फॉलोअर

२७ ऑक्टोबर २०१८

lस्वप्नवत दिवाळी अमिताभजी सोबत


lस्वप्नवत दिवाळी अमिताभजी  सोबत


स्वप्नपुर्तीचे पहिले पाऊल

हॅलो सर्व बच्चन प्रेमी,

ज्या दिवसाची आपण खुप दिवसा पासून वाट पाहत होतो
तो दिवस आज उजाडला.

सातारा येथील बच्चन प्रेमी पंकज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आज कौन बनेगा करोडपती च्या सेटवर मला आणि दीपक प्रभावळकर यांना जाण्याचा सन्मान मिळाला, संधी मिळाली.

कराड आणि सातारा येथे आपल्या बच्चन प्रेमी ग्रुपच्या झालेल्या मेळाव्यात मी आणि दीपक प्रभावळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपला लवकरच अमिताभ बच्चन यांना भेटावयास जायची संधी मिळण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज आहे, त्या प्रयत्नांचा पहिला भाग आज पूर्ण झाला.

अमिताभ बच्चन यांना भेटून सातारकर जनतेच्या वतीने पंकज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. त्याचबरोबर दीपक प्रभावळकर यांच्या वतीने छत्रपतींची शिवमुद्रा भेट देणारी देण्यात आली.

*आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने गेल्या वर्षभरात आपण राबवलेल्या विविध उपक्रमांना एक पुस्तिका तयार केली होती.ती पुस्तिका महानायक अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे शुटींग संपल्यानंतर आम्ही भेट दिली.*

*या पुस्तिकेवर अमिताभ बच्चन यांनी स्वतः ऑटोग्राफ दिला आहे.*

बच्चन प्रेमी ग्रुपने सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आपल्या ग्रुपचे कौतुक करत त्यांनी पुस्तिकेवर स्वतःची सही केली आहे.

*कराड सातारा येथील सर्व बच्चन प्रेमींना आपणास मुंबई येथे भेटण्याची वेळ द्यावी ,अशी मागणी मी आणि दीपक प्रभावळकर यांनी त्यांना केली. या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.*

*आपण राबवत असलेल्या कामाची एक पुस्तिका त्यांना भेट देऊन दुसऱ्या पुस्तिकेवर त्यांची सही घेतली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.*

अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडी विषयी सविस्तर लिहिणार आहे.

*आता फक्त एवढेच सांगतो आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप चे स्वप्न लवकरच साकार होणार आहे .*

आपला बच्चन प्रेमी ग्रुप पुढील काळात कार्यरत राहून आपले उपक्रम अमिताभ बच्चन यांच्या पर्यंत पोहोचतील .

आपल्या सर्वांच्या वतीने पंकज चव्हाण ,दिलीप प्रभावळकर आणि मी सतीश मोरे आम्ही तिघांनी अमिताभ बच्चन यांच्या पर्यंत आपल्या ग्रुपचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

*आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मंतरलेले दिवस आहे.*

*हा दिवस आपल्या सर्वांमुळे आला आहे,लवकरच  आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा क्षण येणार आहे.*

*आपल्या सर्वांचे सदैव ऋणात आम्ही राहणे पसंत करतो.*

*आम्ही बच्चन प्रेमी*
...पंकज चव्हाण
...दीपक प्रभावळकर
...सतीश मोरे

२१ ऑक्टोबर २०१८

100 %अमिताभ बच्चनप्रेमी



आमचा श्वास
आमचा ध्यास
अमिताभ अमिताभ
आणि फक्त अमिताभ !

असे ब्रीदवाक्य असलेला अमिताभ बच्चन यांच्या कलागुणांवर निखळ प्रेम करणारा असा आमचा ग्रुप गेली तीन वर्षे अखंड पणे सुरु आहे.

अमिताभ बच्चन जणू आमचा श्वास आहे.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहता पाहता
आम्ही लहानाचे मोठे झालो ,
मोठ्याचे समजदार, प्रौढ झालो,
आता पन्नाशीकडे, साठीकडे निघालो आहे.
मात्र आमचं बच्चन प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

बच्चन प्रेमाचा धागा पकडून तयार झालेला आमचा ग्रुप पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ बच्चन यांच्या कलागुणांना डोक्यावर आणि डोक्यात घेऊन नाचतो, या गुणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो .

फार मोठ्या पदावर जाऊन देखील जमिनीवर असणारा आमचा अमिताभ !

लहान मोठा तर कोणीही भेटला
तर त्याला आदराने बोलणारा आमचा अमिताभ;!

सर्वांचा सन्मान ठेवणारा
आमचा अमिताभ !

भारत सरकारच्या सर्व अभियानामध्ये
हिरीरीने सहभाग घेणारा आमचा अमिताभ !

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून घराघरात जनजागृती करणारा आमचा अमिताभ !

एक चांगला कलाकार,
चांगला पती ,चांगला वडील
आणि आदर्श देशप्रेमी असा आमचा अमिताभ !

अमिताभ बच्चन यांच्या कलागुणावर  प्रेम करणारा आमचा सातारा जिल्ह्यातील अमिताभ बच्चन एकमेव व्हाट्सएप ग्रुप आहे.

अमिताभ बच्चन यांच्या गुणाचे अनुकरण करताना या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत समाजासाठी काहीतरी करण्याचा आम्ही वसा घेतलेला आहे.

याचाच एक भाग म्हणून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसादिवशी 11 ऑक्टोबरला आम्ही कराड शहरात स्वच्छता अभियान राबवले.

अमिताभ बच्चन हे भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ब्रँड अँबेसिडर आहेत. गावागावात स्वच्छतेची चळवळ वाढली पाहिजे पाहिजे यासाठी अमिताभ बच्चन यांनी या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहचवला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमिताभ बच्चन प्रेमी अर्थात एबीपी या आमच्या ग्रुपने कराड शहरात प्रवेशद्वाराजवळ असणारा भाग, रस्ते स्वच्छ केले.

सुमारे तीन तास आम्ही 40 अमिताभ बच्चन प्रमीनी श्रमदान केले , सुमारे 4 टन कचरा गोळा केला.

समाजासाठी काहीतरी करायचं हा अमिताभ बच्चन यांचा संदेश आम्ही काही प्रमाणात सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमचा ध्यास अमिताभ बच्चन यांना भेटणे हा तर आहेच परंतु रोज फेसबूक, ट्विटर इंस्टाग्राम आणि ब्लॉग च्या माध्यमातून  वेगळं लिखाण करुन समाजासाठी काहीतरी करण्याचा अमिताभ बच्चन यांनी घेतलेला वसा आम्हालाही पुढे चालवायचा आहे.
म्हणूनच आम्ही अमिताभ बच्चन असा वेगळा ग्रुप तयार केला आहे.

आम्ही अमिताभ बच्चन यांचे  फॅन नाही तर 100% प्रेमी आहोत. आम्हाला पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ बच्चन खूप आवडतात.

त्यांचा आदर्श घेत आमचा ग्रुप अमिताभ बच्चन यांच्यासारखेच कार्य करण्यासाठी यापुढील काळात कार्यरत राहणार आहे.

जयहिंद.

सतीश वसंतराव मोरे
09881191302

चिफ एडमिन
अमिताभ बच्चनप्रेमी ABP ग्रुप.
कराड- सातारा.

Our Passion, Our Mission and Our Breathe has only name; Amitabh Bachhan


Amitabh Bachchan is in our heart.


We grew up watching and enjoying  Amitabh Bachchan's films. Now we grown up as matures and traveling towards fifties. Yet our love for Amitabh has not diminished even with single Nano particle.

Our group is built by Bachchan passion thread, tries to imitate the every single on-screen and off-screen act of our only idol.

Amitabh is one of the very few persons, who is always down to earth despite of his larger than life image.

Every single person gone through his magical existence is overshadowed by his ever humbleness and sophisticated behavior.

Amitabh invests respect and get refunds million folds of it.

He always takes initiative in implementation of various government schemes.

Amitabh Bachhan is playing a huge part in clean India campaign. He is the brand ambassador of  Clean Survey Campaign for the Government of India.


He is an actor of the millennium. He maintained great family values with being a good husband and an ideal father.

We are appreciating Amitabh Bachhan’s legendry work through a whatsapp group named Amitabh Bachhan Premi ABP. This is the only group in satara district which is only made for AB. Our group has soulful attached with love for living legend Amitabh Bacchan since last three years with various mediums. Through ABP group we are organizing various events and activities related with Amitabh’s Art and his social awareness. We try to imitate his social efforts.

We celebrated AB’s birthday on 11th October as cleanliness campaign in Karad city. Hundreds of people from different streams took part in this unique drive.  On this event ABP group clean swiped roads near the gateway of karad. This campaign last over 3 hours and result was collection of nearly 4 tons garbage. We did it as a follow act of Amitabh’s message to do your part for society.

No wonder we want to meet our mentor someday. However this is not our only goal. We are spreading Amitabh’s era using various social media platforms. Feeling proud to say that we are not just ordinary AB fans. We just love his thorough charisma. ABP group will follow and spread AB brand allover and forever.


.

Jaihind

Satish Vasantrao More
09881191302

Chief Admin,
Amitabh Bachchan Premi
( ABP) Group.
Karad- Satara.
Maharashtra.

१४ ऑक्टोबर २०१८

Amitabh birthday 1

एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.

एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.

सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.

नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.

हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.

सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.

पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.

असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते.  संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.

बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.

किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.

त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.

अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.

बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...