फॉलोअर

१२ फेब्रुवारी २०१७

असंच काहीतरी सुचलेलं 1

1
उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

2
एकमेकाना आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

3
कोणीतरी असावं
जसं आपण आहे
तसं स्वीकारणारं
चांगलं वाईटच्या
खोलात न जाणारं
पण
खुलकर प्रेम करणारं


4
सखे,
तुझ्या कानात काहीतरी
सांगायचं आहे
अव्यक्त मन माझं
व्यक्त करायचं काय.


5
तु सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही...

6
सखी,
तु आणि मी
मी आणि तु
कधी वेगळे नव्हतोच
तुझी आठवण यायला
तुला कधी विसरलोच नव्हतो.


7
ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं की
आरश्यात पहावसंच वाटत नाही !
हृदयातच तुझ्या राहते मी,
आत्ता घरी रहावसच वाटत नाही !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...