फॉलोअर

३१ ऑक्टोबर २०१७

पिन कोड काय आहे

*🔺🙇🏻 मनातील प्रश्न...*

*☑ लॉजिक काय आहे पिन कोड ( PIN CODE) मागचं...*
➖➖➖➖➖➖➖
आपणास आपल्या घरी कोणते पार्सल, पत्र अथवा डिलीव्हरी मिळवायची असेल तर आपणास पत्याबरोबर पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर विचारला जातो. जेणेकरूण आपली डिलीव्हरी योग्य वेळेत सत्वर होईल. पिन नंबर हा पत्या इतकाच महत्वाचा असतो. पत्रव्यवहार अधिक सोपस्कर व्हावा म्हणून भारतामध्ये १५ ऑगस्ट १९७२ पासून पिन कोड वापरात आणला गेला .
पिन कोड कसा तयार होतो. त्याची संकल्पना काय आहे. हे तुम्हाला कदाचित माहीती नसेल.

*🔺पिनकोड मागील रहस्य खालील माहीती वरून उलघडून पाहू या...*

◼तक्ता क्र.1 प्रमाणे पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो

*🔘 विभाग तक्ता क्र.1*

अंक विभाग
1 व 2 उत्तर
3 व 4 पश्चिम
5 व 6 दक्षिण
7 व 8 पुर्व
9 आर्मी
भारतामध्ये एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत. 1 ते ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात आणि ९ हा क्रमांक भारतीय सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो.

*🔘 तक्ता क्र. 2*

पहिली संख्या विभाग राज्ये
1 उत्तर दिल्ली, हरयाना, पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू कश्मीर
2 उत्तर उत्तर प्रदेश व उत्तरांचल
3 पश्चिम राजस्थान व गुजरात
4 पश्चिम महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड
5 दक्षिण आंध्र प्रदेश व कर्नाटक
6 दक्षिण केरळ व तमिळनाडू
7 पुर्व पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर पुर्व
8 पुर्व बिहार व झारखंड
9 ए.पी.एस आर्मी पोस्टल सर्व्हिस
पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात.

*🔘 तक्ता क्र. 3*

पिन मधील पहीली दोन अक्षरे राज्ये
11 दिल्ली
12 ते 13 हरयाना
14 ते 16 पंजाब
17 हिमाचल प्रदेश
18 ते 19 जम्मु कश्मिर
20 ते 28 उत्तर प्रदेश व उत्तरांचल
30 ते 34 राजस्थान
36 ते 39 गुजरात
40 ते 44 महाराष्ट्र
45 ते 49 मध्यप्रदेश छत्तीसगड
50 ते 53 आंध्रप्रदेश तेलंगण
56 ते 59 कर्नाटक
60 ते 64 तमिळनाडू
67 ते 69 केरळ
70 ते 74 पश्चिम बंगाल
75 ते 77 ओरिसा
78 आसाम
79 उत्तर पूर्व
80 ते 85 बिहार व झारखंड
90 ते 99 आर्मी पोस्टल सर्व्हिस (APS)

*_◼पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात._*

_*◼पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात.*_
➖➖➖➖➖➖➖
📮📩📮📩📮📩📮

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...