फॉलोअर

३१ ऑक्टोबर २०१७

यातना नव्हे प्रेमच !

मी तुझ्या प्रेमात
तु माझ्या ह्दयात,
मी तुझ्या स्मरणात
तु माझ्या श्वासात !

तुझा जीव माझ्यावर
माझा नीव तुझ्यावर,
तुझं सर्व काही माझं
माझं ना उरलंय माझं !

मी तुझा दिवाना
तु माझी संगीनी
मी तुझ्यातच विसावतो
तु माझ्यातच पहुडतेस !

आपण दोघेही एकच
दोघांची स्वप्नंही एकच,
दोन शरीर अन मनं
तरीही आपण एकच !

तुझं फक्त असणं
माझ्यासाठी संजीवनी आहे ,
तुझं जवळ वावरणं
मला ऑक्सिजन आहे ,
तु माझ्यासोबत असणं
माझ्यासाठी वरदानच आहे !

माहीत आहे मला
माहीत आहे मला
प्रेम म्हणजे यातना
प्रेम आहे यातनामय सुख !
यातनाच प्रेमाने हात फिरवतात
तुला माझ्या जवळ आणतात !

म्हणून
मला तुझ्यासोबत यातनाही सुंदर वाटतात ,
कारण त्या मला तुझ्या आठवणीत ठेवतात !

हम आपके साथ कायम है !

पिन कोड काय आहे

*🔺🙇🏻 मनातील प्रश्न...*

*☑ लॉजिक काय आहे पिन कोड ( PIN CODE) मागचं...*
➖➖➖➖➖➖➖
आपणास आपल्या घरी कोणते पार्सल, पत्र अथवा डिलीव्हरी मिळवायची असेल तर आपणास पत्याबरोबर पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर विचारला जातो. जेणेकरूण आपली डिलीव्हरी योग्य वेळेत सत्वर होईल. पिन नंबर हा पत्या इतकाच महत्वाचा असतो. पत्रव्यवहार अधिक सोपस्कर व्हावा म्हणून भारतामध्ये १५ ऑगस्ट १९७२ पासून पिन कोड वापरात आणला गेला .
पिन कोड कसा तयार होतो. त्याची संकल्पना काय आहे. हे तुम्हाला कदाचित माहीती नसेल.

*🔺पिनकोड मागील रहस्य खालील माहीती वरून उलघडून पाहू या...*

◼तक्ता क्र.1 प्रमाणे पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो

*🔘 विभाग तक्ता क्र.1*

अंक विभाग
1 व 2 उत्तर
3 व 4 पश्चिम
5 व 6 दक्षिण
7 व 8 पुर्व
9 आर्मी
भारतामध्ये एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत. 1 ते ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात आणि ९ हा क्रमांक भारतीय सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो.

*🔘 तक्ता क्र. 2*

पहिली संख्या विभाग राज्ये
1 उत्तर दिल्ली, हरयाना, पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू कश्मीर
2 उत्तर उत्तर प्रदेश व उत्तरांचल
3 पश्चिम राजस्थान व गुजरात
4 पश्चिम महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड
5 दक्षिण आंध्र प्रदेश व कर्नाटक
6 दक्षिण केरळ व तमिळनाडू
7 पुर्व पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर पुर्व
8 पुर्व बिहार व झारखंड
9 ए.पी.एस आर्मी पोस्टल सर्व्हिस
पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात.

*🔘 तक्ता क्र. 3*

पिन मधील पहीली दोन अक्षरे राज्ये
11 दिल्ली
12 ते 13 हरयाना
14 ते 16 पंजाब
17 हिमाचल प्रदेश
18 ते 19 जम्मु कश्मिर
20 ते 28 उत्तर प्रदेश व उत्तरांचल
30 ते 34 राजस्थान
36 ते 39 गुजरात
40 ते 44 महाराष्ट्र
45 ते 49 मध्यप्रदेश छत्तीसगड
50 ते 53 आंध्रप्रदेश तेलंगण
56 ते 59 कर्नाटक
60 ते 64 तमिळनाडू
67 ते 69 केरळ
70 ते 74 पश्चिम बंगाल
75 ते 77 ओरिसा
78 आसाम
79 उत्तर पूर्व
80 ते 85 बिहार व झारखंड
90 ते 99 आर्मी पोस्टल सर्व्हिस (APS)

*_◼पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात._*

_*◼पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात.*_
➖➖➖➖➖➖➖
📮📩📮📩📮📩📮

३० ऑक्टोबर २०१७

PAN CARD काय प्रकार आहे

*☑ कशी असते पॅन कार्ड ची रचना ?*
➖➖➖➖➖➖➖

*🔺पॅन कार्डची रचना –*

भारत सरकार च्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आपणास लॅमिनेटेड स्वरूपामध्ये एक कार्ड दिले जाते. त्यावर तुमचा फोटो, नांव, सही व एक दहा अंकी एक नंबर दिला जातो. त्यास पॅन नंबर असे म्हटले जाते. त्यामध्ये पहीली पाच अक्षरे ही वर्णाक्षर, पुढिल चार अक्षरे ही अंक व दहावे अक्षर पुन्हा वर्णाक्षर असते.
🔲🔲🔲

पॅनचे कार्ड :CHIPS0061H. यात सुरुवातीला A पासून Zपर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात.

चौथे मुळाक्षर खालील प्रमाणे कार्डधारकाची जातवारी सांगते.

1) कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.

2) कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते.

3)   कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते.

4) कार्डधारक जर फर्म असेल तर चौथे मुळाक्षर F असते.

5) कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते.

6)   कार्डधारक जर सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते.

7)   कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य संस्था तर चौथे मुळाक्षर L असते.

8)   कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते.

9)   कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते.

10) कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
🔲🔲🔲
परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते.

*🔺पॅन कार्ड कसे काढावे –*

आपल्या शहरातील विविध अधिकृत एजन्सी द्वारे किंवा नैशनल सिक्युरिटीज डिपॉजटरी लिमिटेड (NSDL) च्य़ा ऑनलाईन पोर्टलवर _*🔺(https://tin.tin.nsdl.com/pan/form49Adsc.html)* पॅन कार्ड काढणे आता अत्यंत सोपे झाले आहे. https://india.gov.in/apply-online-new-pan-card  या संकेत स्थळावरून आपल्याला 49 अ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल . नंतर तो विहीत नमुण्यामध्ये भरूण द्यावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नांव, जन्मतारीख, पत्ता, वडीलांचे व आईचे संपुर्ण नांव मोबाईल नं. अचूक भारावा लागेल. फॉर्मसोबत तुम्हाला नजीकच्या काळातील स्टॅम्प साईज दोन फोटो, रहीवाशी पुरावा, ओळखीचा पुरावा तसेच जन्मतारखेचा दाखला द्यावा लागेल. उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड इ. तुम्हाला फिजीकली सदरचे डॉक्युमेंट द्यायचे नसतील तर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ई-के वाय सी व ई-साईन द्वारे सुद्धा नोंदणी केली जाऊ शकते. ऑनलाईन नोंदणी करताना 49 अ फॉर्म मध्ये बरोबर माहीती नोंद करावी लागते. ती आपणास जतन करता येते. त्यासाठी वेब साईट वर आपणास तात्पुरता नोंदणी क्रमांक मिळतो. त्यामुळे डाटा लॉस सारख्या परिणामांना सामोरे जावे लागत नाही. संपुर्ण माहीती भरूण झाल्यावर आपणास ती ऑनलाईन जमा करावी लागते. पॅनकार्ड साठी ची फि आपणास ई-पेमेंट ने अथवा रोखीने देता येते. शेवटी आपणास नोंदणी क्रमांक व कुपण कोड दिला जातो. त्याद्वारे आपण पॅन कार्ड स्टेटस _*🔺https://tin.tin.nsdl.com/tan/servlet/PanStatusTrack*_ या लिंक द्वारे तपासू शकतो.
🔲🔲🔲
पॅन कार्डबाबत व्हेरीफिकेशन केले जाते. पॅनकार्ड तयार झाल्यानंतर सर्व प्रथम आपल्या मोबाईलवर त्याचा मेसेज मिळतो. शक्यतो पॅन कार्ड एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला दिलेल्या पत्यावर पोस्टाद्वारे मिळते. त्याशिवाय पॅनक्रमांकाच्या माहीतीतील दुरूस्ती किंवा बदल सुद्धा इंटरनेट वरून करता येतो.
➖➖➖➖➖➖➖
🔲◾🔲◾🔲◾🔲

२२ ऑक्टोबर २०१७

म्हणे मी तुला का आवडते ?

म्हणे मी तुला का आवडते?

तु माझी आहेस ,
ही कल्पनाच मला सुखाऊन जाते!
तरीही मला विचारतेस
म्हणे मी तुला का आवडते ?

माझ्याकडे चोरुन पाहतेस ,
अन् न पाहिल्या सारखं करतेस  !
तरीही मला विचारतेस
म्हणे मी तुला का आवडते ?

तुझ्या सहीत तुझं ,
मला सारं काही आवडतं !
तरीही मला विचारतेस
म्हणे मी तुला का आवडते ?

काही नाही माझं ,
सारं माझं आहे तुझं !
तरीही मला विचारतेस
म्हणे मी तुला का आवडते ?

अपूर्ण......

१३ ऑक्टोबर २०१७

अंतर्नाद

पाहून मजला
फिरवलंस नयन सखे !
ओळख ठेवलीस
ऐवढी तरी हे ही नसे थोडके !

तुझी साथ मजसाठी प्राणवायू
तुझी साद बेफान वसंत !
तुझी काया मज मोहमाया
तुझा सुगंध मज करी बेधुंद !


आप मिलते रहो,
हम देखते रहेंगे !
आप मुस्कुराते रहो ,
आप खिलते रहेंगे !
आप साथ रहोगें,
हम लिखतेही रहेंगे !


वाट बदलली तेंव्हा
वाटलं हात सुटेल हातातून
तेंव्हा कुणास ठाऊक होतं
खरी सोबत असते मनातून !


ये माझ्या सखी साजणी,
तुझी ही पाठमोरी छबी दिवानी !
बरसू दे तुझ्या शब्दाच्या सरी,
नको मौन करू सतीदुल्हारी !


खुप अवखळ आहेत तुझ्या आठवणी,
शिकव थोडी समजदारी त्यांना !
येण्याअगोदर काहीच कळवत नाहीत,
जाताना उध्दवस्त करून जातात !


कितीही प्रयत्न करा
तो आपल्या हाती लागत नाही !
ही वेळ आहे साहेब
बदलल्या शिवाय रहात नाही !

तुझ्यावर रुसणं,
तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही !
कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही !

११ ऑक्टोबर २०१७

अमिताभ बच्चन वाढदिवस पुढारी विशेष

पुढारी साभार
महानायक@75
अमिताभ बच्चन @ 75 नजरेतून

भारतीय सिनेसृष्टीतील ‘पारंपरिक’ अभिनेत्याची सगळी परिमाणे बदलून टाकत 70 मि.मी. पडदा अमिताभ बच्चन या नावाने एकट्याने व्यापला. 1973 साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’मधील  ‘ये पुलिस स्टेशन है। तुम्हारे बाप का घर नही।’ असे डोळ्यांत अंगार फुलवून म्हणत त्वेषाने ‘खलनायक’च्या खुर्चीला लाथ मारणार्‍या ताडमाड अमिताभने कोट्यवधी लोकांच्या मनांचा ताबा घेतला आणि 2017 मध्ये टीव्हीच्या छोट्या पडद्यावर ‘देवी और सज्जनो आज हम खेलते है.. कौन बनेगा करोडपती..’  असे म्हणत सन्मानपूर्वक स्पर्धकाला खुर्ची देतो, तेव्हाही त्याने घेतलेला ताबा सुटलेला नाही.. आज अमिताभ वयाची 75 वी वर्षपूर्ती करीत आहेत.. त्यानिमित्ताने या महानायकाच्या आयुष्यातील वेचक आणि अशा वेधक नोंदी...

१. बीग बी यांचा ११ ऑक्टोबर १९४२ला अलाहाबाद येथे जन्म झाला.

२.प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन हे त्यांचे वडील. खरे आडनाव श्रीवास्तव कवी म्हणून स्वीकारलेले बच्चन हेच नाव ते वापरु लागले 

३. के. ए. अब्बास दिग्दर्शित सात हिन्दुस्तानी (१९६९) हा पहिला चित्रपट.

4. रेखा नायिका असलेल्या ‘दुनिया का मेलाफ’ मधून त्यांना काढून संजय खानला घेतले.

५. यार मेरी जिंदगी हा त्यांचा चित्रपट तब्बल 21 वर्षांनी पूर्ण झाला तर रुद्र, शिनाख्त, बंधुआ, टायगर, रिश्ता, सरफरोश असे चित्रपट मुहूर्ताला बंद पडले. 

६. कुलीच्या सेटवर 26 जुलै 1982 रोजी मारहाणीच्या दृश्यात ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ यांच्या पोटात टेबलाचा लागलेला कोपरा जीवघेणा ठरला. तेव्हा त्यांच्या तब्येतीला आराम पडावा, ते बरे व्हावे म्हणून देशभरातीलच नाही तर विदेशातील चाहत्यांनाही प्रार्थना केल्या. 

७. १९८४ मध्ये अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. 

८. खुदा गवाह (१९९२) नंतर त्यांनी काही काळ चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले.

९. अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्यांच्या ताफ्यात लेक्सस, रॉल्स रॉयल फैंटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज यांसारख्या कारचा समावेश आहे.

१०. सफेद रंगाची रॉल्स रॉयल फँटम ही 4.5 कोटींची गाडी प्रोड्युसर विधु विनोद चोप्रा यांनी ‘एकलव्य’ चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्ट केली होती. 

११. अमिताभ बच्चन यांनी एका ब्रिटीश कंपनीमध्ये काम करणारी एक महाराष्ट्रीयन मराठी मुलगी होती. बिग बींना तिच्याशीच विवाह करायचा होता. पण ते शक्य झाले नाही त्यामुळे नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडून ते मुंबईला आले होते.

१२. हिंदीमध्ये अमिताभ यांच्या डॉन,अग्निपथ,जंजीर या गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बनवण्यात आले.

१३. दक्षिणेत दीवार,नसिब,अमर अकबर अँथनी,जंजीर,कस्मे वादे आदि चित्रपटांचे रिमेक बनवण्यात आले.या प्रत्येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांनी साकारलेली भुमिका केली.

१४. अमिताभ   यांचे  20 चित्रपटात नाव ‘विजय’ आहे. त्यानंतर अमित हे दुसरे सर्वाधिक वेळा वापरलेले गेले नाव होय. 

१५. अमिताभ यांनी दुहेरी भुमिका करण्याततही बाजी मारली आहे.डॉन,दि ग्रेट गॅबलर, आखरी रास्ता, देशप्रेमी, अदालत, सत्ते पे सत्ता, कस्मे वादे अशा अनेक चित्रपटात त्यांनी दुहेरी भुमिका केली.

१६. अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत.मि.नटरवलाल मधील मेरे पास आओ मेरे दोस्तो,लावारीसमधील मेरे अंगने मे.सिलसिलामधील निला आसमा सो गया  आणि रंग बरसे ही त्याची काही उदाहरणे.

१७.कारकीर्दीच्या उत्तरार्धात अमिताभ यांना अनेक चांगल्या भुमिका मिळाल्या. त्यासाठी त्यांनी गेट अपही बदलला. पा चित्रपटातील आजारग्रस्त लहान मुलाची भुमिका हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण

१८. उतारवयात अमिताभ यांच्या बागबन, बाबूल, आँखे, पीकू, पिंक, वजीर, शमिताभ या वेगळ्या चित्रपटातील भुमिकाही गाजल्या.

१९. रामगोपाल वर्मा यांच्या शोले या चित्रपटात अमिताभ यांनी गब्बरसिंगची भुमिका केली होती.हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला

२०. अमिताभ यांनी अनेक चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भुमिका केली. त्यांना अँग्री यंग मॅन हा किताब मिळवून देणाऱ्या जंजीर या चित्रपटातही ते पोलिस अधिकारी होते. 

२१. राजेश खन्ना, संजीवकुमार अशा अनेक दिग्गजांसोबत अमिताभ यांनी काम केले. शक्ती या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्यासोबत त्यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली.

२२. विनोदी भुमिका रंगवण्यात अमिताभ यांचा हातखंडा आहे. अमर अकबर अँथनी हा चित्रपट आणि त्यातील आरशासमोरील प्रसंग हे त्याचे उत्तम उदाहरण.

२३. ‘कौन बनेगा करोडपती’मधून अमिताभ यांनी २००० साली टीव्हीवर पदापर्ण केले. सर्वसामान्य प्रेक्षकांना रिलेट होईल अशी शैली, नर्मविनोदी संवाद, अत्यंत उच्च दर्जाचे पण सोपे हिंदी यामुळे हा शो प्रचंड लोकप्रिय झाला आणि अमिताभ यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. यंदा या शोचे नववे सत्र सुरु आहे.

२४. आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासियत. कथेची पार्श्वभूमी कथन करण्यासाठी अनेक चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरण्यात येतो. १९७७ साली सत्यजित राय यांनी शतरंज की कहानी या चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरला होता. महाभारत मालिका तसेच जोधा अकबर, लगान हे काही गाजलेले चित्रपट. 

२५. अमिताभ यांना आतापर्यत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून हा एक विक्रमच आहे. अग्नीपथ (२०००), ब्लॅक (२००५), पा (२००९) आणि पिकु (२०१५) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल आहे. 

२६. १९८४ साली पद्मश्री, २००१ साली पद्भुषण तर २०१५ साली पद्मविभुषणने सन्मानित करण्यात आले आहे. २००७ साली फ्रान्स सरकारने त्यांना ङ्गनाईट ऑफ दी लेजिओनफ हा सन्मान बहाल केला. 

२७. महानायकला आतापर्यंत तब्बल २२० वेगवेगळे पुरस्कार मिळाले असून सात वेगवेगळया विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

२८. ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोबे विद्यापीठ’ येथे अमिताभ यांच्या नावाने शिष्यवृत्तीही दिली जाते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणार्या ‘पेटा’ संस्थेने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ म्हणून अमिताभचा गौरव केला होता.

२९. अलहाबादमधील क्रीडा संकुल , इटावा येथील सरकारी शाळा यांना अमिताभ यांचे नाव देण्यात आले आहे. अलाहाबादमधील एक रस्ताही त्यांच्या नावाने आहे. 

३०. खुदा गवाह शुटिंगच्या वेळी अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी अमिताभ यांना वायुसेनेची खास सुरक्षा दिली होती. अफगाणिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून खुदा गवाहची नोंद आहे. 

३१ .अमिताभ यांचे खास वैशिष्ठय म्हणजे ते दोन्ही हाताने लिहू शकतात. 

३२. मुलांच्या मुलाची  भूमिका करणारे अमिताभ एकमेव अभिनेते आहेत. ‘पा’ चित्रपटात त्यांनी अभिषेक बच्चनच्या मुलाची भूमिका केली होती. 

३३. एकाच नावाच्या दोन वेगवेगळया चित्रपटात ( दिवार १९७४ आणि २००४) कामही अमिताभ यांनी केले आहे. 

३४. गाड्यांबरोबर अमिताभ यांना घड्याळे जमा करण्याचाही छंद आहे. लंडन आणि स्वित्झर्लंड ही त्यांची आवडती ठिकाणे. 

३५. अमिताभ यांनी पहिली कविता १९८२ साली इस्पितळात असताना लिहिली. धर्मयुगमध्ये ही कविता प्रसिद्ध झाली होती. 

३६. घरातील बेडरुम ही त्यांची आवडती जागा. येथे बसून शांतपणे वाचन करणे त्यांना आवडते. 

३७. विल्यम्स शेक्सपियरच्या अजरामर ‘हेम्लेट’ ची भूमिका साकारण्याची अमिताभ यांची इच्छा आहे. 

३८. ते कधीही चहा, कॉफीही घेत नाहीत. दारुड्या व्यक्तीचा उत्तम अभिनय करणारे अमिताभ दारुला शिवतही नाहीत. 

३९. अँग्री यंग मॅन साकारणारे अमिताभ प्रत्यक्षात फारसे चिडत नाहीत. 

४०. त्यांच्याकडे पेनचा मोठा संग्रह असून त्यात केशरी रंगाची शाई असणारा एक पेन देखील आहे. 

४१. रस्त्यावरची भुर्जी, भाजलेले कणिस त्यांना प्रचंड आवडते. संधी मिळेल तेव्हा अभिषेकसमवेत जाऊन ते याचा आनंद घेतात. 

४२. हिंदीशिवाय बंगाली, पंजाबी, गुजराती आणि मराठी या भाषा अमिताभ बोलू शकता आणि समजू शकतात. जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन या विदेशी भाषाही त्यांनी शिकल्या आहेत. 

४३. ट्वीटर, फेसबुकवर अमिताभ प्रचंड सक्रिय आहेत. ट्वीटवर त्यांचे ३ कोटी तर फेसबुकर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत. ट्वीटरवर अमिताभ स्वत: फक्त ११५७ जणांना फॉलो करतात.

४४. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील आपले अकाऊंट अमिताभ स्वत: हाताळतात.  केवळ सोशल मीडिया नव्हे तर अमिताभ चांगला ब्लॉगरही असून नियमितपणे ब्लॉग लिहित असतात.  

४५. अमिताभ यांनी सेकंड हॅन्ड फियाट घेतली होती. ही त्यांची पहिली गाडी. 

४६. सहा फुट २ इंच उंची असलेले अमिताभ बॉलीवूडमधील सर्वांत उंच अभिनेते आहेत. 

४७. मुंबईत स्ट्रगल करतांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्हर काढल्या आहेत. 

४८. वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी आकाशवाणीत अर्ज केला मात्र आवाज ‘चांगला’ नसल्याने त्याला ही नोकरी मिळाली नाही. 

४९. सात हिंदुस्थानी या पहिल्या चित्रपटासाठी अमिताभ यांना १ हजार रुपये मानधान मिळाले होते. 

५०. आज जाहीरात क्षेत्रात अमिताभ यांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र सुरवातीच्या दिवसांत त्यांनी एका जाहीरातीसाठी डबिंग केले तेव्हा त्याचे ५० रुपये त्यांना मिळाले होते. 

५१. १९७३ ते १९८४ दरम्यान अमिताभ यांचे १९ चित्रपट गोल्डन ज्युबली झाले होते.

५२. लंडन येथे २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मशाल धावकाचा मान अमिताभ यांना मिळाला होता. 

५३ ‘बॉलीवूड’ हा शब्द अमिताभ यांना आवडत नाही. ‘हिेंदी फिल्म इंडस्ट्री’ या शब्दाचा वापर ते शक्यतो करतात. 

५४. इजिप्तमध्ये २००१ मध्ये झालेल्या अलेक्झांडर चित्रपट महोत्सवात त्यांचा ‘अॅक्टर ऑफ मिलेनियम’ म्हणून गौरव करण्यात आला. 

५५. ‘मि. इंडिया’ या चित्रपटाची कथा अमिताभ यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिण्यात आली होती.  शशि कपूर यांचा ‘उत्सव’ आणि राकेश रोशनचा ‘किंग अंकल’ ही अमिताभसाठीच लिहिण्यात आले होते.

५६. त्यांच्या मते वहिदा रेहमान ही हिंदी चित्रपटातील सर्वांत सुंदर अभिनेत्री आहे. 

५७. नव्वदीच्या अखेरीस ‘मृत्युदाता’ या चित्रपटातून दुसऱ्यांदा कमबॅक केल्यानंतर अमिताभ यांना ‘बिग बी’ हे टोपण नाव देण्यात आले. 

५८. लंडनच्या मदाम तुसाँ संग्रहालयात २००१मध्ये अमिताभ यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आले. येथे स्थान पटकावणारे ते हिंदी सिनेसृष्टीतील पहिले अभिनेते आहेत. 

५९. रेखा, परवीन बॉबी आणि झीनत अमान या अमिताभसमवेत सर्वाधिक चित्रपटात नायिका म्हणून झळकल्या. सायरा बानो (हेराफेरी १९७६), मुमताज (बंधे हात १९७३), नुतन (सौदागर १९७३), रती अग्निहोत्री (कुली १९८३) यांनी फक्त एकाच चित्रपटात अमिताभसमवेत काम केले.

६०. यश चोप्रा दिग्दर्शित कभी कभी या मल्टिस्टारर चित्रपटांचे जवळपास सगळे शुटिंग काश्मिरमध्ये महिनाभरातच पूर्ण करण्यात आले होते. 

६१. सत्ते पे सत्ते मधील ‘अॅन्टी हिरो’ ची भूमिका करताना अमिताभ यांनी लेन्सचा वापर केला होता. या लेन्स घालताना आणि काढताना प्रचंड त्रास होत असे. 

६२. सुमारे १८ चित्रपटात अमिताभचा मृत्यु दाखवण्यात आला आहे. 

६३. युनिसेफ, पेटा, सेव दी टायगर, स्वच्छता अभियान अशा अनेक सामाजिक प्रकल्पांसाठी अमिताभ सदीच्छा दूत म्हणून काम करतात. 

६४. अनेक सुपर हिट चित्रपट देणारे सुभाष घई आणि अमिताभ अद्यापही एकत्र आलेले नाही. ‘देवा’ नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली. पण त्याची पुढे प्रगती झाली नाही. 

६५. अमिताभ आणि अमिरखान ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. 

६६. दर रविवारी अमिताभ त्यांच्या ‘जलसा’ या घराबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन करतात. गेल्या ३५ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.  

६७. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ यांनी अंधा कानुन, गिरफ्तारसारख्या मोजक्या चित्रपटात एकत्रित काम केले. गिरफ्तारमध्ये कमल हसनही होता. 

६८. १९७८ मध्ये एकाच महिन्यात अमिताभ यांचे त्रिशुल, डॉन, कस्मे वादे, बेईमान प्रदर्शित झाले. सगळेच हाऊसफुल्ल होते 

६९. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अमिताभ यांचे अलहाबाद येथे अभुतपूर्व स्वागत करण्यात आले. नव्या कोऱ्या साड्या पायघड्या म्हणून वापरण्यात आल्या होत्या. 

७०. अमिताभ यांच्या पडद्यावरील आईची भूमिका सर्वाधिक वेळा निरुपा रॉय यांनी केली. 

७१. अनेक फ्लॉप चित्रपट नंतर हा शेहनशाहही निराश झाला. एका रात्री ते  यश चोप्रांकडे गेला आणि एखादा चित्रपट देण्याची विनंती केली. त्यानंतर ‘मोहब्बते’ तयार झाला. गुरुकुलच्या अत्यंत कडक मात्र तितक्याच हळव्या प्रमुखाच्या भूमिकेत अमिताभशिवाय कोणीही शक्य नव्हता. 

७२. वक्तशिरपणाचे दुसरे नाव अमिताभ. शुटिंग सकाळी सात असेल तर हा शेहनशाह ६.४५ ला हजर. मग सेटवर कोणी असो किंवा नसो. 

७३. चित्रपटांसाठी अमिताभचा पहिला फोटोशुट त्यांचा मोठा भाऊ अजिताभ यांनी केले. 

७४. अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन यांनाही अभिनाची आवड होते. पण कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना हे शक्य झाले. मग त्यांनी अमिताभला प्रोत्साहन दिले. 

७५. अमिताभ नायक असलेले सुप्रिमो नावाचे कॉमिक्सही प्रकाशित झाले होते.
संकलन  : मुकुंद फडके, केदार प्रभुणे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...