फॉलोअर

२४ जुलै २०१८

मनोयन

दोन पाऊलं
तुझ्या सोबतची
मज भावून गेली!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझ्या सोबतचे दोन क्षण,
मला वेडाऊन गेले
मन तव गुंतले
ह्दय धडधडले.!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

हाय तुझी अदा,
उफ तेरी एक नजर,
धडकन वाढवून गेले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तु जवळ आहेस,
हे स्वप्नच भासले
दिल खुश झाहले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझा एक कटाक्ष
तुझी चोरटी नजर
बेधुंद करून गेले
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

@ सतिताभ

२२ जुलै २०१८

प्रेमत्रागा

प्रेमत्रागा

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !
तुझं माझ्यावर प्रेम आहे का?
हे पण विचारणार नाही !

माझी आठवण काढतेस का?
माझ्या साठी झुरतेस का?
मला मिस करतेस का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

माझी सावली होणार काय ?
माझ्या साठी काय करशील ?
मी तुला का आवडतो ?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

तु माझी आहेस ना ?
तुझ्या ह्दयात मला जागा आहे का ?
माझ्यासाठी तुला वेळ आहे का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

किती दिन माझ्यावर प्रेम करणार?
माझ्या साठी काय काय करणार?
माझ्यासाठी किती वेळ वाट पाहणार?
हे पण विचारणार नाही !

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

का म्हणू तुला
लव्ह यु ?
जे आहे ते तुला
माहितच आहे !
फक्त मी
म्हणत राहू अन्
तुझ्या लव्ह यु
साठी किती
वाट पाहू ?

@ सतिताभ.

२१ जुलै २०१८

प्रर्जेन्य नक्षत्रे कोणती

⛈🌈⛈⛱⛈🌈⛈
➖➖➖➖➖➖➖
_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

*☑ विज्ञानाचा आधार न घेता शेकडो वर्षांपासून पावसाचे अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात...??*

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

*🌀 पावसाला पडलेली नावे कोणती..??  तरणा पाऊस, म्हातारा पाऊस म्हणजे काय..??*
➖➖➖➖➖➖➖
_*📚

तुम्हाला बिरबल-बादशहाची ती गोष्ट माहीत असेल. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले की, ‘सत्तावीसातून नऊ गेले तर उरले किती?’

बिरबलाने उत्तर दिले ‘ शून्य!’

बादशहाने हे कसे असे विचारताच बिरबल म्हणाला, ‘सत्तावीस नक्षत्रांपैकी जर जास्त पावसाची मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काहीही उरणार नाही!’ बिरबलाच्या या चतुर उत्तरावर बादशहा खूश झाला.
🔲🔲🔲

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

सूर्य ज्यावेळी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रात असतो त्यावेळी आपल्याकडे जास्त पाऊस पडतो. त्यामुळे या नक्षत्रांना ‘पर्जन्य नक्षत्रे’ असे म्हणतात. प्राचीन काळापासून हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. हिंदुस्थानात बऱ्याचअंशी शेती ही पावसावर अवलंबून असते. त्यामुळे दरवर्षी पाऊस कसा पडणार हे जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते.
🔲🔲🔲

*◼पावसाचा अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात....??*

पूर्वी विज्ञान आताच्या इतके प्रगत नव्हते. त्याकाळी अद्ययावत वेधशाळाही नव्हत्या. पावसाविषयी नक्षत्र वाहनांवरून ठोकताळे बसविले जायचे. पर्जन्य नक्षत्रांची वाहने पाहून पावसाविषयी अंदाज केले जायचे. नक्षत्रांचे वाहन ठरविण्याचा नियम असा आहे. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी व त्या संख्येस नऊने भागवावे. जी बाकी राहील तिच्यावरून वाहन जाणावे. शून्य बाकी राहिली तर हत्ती, १-घोडा, २-कोल्हा, ३-बेडूक, ४-मेंढा, ५-मोर, ६-उंदीर, ७-म्हैस, ८-गाढव अशी वाहने ठरविली जातात.

▪घोडा वाहन असता डोंगर-पर्वतावर पाऊस पडेल.
▪कोल्हा व मेंढा वाहन असता पाऊस पडणार नाही.
▪मोर, गाढव व उंदीर वाहन असता कमी पाऊस पडेल.
▪बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल असे समजले जाते.

अर्थात यावरून तुमच्या लक्षात येईल की, या नियमाला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. हा केवळ ठोकताळाच असतो. कधी तो अंदाज चुकतो तर कधी तो अंदाज बरोबर येतो. पण ही पद्धत शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.

🔲🔲🔲

*◼पावसालाही पडलेली नावे...*

स्वभावाप्रमाणे एकमेकाला नावे ठेवण्याची माणसाची सवयच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावरून पावसालाही नावे ठेवण्यात आलेली आहेत.

*▪तरणा पाऊस -* दरवर्षी सूर्य साधारणतः ५ ते १८ जुलै या काळात पुनर्वसू नक्षत्रात असतो. या काळात साधारणतः सतत मुसळधार पाऊस पडत असतो. म्हणून पुनर्वसूच्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात.
*▪म्हातारा पाऊस -* पुष्य नक्षत्राचा काळ १९ जुलै ते १ ऑगस्ट हा असतो. या कालात पाऊस मध्ये मध्ये थांबत असतो म्हणून पुष्य नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात.
*▪आसळकाचा पाऊस -*
आश्लेषा नक्षत्र २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असते. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात.
*▪सासूंचा/सासवांचा पाऊस -*
सूर्य १६ ते २९ ऑगस्ट मघा नक्षत्रात असतो. या नक्षत्रात मेघगर्जनेसह जोरात पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात.
*▪सुनांचा पाऊस -*
३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालात सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस शांतपणे पडतो म्हणून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ असे म्हणतात.
*▪रब्बीचा पाऊस -* उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील १३ ते २५ सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त ठरतो म्हणून या पावसाला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात.
*▪हत्तीचा पाऊस -* २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालात पडणाऱ्या हस्त नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ म्हणतात.

Astro विशारद दा. कृ. सोमण यांच्या माहितीतुन..

_*📚 ..✒*_
➖➖➖➖➖➖➖
⛈🌈⛈⛱⛈🌈⛈

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...