फॉलोअर

माझे दादा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझे दादा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ नोव्हेंबर २०२५

आशिर्वादावर तुमच्या तरतो मी


दादा अनेकदा कराडला येतात, 
गप्पा मारतात, आराम करतात,
नातवांना चार गोष्टी सांगतात. 
विषय निघाला तर 
जुन्या आठवणी ताज्या करतात.
 
अधूनमधून माझ्या डोळ्यात खोलवर पाहतात.
माझ्यातला छोट्या सतीशला ओळखतात.

शक्यतो त्यांच्या समोर व्यक्त होत नाही मी !
त्यांचं वय आणि आदर यामुळे, 
आतल्या आत शब्द गिळून घेतो मी !

आज खुप दिवसांनी 
त्यांनी मला एक प्रश्न विचारला. 

तुला मानसिक त्रास होतो का?
कसं सहन करतोस मग हे सारं?
काय करतोस मग अशा वेळी?

डोळ्यात पाणी आलं होतं,  
गळा दाटून आला होता !
पण आवरलं मी... ;
खिडकीतून दूर पाहत बोललो मी,

अहो दादा, 
सगळं पाठीवर टाकून पुढं जातो मी !
सतत माणसाच्या गर्दीत राहतो मी !

दुःखाचा बाजार का करायचा ?
आनंदाचा गुणाकार करतो मी !

छंद आवडीचे जपतो मी !
मित्रांसोबत रमतो मी !
मुलांकडे बघून जगतो मी,
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी! 
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी!



दादांचा सतीश 
१४.११.२५

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...