फॉलोअर

०५ नोव्हेंबर २०१६

भाजप-उंडाळकर (सदृश्य) आघाडी, धडपडणारी "सेना'; एमआयएमचा डाव

भाजप-उंडाळकर (सदृश्य) आघाडी, धडपडणारी "सेना'; एमआयएमचा डाव

सत्तेत असलेली लोकशाही आघाडी आणि त्यांच्यातूनच बाहेर पडलेल्या गटासोबत तयार झालेली "यशवंत जनशक्ती विकास आघाडी' आणि भाजपाच्या कारभारी नेत्यांची पडद्यामागील "सेटलमेंट' आणि विस्कटलेल्या आघाड्या याबाबत कराडकर चांगलेच जाणून आहेत. सर्व प्रभागांत उमेदवार न देता माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील कराड शहर नागरी विकास आघाडीला बरोबर घेऊन भाजपानेही सदृश्य आघाडी केली आहे. शहराबाहेरील विलासराव पाटील-उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले या दोन नेत्यांच्या आघाडीला आजपर्यंतचा इतिहास पाहता कराडकर काय करणार ?. अस्तित्व शोधणाऱ्या शिवसेनेला वरिष्ठांचे कसलेच सहकार्य नाही तरीही ती धडपडत आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमने निवडलेला उमेदवार वेगळा डाव आहे.




कराड शहरातील परंपरागत विरोधक आणि समविचारी लोक यांनी तयार केलेल्या आघाड्यांबाबत कराडकरांना चांगलीच माहिती आहे. कराडकरांनी नेहमीच शहरातील नेत्यांनाच पाठींबा दिला आहे. 2006 साली डॉ. अतुल भोसले यांनी पुरस्कृत केलेले मात्र प्रचारात कोठेही त्यांचे नाव जाहीर न केलेले तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. हा अपवाद वगळता शहराबाहेरील कोणत्याही नेत्यांना लोकांनी स्वीकारले नाही. 2006 ते 2016 दरम्यानच्या 10 वर्षात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले असले तरी कराडकरांच्या या विचारात अजून कसलाही फरक पडलेला नाही. याची जाणीव असल्यामुळेच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी शहरातील त्यांच्या विचारांच्या लोकांना पुढे करून कराड शहर नागरी विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने  महिन्यापूर्वी कराड पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद शहरातून  मिळाला नाही.


नगरपालिका निवडणुकीतील आचारसंहिता सुरू झाल्यानंतर शहरातील सत्ताधारी, सत्ताधाऱ्यामधील विरोधक,  मुळ विरोधक, भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या आघाड्यांनी जोरदार मुसंडी मारत लॉबिंग सुरू केले. मात्र शहर नागरी विकास आघाडीला कोणीही दाद दिली नाही. कराड दक्षिणेत माजी आ. विलासराव उंडाळकर आणि डॉ. सुरेश भोसले  मैत्रीपर्व  आहे. हे दोन्ही गट एकत्र येऊन कराडात उमेदवार देतील अशा शक्यता व्य्कत होत्या. डॉ. सुरेश भोसले यांचे चिरंजीव डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टी वतीने विलासराव उंडाळकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर झालेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत भोसले-उंडाळकर गट एकत्र आला होता. 

दरम्यान डॉ. अतुल भोसले यांना भाजपाने गेल्या दोन वर्षांत मानाचे स्थान देत  चांगली ताकद दिली आहे. भविष्यात भाजपाकडून ङ्किळणाऱ्या आमदारकीचा  विचार करत डॉ. भोसले यांनी पक्षाच्या अजेंड्याप्रमाणेच कराड पालिकेत उतरण्याचा निर्णय घेतला. वास्तविक डॉ. भोसले यांना मानणारे शहरातील अनेक लोक भाजपा पक्ष चिन्हापेक्षा आघाडी करून निवडणूक लढवावी, या विचारांचे होते व आहेत. सध्या डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीचे 8 सदस्य पालिकेत आहेत. या सदस्यांपैकी  महादेव पवार वगळता कोणीही भोसले यांचे नाव घेत नव्हते. डॉ. भोसले यांची कृष्णा विकास आघाडी आणि कराड शहर नागरी विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवितील, असा अंदाज अनेकांनी वर्तविला होता. त्यादृष्टीने उंडाळकर गटाने शहरात प्रवेश करण्याची स्वप्ने पाहिली होती. मात्र भाजपाच्या दबावा  मुळे डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाबरोबरच राहणे पसंत केले. कोअर कमिटीत विक्रम पावसकर, ना. शेखर चरेगांवकर, स्वप्निल भिंगारदेवे यांच्या बरोबरीने अतुल भोसले कार्यरत राहिले. भाजपाने सुरूवातीपासूनच पक्ष चिन्हाचा आग्रह करताना नंतर  आमच्च्याबरोबर येणाऱ्या सर्व आघाड्यांना स्थान दिले जाईल, असे जाहीर केले होते. ताकद असलेल्या सात प्रभागांमध्ये भाजपा लढणार आणि उर्वरित सात प्रभागांत नागरी विकास आघाडीला जागा सोडण्याचा अलिखित करार करून भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर केला. भाजपा आणि कराड शहर नागरी विकास आघाडीचा समझोता आणि त्यांनी दिलेले (मिळालेले)  उमेदवार पाहता येथेही "सेटलमेंट ए्क्सप्रेस' जोरात धावली आहे, असेच म्हणावे लागेल.


प्रभाग क्र. 1, 2, 4, 5, 6, 13 आणि 14  मधून भाजपाचे उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रभाग क्र. 7, 8, 9, 11, 12, 13 ङ्कध्ये कराड शहर नागरी विकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. 7, 8, 9 आणि 10 या प्रभागांत व्यापारी वर्ग, जैन, मारवाडी यांची  लक्षनीय आहेत. ही  मते भाजपाला  मिळू शकली असती. पण भाजपा जिल्हाध्यक्षांपासून प्रदेश चिटणीसपर्यंत तसेच भाजपा शहराध्यक्षांपासून सचिवांपर्यंत सर्वांचे विरोधी जनशक्ती आणि लोकशाही आघाडीच्या नेत्यांशी लागेबांधे आहेत. या प्रभागात उमेदवारी देऊन ताकद आजमावण्याऐवजी भाजपाने या जागा आघाडीला देऊन टाकल्या आणि एकप्रकारे जनशक्ती आणि लोकशाही आघाडीला  मदतच केली आहे. प्रभाग क्र. 12  मध्ये डॉ. अतुल भोसले यांचे निष्ठावंत नगरसेवक  महादेव पवार यांच्या पत्नीने कराड शहर नागरी विकास आघाडीची उमेदवारी घेतली आहे. या प्रभागात मुस्लिम  मतदारसंख्येचा विचार करून पवार यांनी भाजपाच्या चिन्हावर लढण्याऐवजी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बाजार समिती, खरेदी-विक्री संघ परिसरात असलेल्या या प्रभागात विलासराव पाटील-उंडाळकर यांना मानणारा वर्ग दखलनीय आहे. याचा विचार करून भाजपाने ही जागा सोडल्याची चर्चा आहे.


माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कराड शहरात थेट प्रवेश करण्यासाठी आसूसलेले आहेत. कराड शहराचा समावेश दक्षिणेत झाल्यानंतर 2009 च्या पहिल्या निवडणुकीत कराडकरांनी काकांना चांगली साथ दिली होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर उंडाळकर काकांचे शहरातील  महत्व हळूहळू कमी होत गेले. 2014 च्या निवडणुकीत उंडाळकरांना कराड शहरात म्हणावीशी  मते  मिळू शकली नाहीत. शहरात त्यांना मानणारा ज्येष्ठ नागरिकांशिवाय दुसरा वर्ग नव्हता. युवक वर्ग भाजपा, शिवसेनेकडे तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या विकासनिधी मुळे इतर सर्व वर्ग कॉंग्रेसकडे किंबहुना बाबांकडे आकर्षिला गेला. शहरातून ताकद न  मिळाल्याने उंडाळकर तिसऱ्या क्रमांकावर  फेकले गेले. या पराभवानंतर उंडाळकरांनी कराडात गटबांधणी केली. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरात प्रवेश करण्यासाठी मोर्चेबांधणी केली. मात्र  मराठा समाजाचा एकही वजनदार कार्यकर्ता त्यांच्या हाताला लागू शकला नाही. त्यामुळे उंडाळकर गट कराडात बॅकफुटवर गेला. नेहमीचेच निष्ठावंत विजय  मुठेकर, मझहर कागदी तसेच माजी नगराध्यक्ष अशोक भोसले यांना पुढे करून त्यांना आघाडी स्थापन करावी लागली. 35 वर्षे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले विलासकाका भाजपासोबत खुल्यापणाने आघाडी करू शकत नव्हते आणि नाहीत. उंडाळकरांनी कॉंग्रेस पक्षत्याग केला असला तरी पक्ष धोरणे अजूनही सोडलेली नाहीत. भविष्यात आ. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष आपलाच विचार करेल असा विश्वास उंडाळकरांना आजही आहे. त्यामुळे  नागरी विकास आघाडीचा भाजपासोबत अलिखित युतीमध्ये  उंडाळकर गटाने कुठेही खुला पुढाकार घेतलेला नाही. मात्र तरीही भाजपा- उंडाळकर सदृश्य युती लपून राहिलेली नाही.

भाजपा आणि नागरी विकास आघाडीच्या सेटलमेंट   युतीनुसार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाला  फायदा होईल, असे गणित मांडले गेले आहे. भाजपाने दिलेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या डॉ. अतुल भोसले यांनी सुचविलेल्या आहेत. या उमेदवाराच्या निवडणुकीची यंत्रणा, प्रचार आणि विजयाची जबाबदारी डॉ. अतुल भोसले यांच्या सहित ना. शेखर चरेगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने नगराध्यक्ष  भाजपचा झाला तर  शहराला मोठा निधी आणता येईल. या अपेक्षेने तसेच येणाऱ्या निवडणुकीत ङ्खायदा व्हावा या दृष्टीने अतुल भोसले यांनी पावले टाकली आहेत. याचा किती ङ्खायदा होईल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी उंडाळकर-भोसले गट आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची ध्येय-धोरणे आणि खेळ्या कराडकर चांगलेच जाणून आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत कराडकरांचा कल आणि स्वभावाचा विचार करता डॉ. अतुल भोसले आणि विलासराव उंडाळकर या शहरा बाहेरील नेतृत्वांच्या आघाडीला कराडकर कुठे नेऊन ठेवणार हे 28 नोव्हेंबरला कळणार आहे.

शिवसेना हा भाजपाचा मित्र  पक्ष आहे. राज्य पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची घोषणा या दोन्ही पक्षांनी शेवटच्या टप्प्यात केली. मात्र तोपर्यंत बरेच होत्याचे नव्हते झाले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाने ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यात आक्रमक यंत्रणा राबविली तशी शिवसेनेचा पालकमंत्री   असूनही त्यांना राबविता आली नाही. कराडात तर शिवसेना आहे की नाही? असा प्रश्न पडला होता. एकेकाळी शहरात शिवसेनेच्या विचारांचे 7 ते 8 नगरसेवक होते. शहरात शिवसेनेच्या 29 शाखा होत्या.  मात्र गेल्या 20 वर्षांत पक्षाची शहरात वाताहत झाली आहे. कराड उत्तरेत शिवसेना सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून येते. मात्र त्या मानाने शहरात हा पक्ष निवेदनाच्या पुढे जात नाही. निष्ठावंत शिवसैनिकांना ताकदही दिली जात नाही आणि ङ्कुंबईत बसलेले नेते पाठींबाही देत नाहीत. तरीही शशिराज करपे यांच्या पत्नी  सौ. स्वाती करपे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. पक्षाचे 8 उमेदवार 4 प्रभागात आहेत.  धनुष्यबाणाचे चिन्ह कराडात पुन्हा घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवसेना धडपडत आहे. पण शिवसेना पक्षप्रङ्कुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आयात केलेल्या उमेदवाराला जेवढी ताकद दिली तशी ताकद दिली तरच शिवसेनेचे अस्तित्व जाणवणार आहे.


माजी नगराध्यक्ष अल्ताफ गणी शिकलगार यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेच कराडची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. एमआयएम पक्षाची ध्येयधोरणे आणि समाजातील स्थान तसेच पक्ष आणि शिकलगार यांची निगेटिव्ह प्रतिमा यांमुळे गेल्या वर्षभरात शिकलगार यांना म्हणावासा प्रतिसाद मिळाला  नाही. तरीही एमआयएमने माजी नगरसेवक आनंदराव लादे यांच्या पत्नी रुपाली लादे यांना नगराध्यक्ष पदासाठी दिलेली उमेदवारी  धकादायक आणि इतर आघाड्यांना विचार करायला लावणारी आहे. मुस्लिम  बहुल पाच प्रभागांत 10 जागांवर एमआयएमचे उमेदवार रिंगणात आहेत. पैकी 4 जागांवर एकटे अल्ताङ्ख शिकलगार उभे आहेत. कराडात ङ्कुस्लिङ्क समाजाचे  मतदान 14/15 हजारांच्या घरात आहे. स्थानिक राजकारणाचा विचार करता या समाजाचे सर्वच राजकीय पक्ष आणि आघाड्यांशी संबंध आहेत. जनशक्ती, लोकशाही, कराड शहर नागरी विकास आघाडी तसेच भाजपानेही मुस्लिम  लोकांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग पातळीवर मुस्लिम  समाजाच्या  मतांची प्रत्येक ठिकाणी विभागणी होणार आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमने टाकलेला डाव आणि गणिते धक्कादायक असण्याची श्नयता आहे.
बहुजन क्रांती दलानेही नगराध्यक्ष पदासहीत 5 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. पहिल्यांदाच बहुजन क्रांती दल पालिकेच्या निवडणुकीत उतरली असल्याने  त्यांचा अंदाज कोणालाच नाही.

कराड पालिकेच्या रिंगणात असलेल्या सर्व आघाड्‌या आणि पक्षांचे उमेदवार   आणि उमेदवार निवडीवेळी विचारात घेतलेली गणिते, परस्पर सहकार्य करण्याचे धोरण आणि सेटलमेंट याबाबत सर्वसामान्य कराडकरांना जेवढा अभ्यास आहे, तेवढा  कोणत्याच आघाडीप्रमुखांनाही नाही. पहिल्यांदाच नगराध्यक्ष आणि प्रभाग निहाय निवडणुकीत तिहेरी, चौरंगी, पंचरंगी लढतीची श्नयता निर्माण झाली आहे. 11 नोव्हेंबर पर्यंत आणखी काही आघाड्या किंवा पक्ष एकत्र येण्याच्या श्नयता आहेत. अनेकजण माघारही घेणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

                             
  (उत्तरार्ध)
- सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...