फॉलोअर

१४ फेब्रुवारी २०१७

तुझं विस्मरणं

तुझं स्मरण माझं विस्मरण


ती
तू विसरलास काय मला ?
डिलिट केलंस का माझं नाव !
आज कशी आठवण झाली ?
मेसेज करायला सवड कशी मिळाली ?

तो
सखी,
तु आणि मी
कधी वेगळे नव्हतोच !
तुझी आठवण यायला
तुला कधी विसरलोच नव्हतो !

तुझं नाव डिलिट करायला,
तु फोन लिस्ट थोडीच आहेस ?
सवड न मिळायला
तु सवडीची गोष्ट थोडीच आहेस ?

स्मरणात तू, स्वप्नात  तू
रोमारोमात फक्त तूच !
खुप खुप  दूर असूनही
फार जवळ आहेस तू !

मला सांग सखे,
मनी आले की मेसेज पाठवणं
यात गैर काय आहे ?
क्षणोक्षणी तुझाच ध्यास असणे
यात माझा दोष काय आहे ?


तु नेहमी म्हणायचीस
डोळ्यांत तुझ्या पाहिलं की
आरश्यात पहावस वाटत yu !
हृदयातच तुझ्या राहते मी,
आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

मग आज तू अशी वेगळी
का वागलीस
मी मेसेज पाठवूनही
माझ्यावरच का सरकलीस !
.........सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...