फॉलोअर

२४ मार्च २०२६

थांबता आलं पाहिजे


थांबता आलं पाहिजे,
योग्य वेळी, योग्य ठिकाणी,
कारण प्रत्येक धावणं जिंकण्यासाठी नसतं,
कधी थांबणंही जिंकण्यासारखंच असतं.

नाही म्हणायला शिकलं पाहिजे,
योग्य क्षणी, अयोग्य व्यक्तीला,
कारण आपल्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना
मर्यादा दाखवणंही गरजेचं असतं.

बोलता आलं पाहिजे,
योग्य ठिकाणी अन्यायाविरोधात,
कारण मौन कधी कधी सहमती ठरते,
आणि आवाजच बदलाची सुरुवात असते.

शांत राहता आलं पाहिजे,
योग्य क्षणी, संयमाच्या वेळी,
कारण प्रत्येक उत्तर शब्दांत नसतं,
कधी शांततेतही ताकद असते.

सोडता आलं पाहिजे,
कधी कधी आपल्यानाही,
कारण नात्यांपेक्षा स्वतःची शांती
जास्त महत्त्वाची असते.

विसरायला हवं,
जे आपले नाहीत त्यांना,
कारण आठवणींमध्ये अडकून राहणं
हीही एक वेदना असते.

@सतिताभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...