फॉलोअर

०९ मार्च २०१७

आजचा नाष्टा आमदार साहेबांसोबत

आजचा नाष्टा आमदारांसमवेत 4 ऑक्टोबर 2015


अनंत चतुर्थीचा दिवस दैनिकाला सुट्टी असल्याने निवांत होतो. तरीपण कराडचा फेरफटका मारून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे का पहायला बाहेर पडलो. बापू डुबलांसोबत दत्त चौकात आलो. तिथे आमचे जवळचे फोटोग्राफर नितीन रांगोळे नवीन अल्टो कार मधून हात काढत कार घेतली असे आनंदाने सांगत, खुणावत  पुढे जाऊन थांबले. पेढे आता नाहीत, चला चहा पिऊया असा आग्रह करून त्यांनी गजानन हाॅटेलात बळजबरीने नेले. चहा पिऊन उठणार तेवढ्यात आपले आमदार बाळासाहेब पाटील हाॅटेलात आले. आमदारसाहेब आल्यावर हाॅटेलचे मालक, वेटर यांच्या बरोबरच नाष्टा करायला बसलेल्या सर्वाचीच लगबग सुरू झाली. 

सुरूवातीच्याच कक्षात टेबलावर नाष्टा करत दोन युवक बसले होते, त्याच्या समोर साहेब आणि गंगाधर जाधव बसले. काय देणार खायला असे विचारून साहेबांनी पोहे न टाकता मिसळची ऑर्डर दिली. दरम्यान समोर बसलेल्या दोघांची साहेबांनी चौकशी केली. त्यांनी ओळख करून दिली. वडुजच्या त्या दोघांना कळलेच नाही समोरची व्यक्ती कोण आहे. दरम्यान कराडचे आमदार आपल्या सोबत, चौकातील छोट्या छोट्या हाॅटेलात नाष्टा करायला बसलेत याचे त्यांना आश्चर्य वाटले. गप्पा मारत नाष्टा झाला. ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांना साहेबांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वडूजला आमच्या घरी या असे निमंत्रण देऊन दोघे बाहेर पडले.

साहेबांसमवेत नाष्टा केला. दरम्यान इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झांज पथकाने पुजा सुरु केली. कराडात महारूद्रा नावाने झांज पथक स्थापन झाले आहे, त्याची माहिती माझ्याकडून घेतली. दोन दिवसापुर्वी डुबल गल्लीत राजीव डुबल यांच्या पुढाकाराने पुण्याचे शिवमुद्रा पथक आणले होते, कराडकरानी या पथकाला डोक्यावर घेतले, चांगला उपक्रम डुबल गल्लीत झाला, असे साहेबांनी सांगितले. त्याच दिवशी कराडात लोणावळ्याचेही पथक होते,  मात्र एक सुर एक ताल धरत आणि शिट्टी चा वापर न करता फक्त ताशाच्या तालावर,  इशाऱ्यावर पुण्याचे पथक सर्वाना ठेका धरायला लावते, असे आमदार साहेबानी सांगितले.  हे ऐकून या व्यक्तीची निरिक्षण शक्ती थोरल्या साहेबांप्रमाणे आहे, याचा प्रत्यय आला. नाष्टा झाल्यावर बील किती झाले याची माहिती घेऊन साहेब बील द्यायला उठले. गजाननच्या मालकांनी नम्रपणे बील घ्यायला नकार दिला. मग साहेबांनी हळूच शंभरच्या दोन नोटा वेटरच्या हातात ठेवल्या. सोबत आलेल्या कार्यकर्ताना बील द्यायला लावणारे लोकप्रतिनिधी मी खुप पाहिले आहेत. पण स्वतच्या खिशातून पैसे देणारे बाळासाहेब पाटील यांच्या सारखे लोकप्रतिनिधी क्वचितच असतात, हे पहायला मिळाले. मध्यंतरी मुंबई येथे साहेबांसोबत दोन तीन वेळा जेवलो होतो, तेव्हा सुद्धा मी हे अनुभवले होते.


नाष्टा करून बाहेर पडलो. येतो म्हणून साहेबांना नमस्कार केला, पण सतीश थांबा, काय गडबड आहे, असे म्हणत गंगाधर जाधव यांच्या खताच्या दुकानात मला घेऊन गेले. तिथे पण खते , बियाणे याची माहिती घेताना नवीन कुठला शाळू आला आहे असे विचारून बियाणे पिशवी हातात घेऊन पाहीली. दरम्यान दत्त चौकातील नंदकुमार गणेश मंडळांने तयारी झाली आहे, असा निरोप दिल्यानंतर आम्ही सारे जण उठलो. साहेबांच्या हस्ते मिरवणूक नारळ फोडण्यात आला. पालखी खांद्यावर घेऊन साहेब थोडे अंतर चालले. कराडच्या नवीन झांज पथकाने सुद्धा नारळ फोडण्याची विनंती केली. पथकातील युवकांची आस्थेने चौकशी केली, सर्वाना नमस्कार करून साहेब तेथून निघाले.

आजच्या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपकांचे पैलू पहायला मिळाले. पी डी पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे पहायला मिळालं.

गणपती बाप्पा मोरया.

4 /10/2015
सतीश मोरे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...