'कामावरून जात नव्हे काम हीच जात'
त्या हुशार व्यक्तीने इतर सर्व लोकांमधील एक एक गुण हेरला. पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम दिले आणि कामावर आधारीत व्यवस्था निर्माण झाली. चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशु संवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला, न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी असे अनेक कर्मकार झाले. काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला, पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामाने त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती पडल्या. अशा आशयाची ती गोष्ट होती
.
सध्या सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. फेसबुक, ट्विटर, हाईक, व्हाॅटसअप आदी मेडीयावर तरूण पिढी तुटून पडलेली असते. आपल्याकडे whatapp सध्या जोरात आहे. फोन बुक मध्ये सेव्ह नंबर पैकी 90 %लोकांकडे हे अॅप आहे. त्यामध्ये ग्रुपची मोठ्ठी चलती आहे. ग्रुप तयार करणे खुप सोपे असल्या कारणाने अॅडमीन सरांनी त्या कामात सपाटा लावला आहे. मित्रांचा ग्रुप, शेजारी, गाववाले, शाळा, कॉलेज, ऑफिस, बिल्डिंग, शेजाशेजारी,फॅन्स आदी प्रकारचे शेकडो ग्रुप रोज तयार होत आहेत. कोणाची इच्छा असो वा नसो त्याला ग्रुपमध्ये घेतले जाते. या ग्रुपवर दिवसभर मेसेजेस येत राहतात. रात्री उशिरा पर्यंत चॅटिंग सुरू असते.
एकच मेसेज, इमेज अनेक ग्रुपवर पुन्हा पुन्हा येत राहते. आपल्याला काय वाटते, या इमेजचा, फोटोचा अर्थ काय याची जराही खात्री न करता, माहिती न घेता मेसेज पुढे पाठवले जातात. मी स्वतः पन्नास ग्रुपमध्ये आहे. अशाच एका ग्रुपमध्ये परवा व्हाॅटस अपवर मला एक फोटो आला होता. देशपांडे बिर्याणी हाऊस नावाची. कोकणातील एका हाॅटेल किंवा धाब्याचा फोटो होता तो. या फोटोखाली एक कमेंट होती, 'येवढेच बघायचे राहिले होते ' देशपांडे नावाची ब्राह्मण व्यक्ती बिर्याणी हाउस काढते, ब्राह्मण लोक मटणाचे हाॅटेल काढतात, चिकन, मटण डिश विकतात , हे बरोबर नाही, मटण न खाणारे ब्राह्मण मटण विकायला लागले, खायला लागले, असे त्या संबंधित व्यक्तीला कमेंटमध्ये म्हणायचे होते.

देशपांडे बिर्याणी हाऊसचा हा फोटो, त्याबाबतची प्रतिक्रिया पाहून मला पंढरीच्या वारीत भेटलेले अनेक हिंदु मुस्लिम विक्रेते डोळ्यासमोर उभे राहिले. कोणते काम कोणी करायचे हा शोध आणि नियम कुणी लावला, ब्राह्मणांनी हाॅटेल सुरू करायची नाहीत का? ब्राह्मणानी कोणते उद्योग करायचे आणि करायचे नाहीत ही नियमावली कुणी व कधी लावली ?
हिंदुनी, मुस्लिमांनी काय काम करायचे आणि करायचे नाही? काम कशासाठी करायचे असते? लोक काम का करतात? कोणत्या जातीच्या लोकांनी कोणते काम करायचे असा काही नियम आहे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. माझ्या आसपास, कराडात, जिल्ह्य़ात कोण कोण काय कामे करतो याची माहिती घेतली. या दरम्यान मला बारावीच्या इंग्रजी पुस्तकात वाचलेली, शिकलेली आणि शिकवलेली एक गोष्ट मला आठवली. ती गोष्ट मला सांगावाशी वाटते.

गोष्टीचे नाव होत शंभर लोकांची एक जमात.
Community of People.
एक गाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, त्या गावात 100 स्त्री पुरुष रहात होते. सारे लोक अतिशय अतिशय कष्टाळू होते. दिवसभर काम करून खाऊन पिऊन सुखी होते सारे. त्या शंभर लोकांमध्ये एक अतिशय हुशार, वेगळ्या विचाराचा एक प्रज्ञावंत, विचारवंत होता. गावातील लोक रोज सकाळी पाणी आणण्यासाठी खुप लांब पायपीट करीत उंचावर असलेल्या झर्या जवळ जायचे. या कामासाठी सकाळचे तीन चार तास खर्ची पडायचे. हे सर्व लोक हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या कामाला लागायचे. त्या हुशार माणसाने याचा अभ्यास केला, माहिती घेतली, पाणी प्रवाह कसा आहे याचे निरीक्षण केले आणि हे पाणी गावात कसे आणता येईल याचे नियोजन सुरू केले.
रात्रंदिवस काम केले, तो झरा ते गाव पाणी प्रवाहाने आणण्यासाठी चर खोदायला त्याने सुरुवात केली. शेवटी ते पाणी गावात आले, लोक खुश झाले. आता गावातील चौकात पाणी मिळणार, पाण्यासाठी चार तास घालवावे लागणार नाहीत, याचा सर्वानाच आनंद झाला. मात्र त्या हुशार व्यक्तीने लोकांना पाणी देण्यासाठी एक अट घातली. मी तुम्हाला पाणी देईन मात्र त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा वेळ द्यावा लागेल, आज पर्यंत तुम्ही पाणी आणायला रोज चार तास घालवत होता,आता एका तासात तुमचे पाणी भरण्याचे काम होणार आहे, त्यामुळे तुमचे तीन तास वाचतील. ते तीन तास तुम्ही मला द्यायचे, अशी अट त्याने घातली.

रोज पाणी आणायला लागणार्या वेळेच्या बदल्यात वाचलेला तोच वेळ हुशार व्यक्तीला दयायची अट सर्वानी मान्य केली. सर्व 99 लोक हुषार व्यक्तीचा घरी रोज तीन तास कामाला येऊ लागले. घरातील स्वच्छता, शेती मशागत, कपडे धुणे, झोपडी बांधणे,जनावरांची काळजी घेणे, दुध काढणे आदी अनेक प्रकारची कामे लोक करू लागले. ही कामे करत असताना त्या हुशार व्यक्तीने अनेक लोकांना हेरले. त्याच्या असे लक्षात आले की अ नावाची व्यक्ती फळे फुले याची काळजी योग्य प्रकारे घेतोय, त्याला यात रस आहे. मग त्याने अ ला इतर सर्व लोकांच्या घरातील, शेतातील फळाफुलांची कामे करायची. त्या बदल्यात इतर सर्व व्यक्तींनी त्याचे इतर कामे करायची. पुढे ती व्यक्ति गावातील माळी म्हणून उदयास आला.
त्या हुशार व्यक्तीने इतर सर्व लोकांमधील एक एक गुण हेरला. पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम दिले आणि कामावर आधारीत व्यवस्था निर्माण झाली. चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशु संवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला, न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी असे अनेक कर्मकार झाले. काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला, पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामाने त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती पडल्या. अशा आशयाची ती गोष्ट होती
.
ही गोष्ट मला पटते. जो चांगले काम करत होता त्या पद्धतीने त्याचा व्यवसाय वाढला. ज्याला जी गोष्ट आवडते, करू वाटते त्याने ती मन लावून करायची, त्याच क्षेत्रात पुढे जायचे, शिकावे, मोठ्ठे व्हायला हवे. जात व्यवस्था कामावरून तयार झाली तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आजचे कलियुग नसून कलायुग आहे. आज कोणतीही व्यक्ती कोणतेही काम करू शकते, नव्हे करत आहे! सोमवार पेठेत एक रेखाताई नावाची मराठा समाजाची महिला आहे. ती गेल्या दहा वर्षापासून अपार्टमेंट स्वच्छता काम करते. रोज सकाळी पाच ते दहा तिचे काम चालले. पंधरा ते वीस अपार्टमेंट बाहेरून झाडायचे, प्रत्येक फ्लॅट मालकाचा कचरा एकत्र करायचा, सर्व कचरा पालिकेच्या गाडीत टाकायचा. खुप कष्टाचे काम आहे, यातून या महिलेने सोमवार पेठेत स्वतःचे दोन मजली घर बांधले आहे. मराठ्यांनी हे काम करायचे का? असे म्हणत बसली असती तर रेखाताई आज मोठय़ा घराची मालकीण झाली नसती.
देशपांडे बिर्याणी हाऊसचे नावाने खडे फोडणारे लोकांनी घाटावरच्या सिद्धिविनायक आणि कृष्णाबाई मंदीरासमोर दुर्वा, फुले, नारळ विकणारे मुस्लिम लोक पहायला यायला हवे. पंढरपुरात तर विठ्ठलचा प्रसाद, फोटो, बुक्का विकणारे शेकडो मुस्लिम लोक पहायला मिळतात. मी स्वतः अफसाना चाची कडून प्रसाद विकत घेतला होता.

आज कोणत्याही व्यवसायात कोणीही पडू लागले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर माहिती घेतली तर लाखो उदाहरणे पहायला मिळतील. पण ती पहायला जावी लागतील. येथे आपल्या परिसरातच असे अनेक लोक आहेत. कराडच्या संगम हाॅटेलचे मालक ब्राह्मणच आहेत, गेली चाळीस वर्षे मटण डिश खाऊ घालत आहेत. मटणाची, चिकनची दुकाने आज हिंदु लोकांनी पण टाकली आहेत. सातारच्या गोडोली नाक्यावर साईबाबा मंदिरासमोर काल मी गणेश चिकन सेंटर नावाचे दुकान पाहिले. हा बोर्ड वाचून आपण काय म्हणणार?
आज खानदानी घरातील अनेक महीलांनी ब्युटी पार्लर थाटली आहेत. केस कापणे हे काम फक्त नाभिक समाजाचे राहीलेले नाही. मारवाडी, मराठा समाजातील युवकांनी चपल्याची दुकाने सुरू केली आहेत. अनेक जाती जमातीचे लोक सुवर्ण व्यवसायात दिसतील की जे काम पुर्वी गावातील सोनार करायचा. परंपरागत काम करणारे सुतार, लोहार यांची जागा उत्तर भारतातून आलेल्या पोटार्थी कामगारांनी घेतली आहे. रोजगार ही त्यांची जात नसून गरज झाली आहे.

काम आणि पोटाचा जवळचा संबंध आहे. कामाला, व्यवसायाला कोणती जात नसते. काम पोटासाठी असते. व्यवसायासाठी, कुटुंबातील सदस्याच्या उदरनिर्वाहासाठी , प्रगतीसाठी आणि मोठ्ठे होण्यासाठी तसेच समाज आणि स्वतःच्या भल्यासाठी काम, व्यवसाय असतो, ऐवढेच म्हणावे लागेल. चांगले काम करणारा , सेवा देणारा,सातत्य राखणारा आणि ग्राहक देवो भव म्हणणाराच यापुढे टिकणार आहे. जात पाहून दुकानात जाणारे, जातीभेद करण्यात धन्यता मानत राजकीय पोळी मागणारे काळाच्या ओघात संपले आहेत, संपणार आहेत.
.............सतीश मोरे
सोशल प्रीतिसंगम.....प्रत्येक सोमवारी पुढारी मध्ये वाचा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा