अंतरंग @सतिताभ
*प्रायव्हसी — यशाची खरी ताकद*
काही गोष्टी आपण आपल्यापुरत्याच ठेवायला हव्यात.आपली स्वप्नं, योजना, प्रयत्न आणि पुढचं नियोजन — या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी जगासमोर मांडणं आवश्यक नसतं. उलट, अनेक वेळा त्या गुप्त ठेवणंच आपल्या यशाचं खरं गुपित ठरतं.
आजच्या काळात प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय झाली आहे. आपण कुठे जातो, काय करतो, काय मिळवणार आहोत — सगळं लगेच सोशल मीडियावर टाकतो. पण एक गोष्ट आपण विसरतो…
जगात सगळेच आपल्या आनंदात आनंदी नसतात.
“Privacy is power. What people don't know, they can't ruin.”हा विचार खूप काही सांगून जातो.
जोपर्यंत तुमचं काम, तुमची योजना इतरांना माहिती नसते, तोपर्यंत त्यावर कोणीही परिणाम करू शकत नाही. पण जसं ते बाहेर येतं, तसं त्यावर चर्चा, मत्सर, टीका आणि अडथळे सुरू होतात.
याचं एक साधं पण प्रभावी उदाहरण म्हणजे — चॉकलेट.
जेव्हा चॉकलेट पूर्णपणे पॅक केलेलं असतं, तेव्हा ते सुरक्षित असतं. कुणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. पण जसं ते उघडलं जातं, तसं लगेच माशा त्यावर जमा होतात.
आपल्या आयुष्याचंही तसंच आहे —
👉 गुप्त ठेवलेली गोष्ट सुरक्षित राहते
👉 उघड केलेली गोष्ट आकर्षण आणि अडथळे दोन्ही निर्माण करते.
तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला गेलात, एखादी मोठी योजना आखली, किंवा काहीतरी खास साध्य करणार असाल — ते लगेच सगळ्यांना सांगणं गरजेचं नाही.कारण त्या क्षणाचा खरा आनंद आणि त्या कामाची खरी ऊर्जा ही शांततेत आणि गोपनीयतेत वाढते.
अनेक वेळा आपण स्वतःच आपलं नुकसान करून घेतो —
जास्त बोलून, जास्त दाखवून, जास्त शेअर करून.
म्हणूनच लक्षात ठेवा —
✔ शांतपणे काम करा.
✔ योजना पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा.
✔ यश मिळाल्यावरच जगाला दाखवा.
कारण…
👉 जे लोकांना माहिती नाही, ते ते बिघडवू शकत नाहीत.
👉 आणि जे शांतपणे घडतं, तेच मोठं आणि टिकाऊ यश देतं.
✅*सतीश मोरे सतिताभ*