फॉलोअर

०७ जानेवारी २०२०

It matters nothing without Facebook and WhatsApp

*फेसबुक,व्हाट्सअप* 
*बंद केल्यावर*
*काही फरक पडत नाही*

@ *सतीश वस़ंतराव मोरे*
karawadikarad.blogspot.com



Please Please Please

*Read these images*

मला अनेकांनी विचारले ८० दिवस फेसबुकवर रजा का घेतली होती, याचे एक कारण आणि उत्तर या इमेजेस मध्ये आहे.


साधारण एक तींन महिन्यापूर्वी मी वीवो एक नवीन फोन घेतला. हा फोन तुम्ही रोज फेसबुक किंवा व्हाट्सअप वर किती वेळ दिला याची माहिती देतो. एक दिवस माझ्या असे लक्षात आले की माझा दिवसभरातील दोन तास वेळ फेसबुक वर जातो आणि चार तास वेळ व्हाट्सअपवर जातो. *दिवसातील सहा सात तास मी ऑनलाईन वर असतो*.

त्याचदिवशी फेसबुक आणि व्हाट्सअप बंद केले तर काय होईल असा विचार मी केला आणि माझा व्हाट्सअप नंबर सकाळी एकदा आणि रात्री एकदाच पाहायचा असे ठरवले. तसेच 11 ऑक्टोबरला फेसबुक अकाउंट अॅप सुद्धा  मोबाईलवरून डिलीट करून टाकले.

*फेसबुक बंद केल्यानंतर काय त्रास होतो? काय कमी पडते ?काय माहिती मिळते किंवा मिळत नाही ?मी कुठे कमी पडतो? याचा मी थोडासा अभ्यास केला.* पण मला कसलाच त्रास झाला नाही, त्यामुळे सलग 80 दिवस फेसबुक बंद ठेवले.

 दरम्यान डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि आणि पुन्हा मी फेसबुकवरती दाखल झालो.

त्यादिवशी *30 डिसेंबर रोजी मी व्हाट्सअप दिवसातून फक्त पंधरा मिनिटं वापरायचा असा निश्चय करून 98 811 91 302 व्हाट्सअप नंबर फक्त रोज सकाळीच पाहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून फक्त रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे मी व्हाट्सअप पाहतो*. अनेकांचे 24 तासात आलेले मेसेज पंधरा मिनिटांत पाहतो आणि त्यानंतर शक्य असेल त्यांना उत्तर देतो. तसेच पॉझिटिव्ह मेंटल एटीट्यूड (सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह व्हाईब्स्स) चा एक चांगला मेसेज वेबसाईट वर शोधून काढून तो सर्वांना फॉरवर्ड करतो. आणि व्हाट्सअप असलेला मोबाईल बंद करून घरात ठेवून कामाला जातो.

गेले आठ दिवस मी फक्त सकाळी 15 ते 20 मिनिटे व्हाट्सअप वापरतो, याचा मला कसलाही तोटा झालेले नाही. फेसबुक आणि व्हाट्सअपवर वेळ खूप घालवतात, अशा सर्व जणांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो, कि फेसबुक आणि व्हाट्सअप हे सर्वस्व नाही, यांचे तोटे मी सांगण्याची गरज नाही. माझ्या मित्रांना आणखीन एक गोष्ट सांगायची आहे 80 दिवस फेसबूक बंद केल्यामुळे किंवा व्हाट्सअप आठ दिवसांमध्ये बंद केल्यामुळे मला फायदाच होत गेला आहे, कसलेही नुकसान झाले नाही.

 मला ज्यांची गरज असते असे लोक मला फोन करतात, मला ज्यांची आवश्यकता आहे त्यांना मी फोन करतो.कोणतीही बातमी चुकलेली नाही, न्युज सोर्स कमी पडलेला नाही. एक-दोन बातमी किंवा माहिती मला कमी मिळाली असेल मात्र *मला व्हाट्सअप बंद (कमी )करण्याचा गेल्या दहा दिवसात कसलाही तोटा झालेला नाही.*

दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलीने देवयानीने अशाच प्रकारे मला एक चिमटा घेताना *पप्पा तुम्ही सतत मोबाईलवर असता, माझ्या कडे बघत जा जरा,अशी विनवणी केली होती*. त्यामुळे ती माझ्यापासून दूर जाते की काय अशी मला भीती वाटू लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात देवयानी सोबत मी गप्पा मारायला मला अधिक वेळ मिळतो, तिच्यासाठी वेळ देऊ शकतो आहे. *तसेच महत्त्वाचे म्हणजे या दोन महिन्यात अतिशय सुंदर अशी दोन पुस्तके  वाचून पूर्ण झाली आहेत.*

 होय, व्हाट्सअप आणि फेसबुक वरती नियंत्रण करू शकलो नाही तर या *फोटोमध्ये किंवा इमेजेस मध्ये दाखवलेल्या व्यक्तीप्रमाणे आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही*.


*सतीताभ*

9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...