फॉलोअर

२२ जानेवारी २०२१

टोपी संभालो याने की संय्मम रखो

 दिनकरराव... टोपी संभालो!


माझ्या अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' चित्रपटातील माझा आवडता संवाद मला आठवतो. "हवा तेज चल रहा है, दिनकरराव, टोपी संभालो, उड जायेगा" हा संवाद खुप काही सांगून जातो. 


जेव्हा परिस्थिती उलटी असते,वारा जोरात वाहतो तेव्हा टोपी सांभाळायला हवी,म्हणजे संय्यम ठेवला पाहिजे. जोरात हवा असते तेव्हा आपण ताठ उभे राहिलो तर टोपी उडून जाईल आणि आपले डोके उघडं पडेल. महापुर येतो तेव्हा मोठमोठाले वृक्ष कोसळतात,तिथे परिस्थिती नुसार थोडंस वाकणारे, संयमाने वागणारे लव्हाळ (गवत) जिवंत राहते,अशा आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. 


आपण टोपी सांभाळली नाही तर ती उडते आणि मग आपल्याला उन्हाचे चटके बसतील, पावसात भिजावे लागते. आपल्या समोर संकटं आणि अडचणी वाढतील. ते होऊ न देण्यासाठी आपण थोडंसं बाजुला सरलो, टोपी सांभाळली म्हणजेच संयम बाळगला तर अडचणीची वादळं निघून जातील. वादळ निघून जाईपर्यंत आपण टोपी धरून ठेवावी म्हणजे संय्यम ठेवावा.


अग्निपथ चित्रपटातील या संवादात टोपी म्हणजे संय्यम असा आहे. वादळ म्हणजे संकट. काही वादळं म्हणजे संकटं तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी येत नाहीत तर तुम्हाला नवीन वाटा मोकळ्या करण्यासाठी येत असतात.वादळातून म्हणजे संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संयम ठेवला तर ही संकटं निघून गेल्यावर तुम्हाला नवीन स्वच्छ वाट सापडेल.


#संयम 

#अग्निपथ

#अमिताभबच्चन 

 सतीश वसंतराव मोरे.

२० जानेवारी २०२१

डोळ्यात तुझ्या

 


तुझ्या डोळ्यात माझं प्रेम पाहिलं,

प्रेमरसात मी या पुर्ण न्हाऊन गेलो!



तुझ्या डोळ्यात माझी काळजी दाटली,

मग तु माझ्या काळजात जाऊन वसली!


तुझ्या डोळ्यात आनंद दिसतो,

क्षण क्षण तो माझ्यासाठी दाटतो!


तुझ्या डोळ्यात माझे स्वप्न दिसते,

स्वप्नाच्या गर्दीत मज नवी उर्जा मिळाते!


तुझ्या डोळ्यात मी मला पाहतो,

तिथंही तुझी मजवरील काळजी दिसते!


तुझ्या डोळ्यात मला माझं सर्वस्व दिसलं,

सर्वकाही तुझ्या डोळ्यातच दाटून आलं!



Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...