला कायम पहिला सुपरस्टार म्हणून वंदत आला.  बोफोर्स प्रकरणात एकदाही आक्रस्ताळं तो बोलल्याचं मला आठवत नाही किंवा निर्दोष सुटला म्हणून 'जितं मया' करत बोलत सुटला नाही. मौनात मोठी ताकद असते. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं, तो तेच करत आलाय. पेशंस पाहिजेत बॉस. मला त्याला बघितलं की एक शेर आठवतो, 'अपने खिलाफ बातोंको अक्सर मैं खामोशी से सुनता हूं ... क्योंकी...जवाब देनेका हक मैंने वक्तको दे रखा है'! आदर्श असे गल्लोगल्ली मिळत नसतात. वर म्हटलं ते आणि आदर्श म्हणजे काय याची अजून एक व्याख्या आहे माझी. आपल्याला सोयीस्कर असतो तो आदर्श नसतो, त्याच्यासारखं वागणं, जगणं आपल्याला जमणार नाही असं वाटून जातं तो माणूस 'आदर्श' असतो.

टॅक्स भरण्यासाठी त्याने 'दो बूंद जिंदगीके' जाहिरात केली होती. पैसे किती मिळाले यापेक्षा त्याच्या नावामुळे पोलिओचे डोस खेड्यापाड्यात दिले गेले आणि अशिक्षित लोकांनीही घेतले याचं क्रेडिट मोठं आहे. शब्दाला वजन हवं, ओ द्यायला हाक मारणारा माणूसही तास हवा. कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका संध्याकाळी यश चोप्रांकडे जाऊन काम मागण्यात त्याला कमीपणा वाटला नाही. कुठल्याही फालतू जाहिराती करतो तो पण त्याला कारण आहे. आर्थिक दुरावस्था कदाचित त्याच्या मनात भीती धरून आहे. खरंतर आता गरज नाही पण आपण त्याला सांगायचं हे चुकीचं आहे. सगळे गुणच असतील तर देवत्व मिळतं, तो माणूस आहे तेच बराय. छोट्या पडद्यावर यायला मोठ्या कलाकारांचा धीर व्हायचा नाही. अतिपरिचयाने किंमत कमी व्हायची भीती असते. हा माणूस या वयात सगळ्यात जास्ती टीआरपी खेचतोय. नाव आल्यावर त्याच्याकडे जाताना माणसं सद्गदीत होतात. त्याला भेटणं, त्याच्यासमोर बसणं, बोलणं, त्याला स्पर्श करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, आहे. प्रश्नांची उत्तरं समोर पीसीवर दिसतात पण इतर जे बोलतो ती त्याची बुद्धी आहे, स्क्रिप्टच्या बाहेरचं बोलायला वाचन लागतं, अभ्यास हवा. समोरच्याला न्यूनगंड वाटू नये, दडपण येऊ नये यासाठी त्याची वागण्याची पद्धत बघा. त्याचं कौतुक केल्यावर त्याची होणारी कुचंबणा बघा. नकली नसलेला सभ्यपणा त्याच्यात आहे. त्याची माझी भेट होण्याची सुतराम शक्यता नाही. पण तेच बरंय. शब्दं फुटणार नाही एकतर आणि डोळे भरून येतील त्यामुळे तो धूसर दिसेल.

त्याच्या सुसंस्कृतपणाचा एक फारसा प्रसिद्ध नसलेला किस्सा आहे. खूप वर्ष झाली. प्रसिद्ध गोगटे कुटुंबियांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमधे त्याचा सत्कार झाला होता. कसला तरी पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होता. सत्कार झाला, भाषणं झाली. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून तो निघाला. मग मागे मुख्यमंत्री, गोगटे कुटुंबीय व इतर मान्यवर गप्पा मारत उभे होते. उत्सवमूर्ती गेल्यामुळे काही लोक बाहेर गप्पा मारायला आले. बघतात तर काय, तो पार्किंग मधे गाडीला टेकून उभा. एकजण अचंबित होऊन पुढे गेला (ज्यानी मला हा किस्सा सांगितलाय तो). कारण विचारलं, काही राहिलंय का, कुणी येणार आहे का? नाहीतर आत चला, मी थांबतो कुणी येणार असेल तर. त्यानी दिलेलं उत्तर वेड लावणारं  होतं. "नाही, तसं काही नाही, पण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी गेल्यावर आपण जायचं हा शिष्टाचार आहे. म्हणून थांबलोय." बातमी वा-यासारखी पसरली. मग मुख्यमंत्री गेले मग हा गुणांनी पण उंच असलेला माणूस गेला.  बारा फुटी फ्लेक्स लावून उपयोग नाही अशी उंची गाठण्यासाठी मुळात तेवढं उंच असावं लागतं माणसानी. 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मधे (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - "नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो". उंचीवर पोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला, घसरायला. म्हणून त्याच्याकडे बघून मी एवढंच शिकलोय आणि लक्षात ठेवलंय की 'मान वर हवी ती अजून किती उंची गाठायची आहे ते बघण्याकरता, नाहीतर ठेच आहेच'.

आमची पिढी सगळ्यात नशीबवान. आम्ही लता, आशा, सचिन, द्रविड, मार्शल, रिचर्ड्स, प्राण, आरडी, किशोर पाहिले, ऐकले.  त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकड्यांवर सिद्ध होणार माणूस तो नव्हे. काळ काय झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतके थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेह-यावर हलणारी नस, डोळ्यांपाशी होणारी मायक्रो हालचाल, गळ्याशी ताणल्या जाणा-या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर असेल. आम्ही कदाचित नसू ते बघायला. पुढच्या पिढ्या बघतील, त्या चकीत होतील. अरे कोण रे हा? म्हणतील, मग त्याला शोधतील आणि हरखून जातील. आम्ही तुला वर्षांनुवर्षे पाहिलं, ऐकलं हे आमचं भाग्यं. तुला निरोगी शंभर वर्ष आयुष्यं लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पूर्वी सोळा आण्याचा रुपया होता. पूर्ण काम झालं की सोळा आणे काम झालं असं म्हणायची पद्धत होती. एखादा माणूस परिपूर्ण असेल तर त्याला बंदा रुपया म्हटलं जायचं. दशमान पद्धतीत शंभर पैशाचा रुपया झाला. चार आठ आणे तर कधीच वापरातून कमी झाले. वयाचे बारा आणे पूर्ण झाले त्याचे पण तो मुळातच #बंदा रुपया आहे, माणूस म्हणून अभिनेता म्हणून, आदर्श म्हणून. अजून काय बोलू, तुझे ऋणको आहोत आम्ही. 

जयंत विद्वांस

बंदा रुपया...(मराठी विवेक) http://evivek.com//Encyc/2017/10/10/amitabh-bachchan-75th-birthday.aspx

लेखाच्या शेवटी भाषणाची लिंक आहे 'विवेक'च्या कार्यक्रमातल्या, बघाल :)

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...