*अमिताभ बच्चन- अभिनयाची युनीव्हरसीटी*
तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले....दुर्दैवाने त्याच्या बाबतीत मात्र असे काहीच झाले नाही...उलट प्रचंड अपयश, टीका, टोमणे आणि फेल्युअरचा टॕग. राजेश खन्ना सारख्या पहिल्या सुपरस्टारच्या जमान्यात याची एंन्ट्री. चित्रपट सृष्टीमध्ये यश मिळेल असा कुठलाही गुण नसल्याचे त्यावेळच्या दिग्दर्शकांचे त्याच्याबद्दलचे मत. हडकुळा, सहा फुट उंची, घोगरा आवाज यातील कुठलीच गोष्ट त्याला हिरो बनवायला योग्य नव्हती...पण म्हणतात ना हिऱ्याची पारख हा एक जोहरीच करु शकतो असाच एक जोहरी प्रकाश मेहरा याने त्याच्यावर डाव खेळला...जंजीर.....या चित्रपटात...त्याची ईमानदार पोलीस इन्सपेक्टरची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना इतकी भावली कि त्यानंतर या माणसाने परत वळून बघितलेच नाही...अमिताभ बच्चन....एक असामान्य व्यक्तीमत्व, आज ज्याला ॲक्टींगची युनीव्हरसीटीच मानले जाते.....आशा पारेख, वहिदा रहेमान, नुतन, मौसमी चॕटर्जी पासून ते तब्बू, दिपीका, तापसी पन्नू पर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर आणि दिलीपकुमार, धर्मेंन्द्र, जितेन्द्र, विनोद खन्ना पासून ते अगदी इरफान खान, फरहान, धनुष सारख्या नवीन अभिनेत्याबरोबर काम करुन आजही एक अद्वीतीय अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत मानाने राज्य करणारा शहेनशहा.....जंजीर नंतर चे शोले, दिवार, त्रिशुल, दोस्ताना, राम बलराम, डाॕन, मि. नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर सगळे एकसे एक बाप चित्रपट...प्रत्येक चित्रपटातील त्याची भुमिका त्याला एंग्री यंग मॕन चे लेबल आणि सुपरस्टारची पदवी मिळवण्यासाठीच लिहील्या गेल्या आणि त्याने अभिनयाने त्या सगळ्या जगल्याही....
त्याचे दिसणे, बोलणे, संवाद फेक, विनोदी असो वा सिरीयस, आनंदी असो वा दुःखी, सीन कुठलाही असो....संपुर्ण जीव ओतुन केलेला अभिनय....शोलेमधला त्याचा शेवटचा सीन असेल किंवा दिवार मधला मंदिरातला देवाशी बोलतानाचा सीन....अमर अकबर ॲन्थनी मधला विनोदी किंवा डाॕन मधला हेलनला पकडून पोलींसांसमोरुन घेऊन जाण्याचा सीन....फक्त बघत रहावे, ऐकत रहावे आणि त्याच्या अभिनयाचा एक भाग होऊन जावे.
१९९० मध्ये कुली च्या शुटींगच्या वेळी झालेला जिवघेणा अपघात...ते दोन दिवस....भारतातील प्रत्येक लहान मोठा अमिताभ प्रेमी ते दोन दिवस परमेश्वराकडे फक्त एकच मागणे मागत होता....त्याला वाचव....त्याला वाचव....आणि परमेश्वरालाही सगळ्यांची इच्छा ऐकायलाच लागली... जवळ जवळ सगळे डाॕक्टर हतबल झाले असताना तो वाचावा हा कलीयुगातील एक दैवी चमत्कारच होता....परमेश्वराने आणखी एक संधी दिली त्याला आणि त्या संधीचे त्याने सोनेच केले.
अपघातानंतरचा आणि आत्तापर्यंतच्या केलेल्या सगळ्या चित्रपटाचा कळस म्हणजे....शराबी....सुरुवात ते शेवट संपुर्ण कमर्शिअल....प्रकाश मेहरांच्या पडत्या काळात त्यांना कर्जबाजारीतून बाहेर काढण्यासाठी... अमिताभने किरकोळ मानधनावर स्वीकारलेला एक अप्रतीम चित्रपट....त्यातील संवाद कादरखान यांचे तर संगीत बप्पी लाहीरी यांचे....ओमप्रकाश, प्राण, जयाप्रदा आणि रणजीत यांच्यासारख्या मात्तबर स्टारकास्ट नी भरलेला एक आऊट ॲन्ड आऊट हिट चित्रपट.....सगळीच भट्टी संपुर्णपणे जमून आलेली...मुछें हो तो नथ्थुलाल जैसे....एक कलाकार इन्सान को ना पहेचान वो कलाकार नही होता.....वैसे तो छोटा है लेकिन घर हो तो ऐसाही होना चाहिए....या तो दिवाना हसें या तु जिसे तोफीक दे वरना इस दुनिया में आकर मुस्कुराता कौन है ....आॕंखे मुंद करके बैठे हो तस्सवुर मे किसीके और वो छम से आजाए....अरे मेरे बापके चमचो आज तुम यहाॕं किसलीए आए हो....मुझे छोडके मत जाओ मुनशीजी... एक एक संवाद, सीन, गाणी म्हणजे लाजवाब आणि या सर्वांवर कडी म्हणजे अमिताभचा जबरदस्त अभिनय....सगळंच सुप्पर डुप्पर हिट. त्यानंतर अग्निपथ ही असाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट पहिल्यांदाच आवाज डब करुन काढलेला पण त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या आवाजाचेही चाहते असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या मुळच्या आवाजात परत डब केलेल्या चित्रपटालाच जास्त गर्दी केली.
राजकारण आणि चित्रपट कंपनी या दोन्हीमध्ये आलेल्या अपयशाने एखादा संवेदनशील कलाकार संपला असता, जीवनातुन उठला असता पण हाच फरक आहे बाकीच्यांमध्ये आणि अमिताभ मध्ये....येणाऱ्या काळाची आणि वेळेची पावले ओळखून त्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे टेलीव्हिजन स्वीकारला....कौन बनेगा कोरडपती..... या मालीकेतुन वर्षानुवर्षे फक्त चित्रपटात दिसणारा हा सुपरस्टार सामान्य जनतेला समोरासमोर भेटायला लागला....हात मिळवू लागला....प्रत्येक भाग हा स्पेशल होऊ लागला....भाषेवरती प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आपुलकीने केलेले मार्गदर्शन आणि त्याच्या प्रचंड अनुभवाची झलक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागली....आणि परत एकदा हा माणूस करोडो फॕनचा दिवाना झाला.....यानंतर मात्र त्याला अभिनयात कोणालाच काही प्रुव्ह करुन दाखवायचे नव्हते....मग त्याने स्वतःला आवडतील त्या भुमिका करायला सुरुवात केली....वजीर, पिकू, तीन, पींक या चित्रपटात आजही त्याच्या अभिनयाची प्रचंड ताकद दिसून येते.
अपघातानंतर झालेल्या शस्त्रक्रिया, राजकारण आणि व्यवसायातील अपयश ही कारणे कधीही अडथळा म्हणून न घेता या वयातही त्याचे वेळ पाळण्याची सवय, चालण्याची लकब, प्रचंड उत्साह आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे आजही याचा चित्रपटसृष्टीवर प्रचंड दबदबा आहे.
११ आॕक्टोबरला २०१७ अभिनयाच्या शहेनशहाला ७५ वर्षे पुर्ण होतायेत...जवळ जवळ ५० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर रात्रंदिवस राज्य करणाऱ्या या "विजय" चा वाढदिवस...
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छांबरोबरच दिर्घ आयुष्य आणि अजुन बऱ्याच नवनवीन भुमिका पहायला मिळोत हीच एका अमिताभवेड्या चाहत्याची मनापासूनची इच्छा.
कदाचीत या त्याच्या कलागुणांमुळेच....तो माझा "प्रोफेशनल गुरु" कधी झाला हे मला देखील कळले नाही. म्हणूनच कमीत कमी १०० पेक्षा जास्त वेळा शराबी चित्रपट पाहूनदेखील कधी हा चित्रपट टिव्हीवर चालु असेल तर आजही टिव्हीसमोरुन हलण्याची इच्छाच होत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा