*☑ या '6' फळांच्या बीया खाणं सुरक्षित आणि आरोग्यदायीही !!*
➖➖➖➖➖➖➖➖➖
अनेकदा फळं खाताना आपल्या सोयीनुसार आपण फळांची साल काढतो, त्यामधील बीया काढून त्याचा आस्वाद घेतो. पण असे केल्याने काही फळांमधून मिळणारी पोषणद्रव्यच आपण बाहेर टाकत असतो. या काही फळांचा आस्वाद घेताना त्यामधील बिया काढून फेकू नका.
*🔺पपई -*पपईच्या बीयांबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र पपईच्या बीयांमध्ये आढळणारी papain पॅपीन नामक proteolytic enzymes शरीरातील /पोटातील जंत बाहेर काढायला मदत करतात.
*🔺किवी -* कीवी फळातील काळ्या बीयांमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास, कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण आणि हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
*🔺अॅव्हॅकॅडो -* यामध्ये सोल्युबल फायाबर्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असतात. तसेच अॅव्हॅकॅडो सीडमध्ये पोटॅशियमही मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहण्यास तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते.
*🔺लिंबू -* सलाड किंवा ज्युसमध्ये 1-2 बीयांचा समावेश करणे सुरक्षित आहे. त्यामधील salicylic acid वेदना कमी करण्यास मदत करतात.
*🔺ब्लॅकबेरी -* ब्लॅकबेरीच्या बीयांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळते. सोबतच डाएटरी फायबर्स, प्रोटीन्स आणि कॅरोटेनॉईड्स आढळतात. ब्लॅकबेरीच्या बीयांमधील पॉली अनसॅच्युरेटेड फॅट हृद्यविकाराचा धोका कमी करतात.
*🔺कलिंगड -* उन्हाळ्यात विविध स्वरूपात कलिंगड खाल्ले जाते. पण त्यावरील साल आणि बीया मात्र काढून फेकल्या जातात. त्याऐवजी स्मूदीमध्ये बीयांचा वापर केल्यास नखांचे आणि केसांचे आरोग्य सुधारते. त्यामधील झिंक, फायबर आणि आयर्न घटक शरीराला oleic आणि linoleum अॅसिडचा पुरवठा करतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲◼🔲
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा