फॉलोअर

२९ जून २०१७

मॅनेजमेंट गुरू... माऊली पालखी सोहळा


माळशिरस : सतीश मोरे

पंढरीचा वारकरी।
वारी चुकोनेदी हरी।।

पंढरीची वारी कशी सुरू होते.. कशी चालते, वारकऱ्यांना  कोण निमंत्रण पाठवतं? लाखो वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय कोण करतं? कसं चालतं हे सगळं..! कुणाची तक्रार नाही.. कोणाचा वाद नाही.. कोणी मोठा नाही.. कोणी लहान नाही. कोण कोणाला नाव विचारत नाही, जात विचारत नाही. सगळेजण फक्त एकाच ध्यासाने, एका दिशेने सलग अठरा दिवस ऊन, वारा, पाऊस याची कदर न करता कसे चालतात. त्यांना ही शक्ती कोठून मिळते? हे सगळंच एक न उलगडणारं कोडं आहे ! जगातील कोणत्याही देशात.. कोणत्याही धर्मात अशा प्रकाची सतत अठरा दिवस चालणारी धार्मिक यात्रा नाही. वारकरी हे कसं घडवून करतात? हा सर्व संशोधनाचा विषय आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरु तुकोबा महाराज पालखी सोहळा या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच राज्यभरातील शंभरहून अधिक गावांतून येणाऱ्या  विविध  संतांच्या नावाच्या पालख्या आणि सुमारे पाच हजार गावांतून येणाऱ्या लहान-मोठ्या दिंड्या यांचे नियोजन हा अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. हे सर्व घडवून आणणारा वारकरी माऊली हा सर्वश्रेष्ठ "मॅनेजमेंट गुरु' आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे  सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. प्रस्थानाअगोदर दोन-तीन महिने दिंडी प्रमुखाच्या नेतृत्चाखाली तयारी सुरु होते. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येनुसार राहण्याची सोय, तंबू, भोजन,  वाहतूक याची तयारी केली जाते. सर्व संच एकत्र करून वारकऱ्यांना घेऊन  वाहने  आळंदी, देहुत पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी  या दिंड्यांतील वारकरी आळंदी, देहुतील मठामध्ये किंवा खासगी जागेत कुठेही मुक्काम करतात. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. पुण्यनगरीत माऊली भक्तांच्या सेवेसाठी महानगरातील अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कार्यरत असतात. पुण्यात वारकऱ्यांच्या निवासाची सोय शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा येथे केली जाते. अनेक वारकरी  मिळेल तेथे  निवास करतात. अलिकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनेक अपार्टमेंटस्‌च्या बेसमेंटमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली जाते. पुणे शहर सोडून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात आणि त्यानंतर येणाऱ्या सासवड आणि लोणी काळभोर येथील मुक्कामाच्या ठिकाणापासून खऱ्या अर्थाने  वारीचे अचूक मॅनेजमेंट पहायला मिळते.

पालखी सोहळा सकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतो आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारण 6 ते 8 किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो. पहिल्या विसाव्यानंतर पुढे तेवढेच अंतर पार पडल्यानंतर  दुपारी 12 च्या सुमारास जेवणासाठी सोहळा विसावतो. एक तासानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ होतो. सायंकाळी चारच्या सुमारास आणखी एका ठिकाणी विसावा घेतला जातो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचतो.  वारकरी सकाळी 7 वाजता चालावयास सुरूवात करतात. "ज्ञानेश्वर माऊली तुकाराम', "राम कृष्ण हरी..' च्या जयघोषात भजनाच्या तालावर टाळ वाजवत वारकरी चालत असतात. प्रत्येक दिंडीच्या सुरुवातीला झेंडेकरी, त्या पाठोपाठ वीणेकरी. सोबत तुलशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेली महिला वारकरी अन्‌ त्यांच्या पाठोपाठ तीन किंवा चारच्या ओळीत टाळकरी  आणि शेवटी  चोपदार अशी प्रत्येक दिंडीतील व्यवस्था असते. शिस्तबद्ध सोहळ्यातील वारकरी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाहीत. एकदा चालावयास सुरूवात केल्यानंतर जोपर्यंत माऊलींचा रथ थांबत नाही तोपर्यंत कोणतीही दिंडी मध्ये थांबतच नाही. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक गावांत रस्त्याकडेला सुविधा उपलब्ध  करून दिल्या जातात, मात्र माऊली सोहळ्यातील कोणताही वारकरी ओळ सोडून  कधीही त्या सेवेचा लाभ घ्यायला जात नाहीत. दिंडीत कोणीही बाहेरचा व्यक्ती येऊ शकत नाही. चोपदार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात.

एकिकडे सोहळ्यातील दिंड्या सकाळी मार्गक्रमण करतात. तर दुसरीकडे या दिंड्यांत सहभागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात झटत असतात. दिंडीत सहभागी वारकरी आणि सेवेकरी यांची लगबग पहाटे तीन वाजता सुरू होते. प्रात:विधी आणि अंघोळ आटोपून सोहळ्यात प्रत्यक्ष चालणारे वारकरी पहाटे चार वाजेपर्यंतच तयार होतात. या दरम्यान पालखी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले सर्व तंबू काढले जातात. तंबुचे सर्व साहित्य तसेच वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, पिशव्या ट्रक,जीप, टेम्पोमध्ये ठेवले जाते. ही वाहने चारच्या सुमारास पुढील मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहन असते.  या वाहनात स्वयंपाकी तसेच सेवेकरी महिला आदी लोक बसतात. हे वाहन दुपारच्या नियोजित भोजन ठिकाणी मार्गस्थ होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिंड्या सहभागी होत आहेत त्या सर्व दिंड्यांचे दुपारचे भोजनाचे ठिकाण अनेक वर्षांपासून एकच आहे. ठरलेल्या ठिकाणीच हे वाहन थांबते. हे वाहन सकाळी सातच्या सुमारास नियोजित ठिकाणी पोहोचते. त्यानंतर त्यामधील सेवेकरी नित्यक्रम आटोपून लगेच भोजन तयार करण्याच्या तयारीस लागतात. या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणता स्वयंपाक करायचा याचेही नियोजन ठरलेले असते. अनेक दिंड्यांमध्ये तर भोजनाचा मेनूही वर्षानुवर्षे एकच आहे. (कराडकर 12 नंबर दिंडीच्या लोणंद मुक्कामी दुपारच्या जेवणात गुलाबजामून असतेच. तर तोंडले-बोंडले येथे दुपारच्या जेवणात वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून चकुल्यांचा स्वाद घेतात.) दुपारी 12 वाजता दिंडीत चालणारे वारकरी ठरलेल्या ठिकाणी येतात. या वारकऱ्यांची पहिली पंगत होते. त्यानंतर इतर वारकरी, सेवेकरी मोकळ्या समाजातून चालणारे वारकरी यांची दुसरी पंगत होते. भोजनानंतर वारकरी थोडावेळ विसावा घेतात. नगारा वाजल्यानंतर लगेच पालखीच्या पुढे किंवा मागे नेमून दिलेल्या जागेवर आपल्या दिंडीमध्ये जातात. दुपारच्या भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर भोजन वाहतुकीचे वाहन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. थोडावेळ आराम केल्यानंतर पुन्हा पाच वाजता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. भोजन व्यवस्थेमध्ये (दिंडीतील वारकरी संख्येनुसार) 10 ते 20 जण कार्यरत असतात. अनेक पंगतींसाठी दानशूर लोकांनी धान्य, तेल, साखर आदी वस्तूरुपात मदत दिलेली असते. दिंडीत कितीही लोक आले तरी कोणालाही अन्न कमी पडत नाही. वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रत्येक दिंडी मालकाने तंबुची सोय केलेली असते. तंबुचे सर्व साहित्य, लोखंडी ऍंगल, ताडपत्री, मेका यांचे (राहुटी) नियोजन प्रत्येक दिंडी मालकाने अनेक वर्षांपासून करून ठेवलेले आहे.

एका तंबुमध्ये 20 ते 30 वारकरी राहू शकतात. त्यानुसार प्रत्येक दिंडीत 15 ते 50 इतके तंबू  (राहुट्या) असतात. हे सर्व साहित्य घेऊन वाहन
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. प्रत्येक गावातील माऊलींच्या पालखीचे मुक्कामाचे ठिकाण गेल्या अनेक वर्षांपासून निश्चित आहे. निश्चित जागेवरच पालखीतळ उभारला जातो. पालखीतळापासून प्रत्येक दिंडीचा मुक्काम कोणत्या ठिकाणी असावा, ती जागा सुद्धा अनेक वर्षांपासून एकच आहे. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या जागा ओळखीच्या झाल्या आहेत. कमी जागेत अनेक दिंड्या आपले तंबू उभारतात. या तंबुंची दिशा, जागा हे सुद्धा निश्चित आहे. साहित्य घेऊन आलेला ट्रक मध्यभागी एका विशिष्ट ठिकाणी उभा केला जातो. या ट्रकच्या एका बाजूला भोजन तयार करण्यासाठी ताडपत्री सोडून जागा तयार केली जाते. ही ताडपत्री त्या ट्रकला बांधलेली असते. ताडपत्रीच्या दोऱ्या ताणून बांबुला बांधून तेथे भोजनाचे साहित्य ठेवले जाते. भोजन कक्ष (किचन) तयार झाल्यानंतर  सेवेकरी तंबू उभारण्याच्या कामाला लागतात. दुपारी 12-1 पर्यंत पालखी तळावर अनेक दिंड्यांचे तंबू तयार झालेले असतात.

सायंकाळी सातच्या सुमारास सोहळ्यातील वारकरी आपल्या ठरवून दिलेल्या तंबुमध्ये मुक्कामाला जातात. संध्याकाळी 7 ते पहाटे 3 पर्यंत या वारकऱ्यांसाठी हेच घर असते. पहाटे तीन वाजता सर्व तंबू पुन्हा काढले जातात. साहित्य ट्रकात भरले जाते आणि ही वाहने पुढच्या मुक्कामाला पोहोचतात.

गेली अनेक वर्षे माऊली पालखी सोहळा सुुरु आहे. सर्व नियोजन अखंडपणे  सुरु आहे. कोणी आला किंवा आला नाही म्हणून दिंडी सोहळा कधीच थांबलेला नाही. हा सोहळा अविरत सुरु राहण्यासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही, निमंत्रण नाही, सांगावा नाही. प्रलोभन नाही, फी नाही, कसलाही बंदोबस्त नाही. निधी मिळण्यासाठी कोणाकडे हात पसरायला जावे लागत नाही. तरीही हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत असतो. हे सर्व कोठून येते, कोण करते हे माऊलींच्या विश्वासावर टाकले जाते. सुमारे चार लाख लोक रोज या गावाहून त्या गावाकडे चालत राहतात. पुढच्या गावात मुक्काम करतात. तिथे मांडलेला संसार मोडून पुन्हा पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. कोणालाही काहीच कमी पडत नाही. कोणीच उपाशी रहात नाही. कोणीच आजारी पडत नाही. कसलीही अडचण आली तरी मदतीसाठी अनेक हात धावून येतात. रहायला, झोपायला , खायला कसलीच अडचण येत नाही. निश्ंिचत होऊन पुढे चालत रहायचे. माऊलींनी सगळी सोय केलेली असते. स्वर्गलोकात सुद्धा असा सोहळा पहायला मिळत नाही. असा सोहळा पाहण्यासाठी देवांनासुद्धा पृथ्वीतलावरच यावे लागले आहे, अशी वारकरी समाजाची धारणा आहे. माऊली पालखी सोहळ्याविषयी कितीही लिहीले तरी कागद अपुराच पडणार आहे. असा हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातून अनेक लोक वारीत सहभागी होत आहेत. मॅनेजमेंट गुरु माऊली पालखी सोहळा हे जगासाठी नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे.

या सुखाकारणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडोनू वारीसी आला ।।

१८ जून २०१७

Father's day spesial

🌹👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻🌹
➖➖➖➖➖➖➖➖
*☑जागतिक पितृदिन*
*Happy Father's day*
➖➖➖➖➖➖➖➖
_मे महिन्याच्या दुसरा रविवार मातृदिन Mother's day म्हणून साजरा करतात तर....._

*जून चा तिसरा रविवार पितृदिन Father's day म्हणून साजरा केला जातो....*

*▪तो एक बाप असतो...*

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो, कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो, डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...
🔲🔲🔲
शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं, कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं, हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं, बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...
🔲🔲🔲
सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात, एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात, ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात, माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्या गाजत असतात...
🔲🔲🔲
परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्या, आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात, नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...
🔲🔲🔲
नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात, एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात, दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं, नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं... नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
🔲🔲🔲
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो, पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान... रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो, त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...
🔲🔲🔲
कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं, भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं, दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो, हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो... डोक्यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो, दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो, घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो, आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...
🔲🔲🔲
बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही, बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन् शोधू लागतात क्षितिजं नवी बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी... पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं, अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
🔲🔲🔲
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो, खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो... सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं, बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं, आकाशाहून भव्य अन् सागराची खोली असते बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...
🔲🔲🔲
कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय, बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार? असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही, म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही... करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही, चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही, सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही, बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही... केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा, जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
🔲🔲🔲
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही, आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही... सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
🔲🔲🔲
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्वास हवा, बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं, ते समजून घेण्यासाठी बापंच असणं भाग असतं...
➖➖➖➖➖➖➖➖
🌹👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻🌹

१४ जून २०१७

14 जुन रक्तदान दिन

🅰🅱🆎🅾💉🅾🆎🅱🅰
〰〰〰〰〰〰〰〰〰
*☑१४ जून .......*
*जागतिक रक्तदाता दिन....*
*रक्तदान श्रेष्ठदान ..जीवनदान ...*
*रक्तदाता सुखी भव...!!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
_*आज १४ जून. ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लॅडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला, जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगात साजरा होता.*_
🔲🔲🔲
प्रत्येक वर्षी एक सूत्र घेऊन हा दिवस साजरा केला जातो. माता सुरक्षा, रक्तदान श्रेष्ठ दान, डोनेट प्लेटलेटस् यासारखे सूत्र घेऊन त्याची माहिती दिली जाते, रक्तदानाचे आवाहन केले जाते. अटीतटीच्या वेळी रक्ताची गरज पूर्ण करणारे रक्तदाते नसते तर पुनर्जन्म मिळालाही नसता, हे एक प्रकारे रक्तऋणच आहे जे गरजू व्यक्तीला प्रत्यक्ष जगण्यामरण्याच्या रेषेवरून परत आणू शकते.
🔲🔲🔲

*🔺रक्तदानाविषयीची माहिती प्रश्न शंका आणि निरसन.....*

मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.
🔲🔲🔲
आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.डोळ्याला न दिसणारया अणुरेणुंपासुन,समुद्राच्या तळापासुन,आकाशगंगेतील नवीन ग्रहांपासुन ते पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गो्ष्टींचा उलगडा आपल्याला हया विज्ञानाने करुन दिला पण आपल्या अगदी जवळच्या आणि अविरत कार्य करणारया एका यंत्राचे-मानवी शरीराचे गुढ अजुन विज्ञानाला पुरेसे उलगडता आलेले नाही.
🔲🔲🔲
*आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत राहील आहे.हयामुळेच अपघातामुळे , आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते,आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर रक्तदानाला विशेष महत्व आहे*
🔲🔲🔲
दर २ सेकंदांनी कोणा ना कोणा व्यक्तीला रक्ताची गरज भासते. तुमच्या रक्तामुळे एकाच वेळी अनेकजणांचे प्राण वाचू शकतात. अपघात झालेल्या व्यक्ती, वेळेआधीच जन्मलेली बालके, मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणारे रुग्ण यांना पूर्ण रक्ताची गरज असते जिथे तुमच्या रक्ताची आवश्यक ती तपासणी झाल्यावर ते रक्त थेट वापरले जाते. अपघात, रक्तक्षय किंवा इतर काही शस्त्रक्रियांनी त्रस्त असणा-या व्यक्तींना मुख्यत्वे केवळ लाल रक्तपेशींची गरज असते ज्या तुमच्या रक्तातून वेगळ्या केल्या जातात. रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते. आपल्या आयुष्यात काही वेळा रक्त भरण्याची गरज लागू शकते.
🔲🔲🔲
▪कधीकधी अचानक रक्तस्राव होतो. शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्राव, अपघात, इ. प्रसंगात बाहेरून रक्त देण्याची गरज निर्माण होते.
▪जास्त प्रमाणात रक्तपांढरी असेल तर रक्त भरावे लागते.
▪रक्ताचा कर्करोग, सर्पदंशातील रक्तस्राव, इत्यादी प्रसंगीही रक्त द्यावे लागते.
▪एखादा आटोक्यात न येणारा जंतुदोषही योग्यायोग्यविचार करून रक्त दिल्यावर आटोक्यात येऊ शकतो.
▪हिमोफिलिया व थॅलसीमिया या आजारात वारंवार रक्त भरावे लागते.
🔲🔲🔲
रक्तदान हे या दृष्टीने खरेच जीवदान आहे.रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी रक्तद्रव्याचे प्रमाण निदान 10 ग्रॅम च्या वर असावे. तसेच गेल्या सहा महिन्यांत कावीळ किंवा विषमज्वर झालेला नसावा. एड्स व सांसर्गिक आजार नाही याची खात्री करावी लागते. मात्र तरीही एड्सचा धोका पूर्णपणे टळत नाही. यानंतर अशा व्यक्तीचे सुमारे 250-350 मि.ली. रक्त काढून घेतले जाते. लगेच गरज नसेल तर ते 4 सेंटीग्रेड तपमानात थंड ठेवले जाते. गरज पडेल तेव्हा हे रक्त शरीराच्या तपमानाच्या जवळ आणून योग्य गटाच्या व्यक्तीला देण्यात येते.
🔲🔲🔲
रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात फार भीती आहे. पण ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी बरेच नातेवाईक रक्तदानास घाबरतात. अपरिचित व्यक्तीकडून रक्तदानातून काही सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता असते. (कावीळ, एड्स, इ.) या धोक्यामुळे आता व्यावसायिक रक्तदात्यांकडून रक्त घेतले जात नाही. आता रक्तदान शिबिरातून रक्त गोळा केले जाते.रक्तदानानंतर त्यातले काही रक्त घटक वेगळे केले जातात. काही रुग्णांना पूर्ण रक्त देण्याऐवजी विशिष्ट घटक द्यावे लागतात. याला इंग्रजीत कंपोनंटस् असे नाव आहे.
🔲🔲🔲
_पुढीलप्रमाणे घटक वेगळे केले जातात. – तांबडया रक्तपेशी, ग्रॅन्युलोसाईट (पांढ-या पेशी), प्लाझ्मा, प्लेटलेट्स (रक्तकणिका)._
🔲🔲🔲

*🔺रक्तदानासाठी काही सूचना:-*

▪रक्तदान करण्यापूर्वी किमान ३ तास आधी पोटभर जेवून घ्यावे.
▪रक्तदान झाल्यावर तुम्हाला दिलेला नाश्ता खा. नंतर व्यवस्थित जेवा.
▪रक्तदानाच्या एक दिवस आधी धूम्रपान करणे थांबवा.
▪रक्तदानाच्या ४८ तास आधी जर तुम्ही मद्य घेतले असेल तर तुम्ही रक्तदान करू शकणार नाही.
🔲🔲🔲

*🔺रक्‍तगट (ब्लडग्रुप) म्हणजे काय?*

जर सर्वच माणसांचे रक्‍त लाल असते तर त्यात फरक का असतो? तर हा फरक असतो रक्‍ताच्या गुणधर्मातील फरकामुळे. रक्‍ताची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्‍त प्रमुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढर्‍या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याच प्रमाणे रक्‍तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात. या ऍण्टीजनच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए, एबी, बी, आणि ओ असे चार प्रमुख गट असून आर एच पॉझिटिव्ह व आर एच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट. रक्‍तातील आर एच हे सुध्दा एक प्रोटीनच, ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आर एच पॉझिटिव्ह व नसणार्‍अयांना आर एच निगेटिव्ह म्हणतात. रक्‍तगट अनुवंशिक नसतात. त्यामूळे भावा- बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
‘ओ’ राक्‍तगटाचे रक्‍त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्‍तगटाच्या व्यक्‍तींना ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये ‘ओ’ रक्‍तगटाचे वर्चस्व असून या रक्‍तगटाची एकूण टक्‍केवारी ४६ टक्‍के आढळून येते. निगेटिव्ह रक्‍तगट दुर्मिळ असतात, त्यात एबी निगेटिव्ह रक्‍तगट तर पाच हजार3 व्यक्‍तींमध्ये एकाचा असतो. रक्‍तचढविण्या आधी रुग्णाचा रक्‍तगट आणि रक्‍तदात्याचा रक्‍तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.
🔲🔲🔲

*🔺रक्‍तदान कोणी करावे व कसे?*

रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.
▪1]त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.
▪2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.
▪3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.
▪4]रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.
▪5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
▪6]रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.
🔲🔲🔲
रक्‍तदात्याच्या रक्‍तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचणी द्वारा योग्य ठरवलेले रक्‍तच रुग्णासाठी वापरले जाते.
निरोगी रक्‍तदात्याचे समगटाचे रक्‍त व रुग्णाचे रक्‍त यांच्यामध्ये क्रॉस मॅचिंगच्या चाचण्या केल्या जातात. मेजर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याच्या लालपेशी रुग्णाच्या प्लाझ्मा (रक्‍तातील द्रव) बरोबर, तर मायनर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याचा प्लाझ्मा रुग्णाच्या लालपेशींबरोबर मिसळला जातो. क्रॉसमॅचिंगमधील दोन्ही नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात. सुदृढ मनुष्याच्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्‍त वहात असते. रक्‍तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्‍त घेतले जाते. पुढील ४८ तासात संपूर्ण रक्‍त व रक्‍तघटक पूर्ववत भरपाई शरीरात होते. रक्‍तदानानंतर ताबडतोब नेहमीचे कामकाज करु शकतो.
🔲🔲🔲
_रक्‍तदानाविषयी कोणताही भयगंड न बाळगता प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने निरपेक्ष रक्‍तदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.निरोगी रक्‍तदाता दर तीन महिन्यांनी रक्‍तदान करु शकतो. मात्र एका व्यक्‍तीने १०० वेळा रक्‍तदान करण्यापेक्षा १०० व्यक्‍तींनी दरवर्षी एकदा रक्‍तदान केले तर जास्त उपयुक्‍त ठरते. कारण या १०० व्यक्‍तींनी त्यांच्या आयुष्यात (त्यांनी २५ ते ४० वेळा रक्‍तदान केले तर) २५०० ते ४००० बाटल्या रक्‍त देऊ शकतील._
🔲🔲🔲
*वाढदिवसाला रक्‍तदान करायला हवे हा संदेश समाजात रुजला तर आपल्या देशात कधीही रक्‍ताची चणचण भासणार नाही.*

*🔺रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी*

व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
▪रक्तदानानंतर कमीत कमी ४ तास धुम्रपान करू नये.
▪कमीत कमी २४ तासांपर्यंत कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
▪रक्तदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी घेणे.
▪रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये व अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे.
▪रक्तदानाच्या दिवशी भरगच्च पोटभरून जेवण करू नये. हलक्या स्वरूपाच्या पदार्थाचे सेवन करावे.
▪रक्तदानाच्या दिवशी गोड आणि मांसाहार अन्नाचे सेवन करू नये.
▪हातावर व शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे. उदा. क्रिकेट, व्यायाम, गिर्यारोहण, मैदानी खेळ, इ.
▪रक्त काढलेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास हात वर करून त्यावर दाब द्या.
▪रक्तदात्यास चक्कर अथवा अंधारी येत आहे असे वाटल्यास झोपावे व पायाखाली उशी ठेवावी. तसेच शिबीरातील डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.
▪रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास त्वरित रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.
🔲🔲🔲
रक्तदानादरम्यान आणि रक्तदानानंतर रक्तदात्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
🔲🔲🔲

*🔺रक्तदानासंबंधी काही गैरसमज:-*

▪रक्तदान केल्यानंतर मला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटेल:❓
➡जर तुम्ही द्रव पदार्थ आणि योग्य आहार घेतला तर तुम्हाला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटणार नाही.

▪मी पुन्हा कामावर जाऊ शकत नाही:❓
➡तुम्हाला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले तरी तुम्ही कामावर जाऊ शकता.

▪माझे रक्त कमी होईल:❓
➡जर डॉक्टरांनी तुम्हाला रक्त दान करण्यास परवानगी दिली असेल तर रक्तदान केल्यानंतरही तुमच्या शरीरात पुरेसे रक्त उपलब्ध असते.

▪मी मद्य घेऊ शकत नाही:❓
➡तुम्ही दुस-या दिवशी घेऊ शकता.

▪रक्तदान करताना त्रास होतो❓
➡तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

मला चक्कर येईल आणि गरगरायला होइल:❓
➡रक्तदान केल्यानंतर तुम्हाला असे काहीही होणार नाही.

▪HIV ची भीती आहे का!:❓
➡नाही! डिस्पोझेबल सुया वापरल्या जात आहेत आणि निर्जंतुकीकरणाच्या सर्व पद्धती वापरल्या जात आहेत याची खात्री करा.

▪माझे रक्त सामान्य आहे. मला नाही वाटत त्याला काही मागणी असेल!:❓
➡म्हणूनच तुमच्या रक्ताची मागणी दुर्मिळ रक्तगटापेक्षा जास्त आहे.
🔲🔲🔲

*🔺रक्ताविषयी काही सत्ये:-*

▪रक्त हा जीवनचक्र चालू ठेवणारा द्रवपदार्थ आहे ज्याचे शरीराच्या हृदयातून, शिरा, धमन्यांमधुन अभिसरण होत असते.

▪रक्ताद्वारे शरीराला पोषकद्रव्ये, इलेक्ट्रोलाइट्स, हार्मोन्स, जीवनसत्त्वे, ऍण्टीबॉडीज, उष्णता, ऑक्सीजन पुरविला जातो.

▪रक्त शरीरातून निरुपयोगी पदार्थ आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकण्यास मदत करते.

▪रक्त जंतुसंसर्गाशी लढते आणि जखमा ब-या करण्यास मदत करुन आपल्याला निरोगी ठेवते.

▪रक्त आपल्या एकुण वजनाच्या ७% असते.

▪नवजात बालकाच्या शरीरात सुमारे १ कप रक्त असते.

▪रक्तातील पांढ-या पेशी शरीरातील जंतुसंसर्गावर सर्वप्रथम हल्ला चढवतात.

▪ग्रॅन्युलोसाइट्स नावाच्या पांढ-या रक्तपेशी रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांशी असतात. त्या विषाणू शोधतात आणि त्यांना नष्ट करतात.

▪लाल रक्तपेशी शरीराच्या अवयवांना आणि उतींना रक्तपुरवठा करतात.

▪रक्ताच्या दोन-तीन थेंबामध्ये जवळपास एक अब्ज लाल रक्तपेशी असतात.

▪लाल रक्तपेशी अभिसरण प्रक्रियेमध्ये १२० दिवस जगतात.

▪रक्तकणिकांमुळे जखम भरुन येण्यास मदत होते आणि रक्ताच्या किंवा इतर कर्करोगाने आजारी असणा-या व्यक्तींना जीवन पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळते.
🔲🔲🔲

*🔺रक्तदान का करावे?*

सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात
🔲🔲🔲

*🔺रक्‍तदानामुळे होणारे फायदे.*

▪1]रक्‍तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्‍त प्राप्त करणर्‍या व्यक्‍तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्‍तदान करणार्‍यालाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्‍तदानामुळे तुमच्या रक्‍ताची नियमितपणे तपासणी होते.
▪2]रक्‍तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्‍तगट कळू शकतो. कारण रक्‍तदानाचे कार्ड दिले जाते. त्यावर हा रक्‍तगट लिहिलेला असतो.
▪3]रक्‍तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्‍त लवण (मीठ) रक्‍तदानाद्वारे निघून जाते.
▪4]रक्‍तदान करणार्‍यांना जे रक्‍तदाता कार्ड मिळते त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्‍त मिळु शकते.
〰〰〰〰〰〰〰〰〰
🅰🅱🆎🅾💉🅾🆎🅱🅰

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...