सोशल प्रितिसंगम
आज पुढारी 28 मार्च पान 11
पाणी वाचवा ब्लॉगचा काही भाग पुनःप्रकाशित
जलधारा जपून वापरा !
पाणी किती महत्वाचे आहे हे आम्हाला कुणी सांगायची गरज नाही. आम्ही पाणस्थळ खोर्यात जन्माला आलो आहे. आमच्या कराड तालुक्यातून कृष्णा कोयना नद्या वाहतात. आमच्या येथे भरपूर पाणी आहे. आम्ही पाणी कसे पण वापरणार, आम्हाला काय करायचे आहे दुसर्याचे ? आम्हाला पाणी मिळतेय ना पाहीजे तेव्हा, पाहिजे तेवढे ! अहो पाणी आमच्या उशाला आहे. आम्ही कृष्णा काठावरील गावात जन्माला आलो, हे आपले भाग्य आहे. रोज सकाळी कृष्णा घाटावर, पुलावर जातो , कृष्णाबाई नदीचं दर्शन घेतो आम्ही. पाणीच पाणी. कराड पालिका रोज दोन वेळा पाणी सोडते. शुद्ध करून, कशाला आमची तहान भागवायला नव्हे सकाळी भरलेलं पाणी संध्याकाळी ओतून टाकायला. आम्ही खूप बुद्धीवान आहोत. आम्ही शुद्ध पाणी गटारात ओतणार, शुद्ध पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करणार, पाणी रस्त्यावर मारणार .आम्ही कराडकर, आम्हाला काय कुणाची भिती !
पुण्यवान कराड शहरवासिय आणि महापुण्यवंत कृष्णा काठावरील ग्रामस्थ हो. आहेना तुम्ही याच धुंदीत, याच अविर्भावात . तुम्हाला हेच वाटतंय ना? पाणी पुरवठा योजना कृष्णा काठावरील गावागावात आहेत कराडात रोज दोन टाईम पाणी येते. पाणी भरपूर आहे, आपल्याला काळजीचं कामच नाही, असे अनेकांना वाटत आहे. आणि हो मला काय करायच आहे दुसऱ्याच, मला मिळतंय ना बस झालं. मी एकटा पाणी बचत करून काय साध्य होणार आहे? माझ्या नशिबात आहे म्हणून मी कृष्णा काठी जन्माला आलोय.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
म्हणोणी करहाटक नगरी जन्मलो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा