फॉलोअर

३० मार्च २०१८

स्कूल बस कलर पिवळाच का

_*🔺🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

🚌🎒🚌🎒🚌🎒🚌
➖➖➖➖➖➖➖
*☑प्रत्येक स्कूलबस पिवळ्याच रंगाची का बरं असते.....??*

*🔺स्कुल बस पिवळ्यारंगाची असण्यामागचं लॉजिक जाणून घ्या!*
➖➖➖➖➖➖➖
कोणतीही स्कूलबस पहा ती पिवळ्या रंगाचीच असते. असे का? चला तर आज यामागचे उत्तर जाणून घेऊया! तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की, शाळेच्या बसला पिवळा रंग देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. हे बंधन केवळ बस आकर्षक दिसावी यासाठी घालण्यात आले नसून त्यामागे महत्त्वाची कारणे देखील आहेत.
🔲🔲🔲
_हा पिवळा रंग यासाठी निवडण्यात आला, कारण हा रंग लगेच लक्ष वेधून घेतो. पिवळ्या रंगाची Wavelength 400 – 700 NM एवढी असते, त्यामुळेच पिवळ्या रंग दिवसाच्या सूर्यप्रकाशातही दूर अंतरावरूनही डोळ्यांना सहज दिसते._
🔲🔲🔲
_स्टॉप लाइट्स आणि स्टॉप चिन्हे ही सामान्यतः लाल रंगांची असतात. त्यामुळे लोकांचा समज आहे की, लाल रंग हा लगेच लक्षात येणारा रंग आहे, पण तसे नाही आहे. पिवळा रंग हा कोणत्याही रंगापेक्षा कधीही जलद गतीने डोळ्यात भरतो. धुक्यामध्ये किंवा कमी लाईट्समध्ये देखील पिवळा रंग हा चालकांना लगेच दिसतो, त्यामुळे अश्या वातावरणामध्ये स्कूलबस बंद वगैरे पडली की, मागून येणाऱ्या गाड्या ती स्कूलबस सहज पाहू शकतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचे अक्षर उठावदार दिसते. त्यामुळे पहाटेच्या वेळेस आपल्या मुलांना शाळेला सोडणाऱ्या पालकांना लांबूनच बस येत आहे हे समजते._
🔲🔲🔲
*_भारतातील सर्व शाळांना आपल्या शाळेच्या बसला बाहेरून सोन्यासारखा पिवळा रंग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि रंगाची ही शेडींग ही IS 5 – 1994 नुसार देण्यात यावे असा देखील नियम लागू करण्यात आलेला आहे. शाळेच्या बस वर असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या या शेडींगला ‘नॅशनल स्कूल बस क्रोम’ असे नाव देण्यात आले आहे._*
➖➖➖➖➖➖➖
🚌🎒🚌🎒🚌🎒🚌

कोणते प्लेस्टिक योग्य /अयोग्य

_*🔺🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

♻💦♻💦♻💦♻
➖➖➖➖➖➖➖
*◾प्लास्टिकच्या वस्तू त्यात ही महत्वाचे म्हणजे प्लास्टिक वॉटर बॉटल च्या तळाशी असल्या विशिष्ट चिन्हांकडे कधी लक्ष गेलंय...  ती चिन्हे आणि त्रिकोण काय दर्शवतात हे समजावून घ्या ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे...*

*☑ आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी हे त्या प्लास्टिक ग्रेडिंग प्रणालीद्वारे समजावून घ्या ???*
➖➖➖➖➖➖➖
आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.
🔲🔲🔲
बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल
आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित
आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.
🔲🔲🔲

*🔴◾आपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का?*

_आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहे जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत. मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे...._

*◾यासाठी प्रथम  प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया ????*

_खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते… प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आहे._
🔲🔲🔲

_प्लास्टिकची ग्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखण्यासाठी प्लास्टीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेले आहे. खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:_

*🔺ग्रेड 1 (त्रिकोणात 1) :*

लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी (Only One Time Use) सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.
🔲🔲🔲

*🔺ग्रेड 2, 4 व 5 (त्रिकोणात 2, 4 व 5 ) :*

पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी (Reuse For Regular Use) उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.

*🔺ग्रेड 3 व 7 (त्रिकोणात 3 किंवा 7) :*

3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा (Avoid Use) कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

असे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली......

खरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीपण........

*🔵 मर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. ( फक्त नियमितपणे निर्जंतुक करणे आवश्यक )*

*🔴 तर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळवा.*

*🔺विशेष सूचना : पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त ईतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करोत असतो.*

या साठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेने गरजेचे आहे की, प्लास्टिकची वस्तू दिसली रे दिसली की ती उलटी करुन तिची त्रिकोणातील ग्रेड तपासायची असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यास भी वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.
➖➖➖➖➖➖➖
♻💦♻💦♻💦♻

२४ मार्च २०१८

क्षयरोग दिन

😲💨💉💊😲💨💉
➖➖➖➖➖➖➖
*☑जागतिक क्षयरोग (निर्मूलन) दिन*
*(Mycobacterium Tuberculosis)*
*(मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस)*
➖➖➖➖➖➖➖
24 मार्च 1982 रोजी “रॉबर्ट कॉक’ या वैज्ञानिकाने याचा जीवाणू शोधला तेव्हापासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग (निर्मूलन) दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशामध्ये दररोज 40 हजारहुन अधिक लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते. या पैकी एक हजाराहून अधिक रूग्ण क्षयरोगाने दगावतात म्हणजेच दर दीड मिनिटाला एक रूग्ण क्षयरोगाने दगावतो त्याचप्रमाणे आपल्या देशात दरवर्षी अठरा लाखाहून अधिक नवीन क्षयरूग्ण आढळून येतात. त्यातील आठ लाख रूग्ण हे थुंकीदूषीत असून ते इतरांना हा रोग देण्यास सक्षम आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन 2020 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज क्षयरोगाने त्रस्त असतील.
🔲🔲🔲
क्षयरोगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शासनस्तरावर सन 1992 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यामध्ये झाली व सन 2005 सालापर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला.व आज पूर्ण भारतात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
🔲🔲🔲

*🔺क्षयरोग म्हणजे काय?*

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.
🔲🔲🔲

*🔺लक्षात घ्या क्षयरोगाची लक्षणे !!*

सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे
🔲🔲🔲

*🔺क्षयारोगावरील उपचार कसे व कुठे होतात?*

सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरूवातीचे सहा महिने डॉटस्ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार 100 टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस् उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पध्दती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते. क्षयरूग्णाला डॉटस् उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस् दिला जातो.
🔲🔲🔲
सध्या टी. बी.च्या निदानासाठी सलग दोन आठवडय़ांसाठी बेडक्या सह किंवा कोरडा खोकला असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रातील टी. बी. उपचार केंद्रावर (Sputum) बेडकाची तपासणी करावी असे निर्देश आहे. निदानासाठी दोन बेडकांचे सॅम्पल्स आवश्यक असतात. यात सकाळी उठल्यावरचे पहिले बेडके ब लॅबमध्ये पोहोचल्यावर एक स्पॉट सॅम्पल द्यावे लागते. हे दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह आल्यास एक आठवडा ब्रॉड स्पेक्ट्म अँटीबायोटीक्सचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पुन्हा दोन बेडक्यांच्या तपासण्या व छातीचा एक्स रे करून टी.बी.ची तपासणी केली जाते. हे दोन्ही निगेटिव्ह आल्यास टी. बी. नसल्याचे निदान केले जाते. पण यापैकी कुठली ही गोष्ट पॉझिटीव्ह आल्यास टी. बी.चे निदान करून उपचार पूर्ण करावे लागतात. टी. बी.च्या उपचारांसाठी तीव्रतेप्रमाणे तीन कॅटॅगिरीज ठरवून त्याप्रमाणे कुठली औषधे व किती दिवस घ्यावी हे सूत्र ठरवून दिले आहे. ही औषधे डॉट्स म्हणजेच ‘डायरेक्ट ऑबरव्हेश ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स कीमोथेरपी’ केंद्रावर मोफत उपलब्ध असतात. क्षयरोगाचे निदान झाल्यावर पहिले दोन ते तीन महिने औषधे एक दिवस आड म्हणजेच डॉट्. कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली घ्यावयाची असतात. त्यानंतरचे ४-५ महिने ही औषधे प्रत्येक आठवडय़ाला डॉट्स केंद्रात जाऊन घ्यावयाची असतात.
🔲🔲🔲

*🔺क्षयारोगाबद्दल घेण्याची विशेष काळजी.....!!!*

क्षयरोगाची अनेक रूग्ण, क्षयरोगाविरोधाी औषधी योग्य डोसमध्ये व योग्य कालावधीपर्यंत घेत नाहीत.या अर्धवट उपचारापुढे तसेच क्षयरोग जंतूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तामुळे क्षयरोगाविरोधी औषधी पचविण्याची किंवा त्यांना दाद न देण्याची क्षमता या जंतूमध्ये निर्माण होते. ज्या प्रमाणे डास आता डीडीटी या औषधाला दाद देत नाहीत.तद्वतच क्षयरोग जंतू या क्षयरोगविरोधी बहुविध औषधाला प्रतिसाद देत नाहीत.अशा औषधरोधक जंतूमुळे होणाऱ्या रोगास मल्टिपल ड्रग रेझिस्टन्ट टी.बी.असे म्हणतात. एमडीआर टीबी उपचार पध्दती ही साधारण 24 ते 27 महिने असून ही उपचार पध्दती खूपच खर्चीक आहे.याचा उपचार लाखोंच्या घरात असून यासाठी लागणारा खर्च शासन करीत आहे. परंतु क्षयरोग्याने सुरूवातीलाच पूर्ण उपचार (6 ते 8 महिने कोर्स) घेतल्यास ही वेळ येणार नाही..
➖➖➖➖➖➖➖
😲💨💊💉😲💨💊

२३ मार्च २०१८

हवामान दिन

⛈💨🌪⛈💨🌪⛈
➖➖➖➖➖➖➖
*☑२३ मार्च जागतिक हवामान दिन (World Meteorological Day)*
➖➖➖➖➖➖➖
_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (Meteorology मीटिअरॉलजी) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार निकटच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो._
🔲🔲🔲

*🔺इतिहास.....*

इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते.ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसारपाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.
🔲🔲🔲
इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.
🔲🔲🔲

*🔺सद्य स्थिती.....*
संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशेतयार करण्याचे कामही संगणक करू लागले.
🔲🔲🔲

*▪वार्‍याचा वेग मोजण्याचे साधन -*

*🔺अ‍ॅनोमिटर...*
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

*🔺जमिनीवरील साधने -*
ही प्रामुख्याने हवामानवेधशाळांमध्ये असतात.

*▪रडार -* ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्यासाहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा-पाऊस, गारा, बर्फवृष्टीइत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलरप्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.

*▪समुद्राच्या पाण्यावरील साधने -* समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.

*▪वातावरणात सोडली जाणारी साधने -* फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.
🔲🔲🔲
वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

*▪हवामान साचे.....*
हवामान साचे म्हणजे हवामान कसे बदलेल किंवा वागेल, याची तयार केलेली प्रतिकृती होय. प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.
🔲🔲🔲

*🔺निसर्ग आणि हवामानात सातत्याने होणारा बदल ....*

निसर्गचक्र आता पूर्णपणे पालटले असून वातावरणात कधीही, कोणतेही अनपेक्षित बदल घडून येतात. वातावरणातील बदलाची ही स्थितीत भारतातच नव्हे, तर परदेशातही आहे. म्हणूनच हवामान बदल व पर्यावरण हे विषय जागतिक पातळीवर चर्चिले जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची कृषी व्यवस्था हवामानातील बदलांवर आधारित आहे. तरीही भारतात हे क्षेत्र कायम दुर्लक्षिले गेले आणि तरुण पिढी हवामान बदलाच्या अभ्यासाकडे वळायला तयार नाही. त्या तुलनेत अमेरिकेत मात्र यातील नवनव्या प्रयोगात तरुण पिढीचा सहभाग अधिक आहे.
🔲🔲🔲
गारपीट, वादळ याचा सामना भारतीयांना करावा लागतो. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याचा सामना अमेरिका आणि इतर देशांना करावा लागतो. मात्र, या देशांमध्ये हवामान बदलाचे संकेत वेळोवेळी देणारी आधुनिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा तयार करणारी पिढी तरुण आहे. भारतात अजूनही हवामानक्षेत्रात जुनीच यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळेच हवामानाचे अंदाज चुकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ढग, वारा, गारा, याची स्थिती दर्शविणारे डॉप्लर रडार भारतात आहेत, पण अध्र्याहून अधिक जुने आणि बंदच आहेत. हवामान बदलाच्या कोणत्याही स्थितीला जागतिक तापमान वाढीचे कवच पांघरूण मोकळे होण्याची आणखी एक सवय भारतीय हवामान खात्याला आहे. या सर्व गोष्टींना हवामान खातेच जबाबदार नाही, तर नवनवे प्रयोग करणारी तरुण पिढी या क्षेत्रात नसल्यामुळेसुद्धा हे परिणाम दिसून येत आहेत.
🔲🔲🔲

*🔺‘फारच कमी विद्यापीठात अभ्यासक्रम’*

हवामानाचे क्षेत्र हे संशोधनाचे क्षेत्र आहे आणि भारतात संशोधनाकडे वळणारी तरुण पिढी फार कमी आहे. यासाठी केंद्र सरकारने शिष्यवृत्ती जाहीर केली, पण त्याचाही उपयोग तरुण पिढीला करता आलेला नाही. हवामानाचे क्षेत्र हे दुर्लक्षित असून यातही करिअर असते, हे अजूनही तरुण पिढीला ठावूक नाही.
➖➖➖➖➖➖➖
⛈💨🌪⛈💨🌪⛈

२२ मार्च २०१८

जलदिन

💦🌎💦🌎💦🌎💦
➖➖➖➖➖➖➖
*☑२२ मार्च – जागतिक जल दिन.....*
➖➖➖➖➖➖➖
*_२२ मार्च हा दिवस दर वर्षी जगभर जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. पण पाण्याचे महत्त्व कोणाला समजावून सांगायची आवश्यकता आहे का? ते आधीच सर्वांना ठाऊक आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो._*
🔲🔲🔲
जागांच्या कमतरतेमुळे जेथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तेथे घर बांधणे, शेती करणे, व्यवसाय कारखाने उभारने भाग पडते म्हणून.....
🔺पाण्याचे नियोजन करा,
🔺पाणी काटकसरीने वापरा,
🔺पाणी साठवा,
🔺पाणी जिरवा.
🔲🔲🔲
माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे..!!!
🔲🔲🔲

*◾भविष्यासाठी पाणी वाचवा.....*

विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल त्यावर प्रकाश टाकूया.
🔲🔲🔲
असं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो.
🔲🔲🔲
पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का..
🔲🔲🔲
घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू.
🔲🔲🔲
पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.

🔺भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.

🔺डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.

🔺अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.

🔺किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.

🔺आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या.

🔺बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल.

🔺झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा.

🔺घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.

🔺इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!

🔺दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.

🔺पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.

🔺न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.

🔺इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.
🔲🔲🔲
एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा.
➖➖➖➖➖➖➖
💦🌎💦🌎💦🌎💦

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...