डॉन…सस्पेन्स टायटल म्युझिक
आणि seduction performance ये मेरा दिल !*
__सतीश मोरे सतिताभ_
~अमिताभ बच्चन प्रेमी_~
काल १२ मे रोजी डॉन या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तब्बल ४८ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या निर्मिती मागच्या संघर्षाच्या कथा, दिग्दर्शक Chandra Barot, निर्माते Nariman Irani, आर्थिक अडचणी, काही व्यक्तींच्या मृत्यूनंतर चित्रपट थांबणे आणि नंतर कलाकारांनी तो पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत… हे सगळं आपण अनेकदा वाचलेलं आहे. पण माझ्यासाठी “डॉन” म्हणजे फक्त एक सुपरहिट चित्रपट नाही. माझ्यासारख्या अमिताभप्रेमी साठी तो एक अनुभव आहे… एक वेड आहे!
कराडच्या प्रभात चित्रपटगृहात, रॉयलमध्ये आणि नंतर व्हीसीआरवर, टीव्हीवर पाहिलेला “डॉन” आजही डोळ्यासमोर तसाच उभा राहतो. पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची जी मजा होती ती टीव्हीवर कधीच मिळाली नाही. मी अनेकांना नेहमी सांगायचो — “डॉन” ची सुरुवात कधीच चुकवू नका! कारण चित्रपट सुरू झाल्यापासून ज्या वेगाने कथा धावते आणि # Amitabh Bachchan यांनी डॉनची खलनायकी व्यक्तिरेखा ज्या स्टाईलमध्ये उभी केली आहे, ती त्या काळात अफलातून होती.
त्या काळात अमिताभ बच्चन म्हणजे अँग्री यंग मॅन अशी व्याख्या होती. पण अशा काळात त्यांनी डॉनसारखा निर्दयी, संशयी, स्टायलिश आणि धोकादायक खलनायक साकारला आणि अभिनयाचा एक वेगळाच पैलू दाखवला. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेले ब्ल्यू टोनमधले टायटल्स, त्यावरचं टायटल म्युझिक आणि वातावरण… आजही अंगावर शहारे आणतं. त्या टायटल सिक्वेन्ससारखा प्रभाव मला आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात जाणवलेला नाही.
Don च्या सुरुवातीला जे टायटल्स दाखवले आहेत, त्या प्रकाराला सिनेमाच्या भाषेत “Title Sequence” किंवा “Opening Credits Sequence” असं म्हणतात. पण “डॉन”मध्ये ते ज्या पद्धतीने सादर केले गेले, त्याला त्या काळात एक वेगळीच स्टाईल मानली जात होती.
“डॉन”च्या सुरुवातीला पूर्ण दृश्यांवर जो निळसर रंगाचा प्रभाव दिसतो, त्याला तांत्रिक भाषेत Blue Tint, Color Grading किंवा त्या काळच्या फिल्म प्रक्रियेत Monochrome Tinted Titles असंही म्हटलं जातं. १९७० च्या दशकात अशी स्टाईल फार कमी हिंदी चित्रपटांत वापरली जायची. त्यामुळे “डॉन”ची सुरुवात लगेच वेगळी वाटते.
त्यात वरून चालणारं कल्याणजी आनंदजी यांचं थरारक टायटल म्युझिक… हे प्रत्यक्षात “Background Score Theme” म्हणून ओळखलं जातं. आजच्या भाषेत त्याला Theme Music किंवा Signature Theme म्हणतात. हे म्युझिक इतकं प्रभावी होतं की डॉन पडद्यावर येण्याआधीच प्रेक्षकांच्या मनात त्याची भीती आणि रुबाब तयार होत होता.
त्या काळात अनेक चित्रपटांमध्ये फक्त स्थिर अक्षरांत टायटल्स दाखवली जात, पण “डॉन”मध्ये: चालती दृश्यं,निळसर टोन,जलद कट्स, सस्पेन्स म्युझिक,
आणि स्टायलिश एडिटिंग यामुळे एक “Hollywood crime thriller” सारखी फील तयार झाली होती.म्हणूनच आजही अनेक अमिताभप्रेमी “डॉन”ची सुरुवात ही हिंदी सिनेमातील सर्वोत्तम टायटल सिक्वेन्सपैकी एक मानतात.
विशेष म्हणजे त्या टायटल सिक्वेन्समध्ये डॉनची पूर्ण व्यक्तिरेखा आधीच जाणवते — वेग, रहस्य, स्टाईल आणि धोका! म्हणूनच “डॉन”ची सुरुवात चुकवायची नाही… हे अगदी खरं आहे.
“डॉन”ची एन्ट्री… त्याची चाल… त्याची नजर… आणि मोजक्या शब्दांत बोललेले संवाद — हे सगळं मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. डॉन च्या एका स्टेप वर त्या काळात ही तरुणाई फिदा होती आजही आहे.
हेलनवर चित्रित झालेलं “ये मेरा दिल प्यार का दीवाना” हे गाणं तर आजही सर्वोत्तम गाण्यांपैकी एक वाटतं. "ये
मेरा दिल…” मध्ये हेलनचा डान्स हा फक्त नृत्य नाही; तो प्रत्यक्षात seduction performance आहे. त्या गाण्यात ती डॉनला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे डॉन तिच्यावर संशयाने नजर ठेवतो. त्यामुळे त्या डान्समध्ये:शरीराची लय, डोळ्यांतील एक्सप्रेशन, हातांच्या हालचाली,आणि कॅमेऱ्यासमोरची उपस्थिती हे सगळं फार महत्त्वाचं होतं.त्या काळात हेलन यांची खासियत म्हणजे त्या फक्त नाचत नसत, तर पूर्ण प्रसंग अभिनयातून जिवंत करत. म्हणूनच “ये मेरा दिल…” हे गाणं आजही फक्त आयटम साँग म्हणून पाहिलं जात नाही; ते एक cinematic performance मानलं जातं.
विशेष म्हणजे या गाण्यात अमिताभ बच्चन काही फार मोठे डान्स स्टेप्स करत नाहीत, पण त्यांची नजर,संशय,खुर्चीत बसण्याची स्टाईल, सिगारेट पकडण्याची पद्धत,आणि हेलनकडे पाहण्याची बॉडी लँग्वेज यामुळे पूर्ण गाण्याला वेगळाच थरार मिळतो. त्यामुळेच “ये मेरा दिल…” हे हिंदी सिनेमातील सर्वात स्टायलिश आणि सेन्सुअस गाण्यांपैकी एक मानलं जातं.
या गाण्यात त्यांनी घातलेला हिरवा-पांढरा ब्लेझरही मला नेहमी आठवतो. कराडमधील व्हावळ टेलर्सचे सुशांत व्हावळ यांनी एकदा त्या ब्लेझरमधला बारकावा सांगितला होता — अमिताभ बच्चन उभे राहिले, हात खाली किंवा वर केले तरी त्या चौकटींच्या रेषा अचूक एकसंध दिसतात! त्या टेलरचं कौशल्य खरंच मानावं लागेल. त्यानंतर मी ते गाणं अनेकदा पाहिलं आणि तो बारकावा अचूक जाणवला.
जखमी झालेला डॉन जेव्हा एसीपीच्या गाडीत बसलेला असतो, तेव्हा मृत्यू समोर असूनही त्याच्या चेहऱ्यावर भीती नसते. “डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं…” हा फक्त डायलॉग नाही; तो आत्मविश्वास आहे. शेवटच्या क्षणातही न झुकण्याची वृत्ती आहे. मला तर त्या प्रसंगातून एक गोष्ट कायम शिकायला मिळाली — परिस्थिती कितीही कठीण असो, धैर्य सोडायचं नसतं.
चित्रपटातील आणखी एक अफलातून प्रसंग म्हणजे डॉनला टोळीतील एका गद्दाराची माहिती समजते आणि तो त्याला शांतपणे गोळी घालतो आणि नंतर निर्विकारपणे म्हणतो — “मुझे उसके जुते पसंद नहीं .” हा संवाद ज्या थंड डोक्याने अमिताभ बच्चन यांनी सादर केला आहे, तो अभिनयाचा मास्टरक्लास आहे.
झीनत अमान यांनी साकारलेली रोमा जेव्हा टोळीत प्रवेश करते, तेव्हा तिच्या बहादुरीवर संशय घेतला जातो. पण ती एका माणसाला फाईटमध्ये हरवते आणि वरून हे पाहणारा डॉन टाळ्या वाजवत खाली येतो — “ये लड़की बड़ी फुर्तीली और चुस्त है… और मुझे जंगली बिल्ली बहुत पसंद है.” हा डायलॉग ऐकतानाही डॉनचा स्टाईलिश क्रूरपणा दिसतो.
आणि मग येतो विजय! पान खाणारा, भोळा, मुंबईच्या गल्लीबोळातून आलेला विजय. “खइके पान बनारसवाला”नंतरचा तो निरागसपणा आणि डॉनच्या जागी जाऊन त्याचं आयुष्य जगण्याचा संघर्ष… अमिताभ बच्चन यांनी दोन टोकाच्या व्यक्तिरेखा इतक्या सहजतेने उभ्या केल्या आहेत की आजही तो अभिनय अभ्यासाचा विषय वाटतो.
प्राण, इफ्तिहार यांसारख्या कलाकारांनीही या चित्रपटात जीव ओतला आहे. “अरे दीवानो मुझे पहचानो”, “खइके पान बनारसवाला”, “ये मेरा दिल” ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.“डॉन” हा शब्द आज कोणत्याही क्षेत्रातील टॉप व्यक्तीसाठी वापरला जातो. पण हा शब्द ऐकताच सर्वप्रथम डोळ्यासमोर उभा राहतो तो अमिताभ बच्चनच! कारण त्यांनी “डॉन” या व्यक्तिरेखेला अभिनयातून अमरत्व दिलं आहे.
त्या काळात लोक ब्लॅकमध्ये तिकिटं घेऊन, तासन्तास लाईनमध्ये उभे राहून हा चित्रपट पाहायचे. कराडमध्ये हा चित्रपट उशिरा आला होता, पण आम्ही शालेय जीवनात तो पाहिला आणि नंतर तर कित्येकदा त्याचं पारायणच केलं. आजही टीव्हीवर “डॉन” लागला आणि जिथून चित्रपट सुरू असेल तिथून पाहायला बसल्याशिवाय राहवत नाही.
कारण “डॉन” हा फक्त चित्रपट नाही… ती एक आठवण आहे, एक काळ आहे आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाच्या साम्राज्याचा अजरामर पुरावा आहे.
Congratulations
#48YearsOfDON
🎬 Directed by : Chandra Barot
💰 Produced by : Nariman A. Irani
🎼 Music by : Kalyanji Anandji
✍🏻 Lyrics by : Indeevar, Anjaan
✍️ Dialogue by : Salim-Javed
🎥 Cinematography by : Nariman A. Irani
💰 Budget : 70 Lac
💰 Box office : 7 Crore
🚩 Production Company : Nariman Films
🕒 Running time : 2 hours 55 minutes
📅 Released date : 12 May 1978
⭐ Starring : #AmitabhBachchan,
Zeenat Aman, Pran, Satyen Kappu, On Shivpuri, Mac Mohan, Kamal, Iftikhar, Helen, Arpana Choudhary, Pinchoo Kapoor, Jagdish Raj,
M. B. Shetty, Paid Jairaj, Yousuf Khan.
..
*सतीश मोरे सतिताभ*
अमिताभ बच्चन प्रेमी,कराड
9881191302