रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
२७ जून २०१६
२६ जून २०१६
पंढरीची वारी
🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली हो राम कृष्ण हरी
⛳⛳⛳⛳⛳⛳
पंढरीची वारी दोन दिवसावर आली आहे.
दिनांक 28 जुन रोजी ज्ञानेश्वर माऊली पालखी
सोहळा आळंदी येथून प्रस्थान करणार आहे.
14 जुलै रोजी हा सोहळा पंढरीत पोहचेल.
सुमारे पावणे तीनशे किलोमीटरचा या भक्ती प्रवासात
सुमारे 4 लाख वारकरी सहभागी होतात.
गतवर्षी दैनिक ' पुढारी ' ने मला ही
वारी कव्हर करायची संधी दिली होती.
खुप आनंद लुटला या वारीत.
खुप दिले मला या वारीने !
पायी वारी करण्याचा आनंद औरच!
गतवर्षी वारी विषयावर 22 लेख लिहू शकलो,
शिवाय तेवढेच माझी वारी दिनविशेष लिहता आले.
माऊली कृपा, दुसरे काय?
याही वर्षी पुढारीने मला ही संधी दिली आहे.
वारीला निघालो आहे,
माऊली कृपेने तुमच्यासाठी 'पुढारी'त लिहणार आहे.
शिवाय WhatsApp आणि Blog वर अपडेट्स देणार आहेच.
आशिर्वाद असु द्या, माऊलींनो !
....................
सतीश मोरे,
9881191302
दैनिक पुढारी कराड.
Visit my blog
Click this link👇
karawadikarad.blogspot.in
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
२५ जून २०१६
पंढरीची वारी
दिनांक 28 जुन ते 14 जुलै 2016
माऊली माऊली
चला येताय ना वारीला!
वारी live
on blog daily
खास अनुभव आणि वेगवेगळ्या बातम्या
फक्त पुढारी मध्ये
२० जून २०१६
सखीला मी का आवडतो
एकदा सखीने विचारले
तुला मी का आवडते ?
खुप विचार केला
पण उमगलंच नाही
मला तु का आवडतेस?
खुप वेळा स्वतःला विचारलं
उत्तर नाही मिळालं
काय सांगू तुला सखे
तुझं हसणं मला आवडतं
तुझं डोळे मिचकावनं तर वेड लावतं
तुझा श्वास मला रोखतो
तुझा भास मला बैचेन करतो
तुझं असणं मला साथ देतं
तुझं नसणं मला भिरभिर करतं
तुझा आवाज धडकन वाढवतो
तुझा स्पर्श स्फुल्लिंग आणतो
तुझी सावली मला साथ देते
तुझी मिठी तुझ्यात सामावून घेते
तुझी लाली मला खुणावते
तुझी .... मला
सारं जग विसरायला लावते
तुझं वागणं तुझं चालणं
तुझं गाणं, तुझं बोलणं
तुझं असणं, हळूच रूसणं
तुझं माझं करता करता
शेवटी तुझंच खरं करणं
तुझी काया, तुझा स्पर्श
तुझं बिलगणं,तुझं जवळ येणं
मला ओढणं, माझ्यात सामावणं
बेफाम होऊन श्वासात विरघळणं
तनातून मनात, मनातून देहात घुसणं
तुझ्यासोबतचा हर क्षण आठवतो
मला जगण्याची नवी उर्मी देतो
पण
तुझ्यावर मी प्रेम का करतो
तु मला का आवडतेस
खरंच सांगता येत नाही
कारण
तुला मी माझ्यातच पाहतो
स्वःतवरच प्रेम का करतो
कुणी कधी का पुसतो?
सतीश मोरे
१८ जून २०१६
सिक्किम सफर 7
| रोप वे मधून दिसणारे गंगटोक |
गंगटोक शहरामध्ये लष्कराच्या छावण्या आहेत. लष्कराच्या ताब्यात असलेल्या गणेशटोक आणि हनुमान टोक या उंच टेकड्यांवर जावून गंगटोकचा वेगळाच व्ह्यू पहावयास येतो. या दोन्ही ठिकाणी गणेश आणि हनुमान मूर्ती सिक्किमचे तत्कालीन गव्हर्नर औंधचे पंतप्रतिनिधी ............................ यांनी बसविलेल्या आहेत. अतिशय सुंदर मंदिरे आणि डोळ्याला भावणाऱ्या मूर्ती आहेत. हनुमान टोक मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. येथे पूजा व इतर विधी करण्यासाठी भारतीय जवान आहेत.
बुकिंग झाल्यानंतर दिलेल्या वेळेत नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचावे लागते. स्वच्छ हवा, शुभ्र प्रकाश व अनुकूल नैसर्गिक परिसिथती असेल तरच पॅराग्लायडिंग करता येते. पाऊस असेल तर कोणत्याही परिस्थितीत केले जात नाही. उंच ठिकाणावर गंगटोक दूरदर्शन केंद्राच्या टॉवरनजिक पॅराग्लायडिंग स्टार्ट-अप सेंटर आहेत. याठिकाणी जाण्यासाठी अतिशय चढाचा, अवघड वळणदार रस्ता 5-6 किलोमीटर पार केल्यानंतर येथे पाहोचतो. पायलट नियम समजावून सांगतो. आपल्या शरीरावर जॅकेट व पॅराग्लायडिंग किट बांधले जाते. हातात सेल्फी स्टिक व कॅमेरा दिला जातो. सुरूवात करताना उताराच्या रस्त्याने खूप जोरात पळत जावे लागते. संपूर्ण किट दोन्ही बाजूला उंच धरून दोन सहाय्यक आपल्यासोबत धावतात. हवा शिरल्यानंतर पॅराग्लायडिंग पॅराशूट फुलतो व अचानक आपण उचललो जातो.
१७ जून २०१६
सिक्किम सफर 6
माय जर्नी बाय एअर
मुंबईहून इंडिगोच्या सकाळी 7 वाजून 25 मिनीटांनी सुटणाऱ्या विमानातून आम्ही प्रवासाला निघालो. ही विमान सेवा अतिशय सोयीची आणि जलद आहे. प्रवास कसा झाला हे कळलंच नाही. साडेनऊ वाजता आम्ही गुवाहटी विमानतळावर पोहोचलो. उतरताना आकाशातून गंगा नदीचे पात्र पहावयास मिळाले. दोन तीन दिवस जोरावर वृष्टी झाल्यामुळे पाणी गढूळ होते. लष्कर हवाई अड्डा, फोटोग्राफी करणेस मनाई आहे, असे आमच्या वैमानिकाने जाहीर केले. म्हणायला का होईना मी गुवाहाटीला जाऊन आलो. खाली उतरण्यास परवानगी नव्हती. गुवाहटीचे प्रवासी उतरले आणि तेथून पुढे बागडोग्राला जाणारे प्रवासी या विमानात बसले. एक तास ही प्रक्रिया सुरू होती. साडेदहा वाजता आम्ही पुन्हा आगेकूच केले. साडेअकरा वाजता बागडोग्रा या लष्करी हवाई तळावर आम्ही उतरलो.
![]() |
जलपायगुडीमध्येही डूगडूग...
बागडोग्रा ते जलपायगुडी या दरम्यानच्या प्रवासात रस्त्यावर धावणाऱ्या मिनीडोअर (आपल्याकडील डूगडूग) मला दिसल्या. डूगडूग बघून मला कराडची आठवण झाली. चला, करवडी, वाघेरीची आरोळी दिली. इकडेपण डूगडूग आहे होय , असे मी आमच्या कार ड्रायव्हरला विचारले. तेव्हा त्याने पश्चिम बंगालमध्ये खासगी वाहतूक जोरात चालते. खासगी वाहतूकीवरच पर्यटन व्यवसाय जोरात चालतो, असे त्याने सांगितले.
तिश्ता नदीच्यावरील भागात असलेल्या धरणातून केव्हाही पाणी सोडले जाते. तसेच नदीमध्ये डोंगर, पर्वत, कडे कोसळण्याचे प्रकार सर्रास होत असतात. अचानक पाणी पातळी वाढते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रिवर राफ्टिंगला कायदेशीर परवानगी नाही. मात्र नैसर्गिक परिस्थती चांगली असल्यामुळे आम्ही रिवर राफ्टिंग करण्याचा बेत आखला.
रात्री 8 च्या सुमारास गंगटोक शहरात आम्ही प्रवेश केला.
१६ जून २०१६
सिक्कीम सफर भाग 5
मुख्यमंत्र्यांची इच्छा.. राज्यपालांचा आग्रह...
![]() |
| महिला पोलीस ठाणे उद्घाटन प्रसंगी फोटो |
नो पाॅलिटीकल प्रेशर
वर्षभरात एखाद्या ठाण्यात 50 ते 60 गुन्हे दाखल होतात. राणीपूलमध्ये 2015 मध्ये 62 गुन्हे दाखल झाले होते. सिनियर अधिकारी सावित्री प्रधान या पूर्णवेळ पोलिस ठाण्यात असतात. आम्हा महिला पोलिसांना कसलीही अडचण आली तर धावून येतात. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे. आम्हाला काम करताना कोणताच दबाव येत नाही. पोलिस स्वतंत्रपणे काम करतात. राजकीय दबाव नसल्यामुळेच सिक्किममध्ये पोलिसांचा दबदबा आहे आणि त्यामुळेच आम्ही गुन्ह्यांवर नियंत्रण ठेऊ शकतो.' , असे सिनियर अधिकारी अंकिता यांनी सांगितले.
डॅशिंग सावित्री मॅडम ठाणे प्रमुख
पोलीस को पब्लिक का साथ चाहिए
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...











