*☑ कशी असते पॅन कार्ड ची रचना ?*
➖➖➖➖➖➖➖
*🔺पॅन कार्डची रचना –*
भारत सरकार च्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आपणास लॅमिनेटेड स्वरूपामध्ये एक कार्ड दिले जाते. त्यावर तुमचा फोटो, नांव, सही व एक दहा अंकी एक नंबर दिला जातो. त्यास पॅन नंबर असे म्हटले जाते. त्यामध्ये पहीली पाच अक्षरे ही वर्णाक्षर, पुढिल चार अक्षरे ही अंक व दहावे अक्षर पुन्हा वर्णाक्षर असते.
🔲🔲🔲
पॅनचे कार्ड :CHIPS0061H. यात सुरुवातीला A पासून Zपर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात.
चौथे मुळाक्षर खालील प्रमाणे कार्डधारकाची जातवारी सांगते.
1) कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.
2) कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते.
3) कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते.
4) कार्डधारक जर फर्म असेल तर चौथे मुळाक्षर F असते.
5) कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते.
6) कार्डधारक जर सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते.
7) कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य संस्था तर चौथे मुळाक्षर L असते.
8) कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते.
9) कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते.
10) कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
🔲🔲🔲
परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते.
*🔺पॅन कार्ड कसे काढावे –*
आपल्या शहरातील विविध अधिकृत एजन्सी द्वारे किंवा नैशनल सिक्युरिटीज डिपॉजटरी लिमिटेड (NSDL) च्य़ा ऑनलाईन पोर्टलवर _*🔺(https://tin.tin.nsdl.com/pan/form49Adsc.html)* पॅन कार्ड काढणे आता अत्यंत सोपे झाले आहे. https://india.gov.in/apply-online-new-pan-card या संकेत स्थळावरून आपल्याला 49 अ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल . नंतर तो विहीत नमुण्यामध्ये भरूण द्यावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नांव, जन्मतारीख, पत्ता, वडीलांचे व आईचे संपुर्ण नांव मोबाईल नं. अचूक भारावा लागेल. फॉर्मसोबत तुम्हाला नजीकच्या काळातील स्टॅम्प साईज दोन फोटो, रहीवाशी पुरावा, ओळखीचा पुरावा तसेच जन्मतारखेचा दाखला द्यावा लागेल. उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड इ. तुम्हाला फिजीकली सदरचे डॉक्युमेंट द्यायचे नसतील तर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ई-के वाय सी व ई-साईन द्वारे सुद्धा नोंदणी केली जाऊ शकते. ऑनलाईन नोंदणी करताना 49 अ फॉर्म मध्ये बरोबर माहीती नोंद करावी लागते. ती आपणास जतन करता येते. त्यासाठी वेब साईट वर आपणास तात्पुरता नोंदणी क्रमांक मिळतो. त्यामुळे डाटा लॉस सारख्या परिणामांना सामोरे जावे लागत नाही. संपुर्ण माहीती भरूण झाल्यावर आपणास ती ऑनलाईन जमा करावी लागते. पॅनकार्ड साठी ची फि आपणास ई-पेमेंट ने अथवा रोखीने देता येते. शेवटी आपणास नोंदणी क्रमांक व कुपण कोड दिला जातो. त्याद्वारे आपण पॅन कार्ड स्टेटस _*🔺https://tin.tin.nsdl.com/tan/servlet/PanStatusTrack*_ या लिंक द्वारे तपासू शकतो.
🔲🔲🔲
पॅन कार्डबाबत व्हेरीफिकेशन केले जाते. पॅनकार्ड तयार झाल्यानंतर सर्व प्रथम आपल्या मोबाईलवर त्याचा मेसेज मिळतो. शक्यतो पॅन कार्ड एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला दिलेल्या पत्यावर पोस्टाद्वारे मिळते. त्याशिवाय पॅनक्रमांकाच्या माहीतीतील दुरूस्ती किंवा बदल सुद्धा इंटरनेट वरून करता येतो.
➖➖➖➖➖➖➖
🔲◾🔲◾🔲◾🔲
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा