फॉलोअर

२१ नोव्हेंबर २०२२

आवाहन

*आता फक्त 100 अन्नदात्यांची गरज आहे !* 

माऊलीनो नमस्कार,

आपणास माहीत आहेच की 23 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या आदल्या दिवशी कोळे येथील अनाथ आश्रमाला भेट दिल्यानंतर या अनाथाश्रमाला 365 अन्नदाते मिळवून देण्याचा अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने मी संकल्प केला होता. 

कोळे येथील जिजाऊ अनाथ आश्रम हे समीर नदाफ चालवतात. *महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे नोंदणीकृत* असलेल्या या आश्रमामध्ये तीन ते चौदा वयोगटातील 32 मुले मुली आहेत.नदाफ दांपत्य या मुलांचा सांभाळ करतात. त्यांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होतो ते रात्री अकरा पर्यंत हे दांपत्य या मुलांच्या सेवेत असतात. अतिशय कष्टाने व जिद्दीने उभारलेल्या या अनाथाश्रमासाठी समाजातील अनेक घटक मदत करत असतात.

 *या 32 मुलांचा रोजचा दोन वेळच्या जेवणाचा तसेच चहापाणी नाश्त्याचा खर्च सुमारे पंधराशे रुपये आहे.* हा खर्च त्यांना मिळाला तर या दांपत्याला पैशासाठी भटकत राहावे लागणार नाही, असा विचार आल्यानंतर 365 अन्नदाते शोधण्याचा मी प्रयत्न केला. समाजामध्ये असलेल्या तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या प्रेमामुळे मला अतिशय चांगले यश आले आहे. समाजातील अनेक घटकांनी, अगदी मुंबई पुणे येथील कराडवासीयांनी मला फोन करून या उपक्रमात सहभागी नोंदणी होण्याची इच्छा व्यक्त केली. *265 एवढे सदस्य आता या दानशूर अन्नदात्यांच्या यादीमध्ये सहभागी झाले* आहेत. 

आपणही या योजनेत सहभाग घेऊ शकता. सहभागी होण्यासाठी मला फोन करा. मी आपलं नाव या संबंधी तयार केलेल्या एका ग्रुपमध्ये घेईन. आपण पंधराशे रुपयेची मदत समीर नदाफ यांच्या गुगल पे नंबर 8459883401 वर पाठवून द्यावी.

आपणही मदतीसाठी आपला हात पुढे करावा, ही विनंती.

 धन्यवाद

सतीश वसंतराव मोरे
9881191302

१८ नोव्हेंबर २०२२

समजुन घेताना कमी पडशील का?




तुझ पाहताना तुझ पहावस वाटतं.!!
हे वेड मनातल थोडसंच, जपाव वाटतं 

नजर शोधीशी मज, तुझ भोवती.!
हुरहुर हि मनीची,नाजूक वळणावरती.!

तुझिया नजरेत, जपावे कि लपवावे ?
अबोल मनाचे संकेत, न सांगताच का तुला कळावे?

असे ही हुरहुर, मनाची नात्याची.!!
नात तुझं माझं अनोख ते नवं.!

वाटत तु अवखळ वादळी पाऊस..
तर, मी वाऱ्याची  मंद  झुळूक ,
तु पावसाचा बसणारा थेंब ,
तर, मी बंद पेटतील मोती !

जाणीव होते जेव्हा सत्याची, 
मग वाटतं
निखळ मैत्रीसारखं नातं आपलं असावं !
दूरपर्यंत जपता येत असेल, तर आणि तरच पुढे जावं!!

न सांगताही काही गोष्टीं तुला उमगतील का.??
समजुन घेताना तुही 
कुठे कमी पडशील का?? पडशील का ?

CMYK म्हणजे काय...तल्लख बुद्धीचा जिज्ञासू विद्यार्थी !


राष्ट्रीय पत्रकारदिनी भेटला 
तल्लख बुद्धीचा जिज्ञासू विद्यार्थी !

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त परवा १६ नोव्हेंबर रोजी जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्या मंदिर येथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. सोबत माझे सहकारी उपसंपादक चंद्रजीत पाटील आणि छायाचित्रकार सुरेश पवार उपस्थित होते. आज पहिल्यांदाच या शाळेत गेलो. या शाळेविषयी खुप ऐकून होतो.

बातमी म्हणजे काय? पत्रकार म्हणजे काय? दैनिकाचे कामकाज कसे चालते? संपादक, उपसंपादक, वार्ताहर यांची जबाबदारी काय असते? यासह प्रिंट मिडीयामधील बदल यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

वृत्तपत्र वाचनाचे फायदे काय ? कराड शहरातून प्रसिद्ध होणारी दैनिके कोणती? दैनिकातील नेमकं काय वाचन करावे? भविष्यात यांचा कुठे आणि कसा फायदा होईल? याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे पण दिली. अतिशय आनंददायी स्फुर्तीदायी अनुभव होता. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली हा खरंच आनंददायी अनुभव होता. मुख्याध्यापक विजय कुलकर्णी सर आणि संस्थेचे अध्यक्ष शिरीष गोडबोले साहेब यांना धन्यवाद.

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्याची, जाणून घण्याची किती उत्सुकता असते, याचा प्रत्यय मला या कार्यक्रमात आला. इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या नचिकेत पाठक या विद्यार्थ्यांने मला वेगळा प्रश्न विचारला. मला हा प्रश्न खुप आवडला. तो प्रश्न म्हणजे दैनिकांच्या शेवटच्या पानावरती जे चार ठिपके असतात त्याचा अर्थ काय? मी खरंच चाट पडलो. मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी सुद्धा हा अतिशय सुंदर प्रश्न आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या. मी या चार ठिपक्यांचा अर्थ त्या विद्यार्थ्याना समजावून सांगीतला.

काय आहेत हे चार ठिपके !


खरे तर वेगवेगळ्या रंगांचे हे चार ठिपके वर्तमानपत्राच्या छपाईबद्दल सांगतात, ज्याद्वारे वर्तमानपत्र छापले गेले आहे. ही एक विशेष प्रकारची छपाई आहे, ज्याला CMYK मुद्रण म्हणतात. या छपाईमध्ये चार रंग असतात.

वास्तविक, या विशिष्ट छपाईमध्ये निळसर (हलके आकाशी), गुलाबी, पिवळा आणि काळा रंग आहे. CMYK प्रिंटिंगमधील चार गोष्टींचे हे चार ठिपके प्रतिनिधित्व करतात, ज्यात निळसर, गुलाबी, पिवळा आणि काळा यांचा समावेश होतो.

The CMYK acronym stands for Cyan निळसर, Magenta गुलाबी, Yellow पिवळा , and Key काळा 

मुळात या चार रंगांचा योग्य प्रमाणात वापर करून कोणताही रंग बनवता येतो. या सर्व रंगांच्या प्लेट्स एका पानावर स्वतंत्रपणे मांडल्या जातात आणि मुद्रित करताना त्याच ठिकाणी रंग येतो. कोणत्याही रंगीत छपाईसाठी हे चार रंग आवश्यक असतात.

टोनर-आधारित किंवा मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रिंटिंगसाठी ही पद्धत खूप स्वस्त आहे. म्हणजेच या चार रंगांचा या छपाईमध्ये वापर केला जातो. अशा परिस्थितीत वृत्तपत्राची छपाईही याच पद्धतीने केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे वृत्तपत्र कसे छापले गेले हे सांगितले जाते.

तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही निळसर, किरमिजी रंग आणि पिवळे समान आणि मोठ्या प्रमाणात एकत्र केले तर ते काळा होईल. तथापि, शाईच्या अशुद्धतेमुळे, खरा काळा पुन्हा तयार करणे कठीण आहे – म्हणूनच प्रिंटरमध्ये इतर रंगांसह काळी शाई (K) समाविष्ट असते. CMYK रंग हे RGB पेक्षा जास्त गडद असतात कारण ते कमी विस्तृत स्पेक्ट्रम आहे.

जेव्हा तुमच्याकडे सर्व रंगांपैकी 100% (C 100%, M 100%, Y 100% आणि K 100%) असतात, तेव्हा हा एक घन काळा असतो. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही सर्व रंग 0% वर सेट केले असतील, तेव्हा तुमची प्रिंट पूर्णपणे रिक्त होईल.

व्यावसायिक प्रिंटर बहुतेक वेळा CMYK वापरतात, कारण ते प्रिंट रन आणि मशीनवर रंगाची सुसंगतता सुनिश्चित करण्यास मदत करते.

*CMYK detail References Google.

धन्यवाद..


सतीश वसंतराव मोरे
9881191302








१३ नोव्हेंबर २०२२

मैत्रीची उंची वाढवणारा उंचाई


*मैत्रीची उंची वाढवणारा उंचाई*

आज उंचाई चित्रपट पाहिला...

फक्त दोस्ती ही त्यांची प्रेरणा होती,अशी टॅग लाईन असलेला हा चित्रपट आपण पाहिलाच पाहीजे असा आहे.

आपण हा चित्रपट पाहताना एक तरी सीन आपल्या आयुष्यात येऊन गेला आहे, असं वाटतं.

जे प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही तो सोडविण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे दोस्त..हे सांगणारा..उंचाई

मित्राला काय हवं आहे ते ओळखतो तोच खरा मित्र. असा मित्र पहायलाच हवा असा ... उंचाई

राजश्री प्राडक्शनचा अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा सर्वांग सुंदर चित्रपट आहे .. उचांई

खुमासदार,आनंददायी, स्फुर्तीदायी, राजश्री प्राडक्शन च्या स्टाईलचा.. उंचाई

पत्नीचे स्थान आयुष्यात सर्वोच्च आहे पण मित्राला टाळणं कधीच शक्य नसते हे सांगणारा.. उंचाई

मित्रांसाठी स्वतःची दुःखे दाबून ठेवणारा मित्र आणि मित्रांसह, मित्रांसाठी, मित्राची तीव्र इच्छा पुर्ण करणारा खरा मित्र..

अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटात मित्राची भुमिका निभावली आहे. याराना, दोस्तांना, आनंद मध्ये आपण मैत्री आणि मित्र हेच पहिले प्रेम पाहीलं आहे.मात्र याहून वेगळी मैत्री असलेला उत्कृष्ट चित्रपट म्हणजे.. उंचाई.

पंचाहत्तरी मध्ये सुद्धा एवरेस्ट बेस शिखर पार करणे अशक्य नाही , फक्त सोबत मित्र असला पाहिजे. मित्र आहे तर सारं काही शक्य आहे हे सांगणारा...उंचाई

म्हणूनच पाहीलाच पाहीजे..

अमिताभ बच्चन
डॅनी डॅनझोप्पा
अनुपम खेर
बोम्मी इराणी
निना गुप्ता आणि
सारिका यांचा.....उंचाई..!


* ऊंचाई जो दोस्ती की ऊंचाई बढ़ाती है *

आज ऊंची फिल्म देखी...

इस टैग लाइन के साथ कि केवल दोस्ती ही उनकी प्रेरणा थी, यह फिल्म अवश्य देखी जानी चाहिए।


इस फिल्म को देखते हुए ऐसा लगता है कि हमारी जिंदगी में कम से कम एक सीन तो आया और चला गया।


किसी समस्या को हल करने या उससे बाहर निकलने का केवल एक ही तरीका है जिसे कोई हल नहीं कर सकता है, वह है मित्र..टेलर..ऊंचाई।


एक सच्चा दोस्त जानता है कि दोस्त क्या चाहता है। ऐसा दोस्त जरूर देखा होगा... कद


अमिताभ बच्चन के साथ राजश्री प्रोडक्शन की सर्वंग सुंदर फिल्म है..उचाई


सुस्वादु, हर्षित, जीवंत, राजश्री प्रोडक्शंस की शैली में.. उत्थान


यह कहना कि जीवन में पत्नी का स्थान सबसे ऊंचा है लेकिन दोस्त को कभी टाला नहीं जा सकता..ऊंचाई


दोस्तों के लिए एक दोस्त जो अपने दुखों को दबाता है और दोस्तों के साथ, एक सच्चा दोस्त जो एक दोस्त की लालसा पूरी करता है।


अमिताभ बच्चन अब तक कई फिल्मों में मित्रा का किरदार निभा चुके हैं। याराना, दोस्ताना, आनंद में हमने दोस्ती और दोस्तों को पहले प्यार के रूप में देखा है, लेकिन एक अलग तरह की दोस्ती के साथ सबसे अच्छी फिल्म है.. उंचाई।


पचहत्तर में भी एवरेस्ट बेस पीक को पार करना असंभव नहीं है, बस आपके साथ एक दोस्त होना चाहिए। एक दोस्त जो कहता है कि कुछ भी संभव है...ऊंचाई


इसलिए देखना होगा..


अमिताभ बच्चन

डैनी डैनज़ोप्पा

अनुपम खेर

बोम्मी ईरानी

नीना गुप्ता और

सारिका की ..... ऊँचाई ..!







*Uunchai.. The Height That Raises The Height Of Friendship*


Today Watched Unchai movie in Inox kolhapur.


With the tag line that only friendship was their inspiration, this movie is a must see.


While watching this movie, it seems that at least one scene has come and gone in our life.


There is only one way to solve or get out of a problem that no one can solve, that is a friend..the film Uunchai.


A true friend knows what a friend wants. Such a friend must be seen ...Unnchai.


Rajshree Production's Sarvang Sundar film with Amitabh Bachchan is ..Uunchai.


Luscious, joyful, lively, in the style of Rajshree Productions.. Uunchai


Saying that wife's position is highest in life but friend can never be avoided.. Uunchai.


For friends a friend who suppresses his own sorrows and with friends, for friends, a true friend who fulfills a longing for a friend.. Uunchai.


Amitabh Bachchan has played the role of Mitra in many films till date. In Yaraana, Dostana, Anand we have seen friendship and friends as the first love. But the best film with a different kind of friendship is.. Uunchai.


Even in seventy-five it is not impossible to cross Everest Base Peak, you just have to have a friend with you. A friend who says anything is possible... Uunchai.


That's why you have to watch..


Amitabh Bachchan

Danny Danzoppa

Anupam Kher

Bommi Irani

Nina Gupta and

Sarika's.....Uunchai.!


Satish More Satitabh

9881191302

०८ नोव्हेंबर २०२२

शांती सागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता


सतीश मोरे

शांतीसागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता

कुणी पण यावं आणि टिकली (ढपली) मारून जावं’ अशी अवस्था कराडची झाली आहे. कराड शहर दिसतंय छोटं, वाटतंय छोटंस पण या शहराचा आर्थिक आवाका फार मोठा आहे, ही जाणीव आपल्यातल्या खूप कमी जणांना असेल, मात्र बाहेरच्या संस्थांना आहे. आर्थिक सुबत्त्याने नटलेल्या कराडला लुटण्यासाठी जणू काही वित्तीय संस्था, बँका पतसंस्था यांची चढाओढच लागलेली आहे. नुकतंच शहरातील सुमारे २५ कोटी रुपये ठेवी असणार्‍या शिवशंकर पतसंस्थेला टाळा लागला. गेल्या १५ वर्षात कराड शहरातील नावाजलेल्या दोन बँका, सुमारे २५ हून अधिक पतसंस्था बंद पडल्या आहेत, अनेक खाजगी वित्तीय संस्थांनी कराडकरांना गंडा घालून गाशा गुंडाळला आहे. काही संस्था इतर संस्थामध्ये विलिन करण्यात आल्यात. मात्र बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्था मधील ठेवीदारांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. बँका पतसंस्था स्थापन करून या माध्यमातून स्वतःची राजकीय दुकानदारी उभी करणे, दोन नंबरचे पैसे एक नंबर करणे, हे पैसे बांधकाम व्यवसायामध्ये लावणे याची जणू कराडमध्ये स्पर्धाच लागलेली आहे. एकावर एक संस्था डुबल्यामूळे या पुढील काळात कुठल्या बँकेत पैसे ठेवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकाना पडला आहे.

कराडमध्ये पंधरा वर्षांपूर्वी शांतीसागर नावाचे एक मोठी पतसंस्था आली होती. मुळात ही पतसंस्था राजकीय हेतूने स्थापन झालेली होती, हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतरच्या काळात कडेगांवची दत्त नागरी, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था, भुदरगड यासारख्या पर जिल्ह्यातील अनेक संस्था या ठिकाणी आल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. या ठेवी गोळा करताना मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतरच्या काळात पतसंस्थांच्या माध्यमातून राजकारण या हेतूने कराड तालुक्यातील काही राजकीय मंडळींनी पतसंस्था काढल्या. त्या पण बुडीत निघाल्या. पार्ले येथील यशवंत संस्था अशाच कारणामुळे रसातळाला गेली आहे. पुढील काळात कराड मधील देव देवतांच्या नावाने काढलेल्या अनेक पतसंस्था बंद पडत गेल्या. घर, लग्न, भविष्य निर्वाह कारणासाठी ठेवलेले पैसे बुडायला लागले तर दाद कुणाला मागायची असा प्रश्न सामान्य ठेवीदारांना पडला. सरकारने पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण दिले. मात्र एवढ्याच एका कारणामुळे बँका पतसंस्थांवरचा विश्वास वृद्धिंगत झाला, असे नाही. पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण देण्याचे आमिष दाखवून अनेक संस्थांनी ठेवी गोळा केल्या. पैसे गोळा केले.
निनावी नावाने बँकेमध्ये पैसे जमा केले मात्र पुढील काळात या दोन बँकाही बंद पडल्या. आपणास कळले असेल मी कराड जनता सहकारी बँक आणि जिजामाता बँकेविषयी बोलत आहे.
कराड जनता सहकारी बँक रसातळाला जाणार आहे, याची जाणीव बँकेच्या संचालक मंडळांना किंबहुना अध्यक्षांना होती. त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र संस्थेमध्ये असणार्‍या निनावी ठेवी, बुडीत कारखानदारांना भरमसाठ प्रमाणात देण्यात आलेली न वसूल होणारी कर्जे अशी अनेक कारणे असल्यामुळे जनता बँकेला वाचवायला कोणी पुढे आलं नाही. शेवटी कराड जनता बँक बुडली. या बँकेवर बंधने आल्यानंतर पुढील काळात संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी मनापासून प्रयत्न केला नाही किंवा फक्त प्रयत्न केला आहे, असे दाखवले. वास्तविक कराड जनता बँकेमध्ये काय झाले आहे, याचे सविस्तर विवेचन या बँकेविरोधात तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी अनेकदा प्रसारमाध्यमासमोर दिलेले होते. मात्र जनता बँकेच्या संचालक मंडळांनी सुधारणा न करता अनेक गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ही बँक संपली.
कराड शहरातील किंबहुना तालुक्यातील जनतेचे खरंच आश्चर्य वाटतं, कराड जनता बँक बुडाल्यानंतर या बँकेविरोधात एकही मोठ्ठं आंदोलन झालं नाही किंवा जे झालं ते गाव पातळीचं होतं. बँकेत पैसे बुडून सुद्धा कराडचे लोक शांत कसे बसतात, याचं आश्चर्य वाटतं. यापूर्वी भुदरगड, शांतीसागर, दत्त, यशवंत पतसंस्था, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था अशा अनेक संस्थांकडून ठेवीचे पैसे न मिळालेले कर्जदार अशाच प्रकारे शांत बसले होते.
कराड जनता बँकेच्या विरोधात काही प्रमाणात आंदोलन झाली. त्यानंतर या बँकेवर प्रशासक पूढे अवसायक आला. त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून सुमारे ३७५ कोटी रुपयांच्या ठेवी परत दिल्या. मात्र, पाच लाखापर्यंतचीच रक्कम परत मिळू शकली. ज्यांनी पाच लाख रुपयेच्या ठेवी ठेवलेले आहेत आणि ज्याची दाम दुप्पट दहा लाख किंवा त्याहून अधिक झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा पाच लाखच मिळाले. ज्यांनी दहा लाख किंवा पाच लाखाहून अधिक रक्कम भरलेली आहे, त्यांनाही पाच लाख मिळाले. अशाप्रकारे कराड जनता बँकेमध्ये ठेवीच्या माध्यमातून जे पैसे बुडालेले आहेत, तो आकडा १०० कोटीच्या दरम्यान नक्कीच असेल. या जनता बँके विरोधात कराड शहरातील कोणाही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला किंबहुना ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. कराड शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी कोठून ना कोठून जनता बँकेच्या संचालक मंडळाचे जवळचे नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या राजकीय मित्र होते, आहेत. कराड, मलकापूर शहरात आज रोजी पर जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील सुमारे ६० बँकांचे कामकाज चालते. तसेच ५० पतसंस्थांचे काम चालते. या बँकांमध्ये कराड शहरातील, तालुक्यातील लोकांनी गुंतवलेल्या ठेवीची आकडेवारी अधिकृत उपलब्ध नसली तरी हा आकडा सुमारे ५००० कोटीच्या दरम्यान आहे. यावरून आपणास कळले असेल कराड शहरात किती पैसे आहेत. २००२ साली कराडला एचडीएफसी बँकेची एक शाखा उघडली. ही बँक कराड शहरात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मलाही आश्चर्य वाटले होते. या बँकेच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आपण एवढ्या छोट्या शहरात बँकेची शाखा का काढली, असे विचारले होते. त्यावर त्या अधिकार्‍याने ‘तुम्हाला कराड शहराविषयी काय माहिती आहे? आणि कराड शहरात किती पैसे बँकेत पडून आहेत? असा उलटा सवाल केला होता. त्या काळात कराड मधील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमध्ये ५०० कोटी रुपये पडून होते. एचडीएफसी सारख्या बँकने कराडमध्ये येताना शहराचा, तालुक्याचा अभ्यास केला होता. सहकार चळवळीच्या माध्यमातून तसेच अनेक शैक्षणिक संस्था कराड शहरांमध्ये असल्यामुळे इथे फार मोठी आर्थिक सुबत्ता आहे. कृष्णा-कोयना नदी काठावर असलेल्या समृद्धीमुळे लोकांच्या खिशात अनेक वर्षापासून पैसा आलेला आहे. कोल्हापूरनंतर आर्थिक राजधानी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कराडचे नाव घेतले जाते. म्हणूनच परजिल्ह्यातील संस्थानी कराडला अग्रक्रम दिला आहे. मात्र अशा लुटणार्‍या बँका, पतसंस्थांना कराडमध्ये येऊ न देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी कराड अर्बन बँक नावाची मोठी बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या बँकेवर लोकांचा विश्वास आहे. कारण त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ पूर्ण व्यावसायिक आहे. या उलट कराड जनता बँक आणि जिजामाता बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ पक्के राजकारणी होते आणि या राजकारणानेच जनता बँकेची वाट लावली, असे लोक आता उघड उघड बोलतात. ‘जिथे सर्वाधिक व्याजदराची लालच तिथे सर्वाधिक मोठा धोका’ असे एक छोटेसे समीकरण आर्थिकसंस्थाविषयी बोललं जातं. मात्र जास्त व्याजदरच्या मोहात पडलेल्या ठेवीदारांना त्याचा फटका बसला आहे.
 आर्थिक संस्था मजबूत होण्यासाठी त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ कोण आहेत, बँकेचा कारभार कसा चालतो, बँकेचे खरे ऑडिट रिपोर्ट कुठे पाहायला मिळतील, याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे. मात्र सामान्य ठेवीदारांना हे माहीत नसते. कराडातील सुदृढ पतसंस्था किंवा बँका कोणत्या? बाहेरून आलेल्या कोणत्या आहेत? कोणत्या बँका फसव्या आहेत? कोणत्या पतपेढ्या किंवा मल्टीस्टेट संस्था धोक्यात आहेत? याची माहिती यापुढील काळात कराडकारांना झाली पाहिजे, नव्हे कराडकरांनी ती घेतलीच पाहिजे. असे झाले नाही तर लुटण्यासाठी उत्कृष्ट सिटी कराड हा आर्थिक संस्थांचा फंडा या पुढील काळातही यशस्वी होत राहील आणि कराडकरांचे पैसे बुडत राहतील. शिवशंकर नागरी पतसंस्थेचे उदाहरण घेतले तर या पतसंस्थेत काय घोटाळा झाला आहे, याची गावभर चर्चा आहे. सहकार उपनिबंधक यांच्याकडून फक्त तपास सुरू आहे. पुढील काही महिन्यात या पतसंस्थेत नक्की काय झाले आहे? हे सत्य बाहेर येईल. परंतु आज रोजी या बँकेत, पतसंस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
अशाच प्रकारच्या कराडमध्ये अनेक पतसंस्था आहेत, की ज्या पतसंस्थांचे मालक-चालक पतसंस्थेमध्ये ठेवलेला सर्व पैसे स्वतःच्या वैयक्तिक प्रकल्पावर, मोठ्या साईटवर लावून बसलेले आहेत. मध्यंतरी कोविडच्या संकटामुळे अशा काही पतसंस्थांचे आर्थिक गणित बिघडले होते. काही पतसंस्था डबघाईला आल्या. तर काही बंद पडल्या. मात्र या पतसंस्थांचे गेल्या चार वर्षातील ऑडिट रिपोर्ट पाहिले तर हे रिपोर्ट अतिशय सुंदर आहेत. अनेक पतसंस्थांना ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. आता हे ऑडिट करणारे खाजगी व शासकीय ऑडिटर यांना सुद्धा आरोपी करण्याची गरज आहे. पैसे खाऊन खोटी कागदं रंगवणारे ऑडिटर आणि पैसा चारणारे टोणगे संचालक मंडळ यांना आता यापुढील काळात सहकार खात्याने काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. बँका, पतसंस्थांचे ऑडिट करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेण्याची जबाबदारी ऑडिटरची असते. मात्र हे अधिकारी नक्की काय करतात? कागद पाहताना त्यांच्या चष्म्यावर, डोळ्यावर झापड आलेली असते की काय? असाही प्रश्न पडतो. कराडकरांनो या पुढील काळात बँका, पतसंस्थांमध्ये पैसे ठेवताना सावध राहा, रात्र वैर्‍याची आहे, असे नाही तर दिवस सुद्धा वैर्‍याचाच आहे. नाहीतर रात्रभर तमाशात नाचून मिळवलेले मंगला बनसोडे यांचे एका संस्थेने बुडवले तसे तुमचेही कष्टाचे पैसे बुडत राहतील. तुमच्याही मुला-मुलींची लग्नं पैशाअभावी मोडतील.आजारपणासाठी, म्हातारपणासाठी तुम्ही आर्थिक संस्थेत ठेवलेला पैसा तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुमचं घराचं स्वप्न स्वप्नच राहील.

सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...