फॉलोअर

Colangute Beach Goa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Colangute Beach Goa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०५ एप्रिल २०१६

नो बाॅल म्हणजे चुकीचे पाऊल


              

सोशल प्रीतिसंगम पुढारी सातारा पान 11

भारताने बॅटींग,फिल्डींग खुपच चांगली केली. बाॅलरांचे प्रयत्नांना यश कमी मिळाले, टिम इंडीयाला नशिबाने साथ नाही दिली. तरीपण जाऊ दे. खेळ म्हणजे हार जित चालायचीच. आपणाला फक्त एक हवं असते पाकिस्तानला हरवा, बांगलादेशला ठेचा. आपल्या टीमने ते केले आहे, पाकड्याला हरवलं म्हणजे वल्ड कप जिंकला.
मित्रानो, मँच हरलो म्हनून वाईट वाटून घेऊ नका. बांग्लादेश विरुद्ध हरता हरता जिकलो. आस्ट्रेलिया विरूद्ध पन तेच झाले.जो चांगला खेळ करेल तो जिंकेल..म्हनूण मित्रानो कोणी सुध्दा टिम वर अथवा खेळाडूवर कमेंट करू नका . उलट टिमचे अभिनंदनच करा चांगले खेळाल्याबदल .

धोनी आणि टिम इंडीयाबद्दल वाईट पोस्ट Market मध्ये आणताल तर याद राखा.आज हारलो या पेक्षा या मॅच पर्यंत कसे लढलो ते अभिमानाने सांगा.

या आणि अशा प्रकारचे अनेक चांगले मेसेजेस यावेळी टी 20 विश्वचषक सेमीफायनल मध्ये भारत हारल्या नंतर येऊ लागले आहेत. याअगोदर अशा क्रिकेट स्पर्धेत भारत हरल्यावर येणारे मेसेज, उमटणार्‍या प्रतिक्रिया आणि गेल्या दोन दिवसांत  सोशल मीडिया वर व्यक्त झालेल्या भावना यात फार फरक आहे. क्रिकेट प्रेमीची मानसिकता बदलत आहे. पराभव पचवायची क्षमता वाढण्याबरोबरच खेळाचा विजय लोक स्वीकारू लागले आहेत . आला मनात राग की व्यक्त केला टिव्ही वर, व्हाॅट्स अपवर, फेसबुक वर,  हे यावेळी दिसले नाही. पराभव सुद्धा विनोद बुद्धीने कसा पचवायचा असतो, हे पहायला मिळाले. खरंच दाद द्यावी लागेल सोशल मीडिया प्रेमीना, वेड्यांना, नेटीझनना आणि ऑनलाइन खुळ्यांना !

वेस्ट इंडिज आणि भारतीय क्रिकेट संघात झालेली परवाची सेमीफानल खरंच अप्रतिम होती. आपण ही मॅच जिंकू शकलो असतो जर आपल्याला 'सिमन्स' आडवा आला.  त्याला दोन वेळा  मिळालेल्या नो बाॅलचे जीवदानाने भारतीय संघाला पराभवाकडे खेचत नेले. या 'नो बाॅल' वर खुप छान पोस्ट येत आहेत. ही पोस्ट पहा.

हमे तो नो बाॅलने लुटा, उनमें कहाॅ दम था
मेरा पाॅव वहा पडा, जहाॅ चुना कम था

अश्विन आणि पंड्याच्या गोलंदाजीवर दोन वेळा विकेट मिळाली पण रेषेच्या जवळ पुढे गेल्यामुळे नो बाॅल दिला गेला, विकेट राहीली बाजुला फ्री हिट मुळे रन्स वाढल्या. या गोलंदाजांनी बाॅल टाकताना पाऊल पुढे टाकले म्हणून आलेली ही पोस्ट वाचून आपण हसू आवरू शकणार नाही.

'अश्विन आणि पंड्याला झी चोवीस तास चॅनेलवर
निवेदकाची नोकरी मिळणार
कारण हे दोघे नेहमी एक पाऊल पुढे '
याच्या पुढे जाऊन एकाने म्हटले आहे,
'संपुर्ण रामायण रेषेच्या पुढेपाय टाकल्याने घडले.
T20 चे काय घेऊन बसलाय राव...?'



काही विनोदबुद्धीच्या WhatsApp तज्ञांनी सध्या मार्केटमध्ये आघाडीवर पतंजली उत्पादने 'टाचेच्या मागे चार फुट लांब बुटाची  उत्पादन सुरू करणार आहे ',  असा शोध लावला आहे.

अंधश्रदेवर जोक करत एकाने टाकले आहे,
कालची मॅच हारल्यानंतर धोनी, विराट आणि रोहित शर्मा गुरवांकडे गेले, जाब विचारायला . धोनी गुरवाला विचारतो, तुम्ही अंगारा दिला तरीपण आम्ही मॅच कशी हारलो ? कोकणातील गुरव म्हणतो, मी तुमका सांगलय होतय मी मारलेली रेश कोणी अोलंडता कामा नये, तरी पण आश्विन आणि पांड्यान ती कशाक अोलंडल्यानी,म्हणान तुम्ही मॅच हारलास.
याच आशयाच्या याही पोस्ट गंमतीशीर आहेत. 

' CBI ने मालवणात केली गुरवाला अटक. जादुटोण्यासाठी सुपारी घेतल्याची कबुली '
'चेंडू टाकताना मागून देवचाराने ढकलल्याची आश्विन, पंड्याची तक्रार'
'झेल घेताना कोणीतरी ढकलल्यासारखे वाटल्याचे जडेजाचे प्रतिपादन'

विराट कोहली आणि त्याची मैत्रीण अनुष्का शर्मा यांचे अफेअर, स्टेडियमवर येऊन अनुष्काने विराटला दिलेला फ्लाईंग किस सर्व क्रिकेट प्रेमीना माहीत आहे. पण अनुष्का शर्मा मॅच बघायला आली की भारत मॅच हरतो, अशी (अंध )श्रद्धा क्रिकेट चाहत्यांची आहे. ऑस्ट्रेलिया भारत मॅच दिवशी यावर मिडीयावर खुप जोक पडत होते. सारी ऑस्ट्रेलिया टीम अनुष्का शर्माच्या घरी जाऊन आली आणि तिला विनवणी केली,  ' वहिनी,  काही पण करा मॅच बघायला स्टेडियम वर या ', अशा शब्दांत क्रिकेट प्रेमीनी उडवलेली टर विराटला पण  आवडली नव्हती. मॅचच्या दुसर्‍या दिवशी विराटने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून वेस्ट इंडीज जिंकल्यावर ही पोस्ट आली.

जब जब इस धरती पर
नारी का अपमान हुआ है
तब तब बुरा हुआ है !
और बना लो सालों
अनुष्का पर चुटकुले.

खरंच दाद द्यायला हवी या WhatsApp प्रेमींच्या बुद्धीला.


खा. शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. थोर राजकारणी, किंगमेकर आणि गेम चेंजर आहेत. पवार स्वःत सेमीफायनल पहायला मुंबईत होते. त्यांची उपस्थिती पाहून लगेच त्यांच्या फोटो सहीत ' काही काळजी करू नका, फटाके तयार ठेवा,' असे मेसेज फिरू लागले होते. मॅच हरल्यावर पुन्हा  शरद पवार यांच्या नावाने  आणखी एक मेसेज पडला. ' मॅच हारल्यानंतर पवारांचे जबाबदारी झटकणारे वक्तव्य. मला काय माहीत बाकीचे पण खेळतील, मी फक्त एक गेलशी बोललो होतो '
काही पण होऊ दे कसलीही परिस्थिती निर्माण झाली की ऑनलाइन मंडळीच्या डोक्यात सर्व तयार असते.आता हेच बघा,
'अभ्यास केला गेलचा, पेपर आला सिमन्सचा !
असा युक्तिवाद करणार्‍या नेटीझनचं काय डोकं चालतं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल नेटवर्किंग मार्केटिंगला उत्तर म्हणून काँग्रेस प्रेमीनी टाकलेली जावईशोध लावणारी पोस्ट वाचून हसावे की रडावे हा प्रश्न पडतो ,
1983 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2007 T20 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2011 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
और देश में एक पनोती आई
2016 में इंडिया सेमीफानल से बाहर हो गए


सर्वात शेवटी आलेली ही पोस्ट मात्र मन सुन्न करून गेली.
भारत क्रिकेट टीमने जर विश्वकप जिंकला असता तर सरकारचे करोडो रुपये  त्यांच्या बक्षिसांवर खर्च झाले असते. भारत सरकारने तो पैसा गारपीटग्रस्त शेतकर्याना द्यावा ! बरं झाल हे जिंकले नाहीत.  हरले म्हणून एकही खेळाडू आत्महत्या करनार नाही. कारण मॅच चालू असतांना गारपीट झाली नाही. लोकांना क्रिकेट साठी एवढं दुःख झालय. ज्या शेतकर्यांमुळे दोन वेळची भाकर मिळते त्यांच्या साठी कधीच एवढे दुःख नाहीं करणार ! भारत सेमीफायनल हरला. सर्वांना खुप दुःख झाले. पण माझा शेतकरी राजा दर वर्षी फायनल हरतो याच कुणालाच दुःख नाही !

लास्ट बट नाॅट लिस्ट
' मॅच बघुन खुप शिकायला भेटले.
 जीवनात कधीच NO BALL (चुकीचे पाऊल) पडू देऊ नका. 
कारण लोक तुमच्या त्याच चुकीचा फायदा घेतात '


मॅच हरली म्हणजे सर्व संपले असे नाही. चुकीचे पाऊल आणि नो बाॅलचा सुद्धा संबंध असतो, हे आपल्याला सांगणारी आजची पिढी खुप खुप हुशार आहे. तरूणांच्या 'हिडन टॅलेंट'ला वाव आणि दाद मिळतेय इथं. सोशल मीडिया आणि नेटवर्किंग साइट्स वर येणार्‍या या पोस्ट, प्रतिक्रिया तरूणाईच्या उस्फूर्त भावना आहेत.


                                           .......सतीश मोरे



Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...