फॉलोअर

२४ फेब्रुवारी २०१८

Headphones Left and Right

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

*LEFT👂🏼🎧👂🏼RIGHT*
➖➖➖➖➖➖➖
*☑ दोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं?*
➖➖➖➖➖➖➖
इयरफोनच्या डाव्या बाजूला L आणि उजव्या बाजूला R लिहिलेलं असतं. जर तुम्ही चायना इयरफोन वापरत असाल तर कदाचित तुम्हाला ही गोष्ट आढळणार नाही, कारण प्रत्येक चायना इयरफोनवर असे लिहिलेले नसते, पण एखादा ओरिजिनल इयरफोन पाहिलात तर तुम्हाला Left/Right लिहिलेलं नक्की आढळेल. आज जाणून घेऊया या मागचं लॉजिक!
🔲🔲🔲
मुख्य गोष्ट म्हणजे हे L आणि R असं दर्शवतं की तुम्हाला एयरफोनची कोणती बाजू कोणत्या कानात घालायची आहे. म्हणजे ज्या भागावर L लिहिलेलं असतं तो भाग तुम्ही डाव्या कानात घालणं अपेक्षित असतं आणि ज्या भागावर R लिहिलेलं असतं तो भाग उजव्या कानात घालणं अपेक्षित असतं.
🔲🔲🔲
पण आपण कुठे एवढं लक्ष देतो. जो भाग ज्या हातात येईल तो भाग सरळ त्या त्या कानात घालून मोकळे होतो. आता तुम्ही म्हणालं की दोन्ही बाजूंनी उत्तम तर आवाज येतो आणि उलट सुटल घातलं तर त्रास देखील काही होत नाही, मग Left/Right ची चिन्ह देण्याचा काय फायदा?
🔲🔲🔲
खरतरं प्रश्न एकदम साधा आहे, पण त्यामागचं उत्तर मात्र गहन आहे! Sound Engineering पासून Recording पर्यंत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर ठेवून ही चिन्ह देण्यात येतात.

▪Stereo Recording च्या वेळेस एखादा ध्वनी डाव्या बाजूने येत असेल तर तर तुमच्या इयरफोनच्या Left बाजूकडून तो ध्वनी मोठ्या आवाजात ऐकू येईल आणि जर तुम्ही हा ध्वनी Right बाजूकडून ऐकायला गेलात तर तुम्हाला कमी आवाजात ऐकू येईल. हे झालं एक कारण..!

*_▪इयरफोनवर Left/Right लिहिण्यामागे अजून एक कारण असं आहे की, यामुळे दोन आवाजांना वेगवेगळ करून ऐकणं सोप्प होतं. त्या दोन आवाजांमधला फरक जाणून घेणं देखील सोप होतं. अशी अनेक गाणी असतात ज्यामध्ये Loud Musical Instruments उदा. ढोल किंवा Soft Musical instrument उदा. बासरी, यांसारखी दोन टोकांची वाद्ये एकत्र वाजवली जातात. अश्यावेळेस एका वाद्याच्या आवाजामागे दुसरा आवाज लपू नये म्हणून दोन्ही आवाजांना एकत्र वेगवेगळ्या चॅनेलमध्ये (Left किंवा Right) ऐकलं जातं._*

▪तसेच चित्रपटाच्या अचूक Sound Recording साठी Left आणि Right चॅनेल असणं गरजेच आहे. तुम्ही कधीतरी एखादा चित्रपट लॅपटॉपवर किंवा फोनवर आपल्या एयरफोनच्या माध्यमातून ऐकला असेल. तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की स्क्रीनच्या डाव्या बाजूकडून येणारा एखाद्या गाडीचा आवाज पहिल्यांदा इयरफोनच्या डाव्या बाजूकडूनच ऐकू येतो आणि त्यानंतर हळूहळू इयरफोनच्या उजव्या बाजूकडून ऐकायला येतो. हे यासाठी केलं जातं जेणेकरून चित्रपट पाहणाऱ्याला त्या प्रसंगात तो तेथे असल्याचा फील यावा! अश्यावेळेस जर तुम्ही इयरफोनची डावी बाजू उजव्या कानात आणि उजवी बाजू डाव्या कानात घातली असेल तर तुम्ही तो अनुभव घेऊ शकणार नाही.
➖➖➖➖➖➖➖
*LEFT👂🏼🎧👂🏼RIGHT*

०७ फेब्रुवारी २०१८

चेक बुक वरील नंबर

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

🏦✍🏼🏦✍🏼🏦✍🏼🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ चेकच्या खाली लिहिलेल्या अंकांचा अर्थ माहिती आहे का...??.*
➖➖➖➖➖➖➖
_चेक मध्ये 23 क्रमांकात लिहिलेले असतात ह्या संख्या. चला याचा अर्थ जाणून घेऊयात…_
🔲🔲🔲
आजही, एटीएम आणि इंटरनेट बँकिंगच्या काळातसुद्धा लोकांनी चेकचा वापर सुरू ठेवला आहे. आजही चेक हे मोठ्या व्यवहारासाठी वापरले जातात. चेकचा वापर करताना आपण रकमा, चिन्ह, नाव आणि नंबर तपासून पाहतो आणि संपूर्ण सावधगिरीने भरलेल्या माहितीची विशेष काळजी घेतो. परंतु तुम्ही तुमच्या चेकशी संबंधित इतर काही गोष्टी देखील ओळखून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का…? जसे कि, चेकच्या खाली दिलेली संख्या काय आहे…? चेकचे मूल्य तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित असेल. अशा प्रकारे चेकमध्ये देण्यात आलेली कोणतीही माहिती हि अनावश्यक नसते. चेकवर लिहिलेल्या प्रत्येक विधानाचे विशेष अर्थ आहेत. खाली दिलेले 23 अंक देखील अतिशय खास आहेत.
🔲🔲🔲

*_🔺चेकखाली लिहिलेली 23 अंकीय संख्या 4 भागांमध्ये विभाजित आहे. प्रत्येक भाग किंवा अंगाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे._*

◼चेकच्या खाली लिहिल्या गेलेल्या या नंबरवरून सुरुवातीचे 6 अंक चेकचा नंबर दर्शवतात. जे रेकॉर्डसाठी सर्वप्रथम तपासले जातात.

◼यानंतरचे, पुढील 9 अंकी एम.आय.सी.आर. कोड म्हणजेच ‘चुंबकीय इंक कॅक्टर रेकग्निशन’ दर्शवतात. प्रत्यक्षात हे 9 आकडे दर्शवतात की, कोणता चेक कोणत्या बँकेद्वारे व्यवहारात आणला गेला आहे. ‘चेक रीडींग मशीन’ ह्या कोडचे वाचन करते.

_*◼एम.आय.सी.आर कोड तीन भागांमध्ये विभागले जातात.*_

_▪पहिला भाग म्हणजे सिटी कोड. म्हणजेच, रांगेतील पहिले तीन अंक प्रत्यक्षात आपल्या शहराचा झिप कोड दर्शवतात आणि याने चेक कोणत्या शहरातील आहे याची माहिती मिळते._
_▪दुसरा भाग बँक कोड आहे. प्रत्येक बँकेचा स्वतःचा असामान्य कोड असतो. जसे कि, आय.सी.आय.सी.आय. बँकेचा कोड २२९ आणि एस.बी.आय. बँकेचा हा ००२ कोड आहे._
_▪एम.आय.सी.आर. कोडचा तिसरा भाग म्हणजे शाखा कोड. हा शाखा कोड बँकेच्या प्रत्येक शाखेचा वेग वेगळा असतो. हा कोड बॅंकेला जोडलेल्या प्रत्येक व्यवहारामध्ये वापरला जातो._

◼एम.आय.सी.आर. कोडनंतर, पुढील 6 अंक बँक खाते क्रमांक असतात. आपण हे जाणून घ्या कि, या संख्या फक्त नवीन चेकबुकमध्येच आढळून येतात. पूर्वीच्या जुन्या चेकबुकमध्ये हा क्रमांक नव्हता.

◼शेवटचे दोन अंक ‘ट्रान्झॅक्शन आयडी’ असतात. ज्यात २९, ३० आणि ३१ हे अंक क्रॉस चेकला, तर ०९, १० आणि ११ हे अंक स्थानिक चेकला दर्शवतात. ‘क्रॉस चेक’ हा एक असा चेक आहे, जो संपूर्ण देशातील संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये स्वीकार्य असेल. सोबतच बाहेरच्या शाखांमध्येहि हा चेक वापरताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
➖➖➖➖➖➖➖
🏦✍🏼🏦✍🏼🏦✍🏼🏦

०४ फेब्रुवारी २०१८

CIBIL काय आहे सिबिल स्कोर

_*🔺🙇🏻‍♂ मनातील प्रश्न...*_

🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ सीबील/CIBIL आर्थात (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited) किंवा सिबिल (CIBIL)*

*☑ सिबिल (CIBIL) काय आहे आणि त्याचा कर्जाशी काय संबंध आहे?.....*
➖➖➖➖➖➖➖
एखाद्या बँकेकडून जेव्हा आपण कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा कर्ज द्यायचे की नाही हा निर्णय घेण्यासाठी बँकेला आपल्याबद्दल काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात.

▪१) तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे?

▪२) तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का आणि असेल तर किती आहे?

▪३) यापूर्वी तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केली होती का?

बँकेला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे आहे. तुम्ही बँकेला तुमच्या उत्पनाचे कागद दिले (सॅलरी स्लिप, इनकम टॅक्स रिटर्न) की बँक खात्रीने तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज देता येईल ते ठरवू शकते.
🔲🔲🔲
पण तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का हे किंवा यापृवी घेतलेल्या कर्जाची तुम्ही वेळेत परतफेड केली होती का हे जाणून घेण्यासाठी बँकेला जो कर्ज घेतोय त्याने दिलेल्या माहितीवर विसंबून रहावे लागू शकते. बँकेला यात जोखीम आहे कारण कर्ज मागणाऱ्याने दिलेली माहिती नेहमीच खरी असेल याची हमी नाही.
🔲🔲🔲
जसे उत्पन्न दर्शविण्यासाठी स्वतंत्र कागदपत्रे असतात तसेच जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती देण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था असती तर बँकांसाठी चांगले झाले असते. ह्या विचारातूनच २००५ साली एक कायदा पारित करण्यात आला. त्या कायद्याने कर्जाची माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांना, ज्यांना क्रेडिट ब्युरो (Credit Bureau) असेही म्हणतात, सक्षम केले गेले आणि त्यांना अधिकार देण्यात आले कि त्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून माहिती गोळा करू शकतात. अशीच कर्जाची माहिती गोळा करणारी एक कंपनी (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) किंवा सिबिल (CIBIL).
🔲🔲🔲
सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते. नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फॉर्मशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात.
🔲🔲🔲
ह्या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात. सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँका कर्ज द्यायला तयार होतात आणि सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर बँक एकतर कर्ज नाकारू शकतात किंवा कर्ज दिलेच तर नेहमीपेक्षा जास्त व्याज दर आकारू शकतात.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अर्जदाराने अर्ज भरून बँकेला दिल्यावर बँक प्रथम अर्जदाराचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासते. जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्या अर्जावर विचार करायच्या आधीच त्यास त्यास नकार देऊ शकते. जर सिबिल स्कोर जास्त असेल तर बँक अर्जावर लक्ष देतील आणि अन्य तपशील विचारात घेऊन अर्जदार कर्ज देण्यायोग्य आहे का नाही हे ठरवतील. बँकेसाठी सिबिल स्कोर ही अर्जदाराची पहिली ओळख असल्या सारखे असते, जितका जास्त स्कोर, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त .
🔲🔲🔲
क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच सिबिल ही काही एकच कर्जाची माहिती गोळा करणारी कंपनी नव्हे. तिच्या सारख्याच आणखी ३ कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत जसेकी एक्विफॅक्स (Equifax), एक्स्पेरियन (Experian) आणि हायमार्क (Highmark). त्यांचेही सिबिल सारखेच स्वतःचे क्रेडिट स्कोर आहेत.
🔲🔲🔲

*◾क्रेडिट रिपोर्ट मध्ये काय असते?*

कर्ज घेतल्यावर तुमच्या कर्ज खात्यात जे काही घडले असेल त्यापैकी बहुतांश माहिती ही क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेली असते.

जसेकी –

तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि तुम्ही घेतलेल्या गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज या व अशा इतर कर्जाबरोबर क्रेडिट कार्डा ची माहिती दिलेली असते.पूर्वी घेतलेल्या प्रत्येक कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती यामध्ये दिलेली असते.एखादे कर्ज तुम्ही फेडले नसेल तर तेही नमूद केले असते.बँकांशी कधी कर्जफेडीबाबत भांडण / तंटा झाला असेल आणि त्यामुळे कर्जखाते बंद केले असेल तर त्या कर्जसमोर ‘सेटल्ड’ (Settled) असे लिहिलेले असते.तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल पण कर्ज घेतले नसेल तर त्याचीही नोंद यात केली जाते.सध्या चालू असलेल्या कर्जाच्या बाबतीत किती कर्ज फेडणे अद्याप शिल्लक आहे तेदेखील यात सांगितलेले असते.मागील ३६ महिन्याचा परतफेडीचा इतिहास प्रत्येक कर्जाच्या बाबतीत सांगितला जातो.तुमच्या क्रेडिट कार्डाची माहिती जसेकी प्रत्येक क्रेडिट कार्डांची क्रेडिट मर्यादा आणि कॅश मर्यादा नमूद केलेली असते.कर्जाचे व क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळच्यावेळी भरले जातात का ही बाबही ३६ महिन्यांच्या परतफेडीच्या इतिहासाकडे बघून कळते.
🔲🔲🔲
आणि ह्या सर्व मापदंडांचा उपयोग करून बनवलेला सिबिल स्कोर क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेला असतो.
🔲🔲🔲

*◾चांगला सिबिल स्कोर म्हणजे किती?*

सिबिल स्कोर कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त ९०० एवढा असू शकतो. सिबिल स्कोर ९०० च्या जेवढा जवळ असेल तेवढा चांगला आणि बँका तेवढे तुमच्या कर्ज परतफेडण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील. सामान्यतः ७५० पेक्षा जास्तचा सिबिल स्कोर हा चांगला समजाला जातो.
🔲🔲🔲
*_सिबिलच्या संकेतस्थळावर (www.cibil.com) वर पैसे भरून तुम्ही स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोर बघू शकतो._*
🔲🔲🔲
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर चांगला आहे म्हणून कर्ज मिळेलच ह्याची कुठलीही हमी नाही. शेवटी कर्ज देण्याचा निर्णय हा पूर्णपणे बँकेवर अवलंबून असतो.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर हा जसे व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टला थोडक्यात आकड्याच्या स्वरूपात दर्शवतो तसेच सिबिल जेव्हा एखाद्या कंपनीच्या क्रेडिट रिपोर्ट ला आकड्याच्या स्वरूपात दर्शवते तेव्हा त्याला सिबिल रँक (CIBIL Rank) असे म्हणतात. सिबिल रँक १ ते १० मध्ये असतो, जेथे १ हा सर्वोत्तम रँक असतो. सिबिल रँक फक्त अशाच कंपन्यांना प्रदान केला जातो ज्यांच्यावरील कर्ज  हे १० लाख रुपयांपासून १० कोटी रुपयांपर्यंत असते.
➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦

०३ फेब्रुवारी २०१८

Horn OK Please संग्रहित

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न.....*_

*🚛 Horn 🆗 Please*
➖➖➖➖➖➖➖
*🤔 रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या बऱ्याचशा गाड्यांवर Horn Ok Please लिहिलेलं वाचतो पण काय असावं बरं त्याचं कारण....*

*☑“Horn OK Please” : या शब्दप्रयोगाच्या जन्मामागची कथा....*
➖➖➖➖➖➖➖
कधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील! केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला?”
चला तर जाणून घेऊया या कोड्या मागचं बहुतेक कोणालाच माहित नसलेलं उत्तर!

*▪तत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ:*

त्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते. आणि Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.
आता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.
🔲🔲🔲
ह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.
🔲🔲🔲
*_त्या काळच्या टाटा कंपनीने सादर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो._*
🔲🔲🔲
परंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे. तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.
म्हणजे – मागून येणाऱ्या गाडीने Horn Please! ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.
ट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.
🔲🔲🔲
*हळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.*
🔲🔲🔲
तिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा. त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ (OK) असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.
🔲🔲🔲
या तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही. असो पण काही का असेना Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.
➖➖➖➖➖➖➖
*🚛 Horn 🆗 Please*

मिलिटरी वाहनांच्या नंबर प्लेट्स संग्रहित

_*🔺 🙇🏻‍♂मनातील प्रश्न...*_

🇮🇳 🚛 🇮🇳 🚛 🇮🇳 🚛
➖➖➖➖➖➖➖
*☑ मिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात...?*
➖➖➖➖➖➖➖
भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख! त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अश्याप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते.
🔲🔲🔲
Central Motor Vehicle Rules नुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अश्या स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते.
🔲🔲🔲
या नंबर प्लेट देखील विविध रंगात असतात. त्यावरून त्या गाडीचा प्रकार ओळखला जातो. पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या या खाजगी/वैयक्तिक असतात. पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या पब्लिक वाहन (बस, रिक्षा टॅक्सी) असतात. काळ्या नंबर प्लेट हे दर्शवते की त्या गाड्या व्यावसायिक (commercial) वापरासाठी आहेत. आणि निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर असणाऱरी पांढरी रेषा हे दर्शवते की ती गाडी कोणत्या तरी देशाच्या वकिलातीची आहे. हे झालं या नेहमीच्या रोजच्या गाड्यांबद्दल....
🔲🔲🔲

*◼पण या सर्व गोष्टी आणि नियम मिलिटरी गाड्यांना मात्र लागू होत नाहीत. असे का...??*

▪मिलिटरी गाड्या या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत रजिस्टर असतात. या गाड्यांवर एक वरच्या बाजूला दाखवलेला बाण असतो आणि बाणाच्या पुढे ज्या वर्षी गाडी बनवली गेली किंवा आयात (Import) केली गेली त्या वर्षाचे शेवटचे दोन क्रमांक असतात. उदा. २००३ हे वर्ष असेल तर (03)!

▪या दोन क्रमांकाच्या पुढे असतो बेस कोड, त्यापुढे असतो वाहन क्रमांक आणि त्यापुढे असतो गाडीचा दर्जा..! मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर बाण यासाठी दाखवतात की समजा चुकून नंबर प्लेट उलटी लागली तर त्या बाणामुळे ते लक्षात येते. हा बाण तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या फक्त गाड्यांवरच नाही तर प्रत्येक मालमत्तेवर दिसेल.

▪मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात. मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडायची मुभा असते.

▪फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू नाहीत.

▪तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात. जर लष्करातील दलप्रमुख (Chief Of Staff) अधिकारी असेल तर गाडीवर लाल रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

▪जर वायुदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर त्याच्या गाडीवर आकाशी रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. त्याचप्रकारे जर नौदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर गाडीवर नेव्ही ब्ल्यू रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

▪या अधिकाऱ्यांच्या वरच्या पदी असणारे अधिकारी म्हणजे लष्करप्रमुख, नौदलप्रमुख किंवा हवाईदल प्रमुख असतील तर त्यांच्या गाड्यांवर पाच स्टार्स असतात. हे स्टार्स असे दर्शवतात की हे अधिकारी त्यांचे युनिफॉर्म निवृत्त झाल्यानंतरही मरेपर्यंत घालू शकतात.

*▪याव्यतिरिक्त इतर अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या गाड्यांवर सोनेरी अशोकस्तंभ असतो. या गाड्यांना वाहन क्रमांक नसतो. ही गोष्ट बहुधा सगळ्यांचा माहित नसेल.*
➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 🚛 🇮🇳 🚛 🇮🇳 🚛

०१ फेब्रुवारी २०१८

मनमोकळा



सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची
तू येणार नसतानाही !

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची
तू जवळ नसतानाही !
.

अगं,
आजकाल काय झालंय
माझं मलाच कळतच नाही,
तुझ्या ध्यास आणि भासात
मग मी माझाच रहात नाही !

खरं सांगू,
माझं मलाच कळतं नाही
मी तुझ्या समोर इतका
मनमोकळा का होतो ?

कुणालाही बोलू शकत नाही
शेअर करु शकत नाही,
असं तुला का सांगतो?

भावनांच्या दुरगावी
एक सतिताभ राहातो
जागेपणी क्षणोक्षणी
तुझी स्वप्ने पाहातो !


तुझं माझं नातं
मनापासुन ‌घट्ट आहे !
तुझ्या प्रत्येक सादाला
माझा हो आहे !
तुझ्या नकारालाही
माझा होच आहे !

१३ जानेवारी २०१८

कविता करता येईल




तुझ्या स्मित हास्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या गोड गालावर
एक कविता करता येईल

तुझ्या अल्लडपणावर
एक कविता करता येईल
तुझ्या समंजसपणावर
एक कविता करता येईल

आपल्या जीवन संगीतावर
एक कविता करता येईल
आपल्या सुंदर नात्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या सहवासावर
एक कविता करता येईल
तुझ्या विरहावर
एक कविता करता येईल

तुझ्या प्रेमळ आवाजावर
एक कविता करता येईल
तुझ्या सहज खुलण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या माझ्या प्रीतीवर
एक कविता करता येईल
तुझ्या माझ्या भेटीवर
एक कविता करता येईल

तुझ्या मोहक सौंदर्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मोकळ्या केसांवर
एक कविता करता येईल

तुझ्या लाजण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मुरडण्यावर
एक कविता करता येईल

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...