फॉलोअर

२३ जून २०१८

FIR काय असते

*_🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न.._*

👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂
➖➖➖➖➖➖➖
*◾FIR म्हणजे नेमकं काय..???*

*◾FIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं? जाणून घेऊ FIR बद्दल...!!!*
➖➖➖➖➖➖➖
आपल्या भारतीय लोकांची मानासिकता पण गमतीशीर आहे. बाकी देशात पोलिसांना पाहिल की लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटते. पण आपण भारतीय लोक मात्र पोलीस बघितले की घाबरून रस्ता बदलून निघून जातात. मग भलेही आपण कुठलाही गुन्हा का केला नसेना! आपल्याला पोलिसांचा फोबिया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला पोलीस ह्या शब्दाचीच इतकी भीती वाटते की आपल्यावर अन्याय झाला असला तरी किंवा समोरच्यावर अन्याय होताना दिसत असला तरी, समोरच्याला मदतीची नितांत गरज आहे हे कळत असताना देखील, केवळ पोलिसांच्या भानगडीत कोण पडेल ह्या भीतीने आपण गप्प बसतो. पण पोलिसांची मदत घेत नाही. आपल्याकडे मोठी माणसं सांगतात, शहाण्याने पोलिसांच्या, कोर्ट कचेरीच्या फंदात पडू नये. म्हणूनच गरजेला पोलिसांची मदत घेणं तर लांबच राहिलं, आपण पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंदवणे ह्या भानगडीत पडतच नाही.
🔲🔲🔲
खरं तर ह्या भीतीमागे अज्ञानाचा फार मोठा हात आहे. आपल्याला कोणत्या परिस्थितीत काय करायचं असतं हे देखील माहिती नसतं. पोलीस स्थानकात तक्रार करायची असेल तर ती कशी करायची, FIR काय असते इतके बेसिक ज्ञान सुद्धा कधी कधी सामान्य माणसाला नसते. म्हणूनच आपण जाणून घेऊया FIR बद्दल..!
🔲🔲🔲

_🔺FIR stands for *First Information Report.* It is a written document prepared by Police when they receive an information about a cognizable or Non-cognizable offence. खरं तर FIR आपल्या सुविधेसाठी आहे पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे कारण FIR ची सुविधा ही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे._
🔲🔲🔲

*🌀 FIR म्हणजे काय आणि कोण ती दाखल करू शकतो? सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया FIR म्हणजे काय ?*

_FIR पोलीस दाखल करून घेतात. FIR हा एक महत्वाचा दस्तऐवज असतो ज्यात गुन्ह्याची पहिली आधिकारीक माहिती असते. भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्यांचे २ प्रकारात वर्गीकरण केले आहे._

_*🔺पहिला म्हणजे Cognizable Offence -* ह्या आरोपीला पोलिस वॉरंट शिवाय अटक करू शकतात . शिवाय ह्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय केस बद्दल तपास सुरू करू शकतात._

_*🔺दुसरा प्रकार आहे Non Cognizable Offence-* ह्यात वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकत नाहीत आणि कोर्टाच्या आदेशाशिवाय केसचा तपास सुरू करू शकत नाहीत. म्हणूनच गुन्हा घडल्यावर FIR दाखल करणे अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय पोलीस कुठल्याही केस चा तपास करू शकत नाहीत._
🔲🔲🔲

*🔺FIR कोण दाखल करु शकतो..??*
FIR नोंदवण्यासाठी तुमच्या संदर्भातच गुन्हा घडायला हवा असे आवश्यक नाही. तुम्ही जर गुन्ह्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असाल तरीही तुम्ही गुन्ह्यासंदर्भात FIR नोंदवू शकता. ह्याशिवाय जर इतर व्यक्तीच्या संदर्भातही घडलेल्या गुन्ह्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही FIR दाखल करू शकता.
🔲🔲🔲

*🔺FIR दाखल करताना काय माहिती द्यावी लागते?*
FIR नोंदवताना FIR दाखल करणाऱ्याचे नाव, गुन्हा घडल्याची तारीख, दिवस आणि घटनास्थळाची माहिती पोलिसांना द्यावी लागते. ह्याशिवाय गुन्ह्याची FIR दाखल करताना त्या व्यक्तीने गुन्हा घडल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्याच्या विरुद्ध FIR दाखल करायची आहे त्या व्यक्तीचे नाव आणि इतर सर्व माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी लागते .
🔲🔲🔲
ह्याशिवाय FIR बद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे फायद्याचे आहे.
Criminal Procedure code 1973 च्या सेक्शन 154 अन्वये FIR मध्ये नोंदवलेली माहिती प्रमाणित केली जाते. तसेच FIR ची एक प्रत FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीस दिली जाते. FIR ची प्रत मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. तसेच FIR दाखल करण्यास कोणताही चार्ज लागत नाही. जर तुमची FIR , Cognizable Offence च्या वर्गात येत असेल तर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस तक्रार नोंदवू शकतात .

*🔺पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यास काय करावे?*

जर कुठल्याही पोलीस स्टेशनला पोलीस तुमची FIR दाखल करून घेण्यास नकार देत असतील तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. त्यांचा आदेश पोलीस नाकारू शकत नाहीत. तसेच तुम्ही तुमची तक्रार पोस्ट द्वारे सुद्धा पाठवू शकता. ह्या संदर्भात पोलिसांविरुद्ध तक्रार करायची असल्यास तुम्ही राज्याच्या Human Rights Commission च्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकता .

*🌀 काही महत्त्वाचे :*
ही सुविधा प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी दिली आहे. परंतू ह्याचा गैरवापर करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच कधीही खोटी किंवा चुकीची FIR दाखल करू नका. ह्याने तुम्हालाच शिक्षा होऊ शकते.
पुराव्यांशी कधीही छेडछाड करू नका. पोलिसांना कधीही खोटी, चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊ नका. किंवा FIR मध्ये खोटी, चुकीची माहिती लिहू नका. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला स्वतःला FIR दाखल करणे सोपे जाईल किंवा प्रसंगी कुणालाही FIR दाखल करून द्यायला मदत करता येईल.
➖➖➖➖➖➖➖
👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂📄👮🏻‍♂

२२ जून २०१८

Youtube पैसे कसे कमवायचे

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

💰📲📹💰📹📲💰
➖➖➖➖➖➖➖
_*☑ खरंच ... युट्युबवर आपले व्हिडीओ टाकून पैसे कमावता येतात...???*_

_*◾कसे कमवायचे पैसे...??? काय करावे लागेल...??? इत्यादी बद्दल....*_
➖➖➖➖➖➖➖

आपण सर्वजण युट्युब वापरतो . प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये ऍटोमॅटीक युट्युबचे ऐप असते.त्यामुळे आपण सर्वजन युट्युब मध्ये व्हिडिओ बघतो, आवडला तर पुढे शेअर करतो. बऱ्याच जणांना हे माहित देखील आहे कि युट्युब ही गुगलचीच कंपनी आहे . मग युट्युब मधून पैसे कसे कमवले जाऊ शकतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ही पोस्ट तयार केलीये .
🔲🔲🔲
आपण युट्युबवर जे विडिओ बघतो त्यावेळी साधारण ३ प्रकारच्या जाहिराती आपल्याला दिसत असतात . एक म्हणजे जी आपण स्किप करू शकतो , दुसरी म्हणजे जी आपण स्किप करू शकत नाही आणि तिसरी जेव्हा आपण व्हिडिओ बघतो त्यावेळी व्हिडिओ टाइमलाईन ला जिथे पिवळा डॉट असतो त्यावेळी येते (व्हिडिओ च्या समोर दिसते ) ती आपण क्रॉस वॉर क्लिक करून क्लोज करतो आणि व्हिडिओ बघत राहतो किंवा क्लिक करून त्या जाहिरातीच्या वेबसाईटवर जातो.
🔲🔲🔲
_आता यात आपण पैसे कसे कमवू शकता ? सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओ . तुमच्या व्हिडिओ ला जितके जास्त वेळ आणि जास्त संख्येमध्ये लोक पाहणार , त्यावर तुमचे इनकम अवलंबून असते . त्यासाठी तुमचा व्हिडीओ हा एकदम छान हवाय. जो पाहायला , लाईक करायला आणि शेअर करायला लोकांना आवडायला हवा. मग यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे, तुमचे ज्या क्षेत्रातील ज्ञान चांगले आहे त्यावर तुम्ही हा विडिओ बनवू शकता . कोणता असावा असे नाही बंधन नाही किंवा भाषेचे देखील कोणते बंधन नाही. चित्रपटाच्या रिव्यू पासून , तर चांगल्या रेसिपी बनवण्यापर्यंत किंवा मोबाईल ची माहिती पासून तर मित्र कसे जोडावेत इथपर्यंत काहीही चालेल. पण व्हिडिओ कायम कायम बनवून अपलोड केले तर इनकम साठी चांगले असते त्यामुळे शक्यतो आपले ज्ञान ज्यात आहे तसेच टॉपिक निवडावेत . मात्र अश्शील भाषा आणि अश्शील फोटो असे काही असेल तर गुगल आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते . म्हणजे आपले अकाउंट बंद करू शकते . एक सोपे गणित डोक्यात ठेवा , असा व्हिडिओ जो आपण आपल्या फॅमिली सोबत म्हणजे आई, बहीण ,वडील यांच्यासोबत पाहू शकेल असा व्हिडिओ असावा._
🔲🔲🔲
मग आता सुरुवात कशी करायची , सर्वात आधी आपला एक जीमेल अकाउंट बनवायचं ,आधीच असेल तरीही उत्तम. . मग त्या अकाउंट मधून युट्युब ला लॉगिन करायचं ..एकदा लॉगिन झाले कि मग तिथे स्वतःचा चॅनेल सुरु करायचा .आणि चॅनेल म्हणजे विशेष काही नाही. जस आपण आपले नवीन ई-मेल अकाउंट ओपन करून करतो तसाच प्रकार असतो फक्त ज्यामध्ये आपण आपले विडिओ अपलोड करू शकतो किंवा किती जणांनी हे व्हिडिओ पाहिले हे देखील आपल्याला कळू शकते .
🔲🔲🔲
पूर्वी युट्युब ला एकदा व्हिडिओ लोड केला कि लगेच जाहिराती आणि इन्कम सुरु होत होते. मात्र आता ,आपण चॅनेल सुरु केल्यापासून ते २० फेब्रुवारी पर्यंत कमीत कमी ४००० तासांचा वॉच टाइम आणि १००० पेक्षा जास्त स्बस्ट्राइबर आपल्या चॅनेल साठी मिळवणे गरजेचे आहे . अर्थात हे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही त्यामुळे चांगले व्हिडिओ असतील तर हे टार्गेट पूर्ण केले जाऊ शकते . एकदा हे टार्गेट पूर्ण झाले कि मग आपल्याला आपले व्हिडिओ मॉनेटाईज करता येतात . पण त्यासाठी गुगल ला अप्लाय करावे लागते . जे एकदम सोपे आहे . ९९ टक्के गुगल रिजेकट करत नाही. एकदा गुगल ने अप्रूव्हल दिले कि मग तुमच्या व्हिडिओ वर देखील जाहिराती सुरु होतात आणि त्याचे इन्कम तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला ( ऍडसेन्स हे गुगल चा जाहिरातीचे पब्लिशर लोकांचे प्लॅटफॉर्म आहे ) दिसायला लागते .
🔲🔲🔲
_तुमच्या अकाउंट ला १० डॉलर झाल्यानंतर तुम्ही जो पत्ता दिला असेल त्यावर गुगलचा एक कोड पोस्टाने येतो तो आला कि तुम्हाला तो तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला लॉगिन करून पेस्ट करावा लागतो , हे केले कि गुगल ला खात्री पटते कि तुमचा पत्ता बरोबर आहे . आधी ते ह्या पत्त्यावर चेक पाठवत मात्र आता बँकेत तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात . हे पैसे सिंगापूर मधून येत असल्याने तुमच्या बँकेकडे स्विफ्ट कोड असणे गरजेचे आहे. असा आपल्या बँकांना आयएफएससी कोड असतो तसा परदेशातून पैसे घेण्यासाठी स्विफ्ट कोड गरजेचं आहे . हा सगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे असतो. आपल्या अकाउंट ला १०० डॉलर झाले कि मग गुगल आपल्याला पैसे पाठवते . म्हणजे समजा १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झाले तर ते पैसे १०-१५ मे ला आपल्या अकाउंट मध्ये भारतीय रुपयात कन्व्हर्ट होऊन जमा होतात, मात्र जर १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झालेच नाही , समजा ४० डॉलर झाले तर ते १०-१५ मे ला बँकेत न येता तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला क्रेडिट दाखवतात व पुढे जेव्हा १०० डॉलर होतील ,त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्या बँकेत अकॉउंट ला पाठवले जातात ._
🔲🔲🔲
गुगल आलेल्या जाहिराती मधून काही पैसे स्वतःकडे ठेवते. यात ते ५५ टक्के ज्याचा व्हिडिओ आहे त्यांना देतात व ४५ टक्के स्वतःला घेतात . कारण युट्युब सारखा मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवला आहे म्हणून. आपल्या व्हिडिओ ला जागा, आणि त्यांचा प्लॅटफॉर्म ते पआपल्याला वापरायला देतात म्हणून . मात्र आपल्याला जे आपल्या अकाउंट ला दिसतात ते सगळे येतात. मात्र यात बँक काही रक्कम फी म्हणून घेते , ती साधारण अंदाजे ८००० रुपयाला २००-३०० रुपये अशी असते.
🔲🔲🔲
आज युट्युब मधून करोडो लोक पैसे कमवत आहेत. हा मार्ग सोपा आहे , मात्र कॅमेरा समोर बसायला थोडं शिकावं लागेल.एकदा चॅनेल पॉप्युलर झाला कि लाखो व्हूज एकदा दिवसात सुद्धा येऊ शकतात .आजही असे अनेक चॅनेल आहेत . मोठे मोठे टी.व्ही चॅनेल असोत वा लहान लहान संगीतकार किंवा शिक्षक , सर्वजण आपले ज्ञान प्रबोधनपर व्हिडिओ युट्युब वर टाकतात आणि जसे जसे व्युज येतात तसे पैसे कमवायला सुरु करतात . किचन पासून तर गिटार शिकवणे किंवा मोबाईल रिव्यू पासून ते चक्क गोष्टी सांगण्यापर्यंत काहीही टाका .. लिमिट नाही . फक्त कोणाची बदनामी होईल असे काही करू नका, कारण ह्या कारणाने जर तुमचे अकाउंट गुगल ने बंद केले तर परत गुगल कधीही तुम्हाला ह्या प्रोग्रॅम ला तुम्हाला जॉईन करून घेत नाही. प्रोग्रॅम खूप सोपा आहे तरीही एका टर्म्स वाचून ह्या आणि व्हा सुरु भरभरून भरभरून भरभरून भरभरून भरभरून पैसे कमवायला

_
➖➖➖➖➖➖➖
💰📲📹💰📹📲💰

१८ जून २०१८

X , Y and Z security

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳
➖➖➖➖➖➖➖
*☑ VIP Security कोणाला मिळते ..??*

*◾X-सुरक्षा.. Y-सुरक्षा.. आणि Z-सुरक्षा श्रेणी कवच.. मधील फरक काय..?? त्याचे महत्त्व काय?...*
➖➖➖➖➖➖➖
_

_तुम्ही मोठमोठे नेते, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ति यांच्या भोवती उभे असलेले सुरक्षारक्षक पाहिले असतील. या सर्व व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा कवच प्रदान केले जाते, त्याला VIP Security म्हणतात. प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या व्यक्तींच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, तसेच त्या जेथे जातील तेथे त्यांचे संरक्षण केले जावे या हेतूने त्यांना ही VIP Security उपलब्ध करून दिली जाते._
🔲🔲🔲

*🌀 Security कोणाला मिळू शकते आणि Security द्यायची की नाही ते कोण ठरवतं..??*

राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम आणि हाय कोर्टाचे न्यायाधीश, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांना ते सरकारी सेवेत असल्याकारणाने आपोआपच, न मागता VIP Security मिळते.
🔲🔲🔲
VVIP Security अर्थात अतिशय खास असणाऱ्या व्यक्तीला मिळणारे सुरक्षा कवच कोणाला द्यायचे हे एक समिती ठरवते. या समितीमध्ये इंटलेजींट ब्युरोचे (IB) अधिकारी, गृहसचिव आणि गृहमंत्री यांचा समावेश असतो. तसेच राज्य सरकारने शिफारस केली तर एखाद्या व्यक्तीला VIP किंवा VVIP Security मिळू शकते.
🔲🔲🔲

*🌀 सुरक्षा कवचाच्या श्रेण्या कोणत्या..?? :*

व्यक्तीच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या अनुसार Security चार प्रमुख श्रेण्यांमध्ये विभागण्यात आली आहे.
*X Security, Y Security, Z Security आणि Z+Security !*

▪ *X Security* श्रेणीमध्ये साध्या प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. X Security मध्ये २ सुरक्षा अधिकारी आणि १ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सेवेत असतात.
▪ *Y Security* श्रेणीमध्ये ११ सुरक्षा अधिकारी आणि ३ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी संरक्षण प्रदान करतात.
▪वरील दोन्ही श्रेण्यांच्या मानाने Z Security बरीच मोठी असते. एक प्रकारचा सुरक्षा ताफाच असतो म्हणा ना ! *Z Security* श्रेणीमध्ये २२ सुरक्षा अधिकारी, एक एस्कोर्ट कार आणि दिल्ली पोलीस किंवा सीआरपीएफ कडून प्रदान केलेली अतिरिक्त सुरक्षा यांचा समावेश असतो.
▪ *Z+Security* सर्वात उच्च दर्जाची आणि सर्वात सुरक्षित Security मानली जाते. Z+ Security श्रेणीमध्ये व्यक्तीला SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (विशेष सुरक्षा गट) संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनाचं Z+Security आणि SPG संरक्षण दिले जाते. Z+ Security श्रेणीमध्ये ३६ सुरक्षा अधिकाऱ्यांसह अत्याधुनिक उपकरणे आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले अधिकारी देखील तैनात असतात._
🔲🔲🔲

या श्रेणीचे सेवा कवच ज्या व्यक्तीला मिळते तिला २४ तास वैयक्तिक सुरक्षा मिळते. सुरक्षा अधिकारी एक सेकंदही या व्यक्तीला नजरेआड होऊन देत नाहीत. या सुरक्षारक्षकांमध्ये २८ नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, एक एस्कोर्ट, एक पायलट, कोब्रा कमांडो आणि १२ होम गार्डसचा समावेश असतो.
🔲🔲🔲
१९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांच्या वैयक्तिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यावर उपाय म्हणून SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (विशेष सुरक्षा गट) स्थापना करण्यात आली. एका अहवालानुसार SPG मध्ये सध्या ४००० पेक्षा जास्त अधिकारी सेवेत आहेत. आणि त्यांचा वार्षिक खर्च जवळपास ३०० करोडच्या वर असतो. मनुष्यबळानुसार खर्च केल्या जाणाऱ्या इतर सिक्युरिटी फोर्सचा विचार करता SPG ही अतिशय महागडी VIP guarding security force आहे.
🔲🔲🔲
*_Z+Security श्रेणीमध्ये माजी पंतप्रधानांसाठी एक अट आहे ती म्हणजे- Z+Security सोबत मिळणारे SPG सुरक्षा कवच हे पंतप्रधानांनी पद सोडल्यापासून पुढील एक वर्षचं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेत राहील. परंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल._*
🔲🔲🔲
सध्या भारतात केवळ सहाच व्यक्तींना SPG संरक्षण दिले जाते. त्या व्यक्ती आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी वद्रा..!!!

_forwarded_
➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳

१७ जून २०१८

बाप बापच असतो

👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻
➖➖➖➖➖➖➖
*☑जागतिक पितृदिन*
*Happy Father's day*
➖➖➖➖➖➖➖
_दरवर्षी मे महिन्याच्या दुसरा रविवार मातृदिन Mother's day म्हणून साजरा करतात तर....._

*तसेच प्रत्येक वर्षी जून चा तिसरा रविवार हा पितृदिन Father's day म्हणून साजरा केला जातो....*

🔲🔲🔲
*_घट्ट कौटुंबिक जडणघडणीत पिता, वडील, दादा, भाऊ, बाबा अशी प्रांतानुसार अनेक नावे चिकटलेल्या 'बापा'ची कर्मकहाणी. मृदू, प्रेमळ, सोशिक, कैवल्यमूतीर् आईच्या तुलनेत मानवी व पशू-पक्ष्यांच्या सर्वच संस्कृतींमध्ये मागच्या रांगेत स्थान मिळालेला बाप खरोखरच कठोर असतो का? मुलांच्या संगोपनात त्याचे स्थान नेहमीच दुय्यम असते का? आपल्या पिल्लांची काळजी वाहण्यात त्यांचे पाऊल एक घर मागे असते का?... समाजातील-कळपातील-थव्यातील काही डोक्यांचा अभ्यास करून या मुद्द्यावर निष्कर्षाची शाई उमटवायची असेल तर, त्यावरील शेरा कदाचित विरोधात जाऊ शकेल. पण जीव साकारण्यापूवीर्च त्या निजीर्व आकाराला सजीवतेचे कोंदण देण्यासाठी झगडणाऱ्या बापाची कथा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सारखीच आहे._*
🔲🔲🔲
*_भावभावना असलेल्या मानवाच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास, पंख पसरवून आभाळी बिंदू होण्याची क्षमता असलेल्या पक्ष्यांच्या जीवनरहाटाकडे पाहिल्यास किंवा अथांग समुदात संकट आणणाऱ्यांना चकवण्यासाठी क्षणार्धात रेतीचा कण होण्याची क्षमता असलेल्या जलजिवांच्या जीवनमानात डोकवल्यास बाप हा आपल्या पिल्लांसाठी मातेइतकाच मृदू, प्रेमळ, सोशिक, कैवल्यमूर्ती असतो हे सिद्ध झाले आहे._*
🔲🔲🔲
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम बाप करतो. आई आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही.
🔲🔲🔲
जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.
🔲🔲🔲

*◾तो बाप असतो...*

…………… तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
………………..तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
…………………………….तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
…………………………..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
……………………………..तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
………………………………तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
“सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो
“बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो
………………………………तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
…………….तो बाप असतो
🔲🔲🔲

बाबा, पिता, वडील...
एकमेव व्यक्ती जी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते... बापाच्या सर्व लेकरांना जागतिक पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

_
➖➖➖➖➖➖➖
👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻

१२ जून २०१८

कोयना नदीवरील १० पुल

कोयना नदीवरील १० पुल

कराड ते कोयनानगर ५६ किलोमीटर अंतर .महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजले जाणारे कोयना धरण सर्वासाठी संजीवनी आहे.

कोयनानगर ते कराड 55 किलोमीटरच्या अंतरात एकूण दहा पूल कोयना नदीवर आहेत. यापैकी कराडजवळचा एक पुल इंग्रज सरकारने बांधला आहे. तर उर्वरित ९ पुल स्वातंत्रोत्तर काळातील आहेत. हे पूल म्हणजे कृष्णा कोयना तीरावरील शेकडो गावे आणि खोऱ्यांना जोडणार्या रक्तवाहिन्या आहेत.

१. कोयनानगरमध्ये कोयना धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती करून किंवा थेट पाणी सोडल्यानंतर  धरणाच्या खालील बाजूस असणारा पहिला कोयना पुल.

२.धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याखाली जाणारा संगमनगर धक्का फुल सर्वांनाच माहित आहे. या पुलाशेजारी आता मोठा उंचीचा नवीन पूल बांधण्यात आला आहे. याप्रसंगी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने प्रयत्न केला होता

३.
तिथूनच पुढे सहा किलोमीटर अंतरावर मणेरी पुल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकताच बांधून पुर्ण झाला आहे.

४.
पुढे नवारस्ता मरळी कारखाना दरम्यान कोयना नदीवर सांगवडचा जुना पूल आहे.

५.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सेंट्रल रिलीफ फंड मधून बांधलेला कोयनेवरील पाचवा निसरे पुल आहे.

६.
कराड तालुक्यात कोयना नदीने प्रवेश केल्यानंतर तांबवे येथे कोयना नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

७. 
तेथूनच पुढे चार किलोमीटर अंतरावर सुपने आणि किरपे या गावांना जोडणारा नवीन एक पूल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून गतवर्षी बांधून झालेला आहे.

८ आणि ९.

कराड शहराजवळच कोयनेवर नवा आणि जुना कोयना पुल   आहे.असे नऊ पुल कोयना नदीवर आहेत.

१०.
ब्रिटिश सरकारने बांधलेला आणि आता नुतनीकरण सुरु असलेला दहावा कोयना पुल आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

१० जून २०१८

लाखात एक हाँटेल फौजी

*लाखात एक हाँटेल फौजी*

गेल्या 35 वर्षांत जम्मू, वैष्णव देवी पासून कुलु मनाली दिल्ली, आग्रा, भोपाळ, गंंगटोक, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, बेंगळुरू, तिरुपती, मदुराई ,कन्याकुमारी ते पाँन्डेचरी फिरलो. अनेक ठिकाणी लहान मोठ्या हाँटेलात जेवलो.

पण कुठेही पहायला मिळाला नाही असा एक बोर्ड सातारा लोणंद दरम्यान असलेल्या वाठार स्टेशन हद्दीत असलेल्या हाँटेल फौजी धाबा मध्ये पहायला मिळाला.

*तुमचा चांगला/वाईट अनुभव आम्हाला सांगा.*
*जेवणाच्या क्वालिटी संदर्भात काहीही तक्रार असल्यास काऊंटरवर संपर्क साधा.*

अशा आशयाचा बोर्ड सर्वाना दिसेल अशा ठिकाणी लावला आहे.

एरव्ही हाँटेलात आलेल्या गिर्हाईकाला  जेवू घालणे,  गळ्यात मोठे बिल टाकणेआणि पैसे वसूल करणे एवढेच काम हॉटेलमालक करत असतो. आपल्या हॉटेलमध्ये आलेला ग्राहक समाधानी आहे की नाही याचं त्याला काहीही देणेघेणे नसते

प्रत्येक हॉटेलमध्ये शुद्ध पाणी देणे कायद्याने बंधनकारक आहे तरीही साधे पाणी घेणार का बिसलरी पाणी घेणार असा बळजबरीने आग्रह करून आठ रुपये ची बॉटल 20 रुपये ला गळ्यात मारण्याचे काम हॉटेल व्यवसाय करत असतात.  हॉटेलमधील पदार्थ लोकांना आवडले की नाही त्यात काही कमी-जास्त होते,  लोकांना ते आवडले का?  कॉलिटी प्रमाणे त्याचे पैसे घेतलेत का याचा विचार कोणीही  करत नाही .

अशी एकीकडे परिस्थिती असताना वाठार स्टेशन वरील फौजी धाब्यावर आज मला एक वेगळाच अनुभव आला. चहापाणी घेण्याच्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक धाब्यावर गेलो .  आजवर कुठेही मिळाला नसेल इतका दर्जेदार चहा मिळाला.  झाडूवाले, स्वयंपाकी, कुक,आचारी, वेटर यामध्ये एक प्रकारची नम्रता पाहायला मिळाली . या हॉटेलमध्ये मिळालेले पदार्थ चांगले आहेत की वाईट आहेत याबाबत हॉटेल मालक जातीने येणाऱ्या कस्टमरला विचारत होता.  खरेतर मी चहा पीत नाही तरीही बिनसाखरेचा चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. या हॉटेलमध्ये आला एकदम कडक आणि लाजबाब चहा  प्यायला मिळाला. क्वालिटी सुंदर होतीच मात्र हॉटेलच्या काउंटरवर लावलेला आदरपूर्वक बोर्ड मला खूप आवडला .  हॉटेलमध्ये खाऊन झाल्यानंतर अन्नपदार्थ बाबत तुम्हाला चांगली वाईट कसलाही अनुभव असला तर हॉटेल मालकांना तो शेर करावा अशा आशयाची पाटी मला पहिल्यांदाच एका हॉटेलमध्ये पाहिली खरच अतिशय सुखद असा अनुभव होता.

शाकाहारी मांसाहारी जेवणाबरोबरच स्नॅक्स नाष्टा चहा  फौजी धाब्यावर उपलब्ध आहे. बारा तास या धाब्यावर फार गर्दी असते, मात्र अतिशय सुंदर सेवा मिळते. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गुरुवारी  मांसाहारी जेवण मिळत नाही असा या धाग्याचा नियम आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

9881191302, 9765566202

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...