फॉलोअर

10 bridges on koyna river लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
10 bridges on koyna river लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ जून २०१८

कोयना नदीवरील १० पुल

कोयना नदीवरील १० पुल

कराड ते कोयनानगर ५६ किलोमीटर अंतर .महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजले जाणारे कोयना धरण सर्वासाठी संजीवनी आहे.

कोयनानगर ते कराड 55 किलोमीटरच्या अंतरात एकूण दहा पूल कोयना नदीवर आहेत. यापैकी कराडजवळचा एक पुल इंग्रज सरकारने बांधला आहे. तर उर्वरित ९ पुल स्वातंत्रोत्तर काळातील आहेत. हे पूल म्हणजे कृष्णा कोयना तीरावरील शेकडो गावे आणि खोऱ्यांना जोडणार्या रक्तवाहिन्या आहेत.

१. कोयनानगरमध्ये कोयना धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती करून किंवा थेट पाणी सोडल्यानंतर  धरणाच्या खालील बाजूस असणारा पहिला कोयना पुल.

२.धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याखाली जाणारा संगमनगर धक्का फुल सर्वांनाच माहित आहे. या पुलाशेजारी आता मोठा उंचीचा नवीन पूल बांधण्यात आला आहे. याप्रसंगी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने प्रयत्न केला होता

३.
तिथूनच पुढे सहा किलोमीटर अंतरावर मणेरी पुल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकताच बांधून पुर्ण झाला आहे.

४.
पुढे नवारस्ता मरळी कारखाना दरम्यान कोयना नदीवर सांगवडचा जुना पूल आहे.

५.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सेंट्रल रिलीफ फंड मधून बांधलेला कोयनेवरील पाचवा निसरे पुल आहे.

६.
कराड तालुक्यात कोयना नदीने प्रवेश केल्यानंतर तांबवे येथे कोयना नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

७. 
तेथूनच पुढे चार किलोमीटर अंतरावर सुपने आणि किरपे या गावांना जोडणारा नवीन एक पूल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून गतवर्षी बांधून झालेला आहे.

८ आणि ९.

कराड शहराजवळच कोयनेवर नवा आणि जुना कोयना पुल   आहे.असे नऊ पुल कोयना नदीवर आहेत.

१०.
ब्रिटिश सरकारने बांधलेला आणि आता नुतनीकरण सुरु असलेला दहावा कोयना पुल आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...