फॉलोअर

११ फेब्रुवारी २०१७

गुगलच्या 10 करामती

📡📲📡📲📡📲📡📲📡
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑गुगल आणी १० अफलातुन करामती*
➖➖➖➖➖➖➖➖➖
नुकतेच गुगल या इंटरनेटवरील सर्वात मोठ्या संकेतस्थळाने आपला १५ वा वर्धापन दिवस साजरा केला. गुगलने त्या दिवशी डूडलच्या माध्यमातून जगभरातील वापरकर्त्यांवर शेकडो चॉकलेटसचा अक्षरशः पाऊस पाडला सर्वात जास्त चॉकलेटस मिळवण्याची स्पर्धाच जणू नेटिझन्स मध्ये लागली होती. कोणत्याही विशेष मुहूर्ताला गुगल आपला नेहेमीचा लोगो बदलून त्याजागी दिनविशेष दाखवणारा लोगो दाखवते (उदा – एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा स्मृतीदिन इत्यादी) इतकेच नव्हे तर गुगल तुमच्या वाढदिवसाला देखील अशा प्रकारचे डूडल दाखवते, पण फरक इतकाच कि ते (पर्सनलाईज सेवेच्या माध्यमातुन) फक्त तुम्हालाच दिसते.  जगभरातील काही डेव्हलपर्सनी गुगलचा वापर करून काही अफलातुन करामती सादर केल्या आहेत याच गुगलच्या काही भन्नाट आणी अफलातुन १० करामती येथे दिल्या आहेत.
🔲🔲🔲

*🔺१) गुगल ग्रॅव्हीटी (Google Gravity) –*  
     गुगल ग्रॅव्हीटी म्हणजे न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला गुगलने दिलेली मानवंदना असे गमतीने म्हटले जाते. गुगल अतिशय वेगवान आणी सुरक्षित असलेले संकेतस्थळ आहे हे सर्वश्रुत आहे पण गुगलवर आपण जेव्हा शोध घेतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली माहिती सापडतेच असे नाही मग अशा वेळी गुगलच्या होमपेजवरील सगळ्या गोष्टींची मोडतोड करून त्या अस्ताव्यस्त करायला तुम्हाला आवडु शकेल. जेव्हा अस्ताव्यस्त केलेल्या गोष्टी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली पडतील तेव्हा तुम्ही पुन्हा उचलून त्या हवेत उडवू शकता. तुम्हाला आलेल्या रागाचे मनोरंजनात किंवा असुरी आनंदात  रूपांतर करण्यासाठी पहायलाच हवी अशी गुगल ग्रॅव्हीटी. 

*🔺२) गुगल स्पहीयर (Google Sphere) –*  
     नेहेमी शांत आणी गुणी बाळाप्रमाणे वागणाऱ्या गुगलने अचानक तुम्हाला चकवा द्यायला सुरुवात केली तर ?? गुगल स्पहीयर म्हणजे याचेच एक द्वाड उदाहरण आहे. तुम्ही इमेज सर्च करायला गेला कि हवे असलेले कीवर्ड्स टाइप करून सर्च इमेजेस या बटणावर टिचकी द्यायला गेला आणी तेवढ्यात जर ते बटन तुमच्या हातावर तुरी देऊन धुम पळत सुटले तर तुम्हाला इमेजेस सर्च करण्यासाठी नक्कीच थोडा पकडापकडीचा खेळ खेळावा लागेल आणी यामध्ये जीमेल, मॅप्स, न्युज असे इतर उत्सुक दुवेदेखील सामील होतील हे निश्चित. 

*🔺३) गुगल झेर्ग रश (Google Zerg Rush) –*  
     आपणच निर्माण केलेल्या गोष्टीची आपणच सहसा विल्हेवाट लावत नाही पण गुगल झेर्ग रश मात्र याला अपवाद आहे. तांदूळ, गहू अशा धान्यांमधले किडे तोडणीनंतर प्रक्रिया करून काढले जातात नाहीतर असे किडे धान्य खराब करू शकतात पण गुगलच्या शोधांमध्ये मात्र असे किडे येतील आणी चक्क सर्च रिझल्ट्सच खाऊन संपवतील अशी कल्पना खुद्द गुगलचे निर्माते सर्जी आणी लॅरी यांनीही केली नसेल.  गुगल झेर्ग रश मधील किडे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुगल मधीलच ‘ओ’ हि इंग्रजी अक्षरे आहेत पण तुमचे सर्च रिझल्ट्स वाचवण्यासाठी तुम्हाला कीटकनाशक1 फवारणी एवजी एक + च्या आकाराची बंदूक दिली जाते. 

*🔺४) गुगल पॅक मॅन (Google Pac Man) - * 
     जर तुम्ही ९० च्या दशकात जन्मलेले असाल तर तुम्ही पॅक मॅन हा खेळ नक्कीच खेळलेला असाल. गुगलने हा खेळ पॅक मॅनच्या ३० व्या वाढदिवसाला (२१ मे २०१२) सन्मान म्हणुन डूडलच्या रुपात पुन्हा जगापुढे आणला. अगदी जुन्या रुपात म्हणजे कॉईन टाकल्याशिवाय सुरु न होणे इत्यादी बारकावे देखील आपल्याला पहायला मिळाले. तुम्हाला जर हा खेळ परत डूडल वर खेळायचा असेल तर मात्र तुम्हाला पॅक मॅनच्या ५० व्या किंवा ६० व्या वाढदिवसापर्यंत वाट पहायची आवश्यकता नाही. गुगलच्या डूडल अर्काईव्हज मध्ये तुम्ही हा खेळू शकता. 

*🔺५) गुगल टर्मिनल (Google Terminal) –*  
     तुम्हाला माहिती आहे का बिल गेट्स यांनी फक्त कोडिंगच्या ज्ञानावर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता? ज्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर अस्तित्वात आले तेव्हा ते कसे दिसत असतील हे जाणून घेण्यासाठी गुगल टर्मिनल तुम्हाला उपयोगी पडू शकेल याचे होमपेज पाहिल्यावरच आपल्याला जुन्या पद्धतीच्या कोडिंग संदर्भात कल्पना येते. त्या पद्धतीचे कोडिंग आजही बायोस मेन्यूमध्ये तुम्हाला बघायला मिळते पण एकदा संगणकावर ‘वेलकम’ असा संदेश झळकला कि आजची रंगीबेरंगी साधी आणी सोपी संगणक प्रणाली पहायला मिळते. गुगल टर्मिनल मध्ये शोध घेताना फक्त किबोर्डचाच वापर आवश्यक आहे. 

*🔺६) गुगल अंडरवॉटर (Google Underwater) –*  
     आपण केलेली मेहेनत पाण्यात जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रमाणे कोणाला पाण्यात पाहणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते पण गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध मात्र पहायचे असेतील तर मात्र गुगलला पाण्यात पाहण्यावाचून काही उपाय उरत नाही. सुरुवातीला पाण्यावर तरंगणारा सर्च बॉक्स शोध घेतल्यानंतर मात्र सापडलेल्या शोधांच्या वजनाने जड होतो आणी सगळ्या शोधांसह पाण्याखाली बुडतो म्हणूनच गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध पहाताना ते पाण्यात पहावे लागतात. 

*🔺७) लेट मी गुगल दॅट फॉर यु (Let Me Google That for You) –*  
     गुगल वर शोध घेण खरच खूप अवघड असते का?? नक्कीच नाही पण गुगल पहिल्यांदा वापरताना कदाचित एखाद्याला अडचण येऊ शकते, यावेळी तुम्ही ‘लेट मी गुगल दॅट फॉर यु’ चा वापर करू शकता. येथे होमपेजवर आपला नेहेमीचा गुगल सर्च बॉक्स दिसतो तेथे जाऊन कीवर्ड टाइप करायचे आणी सर्च बटणावर टिचकी द्यायची आता नेहमीप्रमाणे सर्च न होता एक लिंक तयार होईल जी तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. ह्या लिंकवर टिचकी दिल्यावर दर वेळेस कीवर्ड टाइप होण्यापासून ते सर्च रिझल्ट्स दिसेपर्यंत सर्व प्रोसेस तुम्ही पाहू शकाल आणी सरतेशेवटी तुमच्याकडे असतील सर्च रिझल्ट्स. एक उदाहरण तुम्ही या दुव्यावर पाहू शकता. 

*🔺८) स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) – * 
     नकाशा पहाताना तुम्ही बहुतेक वेळेला गुगल मॅप्सचा वापर करत असाल तर स्ट्रीट व्ह्यू हि सुविधा तुम्ही वापरायलाच हवी. सध्या भारतातील नकाशा स्ट्रीट व्ह्यू मार्फत पाहता येत नसला तरीही इतर देशातील नकाशे पाहू शकाल. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे चक्क एखाद्या रस्त्याचा फोटो होय, पण थांबा स्ट्रीट व्ह्यू सुविधा तुम्हाला नुसताच फोटो दाखवत नाही तर तुम्ही तुमचा किबोर्ड वापरून पुढे-मागे चालू शकता डाव्या-उजव्या बाजूला वळू शकता म्हणजेच थोडक्यात एखादा व्हिडियो-गेम खेळल्याप्रमाणे तुम्ही त्या देशाची मुक्त भटकंती करू शकता याशिवाय व्हाईट हाउस सारख्या स्थळांचाही समावेश गॅलेरी मध्ये करण्यात आलेला आहे. 

*🔺९) अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी (Google Account Activity) -*  
     अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी म्हणजे एक अशाच प्रकारची उपयुक्त सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंटची सर्व माहिती पुरवते. तुम्ही पाठवलेले सर्व ई-मेल्सची संख्या, गुगल वर केलेले सर्च इत्यादी याशिवाय तुम्ही पाहिलीली संकेतस्थळे, सबस्क्राइब केलेल्या फिड सुविधा याबाबतही माहिती  गुगलच्या अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी मध्ये उपलब्ध आहे. 

*🔺१०) टेक-आउट (Google Takeout) –* 
     कदाचित तुम्हाला माहिती नसेल कि तुम्ही जेव्हापासून गुगल प्रोडक्ट्स वापरत आहात (उदा- गुगल अर्थ, गुगल क्रोम) तेव्हापासून गुगलकडे तुमच्याबद्दलची इत्यंभूत माहिती जमा केली जात आहे, रिसर्चच्या नावाखाली जमा केली जात असलेली सर्व माहिती गुगल पर्सनलाईझ सेवा देण्यासाठी वापरते आणी याच माहितीचा वापर करून तुमच्यासाठी सर्वाधिक योग्य अशा जाहिराती देखील दाखवल्या जातात ज्या तुम्हाला आवडु शकतात. तुम्हाला देखील तुमच्याबद्दलची गुगलकडे असणारी माहिती हवी असेल तर तुम्ही ती डाऊनलोड करू शकता, पण सर्व माहिती तुम्हाला दाखवण्यात येत नाही त्यामुळे जितकी आवश्यक तितकीच माहिती तुम्हाला पुरवण्यात येते आणी गुगलकडे तुमच्याबद्दल असलेली माहिती तुम्ही गुगलच्या पॉलिसीनुसार डिलीट करू शकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📡📲📡📲📡📲📡📲📡

०६ फेब्रुवारी २०१७

ह इश्क इश्क ...!

🍁*VALENTINE SPECIAL* 🍁

ये इश्क इष्क ये इश्क इश्क

हाये बन बन घूमी जनक दुलारी पहन के प्रेम का प्याला
और दर्शन जल की प्यासी मीरा पी गयी विष का प्याला
और फिर अरज करीलाज राखो राखोलाज राखो राखो
ये इश्क इश्क है इश्क इश्क

रामावरच्या प्रेमाची माळ गळ्यात घालून जनकनंदीनी रानावनात फिरते . कृष्ण दर्शनासाठी तहानलेली मीरा विषाचा प्याला देखील पिऊन जाते आणि मग विनवणी करते लाज राख माझी लाज राख ! कारण प्रेम हे प्रेमच असतं.

रामासारखाच वनवास भोगणारी सीता म्हणजे सरूपता आणि कृष्णात विलिन होण्यासाठी विषप्राशनाची शिक्षा भोगणारी मीरा हे साजुज्यतेचं उदाहरण आहे.

अल्लाह रसुल का परमान इश्क है
यानी हदीस इश्क है कुराण इश्क है

सर्वशक्तिमान परमेश्वर आणि त्याच्या प्रेषिताची आज्ञा म्हणजे प्रेम आहे म्हणजेच हदीस प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या जीवनप्रवासावर आधारित शिकवण आणि कुराण म्हणजे प्रेम आहे.

गौतम का और मसीह का अरमान इश्क है
ये कायनात जिस्म है और जान इश्क है

तथागत गौतम बुद्ध आणि येशू मसिहा या दोघांचं इप्सित प्रेमच आहे. संपूर्ण विश्व (कायनात) शरीर आहे तर त्यात असलेला जीव (जान) प्रेम आहे.

इश्क सरमद इश्क ही मन्सूर है
इश्क मूसा इश्क कोह-ए-तूर है

प्रेम हे शाश्वत (सरमद) आहे , प्रेम हेच विजेता (मन्सूर सुफी संताचे नाव) आहे. प्रेम हेच मूसा (इज्रायली यहुदी प्रेषित) आहेत. प्रेम हेच (कोह -ए -तूर ) तूर चा पर्वत आहे. (या पर्वतावर प्रेषित मूसाना परमेश्वरानं दहा धर्माज्ञा आणि तोराह हा धर्मग्रंथ सांगीतला. )

खाक को बुत और बुत को देवता करते है
इश्क इंतिहा ये है के बन्दे को खुदा करता है इश्क
यह इश्क इश्क है इश्क इश्क...!

प्रेम हेच मातीला खाक मुर्ती (बुत) आणि मुर्तीला देवता करतं आणि याचं प्रेमाची इंतिहा(पराकाष्टा) म्हणजे भक्ताला देवत्व प्राप्त करते.
भक्त परमेश्वरात विलिन होतो. हिच ती साजुज्यता. ती प्राप्त करण्याचं कारणच हे प्रेम आहे, हेच प्रेम आहे , हे प्रेमच आहे , हे प्रेमच आहे.

                  संकलन & टायपींग by सतीश मोरे

      🙏🏽 Visit my blog 🙏🏽
     

२९ डिसेंबर २०१६

लिंबू, मिरची आणि बिब्बा

🍋🌶🍋🌶🍋🌶🍋🌶🍋
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔺🙇🏻 मनातील प्रश्न...*

*◾लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली...?*
*🔺काय आहे नेमके कारण...?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल._
🔲🔲🔲

*🔺पण हे का? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.*

*🍋▪मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.*

*🌶▪त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात असे.*

*🍢▪बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई.*
🔲🔲🔲
_अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे. ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश...._
➖➖➖➖➖➖➖➖➖
🍋🌶🍋🌶🍋🌶🍋🌶🍋

२३ डिसेंबर २०१६

Passport बदल

📓🌎✈📓🌎✈📓🌎✈
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑ पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल, प्रक्रिया अधिक सोपी!*
➖➖➖➖➖➖➖➖➖
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. विशेषत: जन्म तारखेवरील वादावरुन अनेकदा पासपोर्ट मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र, परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे पासपोर्ट मिळण्यास अधिक सोपं जाणार आहे.
🔲🔲🔲

*🔺जन्म तारखेसंदर्भातील बदल :*

_पासपोर्ट नियम, 1980 नुसार, 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा या दिवसानंतर ज्यांचा जन्म झाला असेल, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणं बंधनकारक होतं. मात्र, नियमांमधील नव्या बदलानुसार, आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले आहेत, ज्यामुळे जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल._
🔲🔲🔲

*🔺जन्म तारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतंही एक कागदपत्र पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदार सादर करु शकतात :*

▪महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्म दाखला.
▪शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.
▪मात्र, प्रमाणपत्र देणारी शिक्षण संस्था शासन मान्यताप्राप्त असायला हवी.
▪पॅन कार्डआधार कार्ड/ई-आधार कार्डसर्व्हिस रेकॉर्ड (सरकारी नोकरदारांसाठी) किंवा पे पेन्शन ऑर्डर (निवृत्त सरकारी नोकरदार).
▪मात्र, हे कागदपत्र संबंधित संस्थेतील अधिकृत व्यक्तींकडून अटेस्टेड करुन घेणं गरजेचं असेल.
▪ड्रायव्हिंग लायसन्स
▪मतदान ओळखपत्र
▪एलआयसी पॉलिसी बाँड
🔲🔲🔲
 
*🔺पासपोर्ट बनवण्यासंदर्भात..*
*इतर महत्त्वाचे बदल :*

*_आई-वडिलांचं नाव, अनाथ मुलं, कुमारी माता इत्यादींसंदर्भातही परराष्ट्र खात्याने पासपोर्टच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. विशेषत: अनाथालयातील मुलांना याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असे. मात्र, नव्या नियमांनंतर त्यांनाही पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सोपी जाणार आहे._*
🔲🔲🔲
*_पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापुढे अर्जदार आपल्या नावासह आई किंवा वडील किंवा पालकांचं नाव देता येईल. म्हणजेच यातील कुणाही एकाचं नावही यापुढे ग्राह्य धरलं जाईल, आई-वडील अशा दोघांचीही नावं देण्याची गरज पडणार नाही. सिंगल पॅरेंट्स असलेल्यांना या बदललेल्या नियमाचा मोठा फायदा होणार आहे._*
🔲🔲🔲
▪पासपोर्टसाठी याआधी 15 अॅनेक्सेस असायचे, ते आता 15 वरुन 9 वर आणले आहेत. अॅनेक्सेस A, C, D, E, J आणि K काढून टाकण्यात आले आहेत.
▪सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: प्लेन पेपरवर लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
▪अर्जदाराला यापुढे अॅनेक्सेर K किंवा कोणतंही विवाह प्रमाणपत्र सादर करावं लागणार नाही.
▪जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला आपल्या घटस्फोटित पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही. किंबहुना, घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
▪अनाथ व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये केले आहेत. पासपोर्टसाठी अर्ज करताना अनाथ व्यक्तींना आपला जन्मदाखला सादर करण्याची गरज नाही. मात्र, अनाथालयाच्या मुख्य व्यक्तीचं त्यासंबंधी पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
▪दत्तक घेतलेल्या मुलांनाही पासपोर्टसाठी अर्ज करणं सोपं जाईल. दत्तक घेतल्याचं प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतलं आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
▪साधू, संन्यासी यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास, ते पालकांच्या जागी आपल्या अध्यत्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
▪सरकारी नोकरीत असलेल्यांना आता शासकीय सेवेत असल्याचं ओळख प्रमाणपत्र किंवा एनओसी न मिळाल्यास पासपोर्ट बनवण्यात अडथळे येणार नाहीत. कारण अॅनेक्सर- ‘N’ मध्ये अर्जराद स्वत: पत्र लिहून अर्जासोबत जोडू शकतो. या बदलामुळे आता तातडीने पासपोर्ट हवा असल्यास सरकारी नोकरीत असलेल्यांना अडचणी येणार नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📓🌎✈📓🌎✈📓🌎✈

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...