फॉलोअर

३० मे २०१९


का हरले.. का जिंकले..!
सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असला तरी या वेळची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. उदयनराजेंच्या विरोधात कधी नव्हे तेवढे गढूळ वातावरण निर्माण झाले. उदयनराजेंचा पराभव होणारच !, अशी अटकळ होती. मात्र मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत निवडणुकीपर्यंत उदयनराजेंनी प्रचाराचा लावलेला धडाका, समोर येईल त्याला आपले म्हणत जवळ घेण्याची पद्धत, विरोधी आघाडीतील लोकांना आपलंसं करण्याची कला, छत्रपतींच्या गादीच्या वारस असल्याचे वलय आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे उदयनराजे यांनी दाखविलेला संयम. यामुळे हातातून गेलेली निवडणूक त्यांनी जिंकली.


दुसरीकडे शिवसेनेमधून आयत्यावेळी आयात केलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना ही निवडणूक पहिल्यापासूनच सोपी होती. उदयनराजेंच्या विरोधात असलेले वातावरण ‘कॅच’ करणे एवढेच काम त्यांच्यासाठी राहिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच अनेक आमदारांचा उदयनराजेंना विरोध होता. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या ‘होमपिच’वर सकारात्मक वातावरण होते. त्याचबरोबर जिल्ह्यात माथाडी कामगारांचे असणारे नेटवर्कही त्यांच्या कामी येणार होते. मात्र, सामान्य जनतेपासून स्वत:च्या पक्षातील नेतेमंडळी, भाजपामधील वरिष्ठ नेते आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी व्यवस्थित हाताळता न आल्याने हातात आलेली निवडणूक नरेंद्र पाटील हरले.


उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून पुन्हा तिकिट मिळवण्यासाठी फार मोठे लॉबिंग केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचा उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र उदयनराजे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, तर भाजपासहित इतर पक्ष त्यांना लगेचच उमेदवारी द्यायला तयार होते. छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज म्हणून उदयनराजेंचा राज्यभर दबदबा आहे. उदयनराजेंचे वलय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावागावांत आकर्षण आहे.  उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर, भाजपा त्यांना तात्काळ आपल्याकडे ओढून घेईल आणि राज्यभर त्यांच्या वलयाचा फायदा करुन घेईल, अशी भीती खा. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांना होती.


 पक्षातील उदयनराजे विरोधकांना वेळोेवेळी चुचकारत शरद पवार यांनी उदयनराजेे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता दर्शविली होती आणि शेवटी त्यांनाच उमेदवारी फायनल केली. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीमधील सर्व लोकप्रतिनिधींबाबत मवाळ धोरण स्विकारत त्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेताना तेथील आमदारांना विश्वासात घेतले. त्यामुळे हळूहळू उदयनराजे यांच्या विरोधातील वातावरण निवळत गेले.


उदयनराजे भोसले यांना सुरुवातीपासूनच कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातून मताध्निय मिळणार नाही, याची खात्री होती. कराड दक्षिण मतदारसंघात उदयनराजेंचे गेल्या दहा वर्षांत असलेला अत्यल्प संपर्क, विकासकामांकडे केलेले दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांचे अत्यल्प नेटवर्क यामुळे दक्षिणमधील गावागावांत उदयनराजेंना विरोध वाढत होता. भारतीय जनता पक्षाचे तीन दिग्गज कराड दक्षिणमधील आहेत. ना. शेखर चरेगांवकर, ना. डॉ. अतुल भोसले आणि विक्रम पावसकर यांची ताकद दक्षिणमध्ये दखलनीय असल्यामुळे युतीच्या उमेदवाराला येथे मोठा पाठिंबा मिळेल, असे सुरुवातीपासूनच वातावरण होते. शिवाय नरेंद्र पाटील ढेबेवाडी खोऱ्यातील असल्याने त्यांचा कराड शहराशी असलेला मोठा संपर्क युतीच्या पथ्यावर पडेल, अशी अटकळ होती. या सर्व गोष्टींचा अभ्यास उदयनराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच केला. कराड दक्षिणमधून आपल्याला मताध्निय मिळणार नाही मात्र नरेंद्र पाटील यांच्याकडून आपल्यावर मोठे लीड बसू नये यादृष्टीने उदयनराजे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी कराड दक्षिणमध्ये ‘फिल्डिंग’ लावली.


कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदारसंघात चांगले प्राबल्य आणि लोकप्रियता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आघाडी धर्म पाळणारच आहेत. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे दुखावलेला त्यांचा गट उदयनराजेंच्या विरोधात होता. या गटाचा विरोध कमी करण्यासाठी उदयनराजे यांनी कराडात दोन-तीन मॅरेथॉन बैठका घेतल्या. राजेंद्रसिंह यादव आणि आ. आनंदराव पाटील यांच्यातील दुखावलेले व दुरावलेले संबंध कमी करण्यासाठी उदयनराजेंनी लक्ष घातले. पृथ्वीराज चव्हाण यांचे दक्षिणमधील नाना पाटील, बंडानाना जगताप, मनोहर शिंदे यांच्यासारख्या जवळच्या लोकप्रतिनिधींना आपलेसे करण्यासाठी उदयनराजेंच्या विश्वासू सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहर, मलकापूर तसेच तालु्नयातील इतर गावांत पृथ्वीराज चव्हाण गटाला केलेला विरोध, वेळोवेळी केलेले पक्षांतर, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली भूमिका यामुळे निर्माण झालेले विरोधी वातावरण मवाळ  करण्यासाठी उदयनराजेंनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दक्षिणमधील बहुतांश गावांत उदयनराजे पोहोचले आणि याचा फायदा उदयनराजे यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे निवडणुकीतील मतदानाच्या आकड्यांवरून लक्षात येते.


गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी कराड शहरात उदयनराजे यांना कमी मते पडली होती. मलकापुरातही उलटे वातावरण होते. दक्षिण मतदारसंघात उदयनराजेंना  दहा हजार इतके मताध्निय होते. हे मताध्निय या निवडणुकीवेळी वाढवणे श्नय नव्हते. मग विरोधी मते तरी जास्त पडू नयेत, म्हणून राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली उदयनराजेंच्या विश्वासू सहकाऱ्यांनी कराड शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. साताऱ्यातून तरुणांमध्ये क्रेझ असलेले युवा नेते संग्राम बर्गे यांच्यावरही उदयनराजेंनी कराडची धुरा दिली होती. त्यांनीही अनेक ठिकाणी जाऊन पॅचअप केले. सलग दीड महिना उदयनराजेंचे विश्वासू सहकारी कराड शहरात तळ ठोकून होते. दत्त चौकात शुभारंभाच्या सभेवेळी सर्वांना एकत्र आणण्यात उदयनराजे यशस्वी झाले. येथेच यशाची पहिली पायरी होती. त्यानंतर शहरातील लोकशाही, जनश्नती, यशवंत, लोकसेवा या सर्व आघाडीमधील दिग्गज नगरसेवकांना एकत्र आणण्यात, दुखावलेल्या काही नगरसेवकांना हाताळण्यात तसेच गल्ली-गल्लीतील आजी-माजी नगरसेवक, युवा नेते या सर्वांना आपलंसं करण्यात उदयनराजे यशस्वी झाले. या सर्व गोष्टींचा फायदा उदयनराजेंना झाला. गेल्यावेळी शहरातून विरोधात मते पडली होती. ही मते पुन्हा आपल्या बाजूने खेचण्यात आणि चार हजारांचे मताध्निय मिळवण्यात उदयनराजे यशस्वी झाले. शहरात शिवसेना-भाजपाचे नेटवर्क असतानाही नरेंद्र पाटील यांच्याऐवजी उदयनराजेंना मिळालेली मते उदयनराजेंच्या परिप्नव राजकीय खेळीचे उदाहरण आहे.



माथाडी कामगारांचे नेते म्हणून दबदबा असलेले नरेंद्र पाटील यांनी कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच अधिक लक्ष देणे गरजेचे होते. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण असलेले हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या पथ्यावर पडण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र या तिन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि  मतदारांना गृहित धरुन नरेंद्र पाटील सातारा, कोरेगाव, वाई, जावली या भागात प्रचार करत राहीले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून नरेंद्र पाटलांसाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात दोन सभा घेतल्या. मात्र या दोन सभा कुठे घ्यायला पाहिजे होत्या? याची परिप्नवता नरेंद्र पाटील आणि त्यांच्या जवळ सल्लागार म्हणून फिरणाऱ्या नेत्यांना नव्हती.


सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये आयात केलेला उमेदवार म्हणून नाराज असलेल्या शिवसैनिकांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. नरेंद्र पाटील यांनी आम्हाला विचारात घेतलेच नाही. ते भाजपाच्या नेत्यांनाच जवळ घेऊन फिरतात, अशी तक्रार शिवसैनिकांची होती. मात्र नंतरच्या काळात राजकीय घडामोडी घडल्यानंतर हळू-हळू शिवसैनिक प्रचारात उतरले. ना. शेखर चरेगांवकर, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे हे सुरुवातीपासूनच भाजपचा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांच्यासोबत होते. या चौघांनी सूत्रेही चांगली फिरवली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार भाजपचाच आहे, हे पटवून देण्यात भाजपा नेते यशस्वी ठरले. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घर टू घर जाऊन  मतदारांपर्यंत पोहोचण्यात शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते कमी पडले. या दोन्ही पक्षाकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आहे. तेवढीच कामाला आली.







शेवटच्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा कराडात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. ही सभा कोठे घ्यायची? यावरुन भाजपा नेते आणि नरेंद्र पाटील  यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले.  दक्षिण हा भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे भाजपच्या म्हणण्यानुसार कन्याशाळेसमोर सभा घेऊ असा आग्रह होता. मात्र शिवसैनिकांनी भाजपच्या लोकांना विरोध करण्यासाठी सभेचे ठिकाण शिवाजी स्टेडियम निवडले. भर दुपारी तीन वाजता उन्हात स्टेडियमवर सभा घेणे हे दिव्यच होते. हे दिव्य युतीच्या नेत्यांना पार पाडता आले नाही आणि त्याचा फटका युतीला बसला.


नरेंद्र पाटील यांच्यासोबत मुंबईवरुन आलेली माथाडी कामगारांची फळी  होती. त्यांनी जावली, कोरेगाव, वाई भागात दिवस-रात्र कष्ट घेतले. सौ. प्राची पाटील यांनीही जिल्हाभर प्रचारदौरा केला. मात्र कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात जायला हवे होते, तितके जायला नरेंद्र पाटील कमी पडले. उदयनराजे यांच्या विरोधातील मते आपणास आपोआप मिळतील, हे त्यांनी गृहित धरले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारल्याचे कराड दक्षिण व कराड उत्तरमधील मते पाहिले असता लक्षात येते. योग्य कार्यकर्त्यांची फळी आणि सल्लागार न मिळाल्यामुळे कराड दक्षिणमधून अपेक्षित धरलेले 40 हजारांचे मताध्निय मिळवण्यात नरेंद्र पाटील अपयशी ठरले. कराड उत्तरमध्ये तर कराड शहरालगतची काही गावे सोडली तर नरेंद्र पाटील खूपच मागे पडले. त्यांच्या मदतीला आला फ्नत त्यांचा स्वत:चा पाटण तालुका. पाटणमध्ये विधानसभेची रंगीत तालिम म्हणून आ. शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नरेंद्र पाटील यांना 19 हजार इतके मताध्निय मिळू शकले. ‘हातचं सोडून पळत्याच्या पाठी’ या उ्नतीप्रमाणे नरेंद्र पाटील यांनी कराड उत्तर व कराड दक्षिणकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हातात आलेली निवडणूक ते हरले. 

१७ मे २०१९

आज दूरसंचार दिवस

📡☎📲📡☎📲📡
➖➖➖➖➖➖➖
☑ १७ मे जागतिक दूरसंचार /


दुरसंदेशवहन दिन आणि माहिती दिन......

➖➖➖➖➖➖➖
🔺 _१७ मे १८६५ या दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १७ मे हा दिवस जागतिक दूरसंदेशवहन दिवस म्हणून १९७३ पासून साजरा केला जाऊ लागला. पुढे २००५ साली जागतिक माहिती समाज शिखर परिषदेत १७ मे या दिवसाला ‘जागतिक माहिती दिन’ म्हणून मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर २००६ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार मंडळाच्या सभेत हा दिवस *‘जागतिक दूरसंदेशवहन आणि माहिती समाज दिवस’ (World Telecommunication and Information Society Day)* म्हणून साजरा  करण्याचा ठराव ६८ सभासद देशांच्या समितीने जाहीर केला._
🔲🔲🔲
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश दळणवळणाच्या क्षेत्रातील इंटरनेट आणि तत्सम नवीन तंत्रज्ञानाचे जागतिक महत्व अधोरेखित करणे आणि या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांविषयी सामाजिक जागरुकता निर्माण करणे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानातील निरनिराळ्या प्रणालींचे एकसुत्रीकरण करणे हा आहे. त्याचबरोबर या दिनाच्या निमित्ताने दळणवळणाची विविध साधने, माध्यमे, त्याबाबतची राष्ट्रांची धोरणे, तंत्रज्ञानामधील फरक, विविधता, त्यांची जोडणी आणि इंटरनेट, टेलिव्हिजन, फोन यांच्या वापराने देशा-देशांमधील अंतरे कमी करणे अभिप्रेत आहे. दळणवळणाच्या या सर्व आधुनिक सोयी-सुविधा दूरवरच्या दुर्गम भागातील मागासलेल्या खेड्यापाड्यांमधील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची धोरणे, योजना तयार करणे हा देखील या दिवशी आखलेल्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग आहे.
🔲🔲🔲
दूरसंदेशवहन म्हणजे एका ठिकाणाहून काही अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी एखादा संदेश वाहून नेणे. फार प्राचीन काळापासून संदेशवहनाची कला माणसाला अवगत होती. पूर्वी हे काम विविध माध्यमातून केले जाई. कधी एका ठिकाणी धूर करून त्याद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना इशाऱ्याचे संदेश दिले जात तर कधी ढोल-नगारे वाजवून, हातवारे करून किंवा हातात धरलेल्या वस्तूंच्या किंवा झेंड्यांच्या विशिष्ट हालचाली करून संदेशाची देवाण-घेवाण करणे किंवा प्रकाशझोतांच्या सहाय्याने संदेश पाठवणे, सूचना देणे अशी माध्यमे संदेशवहनासाठी वापरली जात. पुढे यात सुधारणा होत जाऊन तंत्रज्ञानाचा विकास होऊन टपाल, तारायंत्र, दूरध्वनी, फॅक्स त्याबरोबरीनेच बिनतारी संदेशवहन जसे आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि आजच्या आधुनिक काळात उपग्रहाद्वारे संदेशवहन, संगणक, इंटरनेट, इ-मेल अशासारखी माध्यमे अस्तित्वात आली आहेत. नवी साधने आली की आधीची त्या ओघात नाहीशी होतात, बंद पडतात.
🔲🔲🔲
*भारतात एके काळी अत्यंत प्रभावी असलेले तारायंत्र (telegraph) हे माध्यम मोबाईल, इंटरनेट, इ-मेल यांच्या प्रभावामुळे नुकतेच बंद झाले.*
🔲🔲🔲

🔺 *तारायंत्राचा शोध -*

सॅम्युएल मोर्स हा खरं तर एकोणिसाव्या शतकातील एक प्रख्यात अमेरिकन चित्रकार. त्याने अनेक जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या, राजकारण्यांच्या तसबीरी चितारलेल्या होत्या. १८२५ साली अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर, फ्रेंच सेनानी, जनरल लाफायेत याचे पोर्ट्रेट काढण्याची संधी त्याला मिळाली. सूर्यास्ताच्या भव्य पार्श्वभूमीवर या चित्राचे काम भरात असताना मोर्सला त्याची बायको आजारी असल्याचे त्याच्या वडिलांचे पत्र मिळाले. काढत असलेले चित्र अर्धवट टाकून मोर्स तातडीने न्यू हेवन येथील आपल्या घरी परतला. पण त्याला उशीर झाला होता. त्याच्या पत्नीचे केव्हाच निधन झाले होते आणि तिचा दफन विधीही आटोपण्यात आला होता. पत्नीच्या आजारपणाची आणि निधनाची बातमी त्याला फार उशिराने मिळाली होती. त्या काळी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोहोचविण्यास त्या काळात फार वेळ लागत असे. लांब अंतरांवर त्वरित संदेश पोहोचविण्यासाठी काहीतरी उपाय शोधण्याचा त्याने मनाशी निश्चय केला. आपली चित्रकला त्याने बाजूला सारली आणि तारयंत्र विकसित करून त्याद्वारे संदेश पाठवण्यासाठी मोर्स लिपी तयार केली. या लिपीमध्ये डॉट (●) आणि डॅश (━) या विद्युत स्पंदनांचा (electric pulses) वापर केला होता. या दोन प्रकारच्या सिग्नल्ससाठी यंत्राच्या ‘कट्ट’ आणि ‘कड’ या तारायंत्रामधून निघणाऱ्या ध्वनीचा उपयोगदेखील संदेश पाठविण्यासाठी केला गेला. संदेश पाठविण्याची ही पद्धत जगभर स्वीकारली गेली.
🔲🔲🔲
सुरुवातीला तारायंत्रांचा वापर युद्धविषयक बातम्या कमी वेळात पाठविण्यासाठी केला गेला. आधी या बातम्या घोडे, गाड्यांचा वापर करून टपालाद्वारे पाठविल्या जात. हे काम फार वेळखाऊ आणि धोकादायक असे. तारायंत्रांमुळे हे काम सोपे जलद आणि निर्धोक झाले. पुढे महत्वाचे संदेश जलद पाठविण्यासाठी नागरी सेवेत तारायंत्रे वापरात येवू लागली. या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्याची सोयही उपलब्ध झाली.
🔲🔲🔲

🔺 *भारतीय तार सेवा*

भारतात तारायंत्राचे युग एकोणविसाव्या शतकाच्या मध्यावर भारत पारतंत्र्यात असताना अवतरले. भारतात १८५१ साली ‘ट्रान्सइंडिया टेलिग्राफ’ या नावाने पहिल्या तारायंत्राची स्थापना करण्याचे काम सुरु होऊन तीन वर्षांनी म्हणजे १८५४ साली हे काम पूर्ण झाले. पहिली जवळ जवळ तीस वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधीची माहिती गोळा करणे आणि त्वरित संदेश पाठवून ती आंदोलने, उठाव चिरडण्यासाठी आणि भारतावर आपला एकछत्री अंमल कायम राखण्याकरिता तारायंत्र हे ब्रिटीश सरकारसाठी एक महत्वाचे साधन बनले होते. हे माध्यम एवढे प्रभावी होते की स्वातंत्र्य लढ्याचा बिमोड करण्याचे ब्रिटीश सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तारलाईन्स तोडणे, उध्वस्त करणे आणि ब्रिटीशांची दळणवळण यंत्रणा खंडित करणे हा क्रांतिकारकांच्या लढ्याचा एक प्रमुख भाग होऊन बसला होता.
🔲🔲🔲
त्यानंतर पुढे १८८५ साली भारतीय तारायंत्र अधिनियम-१८८५ हा कायदा ब्रिटीश सरकारने भारतात लागू केला. या अधिनियमानुसार तारायंत्र, दूरध्वनी, दळणवळण, रेडिओ या सेवांच्या वापरावर सरकारी नियंत्रण आले. यामुळे तारायंत्रांच्या जोडणीसाठी केबल्स टाकणे, जागोजागी तारकेंद्रांची उभारणी करणे, दूरध्वनी केंद्रांची स्थापना, विशिष्ट परिस्थितीत खाजगी फोन टॅप करणे, खाजगी जमिनींचे अधिग्रहण करणे अशासारखे अधिकार सरकारला मिळाले आणि तारायंत्रांचे जाळे झपाट्याने भारतभर पसरले.
🔲🔲🔲
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तार व टपाल खात्याच्या कामकाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि तारयंत्रणा जास्त सक्षम आणि लोकाभिमुख झाली. आजची एसएमएस, इ-मेल, मोबाईल फोन इत्यादी सेवांचे काम पूर्वी तार व टपाल खात्याची पोस्टकार्ड आणि तार या दोन सेवा चोख करीत असत. त्यातही तार या विषयाबद्दल सर्वसामान्यात भीती आणि उत्सुकता अशी संमिश्र भावना असे. अत्यंत गरजेच्या, तातडीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी तार पाठवली जात असे. त्यामुळे एखादी तार आली की ती उघडून पाहीपर्यंत घरातले वातावरण गंभीर होई. कधी तारेमधून आनंदाची, गोड बातमीही समजे तर कधी परीक्षेचा निकाल कळवण्यासाठी तारेचा वापर केला जाई. लष्करातील आपल्या पोस्टींगची किंवा बदलीची वाट पहात असलेल्या जवानांसाठी ‘तार’ ही एक मोठीच उत्कंठेची बाब होती. शिवाय रजा मिळविण्यासाठी ‘. . स्टार्ट इमिजीयटली’ या तारेचीही हे जवान आतुरतेनी वाट बघत.
🔲🔲🔲
*भारतीय पुरावे अधिनियमांतर्गत (Indian Evidence Act) ‘तार’ ही सेवा पंजीकृत झालेली असल्यामुळे कागदोपत्री पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यासाठी या तारांचा वापर वकील लोक मोठ्या प्रमाणात करीत. बॉलीवूडदेखील या गोष्टीपासून लांब राहिले नव्हते. ‘शहरसे (किंवा गांवसे) तार आया है ।’ हे वाक्य हमखास प्रत्येक जुन्या सिनेमातील टर्निंग पॉईन्ट ठरत असे.*
➖➖➖➖➖➖➖
📡☎📲📡☎📲📡

०२ मे २०१९

दुलारी




दुलारी,

दुलारी आप खुशी हो,
आप प्यार कि मुऱत हो,
हमे आप कि आदत है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप प्यारी हो,
आप का प्यार दवा है,
हमे आपकाही असर है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप चाहत हो,
आपका दिल बढीया है,
हम आपके फनाह है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप कल्पतरू है,
आपका साथ इंन्द्रधनु है,
हम आपकी धारा है,
आप हमारी जरूरत हो!

दुलारी आप सबकुछ हो,
आप हमारी साया हो ,
हमारी जान आपकीही है,
आप हमारी जरुरत हो !


आपके सिवा कुछ भी नही
Dedicated to my beloved wife.
Love you by heart and soul.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...