*भूलेंबिसरे गीत*
आज *भूलेंबिसरे गीत*मध्ये पाहू यात या *सदिचे महानायक अमिताभ बच्चन* यांच्या काही आठवणी.
*अँग्री यंग मॅन* म्हणून ज्या चित्रपटाने *अमिताभजींना ओळख दिली, त्या *जंजीर*च्या वेळची गोष्ट. *दीपक* होतकरू रंगभूषाकार होता. त्याचं काम *अमिताभजींना* आवडलं. *अमिताभ* यांचा *खासगी मेकअपमन* होण्याची संधी मग त्याच्यासमोर चालून आली. दीपकनी ती स्वीकारलीच आणि सुरू झाला अमिताभ बच्चन यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून दीपक यांचा प्रवास. या गोष्टीला जवळजवळ ४५ वर्षे झालीत. आज दीपक ६९ वर्षांचे आहेत, तरीही ते तेवढ्याच उमेदीने आणि उत्साहाने अमिताभ यांच्याबरोबर काम करताहेत.
शोले’चं चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठीचं ठिकाण आणि निवासव्यवस्था यात अंतर होतं. एके दिवशी शूटिंग संपल्यावर अमिताभ आणि जया बच्चन निघाले. एकाच गाडीतून. पुढच्या सीटवर दीपक बसले होते आणि जया आणि अमिताभ मागच्या सीटवर. दीपक यांनी पुढचा दरवाजा ओढून घेतला आणि अचानक अमिताभ जोरात ओरडू लागले, ‘माझा हात, माझा हात, गेला माझा हात...’
दीपकच्या काळजाचा ठोकाच चुकला. जया बच्चनही गांगरून गेल्या. कोणाला काही कळेचना की झाले तरी काय? दीपकने घाबरत घाबरतच मागचा दरवाजा उघडला. तर ते जोरजोरात हसत होते. कोणालाही काही कळेच ना. मग लक्षात आलं, की ते दीपकला उल्लू बनवण्याचा प्रयत्न होता. असा हा मिश्कील माणूस!’’
*एकाच महिन्यात चार चित्रपटांचं रिलिज आणि चारही सुपरहिट!* ही किमया *अमिताभ* यांनी केलीय. *गंमत* म्हणजे त्यातल्या *दोन* चित्रपटांत त्याचा *डबलरोल* होता. ऑक्टोबर १९७८ मध्ये हा पराक्रम केला होता. या महिन्याच्या चारही शुक्रवारी अमिताभचे चार चित्रपट रीलिज झाले. *मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, डॉन* आणि *त्रिशूल* हे ते चार चित्रपट होते!
हिपॅटायटिस-बी विरोधातल्या मोहिमेच्या वेळी अमिताभने एक गौप्यस्फोट केला होता. हिपॅटायटिस बीमुळे त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं असून, सध्या फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे. *‘जो भी है, उसीसेही काम चला रहा हूँ मैं’* हे त्याचे मिष्किल उद्गार होते, हे सांगताना!
ते आज ७५ वर्षांचे असूनही त्याच उमेदीने काम करतात, जसे ४५ वर्षांपूर्वी सीनची तयारी करायचे, तशीच तयारी ते आजही करतात. असं वाटतच नाही, की ते ७५ वर्षांचे आहेत.
आज ऐकु या त्यांच्या आवाजातील एक सुंदर गाणं.
चित्रपट : *सिलसिला (१९८१)*
संगीतकार : *शिव हरी*
गीतकार : *जावेद अख्तर*
गायक : *अमिताभ बच्चन*
नीला आसमान सो गया..
नीला आसमान सो गया
ओ हो, ओंस बरसे रात भीगे होठ थर्राए
धड़कने कुछ कहना चाहे कह नही पाए
हवा का गीत माध्यम है..
समय की चाल भी कम है
नीला आसमान सो गया..
ओ, मेरी बाहो मे शरमाते लजाते ऐसे तुम आये
की जैसे बादलो मे चांद धीरे धीरे आ जाए
ये तन्हाई ये मै और तुम..
ज़मीन भी हो गयी गुमसुम
नीला आसमान सो गया...
*संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा