फॉलोअर

२५ मार्च २०१४

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत हेलिकॉप्टर प्रवास

आठवण २५ मार्च २०१४ ची

राष्ट्रीय प्रवाहात राहिल्यामुळेच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत अनेकांना उच्च पदावर नेले आहे. माझे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमलाचाई चव्हाण याचा  वारसा पुढे चालवत असताना गेल्या 50 वर्षात आम्ही राष्ट्रीय प्रवाहातच राहणे पसंत केले आहे. राष्ट्रीय प्रवाहात र मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो आहे, असे नम्रपूर्वक सांगत राज्यात 1991 प्रमाणे परिस्थिती असल्यामुळे राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉंग्रेस यांची आघाडी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दै. पुढारी प्रतिनिधीला खास हेलिकॉप्टरमध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीत व्य्नत केला. 

कराड ते अंबेगाव (शिरुर) या दरम्यानच्या हेलिकॉप्टरमधील 50 मिनिटांच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगताना आजपर्यंतच्या वाटचालीबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. कराड लोकसभा मतदारसंघातून लढविलेल्या निवडणुकांचे अनुभव त्यांनी सांगितले. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यानिमित्ताने मुख्यमंत्री सातारा, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. अर्ज भरल्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्यांनी कराड येथील मलकापूरचे माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या फार्महाऊसवर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची खासगी बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी कराडहून पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी दै.‘पुढारी’ प्रतिनिधींना खास हेलिकॉप्टरमधून प्रवासाचे निमंत्रण देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. 

कराड ही माझी कर्मभूमी आहे. 1991 साली स्व.राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर मी राजकारणात आलो. वास्तविक कराड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय विचारांचा आहे. या मतदारसंघातील जनतेने कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, यशवंतराव मोहिते यांच्यासारख्या दिग्गजांना या मतदारसंघातील जनतेने विक्रमी मताने निवडून दिले आहे. याच मतदारसंघातून राजीव गांधी यांनी लोेकसभेची निवडणूक लढवावी असा प्रेमलाकाकींचा आग्रह होता. या आग्रहावर काकी शेवटपर्यंत हाटून बसल्या होत्या. मात्र, राजीव गांधींनी या मतदारसंघातून मला संधी दिली. त्यानंतर राजीवजींची चेन्नई येथे हत्या झाल्यानंतर ही निवडणूक काही दिवस पुढे ढकलली. या निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. माझ्या पहिल्याच निवडणुकीत शिराळा, वाळवा तालु्नयातील जनतेने मला भरभरून मते दिली. त्यांच्यामुळेच माझी कारकिर्द यशस्वीपणे सुरू झाली. या जनतेच्या ऋणात राहणे मी सदैव पसंत करेन अशी कृतज्ञताही त्यांनी व्य्नत केली. 

आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी यांच्यापासून आमचे राष्ट्रीय प्रवाहात राहिले. सुरूवातीच्या काळात शेकापच्या माध्यमातून माझ्या वडीलांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विचाराची पाठराखण केली. कॉंग्रेस पक्षासाठी योगदान दिले. त्यांच्या पश्चात काकीसाहेबांनी सुद्धा कॉंंग्रेसच्या प्रवाहात राहून राष्ट्रीय विचाराची पाठराखण केली. 1991 मध्ये राजकारणात आल्यानंतर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात काम करताना देश पातळीवरील बदलत्या अनेक घडामोडींचा मला अभ्यास करता आला. कॉंग्रेस पक्षामुळेच मला मोठमोठ्या संधी मिळत गेल्या. राष्ट्रीय प्रवाहात राहण्याचे अनेक फायदे असतात. श्रीमती सोनिया गांधी यांच्या विचाराचा पक्षाला फायदा झाला आहे. राष्ट्रीय प्रवाहाची आणि कॉंग्रेस पक्षाशी मी प्रामाणिक राहिल्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आणि त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली असल्याचे सांगण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. 

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात कॉंंग्रेस व राष्ट्रवादीची परिस्थिती अतिशय मजबुत आहे. सातारा, कोल्हापूरसह सांगलीत पदाधिकाऱ्यांमध्ये काही मतभेद असले तरी समान मुद्यावर आम्ही एकत्र आहोत. माढ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोणीही कॉंग्रेसचा कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही. हातकणंगले मतदारसंघात माझ्या पूर्वीच्या कराड मतदारसंघातील दोन तालु्नयाचा समावेश आहे. या जनतेला अनेक वर्षानंतर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याची संधी आली आहे. मला जसे भरभरून मतदान दिले तसे कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही मिळेल असा विश्वास त्यांनी व्य्नत केला. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी कोट्यवधी रूपयांची विकासकामे दिलेली आहेत. जिल्ह्यात विकासाचा बॅकलॉग राहणार नाही. कराड-पाटण भागासाठी खूप कामे दिली आहेत मात्र ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने व्हायला पाहिजेत. यंत्रणा कमी पडत असली तरी जनतेला कामे चांगल्या पद्धतीने झालेली पहायला आवडतात असा आशावाद त्यांनी व्य्नत केला.

देशात नरेंंद्र मोदींची लाट वगैरे काही नाही. ज्येष्ठांना बाजूला सारत त्यांचा अपमान करून मोदींनी व्य्नितकेंद्रित प्रचार सुरू केला आहे. महाराष्ट्र व गुजरातची स्थापना एकाच दिवशी झाली. त्यानंतर महाराष्ट्राची गुजरातपेक्षा सर्वच पातळीवर कित्येक पटीने प्रगती केली आहे. देशात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात स्वातंत्र्यानंतर झालेले सर्वात मोठे काम आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारने पक्षीय पातळीवर नुकसान होईल हे माहित असूनही माहितीच्या अधिकाराचा कायदा संमत केला. या अधिकारामुळेच अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर आली आहेत. मात्र, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी याची कदर केली नाही. नेहमी सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. राज्यात व केंद्रात आघाडी सरकारने केलेल्या प्रचंड विकासकामामुळे या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या विशेष मुलाखतीदरम्यान व्य्नत केला.

पुढारीचे वाचन आणि आपुलकी

हेलिकॉप्टरमधील विशेष ङ्कुलाखतीच्या दरम्यान गृहराज्यङ्कंत्री सतेज उर्ङ्ख बंटी पाटील यांच्याशी ङ्कुख्यङ्कंत्र्यांनी राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीवर चर्चा केली.  ङ्गपुढारीङ्खच्या अंकाचे वाचन करताना दोनवेळा मतदान करा या ना.शरद पवार यांच्या व्नतव्यावरून उठलेल्या गदारोळावर त्यांनी प्रकाश टाकला. ङ्कुलाखतीच्या सुरूवातीलाच दै. मपुढारीङ्खचे संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारितेतील दिग्गज कारकिर्द आणि योगदानाबाबत त्यांनी कौतुक केले. ङ्गपुढारीङ्खने माझ्या कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले आहे. राज्यातील आघाडी सरकारने गेल्या तीन वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत. याबाबत सविस्तर माहिती आकडेवारीसह लवकरच मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी संधी गमावली

सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षात असणाऱ्या काहींनी गावपातळीवरचाच विचार केला. क्रुकेड बुद्धी व विचारसरणी असलेल्या या लोकांनी राष्ट्रीय प्रवाहाबरोबर राहण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना कदाचित राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती असेही त्यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नाव न घेता सांगितले. 1999 साली वेगळा विचार घेऊन राज्यातील दिग्गज नेत्यानी राष्ट्रीय प्रवाह सोडून वेगळा मार्ग निवडला, ती फार मोठी चूक होती. आज ते पक्षात असते तर मोदीवगैरे लोकांचे वलय निर्माणच झाले नसते. त्यांना देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती असेही ना. शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी आवर्जुन सांगितले.

मुख्मंत्र्यांची खास मुलाखत

हेलिकॉप्टरमध्ये ः सतीश मोरे, कराड

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...