आकरावी बारावी शिक्षण सदगुरू गाडगे महाराज काॅलेज SGM मध्ये झाले. सगळे मित्र ग्रामीण भागातून आलेले. स्टाईल मारणारे काहीजण होते. एक दोघे दुचाकी वाहने घेऊन यायचे. पण बहुतांशी जण सायकल आणायचे. टिबल सीट सायकल जोरात चालवणे, हात सोडून सायकल चालवणे, ही आमची स्टाईल.
आम्ही बाहेर गावावरून येणारे कृष्णा कॅनाल वर उतरायचो, तेथून चालत काॅलेज मध्ये. कराड शहरातील पोरं तशी आमच्या काॅलेजात कमीच. कारण SGM म्हणजे डाऊन मार्केट, खेड्यातल्या पोरांचे काॅलेज. सगळे आमच्या काॅलेजला मठ म्हणून हिनवायचे.
आम्ही बाहेर गावावरून येणारे कृष्णा कॅनाल वर उतरायचो, तेथून चालत काॅलेज मध्ये. कराड शहरातील पोरं तशी आमच्या काॅलेजात कमीच. कारण SGM म्हणजे डाऊन मार्केट, खेड्यातल्या पोरांचे काॅलेज. सगळे आमच्या काॅलेजला मठ म्हणून हिनवायचे.
सदगुरू गाडगे महाराज काॅलेज म्हणजे आमचं विश्व होतं. त्यावेळी काॅलेजात एक कॅन्टीन होतं, पण तिथं आम्ही कमी जायचो. बाहेर एक चहाचे खोके होते. तिथं आम्ही मित्र चहा प्यायला जात होतो. खिशात पाच दहा रूपये असायचे. पण ते असणं पण मोठ्ठं होते. कधी कधी पैज लागायची, हरेल त्याने चहा क्रिमरोल द्यायचा. काय सांगू त्या चहा आणि क्रिमरोलला कसली भन्नाट टेस्ट यायची.
चांगले मित्र होते, टीचर तर एकदम बेस्ट.आम्ही अॅडमिशन घेतले तेव्हा पासूनच ओळख, कारण कोणते विषय ठेवायचे ते तेच सांगायचे. सर आणि विद्यार्थी याच्यामध्ये आदराचे नाते होते, घरी येणेजाणे व्हायचे. खेड्यातल्या पोरांना शिकवायला खेड्यातून आलेले शिक्षकच होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे हे काॅलेज असल्याने एक वेगळीच शिस्त होती.
आमचा मित्र परिवार वाढत होता कारण आमचा बोलण्याचा स्वभाव आणि ओळख काढण्याचा नाद. अशातूनच मित्राचा मित्र असलेला एक नवीन मित्र तयार झाला, विटा भागातला होता. त्याचे पुर्ण नाव आठवत नाही, पण निकम फक्त आठवतंय. तो मिलिटरी होस्टेल मध्ये रहायचा. होस्टेलची शिस्त कडक असलेने तिथे बाहेरच्या मुलांना क्वचित प्रसंगी प्रवेश मिळायचा.
एकदा दुपारी मी त्याच्या सोबत तिकडे गेलो होतो. आत प्रवेश केला, समोर मोठ्ठा आरसा होता. आठरावं वरीस आणि समोर आरसा दिसल्यावर काय होतं, हे सर्वश्रुत आहे. हे वय असं असतं की सारखं आरशात बघून मी कसा दिसतो, हे पाहण्याची उत्सुकता असते. थोडं मिसरूड फुटलेलं, त्यामुळे मी मोठ्ठा झालो असे वाटू लागते. सारखा कंगवा आणि आरसा. एकडून तिकडून आलं की आरसा बघायचा, तोंड धुवायचे, पावडर लावायची, भाग पाडायचा, हे TEEN AGE काॅलेजकुमाराचे आवडते काम.
मिलिटरी होस्टेल मधील तो आरसा पाहून खिशात हात घातला, कंगवा काढला आणि स्टाईल मध्ये भाग पाडू लागलो. तेवढ्यात सिक्युरिटी गार्डचा आवाज आला,
अ काॅलेजकुमार, जरा दमानं, आरसा फुटंल. भांग पाडा आणि मग आरशावर काय लिहलंय ते ही वाचा,
त्यानी दम भरला.
त्यानी दम भरला.
इतक्या वेळ फक्त आरशात बघत होतो, आता आरशाकडे पाहीले,
वरच्या बाजूला सुंदर अक्षरात लिहिले होते,
वरच्या बाजूला सुंदर अक्षरात लिहिले होते,
' तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे आहात याचा विचार करा.'
थोडं डोकं हललं. विचार केला, विचार करण्याचं वय होते ते. एक छोटं वाक्य होतं ते. पण अर्थ खुप मोठा होता. सुंदर दिसण्यासाठी सगळेच आटापिटा करतात, पण आतून सुंदर दिसावे, खुलावे,आंतरिक सौंदर्य वाढवावे, यासाठी कोण प्रयत्न करते का? तो प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे , किती सोप्या शब्दात सांगितले होते.
![]() |
| सेल्फी अशी प्रसन्न असावी |
आज हे आठवायचे कारण म्हणजे आजकाल वाढलेले सेल्फीचे वेड. माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे, तो पण सारखा सेल्फी काढत असतो. त्याला पाहून मला मिलिटरी होस्टेल वरचा तो आरसा डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या बहुतेक जणांकडे ANDROID मोबाईल आहे. पाच ते बारा पिक्सल कॅमेरा त्यामध्ये आहे. दिवसभर एक सेल्फी काढत नाही , असा काॅलेजकुमार आढळणे अवघड आहे. काढला सेल्फी, टाकला ग्रुपवर. मित्रमंडळीना केला शेअर फेसबुकवर, व्हाॅटस अपवर, हाईकवर !
आता तर सेल्फी स्टीकपण आली आहे. इतके फोटो काढतात, शेअर करतात,
पण कुणीतरी मी कसा दिसतो त्यापेक्षा मी कसा आहे, हा विचार केला आहे का?
त्यांना असा विचार करा म्हणून सांगणारे भेटतात का ?
दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ? किती गोष्टी मनासारख्या केल्या? किती मनापासून केल्या? मनाविरुद्ध केल्या? कोणाकोणाच्या चेह-यावर हसू आणले ? काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी.!
थोर तत्त्ववेत्ते राॅबीन सिंग म्हणतात,
आपण रोज किमान एकातरी अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसले पाहिजे .
आपण रोज किमान एकातरी अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसले पाहिजे .
अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसल्यावर वेगळा आनंद मिळतो. आपण आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडे तरी बघून हसतो का कधी? खोटं हास्य आणून सेल्फी काढतो तेव्हा आपणास आनंद मिळतो का? मिळाला तर तो आनंद किती काळ टिकतो? स्वतः आनंदी होण्यासाठी दुसराही आनंदी असायला हवा, असा आपण का विचार करत नाही. सेल्फी मुळे आनंद मिळतो, जर तो मिळाला नाही तर काय होईल, काहीच नाही !
स्वतःचा चेहरा जपतो, मग विचार का जपत नाही ?
सेल्फी म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे आपले खरे रूप नव्हे.
आपलं खरं रूप, अंतरंग आपल्या इतकं कुणालाही माहीत नाही.
आपण आपल्या आतील मनाला विचारले तर आपल्या इतके वाईट कोणी नाही ,
मी हे चुकीचे केले आहे, असं करायला नको होतं,
हे आपल्या लक्षात येईल .
सेल्फी म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे आपले खरे रूप नव्हे.
आपलं खरं रूप, अंतरंग आपल्या इतकं कुणालाही माहीत नाही.
आपण आपल्या आतील मनाला विचारले तर आपल्या इतके वाईट कोणी नाही ,
मी हे चुकीचे केले आहे, असं करायला नको होतं,
हे आपल्या लक्षात येईल .
संत कबीर म्हणतात,
बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना
मुझसे बुरा न कोई !
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना
मुझसे बुरा न कोई !
सेल्फी हे आपले अंतरंग व्हायला हवे. आपल्या चेहर्याकडे पहिल्यावर आपल्याला आनंद झाला पाहिजे .
रात्री झोपताना या सर्वांचा विचार करायला हवा.
आज दिवसभरात जे चुकले ते उद्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आणि
आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करेन.
रात्री झोपताना या सर्वांचा विचार करायला हवा.
आज दिवसभरात जे चुकले ते उद्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आणि
आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करेन.
चेहर्याच्या सेल्फी पेक्षा अंतरंगाचा आनंद महत्वाचा , होय ना ?






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा