फॉलोअर

१० जून २०१८

लाखात एक हाँटेल फौजी

*लाखात एक हाँटेल फौजी*

गेल्या 35 वर्षांत जम्मू, वैष्णव देवी पासून कुलु मनाली दिल्ली, आग्रा, भोपाळ, गंंगटोक, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, बेंगळुरू, तिरुपती, मदुराई ,कन्याकुमारी ते पाँन्डेचरी फिरलो. अनेक ठिकाणी लहान मोठ्या हाँटेलात जेवलो.

पण कुठेही पहायला मिळाला नाही असा एक बोर्ड सातारा लोणंद दरम्यान असलेल्या वाठार स्टेशन हद्दीत असलेल्या हाँटेल फौजी धाबा मध्ये पहायला मिळाला.

*तुमचा चांगला/वाईट अनुभव आम्हाला सांगा.*
*जेवणाच्या क्वालिटी संदर्भात काहीही तक्रार असल्यास काऊंटरवर संपर्क साधा.*

अशा आशयाचा बोर्ड सर्वाना दिसेल अशा ठिकाणी लावला आहे.

एरव्ही हाँटेलात आलेल्या गिर्हाईकाला  जेवू घालणे,  गळ्यात मोठे बिल टाकणेआणि पैसे वसूल करणे एवढेच काम हॉटेलमालक करत असतो. आपल्या हॉटेलमध्ये आलेला ग्राहक समाधानी आहे की नाही याचं त्याला काहीही देणेघेणे नसते

प्रत्येक हॉटेलमध्ये शुद्ध पाणी देणे कायद्याने बंधनकारक आहे तरीही साधे पाणी घेणार का बिसलरी पाणी घेणार असा बळजबरीने आग्रह करून आठ रुपये ची बॉटल 20 रुपये ला गळ्यात मारण्याचे काम हॉटेल व्यवसाय करत असतात.  हॉटेलमधील पदार्थ लोकांना आवडले की नाही त्यात काही कमी-जास्त होते,  लोकांना ते आवडले का?  कॉलिटी प्रमाणे त्याचे पैसे घेतलेत का याचा विचार कोणीही  करत नाही .

अशी एकीकडे परिस्थिती असताना वाठार स्टेशन वरील फौजी धाब्यावर आज मला एक वेगळाच अनुभव आला. चहापाणी घेण्याच्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक धाब्यावर गेलो .  आजवर कुठेही मिळाला नसेल इतका दर्जेदार चहा मिळाला.  झाडूवाले, स्वयंपाकी, कुक,आचारी, वेटर यामध्ये एक प्रकारची नम्रता पाहायला मिळाली . या हॉटेलमध्ये मिळालेले पदार्थ चांगले आहेत की वाईट आहेत याबाबत हॉटेल मालक जातीने येणाऱ्या कस्टमरला विचारत होता.  खरेतर मी चहा पीत नाही तरीही बिनसाखरेचा चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. या हॉटेलमध्ये आला एकदम कडक आणि लाजबाब चहा  प्यायला मिळाला. क्वालिटी सुंदर होतीच मात्र हॉटेलच्या काउंटरवर लावलेला आदरपूर्वक बोर्ड मला खूप आवडला .  हॉटेलमध्ये खाऊन झाल्यानंतर अन्नपदार्थ बाबत तुम्हाला चांगली वाईट कसलाही अनुभव असला तर हॉटेल मालकांना तो शेर करावा अशा आशयाची पाटी मला पहिल्यांदाच एका हॉटेलमध्ये पाहिली खरच अतिशय सुखद असा अनुभव होता.

शाकाहारी मांसाहारी जेवणाबरोबरच स्नॅक्स नाष्टा चहा  फौजी धाब्यावर उपलब्ध आहे. बारा तास या धाब्यावर फार गर्दी असते, मात्र अतिशय सुंदर सेवा मिळते. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गुरुवारी  मांसाहारी जेवण मिळत नाही असा या धाग्याचा नियम आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

9881191302, 9765566202

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...