फॉलोअर

०८ सप्टेंबर २०२०

आठवणीतले स्वच्छता अभियाना

 मुख्यमंत्री देशमुखांचे हिंदी आणि आर.आर.पाटील यांची ऑटोग्राफ आणि डोरलं गहाण ठेवल्याच्या बातमीची कहाणी 


2005-2006 सालचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत२००५-२००६ चा यशवंतराव चव्हाण सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मला मिळाला होता. हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यावेळचे केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री रघुवंश प्रसाद यांच्या हस्ते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना.अजित पवार, ग्राम विकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच ना.आर आर पाटील यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला होता. 


हा पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना हा पुरस्कार का दिला जातो याबाबत बिहारी हिंदीमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना विचारले. विलासराव देशमुख यांचा अचूकपणा आणि टाईम फेक आपणा सर्वांनाच माहीत आहे रघुवंश प्रसाद सिंग यांच्या या प्रश्नावर विलासराव देशमुख यांनी माझ्या समोर दिलेले मोडक्यातोडक्या मराठीहिंदीत दिलेले उत्तर आज हि माझ्या कानावर आहे.गाव स्वच्छता अभियान कि बातमी अलग अलग पेपरमे छपकर आती है,जो पत्रकार अच्छी अच्छी बातमी छापता है उसको ये पुरस्कार दिया जाता है. विलासरावांचे हे हिंदी मराठी ऐकून अजित पवार यांच्यासह सर्वांनीच जोरदार हसून दाद दिली होती.


हा कार्यक्रम झाल्यानंतर दोन महिन्यानंतर निर्मल ग्राम अभियान पुरस्कार सोहळा उंडाळे परिसरात झाला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पुन्हा माझा सपत्नीक सत्कार केला होता.त्यावेळी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील होते. तत्कालीन गटविकास अधिकारी नितीन माने यांनी ना. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


मी स्वच्छता अभियान अंतर्गत फाईल तयार केली होती. या कार्यक्रमात त्या फाइलवर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सही (ऑटोग्राफ) केली होती.विलासराव देशमुख यांनी सही करताना आमदार उल्हास पवार यांना ही फाईल पाहून त्यावर टिप्पणी द्यायला सांगितले होते. ही टिप्पणी उल्हास पवार यांनी दिल्यानंतर त्या खाली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सही केली होती. माझ्यासमोर होत असलेला हा माझ्या आयुष्यातील सुखद क्षण होता.


माझ्या ग्रामस्वच्छता अभियानाच्या फाईलवर तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांनी सुद्धा ऑटोग्राफ दिला होता. मुंबईमध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर आर आर पाटील यांना भेटण्यासाठी मी आणि अमोल चव्हाण अंजनी गावी गेलो होतो. त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली होती. माझी संपूर्ण फाईल वाचून त्यांनी त्यावर सही केली होती. यादरम्यान चर्चा करताना 'ज्याच्या घरी शौचालय नसेल त्याला निवडणुकीला उभा राहायला परवानगी देऊ नका',असे मी त्यावेळी आर आर पाटील यांना सुचवले होते.आर आर पाटील यांनी ही सूचना अतिशय सिरीयसली घेतली होती आणि या सूचनेवरून माझे त्यांनी कौतुक केले होते. पुढच्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने तसा कायदा केला. आर आर पाटील यांनी माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराने केलेल्या एका सूचनेचे एवढे गांभीर्याने घेतलं,हे सुद्धा माझ्यासाठी एक आनंदाची अशीच बाब होती.


7 नोव्हेंबर 2005 रोजी पुढारीच्या पहिल्या पानावर 'डोरलं गहाण ठेवलं आणि शौचालय बांधायला पैसे दिले' अशा आशयाची एक बातमी वेगळी मी दिली होती. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी टि आर गारळे यांनी मला ही बातमी (source) दिली होती. ही बातमी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खूप गाजली होती. संजय नगर येथील एका गोपाळ समाजाच्या महिलेने शौचालय बांधण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले, ही कराड तालुका साठी एक वेगळी कौतुकास्पद बाब होती. सदर बातमी तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी सुद्धा माझे कौतुक केले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या बातमीची कात्रणे, प्रसिद्धी पत्रके, हँडवेल तयार करून जिल्हा परिषदेने गावभर वाटली होती.या बातमीचे मोठे होल्डिंग तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या बाहेर अनेक दिवस लावण्यात आले होते.राज्यभर अनेक जिल्हा परिषद पर्यंत हा मेसेज, ही बातमी माननीय आर आर पाटील यांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. एखादी बातमी एवढी मोठी बदल, क्रांती करू शकते, एखाद्या बातमीचा काय परिणाम घडू शकते हे एक उदाहरण होतं.


*सतीश वसंतराव मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...