🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com
*फलटण,बरड*
*०४/०७/२०१९*
*०५/०७/२०१९*
राम कृष्ण हरी,
फलटण ते नातेपुते (शिंगणापूर फाटा) हा
30 किलोमीटरचा प्रवास एकाच दिवशी म्हणजे काल गुरूवारी माऊलीच्या जयघोषात पालखीच्या
पुढे जाऊन आम्ही पूर्ण केला होता. आमच्या एका सहकार्याला घरगुती कामासाठी कराडला जावे
लागणार असल्यामुळे
दोन मुक्कामाचे अंतर एकाच दिवशी चालायचे
असे ठरवून आम्ही काल दिवसभर सकाळी दहा ते रात्री नऊ तीस किलोमीटर प्रवास पूर्ण केला.
माऊलींचे नाम घेताना हा प्रवास कसा पार पडला हे आम्हाला समजलेच नाही मात्र रात्री थोडा
त्रास झाला.
फलटणच्या विश्रामगृहावर रात्री उशीरा
रात्री उशिरा पोहोचलो पुढारीचे फलटण तालुका प्रतिनिधी हरीश पाटणे यांचा शिलेदार यशवंत
खलाटे यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांचा खूप चांगला पाहुणचार केला. एक वेगळा व्यक्ती एक
चांगला माणूस आम्हाला भेटल्याचा आनंद झाला. फलटणमधील पत्रकार खरे तर वारकऱ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करतात.
यशवंत खलाटे आणि त्याच्या सर्व सहकार्याने माझा मोठा भाऊ म्हणून केलेल्या आदरातिथ्य
आणि दिलेला सन्मान खरच लक्षात राहील. रात्री उशिरा विश्रामग्रहावर पोहोचल्यानंतर
पाय खूप दुखत असल्यामुळे आणि शरीराने साथ न दिल्यामुळे कालच काहीच लिहू शकलो नाही.
मात्र माऊलीचे नाम आणि माऊलींचा आशीर्वाद सोबत असल्यामुळे एवढे विशेष त्रास जाणवले
नाही.
काल रात्री वारीमध्ये चालत असताना फार
मोठी प्रश्न उद्भवला. ही समस्या किंवा अडचण वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे मी सांगू
इच्छित नाही. मात्र न केलेल्या चुकीचा त्रास झाला. सुरुवातीपासूनच माझा सकारात्मक विचारांवर
आणि कर्मावर विश्वास आहे. Success
through Positive Mental Attitude या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे .1996 सालु हे पुस्तक मी
वाचले होते. मुळ इंग्रजी पुस्तकाच्या मी मराठीमध्ये नोट्स काढल्या होत्या. चुकीचे काही
केले नसेल तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आपली दिशा योग्य असेल तर
कधीही अपयश येत नाही. आसा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे हा त्रास झाल्यानंतर काही
क्षण वाईट वाटले. मात्र त्याच क्षणी पंढरपूरच्या दिशेने तोंड करून *विठ्ठला* असा मोठ्या
आवाजात टाहो फोडला. काही अंतर या विचारातच आणि विठ्ठल नाम घेत चालत राहिलो.
विठ्ठल नामाचा महिमा काय असतो आणि सत्याच्या
बाजूने कायम परमेश्वर उभा असतो, याचा प्रत्यय मला फक्त पाचच मिनिटात आला. पाच मिनिटानंतर
महामाऊलींचा मला फोन आला आणि त्यांनी माझी सर्व बाजू उचलून धरली आणि तुम्ही असेच पुढे
काम करत राहा. तुमची कोणतीही चूक नाही,काम करत रहा मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद
दिला आणि माझे डोके हलके झाले.
विठ्ठलाने फक्त पाच मिनिटात सकारात्मक
विचाराचा, सत्कृत्याचा, सत्कर्माचा रिझल्ट दाखवला होता, मी खूप आनंदी झालो. पंढरीच्या
वारीत असे अनेक सुखद प्रसंग ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतात त्यातून मी कसा अपवाद
असेन !
राम कृष्ण हरी
आज शुक्रवार सकाळी पुढे फार काही चालवायचे
नसल्यामुळे आम्ही सर्व सहकारी उशिरा उठलो. आमच्या सहकार्याचे कराडला जाणे रद्द झाले होते. आम्ही तशी विठ्ठलाकडे
विनवणी केली होती. दिवसभर काय करायचं शेवटी
शिंगणापूरला जायचा निर्णय घेतला. गाडी तयार होऊन बसलो तेवढ्यात विश्रामगृहावर पालखी
सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे माऊली यांची भेट झाली. 1990 पासून भिसे
माऊली पंढरीची वारी करत आहेत. अनेक खस्ता खात, सर्व परिस्थितीवर मात करत यांनी आजपर्यंत
पंढरीची वारी कव्हर केली आहे. वारी जगापर्यंत पोचवण्यासाठी मिडीयाचे फार मोठे योगदान
आहे असे भिसे माऊली यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. बदलती वारी, वारीमधील बदलती पत्रकारिता
याविषयी आम्ही बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्वजण शिंगणापूरला जायला निघालो.
माऊलींचा मुक्काम आज बरडला होता. बरड
पासून शिंगणापूर हे अंतर पंधरा किलोमीटर आहे त्यामुळे वारकऱ्यांचा ओढा शिगणापूर कडे खूप होता शिंगणापूर गावात जिकडेतिकडे
वारकरी दिसत होते.विदर्भ मराठवाडामधील वारकरी शिंगणापूरला फार गर्दी करतात .शिंगणापूर
हा आमचा कुलस्वामी, तेथे गेल्यानंतर आमचे परंपरागत बडवे संतोष बडवे यांना भेटलो. रणजित
पाटील यांनी मोहन बडवेंना फोन करून बोलावून घेतले.खूप गर्दी असूनही व्यवस्थित दर्शन
घेतले, शिंगणापूर ची सर्व माहिती घेतली,व्हिडिओ तयार केला आणि परतीच्या प्रवासाला बरडकडे
निघालो.
*See Pudhari online link*
बरडला जाण्यासाठी जवळचा रस्ता पकडला.
या रस्त्यावर सगळीकडे भकास भकास होते. जावळीमध्ये जनावरांची छावणी दिसली, छावणीमध्ये
जनावरांची संख्या कमी असली तरी या भागात अजिबात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची
ओढ लागली होती आणि मशागती करताना शेतकरी दिसले.
जुलै महिना आला तरी पावसाचा पत्ता नाही.
माण खटाव फलटण तालुक्यात भीषण परिस्थिती आहे हे वास्तव आजच्या प्रवासात पाहायला मिळाले.
एका गावातून जात असताना रस्त्याच्या कडेला प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरेल कळशी
हंडे ठेवलेले दिसले .जरा पुढे गेलो तर एका ठिकाणी टँकर मधील पाणी या बॅरलमध्ये भरले
जात होते. ग्रामस्थांची भेट घेतली. हे पाणी पाहून धक्का बसला. टँकरमधून गावागावात अस्वच्छ,
दुषीत पाणी पोहचवले जात होते, हे या भागातील लोकांना समजत नव्हते असे नाही. पण पाण्यासाठी
टाहो करणाऱ्या या नागरिकांना , ग्रामस्थांना मिळेल ते पदरात पडले असे समजून ते पाणी
स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता.
कराड साताराचे लोक पाण्याचा किती अपव्यव
करतात, शुद्ध पाणी गाड्या धुण्यासाठी, शौचालयासाठी वापरतात. सकाळचा भरलेले पाणी शिळं
झालं म्हणून संध्याकाळी ओतून टाकतात,अशी स्थिती जिल्ह्याच्या एका टोकाला असताना दुसऱ्या
टोकावर माण फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आह,पाण्याच्या
टँकरची वाट पाहावी लागते हे विदारक चित्र पाहून खूप वाईट वाटले.
टॅंकर मालकाने पुढारी ऑनलाईन बुम पाहून
थोडेसे त-त-प-प केलं. आम्ही आठ टॅंकर फलटण नगरपालिकेत भरून आणतो असे त्यांनी सांगितले
.मात्र फलटणमध्ये असेच पाणी दिले जात असेल याचा विचार केला नक्की दिले जात नसेल .म्हणजेच
टँकर मालक खोटे बोलत आहेत, अस्वच्छ पाणी भरून ग्रामस्थांना वाटत आहेत, याकडे प्रशासनाचे
लक्ष नाही हे जाणवले.
साडेचार वाजता बरडला पालखी तळावर पोहोचलो.
बारा नंबर दिंडी मध्ये जाऊन वारकरी सहकार्याने गप्पा मारल्या.थोडा वेळ ट्रकमध्ये बसून
आराम केला. या पालखी तळा शेजारीच एक दर्गाह आहे या दर्ग्याच्या परिसरात मुस्लिम समाजाचे
कब्रस्तान आहे. याच परिसरात अनेक वारकऱ्यांनी आपले तंबू उभारले होते.अनेक वारकर्याने
त्या दर्गा च्या समोरील शेडमध्ये आपले अंथरून टाकून जागा धरली होती. ही मुस्लिम समाजाची
जागा आहे,येथे कसे झोपावे झोपावे असे त्यांना काहीच वाटले नव्हते. या लोकांची भेट घेऊन
त्यांची प्रतिक्रिया घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले आहे,जगातील सर्वांच्या
कल्याणाची काळजी घेतली आहे, सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आहे,असे
त्यांनी बोलून दाखवले.या लोकांची मुलाखत घेऊन पुढे गेलो.
*See Pudhari online link*
माऊली पालखी सोहळा अतिशय महत्वाचा क्षण
म्हणजे समाज आरती सोहळा. सोहळ्याचे मालक हरफळकर यांच्या मालकीच्या ट्रक वर उभा राहून
हा सोहळा पहिला, फोटो काढले. व्हिडिओ तयार केले बातमी पाठवली. त्यानंतर ट्रकच्या केबिन
वर बसून तेथे उपस्थित वारकऱ्यांची गप्पा मारल्या.
*See Pudhari online link*
तिकडे बारा नंबर दिंडीमध्ये साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार
झाला होता. लायन्स क्लबचे माझे सहकारी विराज जांभळे मला भेटायला तेथे आले होते, त्यांच्यासोबतच
जेवण घेतले.
रात्री उशिरा नातेपुते मुक्कामी पोहोचलो.
नातेपुते हे माझे मित्र राहून खोचीकर यांचे आजोळ. गेली तीन वर्षे खोचीकर यांच्या आजोळी
आम्ही वारकरी उतरतो रात्री उशिरा त्यांचे मामेभाऊ मंगेश यांच्या सोबत गप्पा मारत बसलो.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान मात्र इमोशनल
गेला.
माऊली माऊली !
माऊली माऊली !
Also available at
👇karawadikarad.blogspot.com
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩