नथुलापास भारताची बर्फाच्छादित सीमा... "सॅल्यूट टू जवान'
![]() |
| भारत चीन सीमा. ..दोन इमारती चीन मध्ये, त्या अलिकडे भारत |
सार्वभौम भारताच्या संरक्षणासाठी सीमा रेषेवर जवान अखंड पहारा देत असतात. महाराष्ट्रासहीत दक्षिण भारत, मध्य भारत येथील राज्यांना इतर देशांची सीमारेषा नाही. त्यामुळे हल्ला, अतिक्रमण किंवा घुसखोरीचा धोका फार कमी आहे. मात्र पूर्वोत्तर आठ राज्यांना नेपाळ, चीन, भूतान, बांग्लादेश या देशांच्या सीमेने वेढले आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, मनीपूर, नागालँड, मेघालय ही सात राज्ये देशाच्या एका बाजूला ठेवल्यासारखी आहेत. या राज्यांना रस्त्याने जोडणारा पश्चिम बंगालचा भूभाग आहे. ही राज्ये म्हणजे सात बहिणी आणि त्यांच्यापासून वेगळा लांब उंचावर असलेला भाऊ म्हणजे सिक्किम. सिक्किमच्या पश्चिमेला नेपाळ, पूर्वेकडे भूतान, उत्तरेकडे चीनव्याप्त तिबेट या देशांची बॉर्डर आहे.
चीनचा धोका भारताने अनेक वर्षांपूर्वी ओळखला आहे.आता भारत स्वंयंपूर्ण झाला असून चीनच्या आक्रमणाला रोखण्यासाठी सीमारेषेवर जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत आणि चीन सीमारेषेलगतच्या नथुलापास आणि लॉचिंग या ठिकाणी भारताने लष्करी तळ उभारले आहेत.
भारत-चीन युद्धकाळातील नोंदणीय नथुलापास नावाच्या लष्करी तळाला भेट देण्याचा योग आला. नथुलापास म्हणजे भारताचे सिक्किमच्या बाजूचे शेवटचे लष्करी तळ. समुद्र सपाटीपासून 14 हजार 500 फूटांवर वसलेल्या या बर्फाच्छादित ठिकाणावर जायला खूप उंच डोंगर, नद्या पार करीत अरुंद रस्त्यावरुन जावे लागते. गंगटोक ते नथुलापास हे अंतर अवघे 55 किलोमीटर आहे. मात्र ते पार करायला नैसर्गिक परिस्थिती चांगली असेल तर तीन तास आणि विरुद्ध असेल तर 5 तासही लागतात.
![]() |
| BRO फलक |
नथुलापास या ठिकाणी जायला सर्वसामान्य लोकांना थेट प्रवेश नाही. तिथे जाण्यासाठी सिक्किम (पूर्व ) जिल्हा पोलिस अधिक्षकांची खास परवानगी व परवाना लागतो. फक्त भारतीय लोकांनाच हा पास मिळतो. राज्यपालांचे खास पाहुणे असल्यामुळे त्यांच्या कोट्यातूनच हा पास राजभवन सर्किट हाऊसला सकाळीच पोहोचला होता. दोन सुमो गाड्या बाहेर तयार होत्या. या वाहनांवर "गेस्टस् ऑफ गव्हर्नर' असे लेबल लावण्यात आले.
![]() |
| खचलेल्या रस्त्यावरुन आम्ही पुढे गेलो |
बाहेर खूप पाऊस पडत होता. वातावरण अंधारले होते. मधूनच पाऊस थांबला की धुके यायचे. मात्र जायचेच असा निश्चय करून आम्ही वाहनात बसलो. गंगटोक सोडले की गणेशटोक, हनुमानटोक या उंच टेकड्यांवरून पर्यटन केंद्रे सोडल्यानंतर नथुलापासकडे जाण्यासाठी फाटा आहे. तेथे लष्कराचा चेक पॉईंट आहे. परवाना पास पाहून तसेच वाहनांत असलेल्या व्यक्तिंची खात्री करून एक-एक वाहन सोडले जात होते. आम्ही पुढे निघालो. पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे पाणीच-पाणी झाले होते. उंच कडेदार डोंगरदऱ्यांतून पाणी वाहत रस्त्यावर येत होते. अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. मात्र असे वातावरण आणि रस्त्याची सवय असलेल्या आमच्या चालकाने अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवित आम्ही कसेबसे 10 किलोमीटर अंतर पार केले.
| भारतीय हद्दीत सुमो उभी करून बर्फातल्या रस्त्यावरुन चाललो |
अचानक सर्व वाहने थांबू लागली. खूप लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा रस्ता पूर्णपणे बीआरओच्या ताब्यात आहे. एकेरी रस्त्यावर समोरून दुसरे वाहन आले की अंगाचा थरकाप उडायचा. नथुलापासला जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप होती आणि ती वेळ जाण्याची असल्यामुळे समोरुन फक्त लष्कराचे वाहनच यायचे. पुढे रस्ता खचला होता. तो दुरूस्त करण्याचे काम लष्कराचे जवान करीत होते. जेसीबी रस्त्यावरच उभा होता. त्यामुळे वाहने पुढे जाऊ शकत नव्हती. अर्धा तासात हे काम संपले व पुन्हा वाहतूक सुरू झाली.
![]() |
| जागोजागी लष्करी तळ आहेत |
चांगो या लष्करी तळावर पुन्हा आमची वाहने थांबली. तेव्हा पाऊस उघडला होता. संपूर्ण आकाश कोरडे झाले होते. आम्ही वाहनांतून खाली उतरलो. सगळीकडे उंच डोंगर, हिरवीगार वनसंपदा आणि शेकडो छोटे-छोटे धबधबे दिसत होत. डोळ्यांचे पारणे फिटले. येथील अतिशय सुंदर असे चांगो तळे आम्हाला खुणावू लागले. रस्ता घसरटी असल्यामुळे तळ्याकडे न जाता ते सौंदर्य डोळ्यांत साठवून आम्ही पुढे निघालो.
![]() |
| याक सोबत फोटो काढून इथे गरम कपडे घालून पुढे निघालो |
नथुलापास आता 5-6 किलोमीटर अंतरावर राहिले होते. नैसर्गिक परिस्थिती बदलली. वारे सुरू झाले. अचानक तापमान खूप कमी झाले. थंडी वाजू लागली. वाहनातील आम्ही सारे कुडकुडू लागलो. कुठे चहा मिळतोय का? असे चालकाला विचारले. एका ठिकाणी आमची गाडी थांबली. थंडीसाठी लागणारे गरम कपडे, जॅकेट, हॅन्डग्लोज, मोजे, गमबूट येथे भाड्याने घ्या, असे ड्रायव्हरने सांगितले. ही कपडे घालून सारे तयार झाले. गरमागरम मॅगी खाल्ली, चहा पिला आणि आम्ही मार्गस्थ झालो.
लांबूनच नथुलापास बाबा मंदिर हा फलक आम्हाला खुणावू लागला. खाली उतरलो. समोर फक्त बर्फ, बर्फ अणि बर्फच दिसत होते. पांढरा शुभ्र गालिचा पसरला आहे, हिमालय शुभ्र कपडे घालून नटला आहे, असे भासत होते. उबदार कपडे घालूनही आम्ही थंडीने कुडकुडत होतो. बर्फातल्या रस्त्यातून वर जाऊ लागलो. 100 मीटर बर्फात चालल्यानंतर भारतीय लष्कर तळ, जवान दिसू लागले. एवढ्या थंडीत न कुडकुडता ते ताठ उभे होते. त्यांच्यात ही ताकद कुठून येते? असा प्रश्न पडला.
लांबूनच नथुलापास बाबा मंदिर हा फलक आम्हाला खुणावू लागला. खाली उतरलो. समोर फक्त बर्फ, बर्फ अणि बर्फच दिसत होते. पांढरा शुभ्र गालिचा पसरला आहे, हिमालय शुभ्र कपडे घालून नटला आहे, असे भासत होते. उबदार कपडे घालूनही आम्ही थंडीने कुडकुडत होतो. बर्फातल्या रस्त्यातून वर जाऊ लागलो. 100 मीटर बर्फात चालल्यानंतर भारतीय लष्कर तळ, जवान दिसू लागले. एवढ्या थंडीत न कुडकुडता ते ताठ उभे होते. त्यांच्यात ही ताकद कुठून येते? असा प्रश्न पडला.
| ककधी धुके कधी खुला आसमान |
या ठिकाणी सीमारेषेपलिकडे मोठ्या दोन इमारती दिसू लागल्या. त्या चीनने बांधलेल्या आहेत. सीमारेषा म्हणजे खूप वेगळे काहीतरी असते, अशी भावना होती. मात्र, लोखंडी काटेरी साधे मोडके-तोडके कुंपन होते. त्याला आम्ही हात लावला. भारतमातेला वंदन केले. कुंपनाच्या पलिकडे चीन होता. पलिकडे जायला परवानगी नव्हती. तरीही एका जवानाला विचारले असता त्याने पलिकडे गेलेल्या चौघा तरुणांना चीनच्या सैनिकांनी दिवसभर कोंडून ठेवले होते, असे सांगितले. उणे 8 तापमान होते. फोटो काढायला परवानगी नव्हती. एकमेकांच्या अंगावर बर्फ टाकताना आमच्यातील काही जण खाली पडले. बुटामध्ये बर्फ गेला मात्र लगेच जाणीव झाली नाही. एवढ्या उंचावर पहिल्यांदाच गेलो होतो.
तेथे असणाऱ्या छोटेखानी हॉटेलमध्ये चहा सोबत मोमो खाल्ला.
तेथे असणाऱ्या छोटेखानी हॉटेलमध्ये चहा सोबत मोमो खाल्ला.
खाली उतरु लागलो. जवानांना सलाम केला. दरम्यान, जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फ पडताना पाहण्याचा आनंद काही औरच होता. कोणी तुझ्या टोपीवर बर्फ साठले आहे ते काढ, असे सांगत होता तर दुसरा तोंडातून वाफ बाहेर काढून दाखवत होता. बर्फवृष्टीचा आनंद घेतला. मात्र त्याचवेळी अशा बर्फातही आपले जवान कसे राहतात? त्यांच्या सहनशिलतेला दाद दिली पाहिजे. हे जवान आहेत म्हणून आपली बॉर्डर सुरक्षित आहे ही कृतज्ञतेची भावना मनी आली .
☝ मेजर बाबा हरन सिंग यांचे मंदिर ☝
19 रजपूज रेजिमेंटचे मेजर हरभजन सिंग हे 1968 साली युद्धा दरम्यान नथुलापास येथे कामी आले. भारतीय सेनेने त्यांच्या नावाने येथे छोटेसे मंदिर उभारलेले आहे. सैनिक श्रद्धेने बाबा हरभजनसिंग यांची पूजा करतात. बाबा सैनिकांच्या पाठीशी राहतात. पहारा देणाऱ्या टीपकी मारतात, सैनिकांना जागे ठेवतात. त्यांचे संरक्षण करतात,अशी सैनिकांची श्रद्धा आहे. 26 जानेवारी 1969 साली भारत सरकारने मरणोत्तर महावीर चक्र देवून हरभजन सिंग यांचा गौरव केला होता.
19 रजपूज रेजिमेंटचे मेजर हरभजन सिंग हे 1968 साली युद्धा दरम्यान नथुलापास येथे कामी आले. भारतीय सेनेने त्यांच्या नावाने येथे छोटेसे मंदिर उभारलेले आहे. सैनिक श्रद्धेने बाबा हरभजनसिंग यांची पूजा करतात. बाबा सैनिकांच्या पाठीशी राहतात. पहारा देणाऱ्या टीपकी मारतात, सैनिकांना जागे ठेवतात. त्यांचे संरक्षण करतात,अशी सैनिकांची श्रद्धा आहे. 26 जानेवारी 1969 साली भारत सरकारने मरणोत्तर महावीर चक्र देवून हरभजन सिंग यांचा गौरव केला होता.
(क्रमश:)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा