फॉलोअर

०१ एप्रिल २०१६

विचारांच्या सुक्ष्म लहरी

विचारांच्या सुक्ष्म लहरी

सदगुरू वामनराव पै म्हणतात,
विचार म्हणजे बह्रीमन आणि  अंतर्मन यांना जोडणारा दुवा.
आयुष्यात प्रत्येक वेळी, क्षणी मनुष्य विचार करत असतो.
जीवन म्हणजे विचार . Life is only thinking .
माणुस हा विचार करणारा प्राणी हे खरे नसून विचार करतो तोच माणूस ,
चैतन्य शक्तीचा अविष्कार म्हणजे विचार.
विचार मनातून नव्हे बाहेरून येतात, बहीर्मनात पोहचतात,
घोळतात मग अंतर्मनात पोहचतात.
नशीब विचारातून घडते, माणसाचे जीवन त्याचे विचार आहेत तसे घडत असते.
सतत एक विषय घोळणे म्हणजे चिंतन.  आपण  शुभ चिंतन व अशुभ दोन्ही प्रकारचे चिंतन करतो. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करणे सामर्थ्य चिंतनात आहे.
उद्याची चिंता करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे.
चिंता करून दुख कमी होत नाही.
  सुविचार प्रात्यक्षिक करा,पहायला शिका. मनातल्या विचाराची संख्या कमी होते.
विचार ओळखायला शिका. वाईट विचार  झटकून कामाला लागा.
शरीराला लागलेला रोग बरा होण्यासाठी दवाखान्यात उपचार घेतो.
आजार, रोग काढायची जेवढी काळजी घेता तितकी विचार करत असताना करा. विचार वळवायला शिका. त्यासाठी संगत महत्वपूर्ण भूमिका निभावते. 
प्रयत्न पुर्वक चांगल्या विचारांच्या लोकांची सोबत करा.

  To get rid of poverty is to think prosperity
  You should become master of your thoughts.
शुभ विचारांची प्रतिष्ठापणा करा,शुभ विचार दिव्य विचार करण्याची सवय लावा.
सुंदर विचाराची जोपासना हीच खरी उपासना.
आत्मलिंगावर शुभ विचाराचा अभिषेक करा.
विचाराचे स्पंदन vibrations एकमेकांपर्यत पोहचतात.
विचार लहरी किती महत्वाच्या आहेत हे समजण्यासाठी
सदगुरू राजा आणि वखारवाला दुकानदार गोष्ट सांगायचे.
ती गोष्ट ऐकलीच पाहिजे.

🎈🎈राजा आणि वखार दुकानदार   🎈🎈
एक न्यायी, जनप्रिय राजा होता. त्याच्या राज्यात जनता सुखी समाधानी होती. राजाला नगरीत फिरायची खुप आवड होती. महीन्यातून एकदा राजा राजधानीत फेरफटका मारायला जात असे. राजाकडे पाहून लोक नमस्कार करत,राजा त्यांची चौकशी करत. लोकाचे समाधानी चेहरे पाहून राजाला आनंद होत असे.
हमरस्त्याच्या कोपर्‍यावर एक लाकडाची वखार  होती. या दुकानाजवळ आले की त्या दुकानदाराकडे पाहून राजाला नेहमी खुप राग येत होता. राजाने खुप विचार केला, असे का होतय पण त्याला रागाचे कारण कळत नव्हते. इतर कोणाकडेही पाहीले तर राग येत नाही, फक्त त्या दुकानदाराकडे पाहून संताप का येतो ?
त्याला थोबाड मारावी अशी इच्छा का होती? याचे कारण काय राजाला उमगत नव्हते.
अखेर राजाने न राहून प्रधानजीच्या कानावर ही गोष्ट घातली.  प्रधानजीने हा शोध लावण्यासाठी वेषांतर करून त्या दुकानाशेजारी दुकान थाटले. काही दिवसांत ते दोघे मित्र बनले. एके दिवशी नेहमी प्रमाणे राजाची स्वारी तेथे आली. राजाला पाहताच त्या दुकानदाराची चलबिचल सुरू झाली. प्रधानजीच्या ते लक्षात आले. त्यांनी दुकानदाराकडे राजाचा विषय काढून बोलणे सुरू केले.
त्रागा करून दुकानदार म्हणाला,
'राजा कधी मरणार कुणास ठाऊक ? जेव्हा हा राजा मरेल तेव्हा त्याला जाळायला अंत्यविधीसाठी राजवाड्यातील लोक माझ्या दुकानातील चंदनाची लाकडे नेतील. माझा चांगला धंदा होईल, बक्कळ फायदा होऊन मी श्रीमंत होईन '
दुकानदाराचे हे उत्तर ऐकून प्रधानजीना राजाच्या संतापाचे कारण उमगले.  दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, राजाविषयी वाईट चिंतन करत होता. त्या वाईट विचाराच्या लहरी राजापर्यत पोहचत होत्या आणि त्यामुळेच राजाला
त्या दुकानदाराकडे पाहून राग येत होता.
गोष्ट  इथे संपली. या मधून एक लक्षात घ्यायला हवे ,
आपण जे इतराविषयी शुभ अशुभ चिंतन, विचार करतो,
ते विचार सुक्ष्म लहरीच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यत पोहचतात
आणि त्यांच्या चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रिया उमटतात.
गोष्टीचा दुसरा भाग. ....
ही गोष्ट गुरूजींनी वर्गातील मुलांना ऐकवली आणि उद्या येताना हीच गोष्ट  सकारात्मक करून आणायला त्यांनी सांगितले.
लहान मुलांच्या मनात नेहमीच चांगले विचार  असतात. 
एका हुशार मुलाने अशी छान गोष्ट करून आणली.
जेव्हा जेव्हा तो राजा समोर आला तेव्हा दुकानदाराने एकच विचार केला,
राजा खुप मोठ्ठा होऊ दे. किर्तीवंत होऊ दे . राजाने अनेक वाडे बांधु दे.
राजाने चंदनाचा राजमहाल बांधु दे.
त्यासाठी माझ्या कडून लाकडे विकत घेऊन जाऊ दे,
मग मी खुप श्रीमंत होईन.
बघा, किती छान विचार केला त्या मुलाने.
उगीच  नाही आपण म्हणत.
लहान मुले ही देवाघरची फुले असतात.
                           ........सतीश मोरे
महत्वाचे....
उद्या शनिवार कविता डे.
रविवार सुट्टी.

सोमवार सोशल प्रितिसंगम.
मंगळवारी वाचा.... विचारांची क्रांती, माझ्या जीवनातील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...