फॉलोअर

०१ जून २०२१

यशवंतरावांची वेणुबाई

यशवंतरावांची ‘वेणूबाई’

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान अशी उच्चपदे भूषवणार्‍या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेणूताई यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव होण्यामध्ये त्यांचा आईचा जितका मोलाचा वाटा होता तितकीच महत्त्वाची साथ त्यांच्या पत्नी वेणूताई यांचीही होता. 41 वर्षे यशवंतरावांना सोबत देणार्‍या वेणूताईंवर यशवंतरावांचे खूप प्रेम होते. 1 जून 1983 साली वेणूताई यांचे निधन झाले आणि त्यांच्या पाठोपाठ दीड वर्षातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1984 साली यशवंतरावांचेही निधन झाले. यशवंतराव आणि वेणूताई यांच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अडचणीच्या, सुखदुःखाच्या आणि भरभराटीच्या काळात सुद्धा एक अतुट नातं होतं. आज वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी सूत्रे हाती घेतली मात्र यशवंतराव यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणी नवी दिल्लीमध्ये हवा असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी यशवंतरावांना मध्यरात्री फोन केला होता. पंडितजींनी यशवंतरावांना मी तुम्हाला एक नवी संधी देत आहे. तुमच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देणार आहे, असे  फोनवरून सांगितले. पंडितजींनी ही बाब कोणालाही सांगू नका असे सांगितल्यानंतर यशवंतरावांनी मला ही गोष्ट एका व्यक्तीला सांगावी लागेल असे पंडितजींना सांगितले. त्यावर अशी कोणती व्यक्ती आहे असे विचारताच मला माझ्या पत्नीला हे सांगावे लागेल, असे यशवंतराव मिश्किलीने म्हणाले होते.

1962 ते 66 या काळात संरक्षण मंत्री, त्यानंतर 1970 ते 1974 या काळात अर्थमंत्री आणि 1974 ते 1977 या कालावधीमध्ये विदेश मंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. या कारकीर्दीत यशवंतरावांना जगभरात अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दौर्‍यामध्ये यशवंतरावांना पत्नी वेणूताईंना प्रकृतीच्या कारणामुळे नेता येत नाही याचे दुःख होते. पत्नीवर असलेले प्रेम आणि तिच्या शिवाय केलेला परदेश दौरा, पाहिलेली रम्य ठिकाणे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उच्च नेत्यांच्या भेटी या विषयाची सर्व माहिती आपल्या पत्नीला सांगण्यासाठी 1965 ते 1977 या कालावधीमध्ये वेणूताईंना एकूण 96 पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रात चव्हाण साहेबांनी जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटीतील सविस्तर वर्णन केले आहे. दिवसभर काय झाले? काय पाहिले ? याचे इतंभूत वर्णन वाचताना प्रत्यक्ष यशवंतराव वेणूताई चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत, असा भास होतो. ही सर्व पत्रे वेणूताईंना लिहिली खरी मात्र ती प्रत्यक्ष ती पोस्ट मध्ये टाकली नाहीत. परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर त्यांनी ही पत्रे वेणूताईंना हातामध्ये दिली.

या सर्व पत्राची सुरूवात ‘प्रिय सौ. वेणुबाईस्’ अशी आहे तर समारोप ‘तुझाच यशवंतराव’ असा आहे. या पत्रातून यशवंतरावांची वेणुताईविषयी काळजी दिसून येतेच आणि प्रेमही व्यक्त होते. बहुतांश पत्रात “तुझी तब्येत कशी आहे, तब्येतीची काळजी घेतेस ना? तू आपली प्रकृती चांगली ठेवत असशील, प्रकृती सांभाळा, डॉक्टर रोज येतात ना? अशी विचारपूस करणारी वाक्य आहेत. 19 सप्टेंबर 1971 साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, आज रात्री कुठे जायचे नाही. त्यामुळे सर्व निवांत आहे. वाचण्यासाठी भरपूर आणले आहे. तुझी आठवण झाली आणि तुझ्या प्रकृतीच्या शंकेने व्याकूळ झालो. प्रकृतीची काळजी घे.”

26 एप्रिल 1974 साली क्वॉलालंपूर येथून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात ‘आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला, तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे सर्व क्षण कसे अलगुन - बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.’ तर 2 मे 1975 साली किंग्स्टन जमैका येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुझी आठवण सारखी येत असते, पण आज तुझ्या संगतीची तीव्रता फार वाटली.’

यशवंतराव परदेश दौर्‍यावर निघताना वेणूताईंना खूप वाईट वाटे. फ्रेंड फोर्ट येथून 28 ऑगस्ट 1975च्या पत्रात ते वेणुताईंना धीर देताना म्हणतात, ‘तू मी निघताना फारच संयम दाखवला, तुला असे एकाकी सोडून निघताना मी किती व्याकुळ होत असेन, कल्पना आहे ना? 1975 साली ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव अफगाणिस्तान दौर्‍यावर होते. या दरम्यान काबूल येथून लिहिलेला लिहिलेल्या पत्रात ते वेणूताईंना म्हणतात, ‘आज दिवाळी ! तुझी फार आठवण झाली. गेल्या 25-30 वर्षात ही पहिलीच दिवाळी आहे,  मी तुझ्यापासून दूर आहे आणि एकटा परदेशात आहे. सकाळी आशामाईचे दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.’
यशवंतरावांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील कोणत्याही देशात गेल्यानंतर तेथून त्यांनी वस्तू, दाग-दागिने नव्हे तर पुस्तके आणलेली आहेत. देशाचा परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षण मंत्री परदेशात गेल्यानंतर काय आणतो तर पुस्तके ? हे वाचून अलीकडच्या राजकारण्यांना थोडे आश्चर्य वाटेल. यशवंतरावांनी शासकीय सोयीचा कधीही गैरवापर केला नाही. 10 मे 1975 साली मेक्सिको सिटी मधून लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘काल हॉटेल मधील दुकानातून एक दोन पुस्तके विकत आणली.  वस्तू पाहिल्या. मात्र महागाई फार आहे म्हणून विचार सोडून दिला. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटते आहे. आज आता चार-पाच दिवसांनी घरी येणार आहे म्हणून परतीच्या प्रवासाची ओढ आहे.’ 2 ऑक्टोबर 1972 साली रॉयल हवेन या हॉटेलमधून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘काहीतरी घ्यावे म्हणून दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृती फार आवडली. किंमत 650 डॉलर्स म्हणजे जवळ जवळ 5 हजार रुपये. म्हंटले रामराम. निदान नेत्रसुख तरी मिळाले.’

19 जानेवारी 1974 साली रोम येथून लिहिलेल्या पत्रात थोडेसे नाराज झालेले मात्र जनतेवर मनापासून प्रेम करणारे यशवंतराव वेणूताईंना म्हणतात, ‘महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे आहेत. कठीण प्रश्न, न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहायचे आहे, त्यांच्यातच मरायचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.’ परदेशात कुठेही असले तरी यशवंतराव घरी परतण्यास नेहमी उत्सुक असायचे. 1975 साली लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘भेटीसाठी उत्सुक, घरासारखे दुसरे रुबाबदार आणि आसरा देणारे दुसरे ठिकाण असू शकत नाही.’

26 एप्रिल 1974 मध्ये क्वॉलालंपूर मध्ये एक पुस्तक प्रदर्शन पाहत असताना एका पुस्तकामध्ये लेखकाने त्यांच्या पत्नीविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून पत्नी वियोगात बुडालेले यशवंतराव लिहितात, ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंतःकरणाने मध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे. एवढे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.’

यशवंतरावांचे हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखन माध्यम स्वीकारले याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी सार्‍या जगाचा प्रवास केला. वेणूताई यांची प्रकृती दुर्बल, हजारो मैलाचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. वेणूताई नित्य दिल्लीत, स्वगृही ! यशवंतरावांना याची खंत असावयाची ही खंत त्यांनी पत्रातून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत या लेखनाची प्रेरणा ठरली असावी, असे ‘विदेश दर्शन’ या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादक रामभाऊ जोशी म्हणतात. रामभाऊ जोशी यांनी संकलित केलेल्या पुस्तकात ही सर्व पत्रे उपलब्ध आहेत.

वेणूताईंना लिहिलेली ही पत्रे पाहिल्यानंतर वेणूताईंवर यशवंतरावांचे किती प्रेम येते हे तर लक्षात येतेच त्याबरोबर यशवंतराव वेणुताई प्रेम कथेची दुसरी बाजू, दोघांमधील परस्पर भेटीची व्याकुळता लक्षात येते. वेणूताईंच्या पुण्यतिथीदिनीच्या पूर्वसंधेला ‘विरंगुळा’ या बंगल्यात जाऊन ही सर्व पत्रे पाहण्याचा, वाचण्याचा मला योग आला. ही पत्रे वाचताना खरंच डोळ्यातून पाणी आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा सुसंस्कृत समाजकारणी राजकारणी होणार नाहीच. त्याच बरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारी दुसरी वेणूताईही होणार नाही, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.वेणूताईंना भावपूर्ण आदरांजली.

*********
प्रीतिसंगमावरून
- सतीश मोरे
१ जुन २०२१

यशवंतरावांची वेणुबाई

यशवंतरावांची ‘वेणूबाई’
***********
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान अशी उच्चपदे भूषवणार्‍या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेणूताई यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव होण्यामध्ये त्यांचा आईचा जितका मोलाचा वाटा होता तितकीच महत्त्वाची साथ त्यांच्या पत्नी वेणूताई यांचीही होता. 41 वर्षे यशवंतरावांना सोबत देणार्‍या वेणूताईंवर यशवंतरावांचे खूप प्रेम होते. 1 जून 1983 साली वेणूताई यांचे निधन झाले आणि त्यांच्या पाठोपाठ दीड वर्षातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1984 साली यशवंतरावांचेही निधन झाले. यशवंतराव आणि वेणूताई यांच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अडचणीच्या, सुखदुःखाच्या आणि भरभराटीच्या काळात सुद्धा एक अतुट नातं होतं. आज वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी सूत्रे हाती घेतली मात्र यशवंतराव यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणी नवी दिल्लीमध्ये हवा असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी यशवंतरावांना मध्यरात्री फोन केला होता. पंडितजींनी यशवंतरावांना मी तुम्हाला एक नवी संधी देत आहे. तुमच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देणार आहे, असे  फोनवरून सांगितले. पंडितजींनी ही बाब कोणालाही सांगू नका असे सांगितल्यानंतर यशवंतरावांनी मला ही गोष्ट एका व्यक्तीला सांगावी लागेल असे पंडितजींना सांगितले. त्यावर अशी कोणती व्यक्ती आहे असे विचारताच मला माझ्या पत्नीला हे सांगावे लागेल, असे यशवंतराव मिश्किलीने म्हणाले होते. 1962 ते 66 या काळात संरक्षण मंत्री, त्यानंतर 1970 ते 1974 या काळात अर्थमंत्री आणि 1974 ते 1977 या कालावधीमध्ये विदेश मंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. या कारकीर्दीत यशवंतरावांना जगभरात अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दौर्‍यामध्ये यशवंतरावांना पत्नी वेणूताईंना प्रकृतीच्या कारणामुळे नेता येत नाही याचे दुःख होते. पत्नीवर असलेले प्रेम आणि तिच्या शिवाय केलेला परदेश दौरा, पाहिलेली रम्य ठिकाणे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उच्च नेत्यांच्या भेटी या विषयाची सर्व माहिती आपल्या पत्नीला सांगण्यासाठी 1965 ते 1977 या कालावधीमध्ये वेणूताईंना एकूण 96 पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रात चव्हाण साहेबांनी जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटीतील सविस्तर वर्णन केले आहे. दिवसभर काय झाले? काय पाहिले ? याचे इतंभूत वर्णन वाचताना प्रत्यक्ष यशवंतराव वेणूताई चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत, असा भास होतो. ही सर्व पत्रे वेणूताईंना लिहिली खरी मात्र ती प्रत्यक्ष ती पोस्ट मध्ये टाकली नाहीत. परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर त्यांनी ही पत्रे वेणूताईंना हातामध्ये दिली.

या सर्व पत्राची सुरूवात ‘प्रिय सौ. वेणुबाईस्’ अशी आहे तर समारोप ‘तुझाच यशवंतराव’ असा आहे. या पत्रातून यशवंतरावांची वेणुताईविषयी काळजी दिसून येतेच आणि प्रेमही व्यक्त होते. बहुतांश पत्रात “तुझी तब्येत कशी आहे, तब्येतीची काळजी घेतेस ना? तू आपली प्रकृती चांगली ठेवत असशील, प्रकृती सांभाळा, डॉक्टर रोज येतात ना? अशी विचारपूस करणारी वाक्य आहेत. 19 सप्टेंबर 1971 साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, आज रात्री कुठे जायचे नाही. त्यामुळे सर्व निवांत आहे. वाचण्यासाठी भरपूर आणले आहे. तुझी आठवण झाली आणि तुझ्या प्रकृतीच्या शंकेने व्याकूळ झालो. प्रकृतीची काळजी घे.”

26 एप्रिल 1974 साली क्वॉलालंपूर येथून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात ‘आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला, तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे सर्व क्षण कसे अलगुन - बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.’ तर 2 मे 1975 साली किंग्स्टन जमैका येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुझी आठवण सारखी येत असते, पण आज तुझ्या संगतीची तीव्रता फार वाटली.’

यशवंतराव परदेश दौर्‍यावर निघताना वेणूताईंना खूप वाईट वाटे. फ्रेंड फोर्ट येथून 28 ऑगस्ट 1975च्या पत्रात ते वेणुताईंना धीर देताना म्हणतात, ‘तू मी निघताना फारच संयम दाखवला, तुला असे एकाकी सोडून निघताना मी किती व्याकुळ होत असेन, कल्पना आहे ना? 1975 साली ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव अफगाणिस्तान दौर्‍यावर होते. या दरम्यान काबूल येथून लिहिलेला लिहिलेल्या पत्रात ते वेणूताईंना म्हणतात, ‘आज दिवाळी ! तुझी फार आठवण झाली. गेल्या 25-30 वर्षात ही पहिलीच दिवाळी आहे,  मी तुझ्यापासून दूर आहे आणि एकटा परदेशात आहे. सकाळी आशामाईचे दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.’
यशवंतरावांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील कोणत्याही देशात गेल्यानंतर तेथून त्यांनी वस्तू, दाग-दागिने नव्हे तर पुस्तके आणलेली आहेत. देशाचा परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षण मंत्री परदेशात गेल्यानंतर काय आणतो तर पुस्तके ? हे वाचून अलीकडच्या राजकारण्यांना थोडे आश्चर्य वाटेल. यशवंतरावांनी शासकीय सोयीचा कधीही गैरवापर केला नाही. 10 मे 1975 साली मेक्सिको सिटी मधून लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘काल हॉटेल मधील दुकानातून एक दोन पुस्तके विकत आणली.  वस्तू पाहिल्या. मात्र महागाई फार आहे म्हणून विचार सोडून दिला. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटते आहे. आज आता चार-पाच दिवसांनी घरी येणार आहे म्हणून परतीच्या प्रवासाची ओढ आहे.’ 2 ऑक्टोबर 1972 साली रॉयल हवेन या हॉटेलमधून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘काहीतरी घ्यावे म्हणून दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृती फार आवडली. किंमत 650 डॉलर्स म्हणजे जवळ जवळ 5 हजार रुपये. म्हंटले रामराम. निदान नेत्रसुख तरी मिळाले.’

19 जानेवारी 1974 साली रोम येथून लिहिलेल्या पत्रात थोडेसे नाराज झालेले मात्र जनतेवर मनापासून प्रेम करणारे यशवंतराव वेणूताईंना म्हणतात, ‘महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे आहेत. कठीण प्रश्न, न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहायचे आहे, त्यांच्यातच मरायचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.’ परदेशात कुठेही असले तरी यशवंतराव घरी परतण्यास नेहमी उत्सुक असायचे. 1975 साली लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘भेटीसाठी उत्सुक, घरासारखे दुसरे रुबाबदार आणि आसरा देणारे दुसरे ठिकाण असू शकत नाही.’
26 एप्रिल 1974 मध्ये क्वॉलालंपूर मध्ये एक पुस्तक प्रदर्शन पाहत असताना एका पुस्तकामध्ये लेखकाने त्यांच्या पत्नीविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून पत्नी वियोगात बुडालेले यशवंतराव लिहितात, ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंतःकरणाने मध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे. एवढे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.’
यशवंतरावांचे हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखन माध्यम स्वीकारले याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी सार्‍या जगाचा प्रवास केला. वेणूताई यांची प्रकृती दुर्बल, हजारो मैलाचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. वेणूताई नित्य दिल्लीत, स्वगृही ! यशवंतरावांना याची खंत असावयाची ही खंत त्यांनी पत्रातून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत या लेखनाची प्रेरणा ठरली असावी, असे ‘विदेश दर्शन’ या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादक रामभाऊ जोशी म्हणतात. रामभाऊ जोशी यांनी संकलित केलेल्या पुस्तकात ही सर्व पत्रे उपलब्ध आहेत.

वेणूताईंना लिहिलेली ही पत्रे पाहिल्यानंतर वेणूताईंवर यशवंतरावांचे किती प्रेम येते हे तर लक्षात येतेच त्याबरोबर यशवंतराव वेणुताई प्रेम कथेची दुसरी बाजू, दोघांमधील परस्पर भेटीची व्याकुळता लक्षात येते. वेणूताईंच्या पुण्यतिथीदिनीच्या पूर्वसंधेला ‘विरंगुळा’ या बंगल्यात जाऊन ही सर्व पत्रे पाहण्याचा, वाचण्याचा मला योग आला. ही पत्रे वाचताना खरंच डोळ्यातून पाणी आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा सुसंस्कृत समाजकारणी राजकारणी होणार नाहीच. त्याच बरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारी दुसरी वेणूताईही होणार नाही, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. वेणूताईंना भावपूर्ण आदरांजली.
*********
प्रीतिसंगमावरून
- सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...